बारामती,दि.१३ : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील नामांकित आणि महाराष्ट्रात उसाला उच्चांकी दर देणारा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने इतिहास घडवत सर्वच्या सर्व २१ जागांवर एकतर्फी व दणदणीत विजय मिळवला आहे. लोकनेते अजित पवार यांच्या कार्याला सभासदांनी भरघोस मतांनी कौल देऊन, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला महाविजय मिळवून दिला.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान पार पडले.या निवडणुकीत अत्यंत चुरस पाहायला मिळाली असून तब्बल ८४.२५ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. मतमोजणी सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुरू झाली व त्याच दिवशी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील 'श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल'ने सर्वच्या सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळवला.
"सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बंडखोरी करून पक्षाच्या विरोधात स्वतंत्र पॅनेल उभा करून देखील बारामतीच्या सहकारातील रणरागिणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचारात घेतलेली मेहनत, प्रतिकूल परिस्थितीमधील लढाऊ वृत्ती, लोकनेते अजित पवार यांनी बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले मोठे कार्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम संघटन, निष्ठावंत कार्यकर्ते व नेत्यांचा उत्तम प्रचार, शेतकरी सभासदांना दिलेला विश्वास, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील, सहकार क्षेत्रातील मोठ्या नेत्याने बंड करून, मोठे आव्हान निर्माण करून देखील, खचून न जाता, त्या लढल्या आणि त्यांच्या नेतृत्वावरती शेतकरी सभासदांनी विश्वास ठेवून फार मोठा विजय मिळवून दिला."
विरोधकांच्या सर्वच्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने २१-० असा दणदणीत विजय मिळवून सोमेश्वर कारखान्यावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित राखले आहे.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार’ पॅनेलच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडखोरी करणारे पुरुषोत्तम जगताप आणि पुरंदर - हवेलीचे मा. आमदार, भाजप नेते संजय जगताप यांचे ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (युगेंद्र पवार समर्थित) ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ यांच्यात तिरंगी सामना रंगला होता. परंतु, सभासदांनी पुन्हा एकदा लोकनेते अजित पवार यांच्या विकासकामांवर आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास दाखवत विरोधकांना पार धुळ चारली.
"सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप 13 वर्ष कारखान्याचे चेअरमन पदावरती उत्तम काम करत होते व 34 वर्षांपासून संचालक म्हणून या कारखान्यावरती कार्यरत होते. लोकनेते अजित पवारांची भक्कम साथ व मार्गदर्शन, सहकारातील दांडगा अनुभव, उत्तम प्रशासक, चांगले नेतृत्व यामुळेच पुरुषोत्तम जगताप यांना लोकनेते अजित पवार यांनी चेअरमनपदाची अनेक वर्ष संधी दिली. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरची सहकारातली ही पहिलीच निवडणूक होती. लोकनेते अजित पवार यांच्या विश्वासू शिलेदाराने बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल विरोधात स्वतंत्र पॅनल उभा करून निवडणूक लढवलेली शेतकरी सभासदांना आजिबात आवडली नाही. त्यामुळे पुरुषोत्तम जगताप गटाच्या लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलचा दारुण पराभव झाला हे निकालावरून स्पष्ट दिसून येते."
बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल अत्यंत नाट्यमय आणि महत्त्वपूर्ण ठरले आहेत. शेतकरी कृती समितीचे ज्येष्ठ नेते सतीश काकडे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या पॅनेलला या निवडणुकीत पाठिंबा दिल्याने चांगली मदत झाल्याचे दिसून आले.
दणदणीत विजय : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार’ पॅनेलने कारखान्याच्या सर्वच्या सर्व २१ पैकी २१ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. लोकनेते अजित पवार यांच्या विकास कार्याचा वारसा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व व मार्गदर्शन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचा निवडणुकीतील उत्तम प्रचार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम संघटन, खासदार पार्थ पवार व जय पवार यांनी प्रचारात घेतलेली मेहनत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी घेतलेले कष्ट व निवडणुकीतील केलेला प्रभावशाली प्रचार व शेतकरी सभासदांचा विश्वास यामुळे या निवडणुकीत मोठा विजय मिळवता आला.
विरोधकांचा दारुण पराभव: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर नेते तथा कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल्सचे आव्हान होते, परंतु या निवडणुकीत विरोधकांचा सुपडासाफ झाला. विरोधकांना एकही जागा जिंकता आली नाही.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यावेळी पुरंदर तालुक्यातील राजकीय नेत्यांचा प्रचारादरम्यान प्रभाव दिसून आला. पुरंदर तालुक्यातील शेतकरी सभासदांनीही पुरुषोत्तम जगताप व मा. आमदार संजय जगताप यांच्या गटाला नाकारल्याचे निकालावरून दिसून येत आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पुरंदर - हवेलीचे मा. आमदार, भाजप नेते संजय जगताप यांनी या सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणूकीत खूप आक्रमकपणे प्रचार केलेला होता. भाजप नेते संजय जगताप यांची निवडणुकीतील प्रचारातील भाषणे खूप गाजली. पुरंदर - हवेलीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत दिलेली साथ महत्त्वाची ठरली. या निवडणुकीतील सांगता सभेतील आमदार विजय शिवतारे यांचे भाषण विरोधकांना चिमटे घेतल्यामुळे खूप गाजले. या निवडणुकीत शिवसेनेची एक जागा सुनेत्रा पवार यांच्या पॅनलमधून निवडून आल्यामुळे बारामती तालुक्याच्या सहकार क्षेत्रात शिवसेनेने प्रवेश केला. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सुदामआप्पा इंगळे व माणिकराव झेंडे यांनी देखील पुरुषोत्तम जगताप गटाच्या वतीने प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता. शेतकरी सभासदांनी लोकनेते अजित पवार यांच्या कार्यावरती व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनलला खूप मोठा विजय मिळवून दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी या निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या मदतीने जनसंपर्क वाढवून चांगला प्रचार केला. परंतु शेतकरी सभासदांनी युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेलला पूर्णपणे नाकारले. खासदार सुप्रिया सुळे प्रचारात कुठेच दिसल्या नाहीत.
अतिशय चुरशीचे मतदान: या निवडणुकीसाठी रविवारी (११ ऑक्टोबर २०२६) सभासदांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त (सुमारे ८४%) विक्रमी मतदान केले होते.
पहिला कौल आणि विजयी सलामी : मतमोजणीची सुरुवात माळेगाव (अजिंठा बँक्वेट हॉल) येथे झाली. ब वर्ग गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलचे उमेदवार संग्राम सोरटे यांनी दणदणीत विजय मिळवून सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलचे खाते उघडले होते. यानंतर अ गटातील सर्वसाधारण व इतर गटांमध्येही याच पॅनेलच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
राजकीय महत्त्व : बारामतीमधील सहकार क्षेत्रावर आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवण्याच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीच्या संपूर्ण निकालामुळे बारामती तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्राबल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत विरोधकांनी लक्ष्मी दर्शन झाल्याचा आरोप केला असला तरी या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झाली नाही. कुठल्याही निवडणुकीत पैशांचा गैरवापर करणे चुकीचे आहे. निवडणुकीत गैरप्रकार करणाऱ्या दोषींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील गटनिहाय विजयी उमेदवार आणि मिळालेली एकूण मते :
१) निंबूत - खंडाळा गट क्रमांक 1 :
1)अभिजीत सतीश काकडे – १४,०४९ मते (विजयी)
2)प्रमोद भगवानराव काकडे – १४,९८१ मते (विजयी)
3)डॉ. वसंतराव रामराव दगडे – १३,९९९ मते (विजयी)
या गटातून पराभूत प्रतिस्पर्धी "लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल" - पुरुषोत्तम जगताप गटाच्या महेंद्र काकडे यांना ६,२९२ मते मिळाली. संतोष गायकवाड यांना ५,६१७ मते मिळाली. संभाजी घाडगे यांना ५,४७५ मते मिळाली. तर "श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल" - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दत्ताजीराव चव्हाण यांना २,५८२ मते मिळाली. शंभुराजे काकडे यांना १,८९८ मते मिळाली. सुभाष कोळेकर यांना १,८४८ मते मिळाली.
२) मुरुम - वाल्हा गट क्रमांक 2 :
1)विक्रम आनंदराव भोसले – १३,८५४ मते (विजयी)
2)ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड – १३,९४१ मते (विजयी)
3)राजवर्धन शिवाजीराव शिंदे – १४,०१५ मते (विजयी)
या गटातून पराभूत प्रतिस्पर्धी "लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलचे" - सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना ७,३६४ मते मिळाली असून त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सतीश सकुंडे यांना ५,५६८ मते मिळाली. वैभव गायकवाड यांना ६,१६८ मते मिळाली. तर "श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल" - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संदीप चव्हाण यांना १,७६५मते मिळाली. राजेंद्रकुमार जगताप यांना १,७३६ मते मिळाली. प्रवीण भोसले यांना २,१३७ मते मिळाली.
३) होळ - मोरगाव गट क्रमांक 3 :
1)मकरंद सस्ते – १४,३१६ मते (विजयी)
2)मनिषा होळकर – १४,२२६ मते (विजयी)
3)रवींद्र भापकर – १२,०७५ मते (विजयी)
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
या गटातून पराभूत प्रतिस्पर्धी "लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल" - पुरुषोत्तम जगताप गटाचे अमर होळकर यांना ५,७७९ मते मिळाली. राहुल भापकर यांना ६,०१३ मते मिळाली. संतोष दरेकर यांना ५,०७० मते मिळाली. तर "श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल" - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुनिता कारंडे यांना १,७६३ मते मिळाली. दत्तात्रय ढोले यांना १,६८३ मते मिळाली. अनिलकुमार शहा यांना २,१३८ मते मिळाली.
४) कोऱ्हाळे - सुपा गट क्रमांक 4 :
1)राजेंद्र बोरकर – १३,८९६ मते (विजयी)
2)अक्षय खलाटे – १४,५०० मते (विजयी)
3)सुनील भगत – १३,७४६ मते (विजयी)
या गटातून पराभूत प्रतिस्पर्धी "लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल" - पुरुषोत्तम जगताप गटाचे सचिन खलाटे यांना ६,१४० मते मिळाली. गोरख खोमणे यांना ५,९११ मते मिळाली. अनिल जगताप यांना ५,५९५ मते मिळाली. तर "श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल" - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सतीश खोमणे यांना २,९२७ मते मिळाली. शिवराज पवार यांना १,७६० मते मिळाली. पोपट पानसरे यांना १,८५३ मते मिळाली.
५)मांडकी - जवळार्जुन गट :
1)सतीश संपत जगताप – १४,६४७ मते (विजयी)
2)उत्तम महादेव धुमाळ – १३,८७० मते (विजयी)
3)सुधाकर ज्ञानोबा टेकवडे – १३,८१९ मते (विजयी)
या गटातून पराभूत प्रतिस्पर्धी "लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल" - पुरुषोत्तम जगताप गटाचे विश्वास जगताप यांना ६,२५३ मते मिळाली. शामराव धुमाळ यांना ५,८९१ मते मिळाली. अरविंद शेंडकर यांना ५,४१९ मते मिळाली. तर "श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल" - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अंकुश जगताप यांना २,२१४ मते मिळाली. संतोष जगताप यांना २,००२ मते मिळाली. संदीप देवकर यांना २,११४ मते मिळाली.
राखीव व विशेष प्रवर्गातील विजयी उमेदवार :
महिला राखीव प्रतिनिधी (अ वर्ग) :
1)प्रणिता मनोज खोमणे – १४,३५६ मते (विजयी)
2)छबुबाई अंकुश नाझिरकर – १३,५८३ मते (विजयी)
या महिला राखीव प्रतिनिधी वर्गातून पराभूत प्रतिस्पर्धी "लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल" - पुरुषोत्तम जगताप गटाच्या मंजिरी निगडे यांना ५,७८८ मते मिळाली. वंदना गरुड यांना ५,८४५ मते मिळाली. तर "श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल" - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मैत्रयी काकडे यांना २,४८७ मते मिळाली. सुरेखा गायकवाड यांना १,७३४ मते मिळाली.
इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रतिनिधी :
1) शैलेंद्र पंढरीनाथ रासकर – १४,५७७ मते (विजयी)
या इतर मागासवर्गीय प्रतिनिधी विभागातून पराभूत प्रतिस्पर्धी "लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल" - पुरुषोत्तम जगताप गटाचे निलेश केदारी यांना ६,१३५ मते मिळाली. तर "श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल" - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हर्षद होळकर यांना १,९७९ मते मिळाली.
अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी :
1)द्वारकोजीराव गुलाब साळवे – १४,०६४ मते (विजयी)
या अनुसूचित जाती - जमाती प्रतिनिधी विभागातून पराभूत प्रतिस्पर्धी "लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल" - पुरुषोत्तम जगताप गटाचे मिलिंद कांबळे यांना ६,१८२ मते मिळाली. तर "श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल" - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गोविंद पवार यांना २,१४१ मते मिळाली.
'ब' वर्ग (सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था) संस्था प्रतिनिधी :
1)संग्राम तानाजी सोरटे – ९३ मते (विजयी)
या ब वर्ग संस्था मतदारसंघात पराभूत प्रतिस्पर्धी "लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल" - पुरुषोत्तम जगताप गटाचे महेश राणे यांना ३६ मते मिळाली. तर अपक्ष असलेले प्रकाश जगताप यांना 1 मत मिळाले.
भटक्या विभक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी :
1)अशोक चंद्रकांत धायगुडे - १४,५४० मते (विजयी)
या भटक्या विभक्त जाती व जमाती, विशेष मागास मतदारसंघात पराभूत प्रतिस्पर्धी "लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल" - पुरुषोत्तम जगताप गटाचे धनंजय गडदरे यांना ६,१४४ मते मिळाली. तर "श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल" - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोमनाथ मदने यांना १,७९८ मते मिळाली.
लोकनेते अजित पवार नेतृत्वाचा विजयोत्सव! :
निकालाची अधिकृत घोषणा होताच सोमेश्वर परिसर आणि बारामती तालुक्यात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत, आनंद साजरा केला. लोकनेते अजितदादा पवार यांचे आशीर्वाद व कार्य, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व, खासदार पार्थ पवार व जय पवार यांनी केलेला उत्तम प्रचार, शेतकरी सभासदांचा विश्वास, कारखान्याचा पारदर्शक कारभार, सभासदांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका आणि अजितदादांचा विकासाचा वारसा पुढे घेऊन जाणारे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी यामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला," अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
"श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (२०२६-३१) 'श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल'ने मिळवलेला विजय हा सभासदांनी अजितदादांच्या कार्यावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. अजितदादांनी ३४ वर्षे कारखान्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी योगदान दिले. त्यांच्या विचारांवर चालून ही स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. या विजयाबद्दल सर्व सभासदांचे आभार मानून, सभासदांचे हित आणि कारखान्याची प्रगती साधण्यासाठी नवीन नेतृत्व कटिबद्ध राहील" अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली."
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल सहकार व राजकीय क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ ने कारखान्याच्या सर्वच्या सर्व २१ जागांवर निर्विवाद आणि दणदणीत विजय मिळवला.
तिरंगी लढत आणि मतदानाची टक्केवारी: या निवडणुकीत तब्बल ८४.२५ टक्के मतदान झाले होते. मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, पुरुषोत्तम जगताप व पुरंदर हवेलीचे मा. आमदार, भाजप नेते संजय जगताप यांचे ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट (युगेंद्र पवार समर्थित) ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ यांच्यात तिरंगी सामना होता. परंतु, निकालात विरोधी पॅनेल्सचा मोठा पराभव झाला.
मतांचे अंतर : विजयी पॅनेलच्या प्रत्येक उमेदवाराने सरासरी १३,५०० ते १४,६०० मते मिळवली, तर प्रमुख विरोधी उमेदवारांना (विशेषतः पुरुषोत्तम जगताप गटाला) ५,५०० ते ७,४०० च्या दरम्यान मते मिळाली. यामुळे विजयाचे मताधिक्य प्रचंड मोठे असल्याचे स्पष्ट होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर आणि प्रभावावर शिक्कामोर्तब :
ही निवडणूक सुनेत्रा पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे होती. पक्षातील किंवा स्थानिक पातळीवरील बंडखोरी मोडून काढत त्यांनी आपल्या राजकीय नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ३४ वर्षांहून अधिक काळ चाललेल्या सहकार क्षेत्रातील वचर्स्वाचा वारसा आणि विचार आजही बारामती तालुक्यात आणि विशेषतः सोमेश्वरच्या सभासदांमध्ये किती घट्ट रुजलेला आहे, याची प्रचिती या २१-० च्या निकालाने दिली.
बंडखोरीचा पराभव आणि राजकीय संदेश :
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी मुख्य प्रवाहाला विरोध करत आणि स्वंतत्र पॅनेल स्थापन करत उघडपणे आव्हान दिले होते. त्यांच्या या भूमिकाला शेतकरी सभासदाने संपूर्णपणे नाकारले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
महाराष्ट्रात ऊसाला उच्चांकी दर देणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुरुम-वाल्हा गटातून निवडणूक लढवणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना ७,३६४ मते मिळाली, मात्र प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विक्रम भोसले यांनी १३,८५४ मते मिळवून सोमेश्वर साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा तब्बल ६,४९० मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करून, जायंट किलर ठरले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे 13 वर्ष अध्यक्ष, 34 वर्ष संचालक, सहकारातला दांडगा अनुभव असणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांचा पराभव करून विक्रम भोसले यांनी मोठी राजकीय झेप घेतली.
सहकार क्षेत्रात दीर्घकाळ महत्त्वाची पदे भूषवलेल्या नेत्याला झालेला हा पराभव भविष्यातील राजकारणासाठी मोठा संदेश मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट / युवा नेते युगेंद्र पवार यांच्या पॅनेलला मर्यादा :
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर बारामती तालुक्यात बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने (युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून) ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ उभे करून आपली ताकद तपासण्याचा प्रयत्न केला.
परंतु, या निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवारांना बहुतांश ठिकाणी दोन हजारांच्या आसपासच मते मिळाली. यामुळे कारखान्याच्या स्थानिक सभासदांनी राजकीय पक्षांच्या ध्रुवीकरणापेक्षा कारखान्याची आर्थिक सुदृढता, ऊस बिल वेळेत मिळणे आणि प्रस्थापित सहकारातील स्थैर्याला प्राधान्य दिल्याचे यातून दिसून येते.
सहकार आणि ग्रामीण अर्थकारणावर पकड :
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा बारामती तालुक्याच्या दक्षिण भागातील ग्रामीण अर्थकारणाचा कणा मानला जातो. मतमोजणीची प्रक्रिया ९३ टेबलांवर आणि ४५० कर्मचाऱ्यांमार्फत अत्यंत व्यवस्थित पार पडली.
पहिल्या निकालापासूनच (ब वर्ग गटातून संग्राम सोरटे यांच्या विजयापासून) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जे मताधिक्य घेतले, ते शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिले. मतपत्रिकांवरील अनेक नावांच्या गोंधळातही सभासदांनी अत्यंत स्पष्ट कौल देत पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले.
सोमेश्वर साखर कारखान्याची ही निवडणूक केवळ संचालक मंडळ निवडण्यापुरती मर्यादित नसून ती बारामतीच्या सहकार क्षेत्रावरील राजकीय वर्चस्वाचा कौल ठरली. विरोधकांची सर्व ताकद आणि कंबर कसून केलेले प्रयत्न निष्प्रभ करत ‘अजितदादांचे सहकार क्षेत्रातील मॉडेल आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोट’ अजूनही किती भक्कम आहे, याचे स्पष्ट दर्शन या निकालाने घडवले आहे.
बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासात देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खूप मोठे योगदान आहे. देशातील आदर्श बारामती तालुका बनवण्यासाठी लोकनेते अजित पवार यांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. बारामतीचे सर्वांगीण विकासातील लोकनेते अजित पवारांचे योगदान बारामतीची जनता कधीच विसरणार नाही.