फलटण, जिंती, दि.१४ : सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील जिंती गावची ३०० पेक्षा जास्त वर्षाची परंपरा असलेली श्री जितोबा देवाची ऐतिहासिक बगाड यात्रा गुलाल - खोबऱ्यांची उधळण करीत, "जितोबाच्या नावानं चांगभलं" च्या गजरात, भक्तीमय वातावरणात पार पडली.
ही ऐतिहासिक परंपरा सुमारे ३०० पेक्षा जास्त वर्षांपासून ग्रामस्थांनी भक्तिभावाने जोपासली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या या जिंती गावच्या ऐतिहासिक बगाड सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन, पुणे,सांगली, सातारा जिल्ह्यातुन हजारो भाविक भक्त उपस्थित होते.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
या जिंती गावच्या ऐतिहासिक बगाड यात्रा सोहळ्याचे जिंती ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या माध्यमातून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.
"महाराष्ट्रातील,सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध जिंती गावचा "असा" असतो ऐतिहासिक बगाड यात्रा सोहळा : -
सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील जिंती गावचा जितोबा देवाचा ऐतिहासिक बगाड यात्रेचा सोहळा पाच दिवस चालू असतो.
या ऐतिहासिक यात्रा सोहळ्यात पहिल्या दिवशी श्री जितोबा देवाचा व जोगेश्वरी देवीचा हळदी समारंभ संपन्न होतो.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
यानंतर दुसऱ्या दिवशी श्री जितोबा देवाचा व जोगेश्वरी देवीचा लग्न समारंभ पारंपरिक पद्धतीने, भक्तिमय वातावरणात संपन्न होतो.
या यात्रा सोहळ्यातील तिसरा दिवस यात्रेचा महत्त्वाचा दिवस श्री जितोबा देवाचे बगाड. या ऐतिहासिक बगाड सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक भक्त उपस्थित राहतात.
यात्रेच्या चौथ्या दिवशी श्री जितोबा देवाचा पहाटे चार वाजता छबिना भक्तिमय वातावरणात संपन्न होतो. त्या दिवशी चार वाजता कुस्तीचा आखाडा रंगतो.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पाचव्या दिवशी पाकाळणी होऊन अशा प्रकारे प्रसिद्ध जिंती गावची श्री जितोबा देवाची ऐतिहासिक बगाड यात्रा पार पडते.
ही ऐतिहासिक यात्रा पार पडत असताना श्री जितोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे ऐतिहासिक बगाड हे बगाड सोमवार, बुधवार ,आणि शनिवार या वारी होत नाही.
श्री जितोबा देवाची यात्रा चैत्र शुद्ध कालाष्टमीला सुरू होते. श्री जितोबा देवाच्या बगाडाच्या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे श्री जितोबा देवाच्या यात्रेत समाजातील सर्व घटकांना, अठरापगड जातीतील लोकांना मान असतो .
या ऐतिहासिक बगाड सोहळ्याची सुरुवात हराळी वैष्णव मठापासून म्हणजे हराळी समाजातील मठ म्हणजेच या लोकांचा एकत्रित देव्हारा होय. या देव्हाऱ्यासमोर श्री जितोबा देवाचे मानकरी, बगाडी यांना पोशाख परिधान करण्यात येतो.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
या पोशाखाचा मान "वाकी या गावातील भक्ताचा" असतो. यावेळेस जिंती गावातील सर्व लोक उपस्थित असतात.
श्री जितोबा देवाचे मानाचे बगाडी यांना पोशाख झाल्यावर गोसावी समाजाचे लोक नातपंथाचे पद म्हणतात. यानंतर बगाडी पालात ढोल - ताशांच्या गजरामध्ये श्री जितोबा देवाच्या मंदिराकडे मार्गस्थ होतात.
यावेळेस गुलालाची उधळण होते.हजारो भाविक भक्त हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात. यावेळी श्री जितोबा देवाचे मानाचे बगाडी श्री जितोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ होतात. श्री जितोबा देवाचे दर्शन झाल्यानंतर श्री जितोबा मंदिरा मधील दीपमाळेचे दर्शन घेऊन श्री जितोबा देवाचे बगाडी बगाडाकडे प्रस्थान करतात.
हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्त उपस्थित असतात. श्री जितोबा देवाचे बगाडी बगाडावर गेल्यावर श्री जितोबा मंदिराकडे तोंड असते या वेळेस श्री जितोबा देवाचे ऐतिहासिक, पारंपरिक बगाड सुरू झालेले असते. हा बगाड सोहळा 15 ते 20 मिनिटं सुरू असतो.
या ऐतिहासिक बगाड सोहळ्यात सनई, चौघड्याचा निनाद तसेच ढोल - ताश्या, बँड, आणि "जितोबाच्या नावानं चांगभलं" हा गजर सर्वत्र चालू असतो.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
या सोहळ्यात फटाक्यांची अतिषबाजी होते. या 15 ते 20 मिनिटांमध्ये श्री जितोबा देवाची भाकणूक यामध्ये ठरत असते. यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात.
हे ऐतिहासिक बगाड झाल्यानंतर बगाडी बगाडावरून आपले अंग पूर्णपणे मागे टाकून देतात. यानंतर सर्व भक्त या बगाड्याला झेलतात यानंतर त्यांच्या पायावर पाणी टाकले जाते. यानंतर बगाड्याच्या कानामध्ये सनई वाजवून जागं केलं जातं. जागे झाल्यावर बगाडी ढोल, सनई चौघड्याच्या ताशामध्ये भक्तिमय वातावरणात खेळतात .खेळताना त्यांना स्नान घातले जाते .यानंतर श्री जितोबा देवाचा वर्षभराचा पारंपरिक भाकणूक सोहळा संपन्न होतो.
ही पारंपरिक भाकणूक झाल्यावर किरणाच्या जागेचा रस्ता मोकळा करण्यात येतो. किरण म्हणजे श्री जितोबा मंदिरासमोर बगाडी मानकऱ्याकडून गोल उडी मारली जाते. यानंतर बगाडी पारंपरिक मठाकडे प्रस्थान करतात. अशा प्रकारे हा जिंती गावचा ऐतिहासिक यात्रा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होतो.
"महाराष्ट्रातील प्रसिद्ध अश्या आमच्या जिंती गावच्या ऐतिहासिक बगाड यात्रेला ३०० पेक्षा जास्त वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक - भक्त आमच्या जिंती गावच्या ऐतिहासिक बगाड यात्रेसाठी उपस्थित राहतात. जिंती ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या माध्यमातून या ऐतिहासिक बगाड यात्रा सोहळ्याचे चांगले नियोजन केले जाते." अशी प्रतिक्रिया जिंती गावचे ग्रामस्थ, भक्त दिपक रणवरे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने जोडणारी ही जिंती गावची ऐतिहासिक बगाड यात्रा भक्तीचा वारसा समृद्ध करते.