धनकवडी,पुणे,दि.१६ : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) २०२५ चा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. पुण्यातील धनकवडी येथील प्रियदर्शिनी विद्या मंदिर प्रशालेने या परीक्षेत सालाबादाप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करत, प्रियदर्शिनी विद्यामंदिर प्रशालेचा शासकीय चित्रकला परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला.
या दोन्ही परीक्षांसाठी एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, आणि सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"राज्यस्तरीय एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या एकूण २९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यापैकी ४ विद्यार्थ्यांनी A ग्रेड मिळवला. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत २१ विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थ्यांनी A ग्रेड प्राप्त केला. एकूण दोन्ही परीक्षांमध्ये ११ विद्यार्थ्यांनी A ग्रेड मिळवून प्रियदर्शिनी विद्यामंदिर प्रशालेचे नाव उज्ज्वल केले आहे."
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ (MSBAE), मुंबई यांच्या वतीने दरवर्षी शासकीय रेखाकला (Elementary & Intermediate Drawing Grade) परीक्षा आयोजित केली जाते. ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या चित्रकला कौशल्यांचे मूल्यमापन करते.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षा सातवी इयत्तेपासून आणि इंटरमिजिएट ग्रेड इयत्ता आठवीपासून सुरू होते. २०२५ मध्ये ७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा सप्टेंबर महिन्यात ऑफलाइन घेतली जाते.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या एलिमेंटरी परीक्षेत मेमरी ड्रॉइंग ज्यामध्ये विविध मानवाकृत्यांचा सराव वस्तूचित्र/स्थिरचित्र, विविध वस्तूंची प्रमाणबद्ध रेखाटणे,संकल्पचित्र/डिझाईन,कर्तव्य भूमितीच्या विविध रचनांचा अभ्यास तसेच अक्षरलेखन/लेटरिंग अशा विविध विषयांचा सखोल अभ्यास करून, पोस्टर कलर, वॉटर कलर, रंगीत पेन्सिल अशा विविध माध्यमांचा वापर करून चित्र वेळेत पूर्ण करावे लागते एलिमेंटरी व इंटरमिजिएटचे प्रत्येकी चार पेपरची ही परीक्षा चार दिवस चालते.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्व :
ही परीक्षा केवळ स्पर्धा नव्हे, तर कौशल्य विकासाची संधी! चित्रकला शिकून निरीक्षणशक्ती, एकाग्रता, कल्पनाशक्ती वाढते. सरकारी प्रमाणपत्र मिळते, जे दहावी बोर्ड परीक्षेत A ग्रेडसाठी ७ गुण, B ग्रेडसाठी ५ गुण, C ग्रेडसाठी ३ गुण असे अतिरिक्त गुण (SSC) मिळवून देते. कला महाविद्यालय, डिप्लोमा, BFA, आर्किटेक्चर, फॅशन डिझाइन, अॅनिमेशनसाठी प्रवेशासाठी अनिवार्य/फायदेशीर. मेरिट लिस्टमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्रदर्शन संधी. भविष्यात करिअरसाठी पोर्टफोलियो मजबूत होते. आजच्या स्पर्धात्मक युगात कला कौशल्ये AI, डिझाइन फील्डमध्ये मागणीचे.
या परीक्षेच्या तयारीत नियमित सराव, तज्ञ कला शिक्षकांचे कोचिंग, पुस्तके मदत करतात. यशस्वी विद्यार्थी म्हणून अभिमान बाळगण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळते. चित्रकला ही करिअरची गुरुकिल्ली!.
राज्यस्तरीय इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत A ग्रेड मिळवणाऱ्या प्रियदर्शिनी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांमध्ये श्रेयश सरतापे, सार्थक गाढवे, आर्यन महाबोले, जान्हवी गलंडे, सई खाटपे,संस्कृती भालेराव आणि शिवानी शिंगारे यांचा समावेश आहे.
शासकीय रेखाकला परीक्षा कलाक्षेत्रात करिअर करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणे हे विद्यार्थ्यांच्या कलात्मक क्षमतेचे प्रमाणपत्र असते.
"प्रियदर्शिनी विद्या मंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सातत्याने कला क्षेत्रातील या राज्यस्तरीय परीक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. यंदाही १००% निकाल आणि A ग्रेड मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येने प्रशालेच्या कलाशिक्षणातील दर्जेदार प्रशिक्षणाचे दर्शन घडवले आहे. पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शिनी विद्या मंदिर प्रशालेमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाते त्यासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात."
प्रियदर्शिनी प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजश्री निंगुणे आणि रूपाली मालुसरे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. "विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हा यशस्वी निकाल साध्य झाला आहे. कलेच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची पायरी आहे. सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा," असे त्यांनी म्हटले.
या यशस्वी विद्यार्थ्यांच्या निकालासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रियदर्शिनी प्रशालेचे कलाशिक्षक सुनिल सोनवणे यांचे विशेष कौतुक केले जात आहे. संस्थेचे सचिव, सामाजिक कार्यकर्ते अप्पा रेणुसे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करताना सांगितले की, "प्रियदर्शिनी विद्या मंदिर ही केवळ शैक्षणिकच नव्हे तर कलागुणवत्तेचीही उत्तम संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत."
"कलेमुळे व्यक्तिमत्त्व विकसित होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून चित्रकलेचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. कलाक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी या परीक्षा कलाक्षेत्राचा पाया समजला जातो. आनंदी जीवन जगण्यासाठी एक तरी कला असणे गरजेचे आहे. शासकीय चित्रकला परीक्षा ग्रेड परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याने देणे आवश्यक आहे . प्रशालेत चित्रकलेची आवड असणारे विद्यार्थी निवडणे व त्यांना परीक्षेसाठी सराव करून, तयार करणे एक आव्हान असते एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही ग्रेड परीक्षेत प्रशालेचे ५० विद्यार्थी सहभागी झाले होते सर्व विद्यार्थी पास होऊन १००% निकाल लागला आहे हा निकाल सलग २२ व्या वर्षी १०० % लागला याचा विशेष आनंद आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजर्षी निंगुणे व सौ रूपाली मालुसरे यांनी बालकलाकारांना व कलेला दिलेले प्रोत्साहन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरले .परीक्षेसाठी बसलेले सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक जे की सध्या अभ्यासाची स्पर्धा सुरू असताना, विद्यार्थ्यांच्या कलागुणांकडे लक्ष देणारे पालक यांचे मन:पासून अभिनंदन करतो. आमच्या प्रियदर्शिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कलाक्षेत्रातील यशस्वी भरारीसाठी छोटेशे योगदान देण्याची संधी मला मिळाली याचे समाधान आहे." अशी प्रतिक्रिया प्रियदर्शनी विद्या मंदिरचे कलाशिक्षक सुनिल सोनवणे यांनी दिली."
धनकवडी परिसरातील ही प्रियदर्शिनी प्रशाला मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देत असून, विद्यार्थ्यांच्या बहुआयामी विकासावर भर देते. रेखाकला परीक्षेतील हा १००% निकाल हा प्रशालेच्या कलाशिक्षणातील यशस्वी परंपरेचा आणखी एक पुरावा आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांचे हे फलित आहे.














No comments:
Post a Comment