पुणे,दि.15 : "होलिस्टिक माइंड एम्पॉवरमेंट अर्थात समग्र मानवी विकास" ही सकारात्मक संकल्पना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या अद्वैत माईंड वेल्थ अकॅडमीच्या नवीन बावधन शाखेचे भव्य आणि दिमाखदार उद्घाटन नुकतेच (दि. १२ जुलै २०२६) अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील सर्व घटकांच्या मानसिक, बौद्धिक, आर्थिक तसेच आध्यात्मिक विकासासाठी ही संस्था वैज्ञानिक व अनुभवाधारित प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहे.
या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात ज्योती मेहता यांच्या 'णमोकार मंत्र' पठणाने झाली. यामुळे संपूर्ण सभागृहात एक अत्यंत सकारात्मक आणि पवित्र ऊर्जा निर्माण झाली.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
मान्यवरांची मांदियाळी अन् भरभरून शुभेच्छा :
अद्वैत माईंड - हेल्थ अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहरातील लोकप्रिय नगरसेवक दिलीप अण्णा वेडे पाटील उपस्थित होते. त्यांच्या सोबतच समाजातील विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.या खास कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये डॉ. विद्या डागा, डॉ. प्रवीण कासार, संदीप श्रीधर काळभोर, मनोज खंदारे, वरिष्ठ पत्रकार अजित जगताप, सिताराम कडू पाटील, रोहन कडू पाटील, दिनेश भागीनकर, ॲड. संपत फड, गणेश शांताराम काटकर, शंकर शांताराम काटकर, उल्हास खुटवड, दिलीप काटकर, अरुण खैरनार, प्राचार्या जानवी आजोटीकर, धन्यकुमार कस्तुरे, विजयकुमार लुंगाडे, विनोद काटकर यांचा समावेश होता.
अद्वैत माईंड -वेल्थ ॲकॅडमी या संस्थेच्या आधारस्तंभ, प्रेरणास्थान व मार्गदर्शक इंदुमती रणदिवे, इंदुबाई काटकर आणि विजया कस्तुरे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. महाराष्ट्रात आरोग्य विमा क्षेत्रात मोठी कामगिरी करणारे प्रसिद्ध अधिकारी अविनाश रणदिवे यांच्या जडणघडणीमध्ये, प्रगतशील वाटचालीमध्ये त्यांच्या मातोश्री इंदुमती रणदिवे यांचे खूप मोठे योगदान आहे.
अकॅडमीच्या दोन शाखांविषयी माहिती :
अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमीच्या सध्या पुण्यात दोन प्रमुख शाखा कार्यरत आहेत :
1. सदाशिव पेठ शाखा: सोबा टॉवर, A-102, सदाशिव पेठ, पुणे.
2. बावधन शाखा (नवीन): ट्रायडेंट प्लाझा, युनियन बँकेसमोर, पहिला मजला, बावधन, पुणे.
मानसिक, आध्यात्मिक आणि व्यक्तिमत्व विकास हे तीनही घटक मानवी जीवनाचे प्रमुख स्तंभ आहेत. हे तिन्ही क्षेत्रे एकमेकांशी अत्यंत घट्ट जोडलेली आहेत. जेव्हा या तिन्ही क्षेत्रांचा समतोल साधला जातो, तेव्हाच व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो आणि एक समृद्ध, आनंदी जीवन जगता येते.
या तिन्ही क्षेत्रांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे :
१. मानसिक विकास (Mental/Emotional Development) :
मानसिक विकास म्हणजे आपल्या विचारांवर, भावनांवर आणि वर्तनावर नियंत्रण मिळवण्याची आणि परिपक्वता आणण्याची क्षमता. आपण संकटांना कसे सामोरे जातो आणि तणावाचे व्यवस्थापन कसे करतो, हे मानसिक आरोग्यावर अवलंबून असते.
महत्त्वाचे पैलू :
भावनांचे व्यवस्थापन (Emotional Intelligence) : राग, भीती, दुःखासारख्या भावना ओळखून त्या योग्य मार्गाने व्यक्त करणे.
सकारात्मक विचारसरणी (Positive Thinking) : कठीण परिस्थितीतही आशेचा दृष्टिकोन ठेवणे आणि नकारात्मकतेपासून दूर राहणे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
तणाव व्यवस्थापन (Stress Management) : दैनंदिन आयुष्यातील चिंता, कामाचा ताण आणि दबाव यांना योग्य प्रकारे हाताळणे.
निर्णय क्षमता (Decision Making) : प्रसंगावधान राखून विचारांती योग्य आणि ठाम निर्णय घेणे.
मानसिक विकासासाठी उपाय :
1)दैनंदिन आयुष्यात मेडिटेशन (ध्यान) आणि प्राणायाम करणे.
2)रात्री पुरेशी आणि गाढ झोप घेणे.
3)भावना व्यक्त करण्यासाठी डायरी/जर्नल लिहिणे.
4)नकारात्मक विचार आणि लोकांपासून अंतर ठेवणे.
२. आध्यात्मिक विकास (Spiritual Development)
आध्यात्मिक विकास म्हणजे केवळ धर्म किंवा कर्मकांड नव्हे, तर "मी कोण आहे?" आणि "माझ्या आयुष्याचा उद्देश काय आहे?" या प्रश्नांचा शोध घेणे. स्वतःशी, इतरांशी आणि या निसर्गाशी अंतर्मनातून जोडले जाणे म्हणजेच आध्यात्मिक समृद्धी होय.
महत्त्वाचे पैलू :
आत्मपरीक्षण (Self-Awareness) : स्वतःचे गुण, दोष, मूल्ये आणि वासना यांचे तटस्थपणे निरीक्षण करणे.
कृतज्ञता भाव (Gratitude) : आपल्याकडे जे आहे त्याबद्दल निसर्गाचे किंवा देवाचे आभार मानणे.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
सहानुभूती आणि करुणा (Empathy & Compassion) : इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवणे आणि त्यांना मदत करण्याची वृत्ती असणे.
आंतरिक शांती (Inner Peace) : भौतिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन मनामध्ये स्थिर आणि शांत राहणे.
आध्यात्मिक विकासासाठी उपाय :
1)रोज काही वेळ शांत आणि एकांत वातावरणात घालवणे.
2)चांगल्या आणि विचारप्रवर्तक पुस्तकांचे वाचन करणे (उदा. भगवद्गीता, संतांचे विचार, तत्त्वज्ञान).
3)निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे.
4)कोणत्याही अपेक्षेशिवाय इतरांना मदत (निष्काम सेवा) करणे.
३. व्यक्तिमत्व विकास (Personality Development)
व्यक्तिमत्व विकास म्हणजे स्वतःतील कौशल्यांचा, बाह्य रूपाचा आणि आंतरिक गुणांचा असा विकास करणे, ज्यामुळे समाजात तुमची एक वेगळी, प्रभावी आणि आदरयुक्त ओळख निर्माण होईल.
महत्त्वाचे पैलू :
1)संवाद कौशल्य (Communication Skills) : आपले विचार स्पष्ट, नम्र आणि प्रभावीपणे इतरांसमोर मांडणे.
2)आत्मविश्वास (Self-Confidence) : स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असणे आणि नवीन आव्हाने स्विकारणे.
3)शरीरबोली (Body Language) : उठण्या-बसण्याची पद्धत, आय-काँटॅक्ट (Eye Contact) आणि 4)चेहऱ्यावरील हावभाव सकारात्मक ठेवणे.
5)वेळेचे व्यवस्थापन (Time Management) : कामांचे नियोजन करून वेळेचा योग्य वापर करणे.
6)सतत शिकण्याची वृत्ती (Continuous Learning) : नवीन गोष्टी, तंत्रज्ञान आणि कौशल्ये शिकण्यासाठी नेहमी तयार असणे.
व्यक्तिमत्व विकासासाठी उपाय :
1)चांगले श्रोते बना (इतरांचे ऐकून घेण्याची कला आत्मसात करा).
2)देहबोली (बॉडी लँग्वेज) आणि वेशभूषा निवड (ड्रेसिंग सेन्स) सुधारण्यावर भर द्या.
3)स्टेज स्टेअरिंग किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भीती घालवा.
4)दररोज स्वतःमध्ये १% तरी सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.
अद्वैत माईंड वेल्थ अकॅडमीचे अनुभवी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी कार्य :
अद्वैत माईंड - वेल्थ अकॅडमीचे संस्थापक व मुख्य मार्गदर्शक, कल्याणमित्र, भगवान (आशिष) शांताराम काटकर हे गेल्या १२ वर्षांपासून मानसिक, आध्यात्मिक आणि व्यक्तिमत्त्व विकास क्षेत्रात निरंतर कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत १०,००० हून अधिक विद्यार्थी व व्यक्तींना प्रशिक्षण देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक विज्ञान, ध्यान, ऊर्जा संतुलन आणि जीवन व्यवस्थापन यांचा सुंदर समन्वय साधणारे उपक्रम राबविले जात आहेत.
"अद्वैत माईंड -वेल्थ ॲकॅडमी या संस्थेच्या कार्यात सुषमा अविनाश रणदिवे यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. तर अविनाश अशोक रणदिवे हे संस्थेच्या आर्थिक नियोजन, व्यवस्थापन व विकास धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. अविनाश रणदिवे यांना आरोग्य विमा व आर्थिक नियोजन क्षेत्रातील १८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी महाराष्ट्रातील १०,००० पेक्षा जास्त ग्राहकांना आरोग्य विमा, आर्थिक नियोजन, संपत्ती व्यवस्थापन आणि आर्थिक साक्षरतेचे धडे दिले आहेत."
"मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी लहानपणापासूनच त्यांच्यावर उत्तम संस्कार करणे, ध्यान धारणा शिकवणे आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे वेगवेगळे उपक्रम समाजामध्ये राबवले गेले पाहिजेत .अशा अकॅडमी प्रत्येक परिसरात सुरू व्हायला हव्या," असे प्रतिपादन पुणे शहरातील लोकप्रिय नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी करत या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
"‘लोक काय म्हणतील?’ यापेक्षा ‘परमात्मा काय म्हणेल?’ हा विचार मानवी आयुष्यात अधिक महत्त्वाचा आहे. समाजाचे आपल्यावर काही ऋण असते आणि ते फेडण्याच्या भावनेतूनच आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. अद्वैत माईंड - वेल्थ ॲकॅडमी या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम राबविले जातात. मुलांमध्ये लहानपणापासून उत्तम संस्कार, ध्यान, जीवनमूल्ये, सकारात्मक विचार रुजवणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी प्रत्येकाने एकत्रितपणे कार्य केले पाहिजे" अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातील प्रसिद्ध आरोग्य विमा अधिकारी अविनाश रणदिवे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"आपली संतती ही केवळ आपल्या कुटुंबाची नसून राष्ट्राची अमूल्य संपत्ती आहे. त्यामुळे देश हिताचा विचार करून मुलांना लहानपणापासूनच उत्तम संस्कार, ध्यान, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सकारात्मक जीवनदृष्टी देणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. वयाच्या पहिल्या १५ वर्षांत मिळणारे योग्य मार्गदर्शन मुलांचे व्यक्तिमत्त्व सक्षम, जबाबदार आणि राष्ट्राभिमानी नागरिक म्हणून घडवते. आजच्या डिजिटल युगात शाळा-महाविद्यालयांत जीवनमूल्य, ध्यान, व्यक्तिमत्व विकास व मूल्याधिष्ठित शिक्षणाला मर्यादित स्थान असल्याने ती उणीव भरून काढण्यासाठी अद्वैत माईंड अँड वेल्थ ॲकॅडमी काम करत आहे. सुसंस्कृत कुटुंब, सक्षम समाज आणि समृद्ध राष्ट्र घडविणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे." अशी प्रतिक्रिया अद्वैत माईंड हेल्थ अकॅडमीचे संस्थापक, संचालक,कल्याणमित्र भगवान (आशिष) काटकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
विशेष प्रात्यक्षिके आणि अभ्यासक्रम (Courses Offered)
या उद्घाटनानंतर उपस्थितांना राजयोग अग्निहोत्र हिलिंग मेडिटेशनचे महत्त्व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आले. या विषयावर देश-विदेशात सुरू असलेल्या संशोधनाची माहिती देण्यात आली, ज्यावर उपस्थितांनी स्वतःचे सकारात्मक अनुभव मांडले.
राजयोग अग्निहोत्र ग्लोबल फाउंडेशनची अधिकृत स्थापना :
या भव्य उद्घाटन सोहळ्यात 'राजयोग अग्निहोत्र ग्लोबल फाउंडेशन' या सामाजिक, आध्यात्मिक व सेवाभावी ट्रस्टची अधिकृत स्थापना करण्यात आली. प्रमुख पाहुणे पुणे शहरातील लोकप्रिय नगरसेवक दिलीप अण्णा वेडे पाटील यांच्या शुभहस्ते वैदिक पद्धतीने अग्निहोत्र करण्यात आले.
यावेळी त्यांनी स्वतः अग्निहोत्र करून त्याचे आध्यात्मिक, मानसिक, पर्यावरणीय व आरोग्यदायी लाभ उपस्थितांना समजावून सांगितले. अग्निहोत्रामुळे वातावरण शुद्ध होण्यास, सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास, मानसिक शांतता, तणाव कमी होण्यास तसेच कुटुंब, समाज आणि निसर्ग यांच्यात समतोल निर्माण होण्यास मदत होते, असे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
यानंतर राजयोग अग्निहोत्र ग्लोबल फाउंडेशनच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. या फाउंडेशनच्या माध्यमातून अग्निहोत्र, राजयोग, ध्यान, मानसिक आरोग्य, पर्यावरण संवर्धन, संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक सेवा यांसह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या फाउंडेशनच्या माध्यमातून उद्योग, व्यावसायिक संस्था व कॉर्पोरेट क्षेत्रासाठी कॉर्पोरेट वेलनेस, माइंडफुलनेस, स्ट्रेस मॅनेजमेंट, अग्निहोत्रद्वारे सकारात्मक कार्यसंस्कृती आणि कर्मचारी सक्षमीकरण यांसारखे विशेष प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत.
अकॅडमीमार्फत चालवले जाणारे प्रमुख कार्यक्रम :
1)सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट प्रोग्राम (मिडब्रेन ऍक्टिवेशन)
2)राजयोग अग्निहोत्र हिलिंग मेडिटेशन
3)ऑरा स्कॅनिंग अँड द १० डिमेन्शन्स ऑफ रियालिटी
4)वेल्थ मॅनेजमेंट अँड सुपर रिच मास्टरी प्रोग्राम
नियमित बॅचेसचे नियोजन आणि प्रवेश माहिती :
बावधन शाखेत दर रविवारी राजयोग अग्निहोत्र हिलिंग मेडिटेशनच्या नियमित बॅचेस आयोजित केल्या जाणार आहेत.
सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट प्रोग्रामची वेळ :
1)बावधन शाखा : दर शनिवारी (सकाळी १० ते १) आणि दर रविवारी (सकाळी ११ ते दुपारी २)सदाशिव पेठ शाखा : दर रविवारी (सायंकाळी ४ ते ७).
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
(टीप: गुणवत्तेवर भर देण्यासाठी प्रत्येक बॅचमध्ये केवळ २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.)
उत्कृष्ट नियोजन आणि आभार प्रदर्शन :
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रीतम मेहता यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत केले. राजयोग अग्निहोत्र सत्राच्या यशस्वी आयोजनासाठी प्राणिक हीलर किरण भगवान काटकर आणि अविनाश रणदिवे यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी शुद्ध जैन सात्त्विक भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
अकॅडमीच्या या सामाजिक उपक्रमाचे बावधन आणि पुणे परिसरातील नागरिक, पालक, शिक्षक व व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
































No comments:
Post a Comment