Thursday, February 19, 2026

"तरुण पिढीसाठी प्रेरणादायी काम करणाऱ्या पुण्यातील प्रसिद्ध आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात संपन्न; नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान; 'आमच्यासाठी जेष्ठ नागरिक संघाचे सामाजिक काम खूप प्रेरणादायी' - सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे"

पुणे,दि.१९ : वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या पुण्यातील प्रसिद्ध आंबेगाव पठार जेष्ठ नागरिक संघाचा तिसरा वर्धापन दिन मंगळवारी, उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

पुण्यातील आंबेगाव पठार परिसरातील कुटुंब सोसायटी येथे आयोजित या विशेष सोहळ्यात परिसरातील ज्येष्ठ नागरिक, मान्यवर पाहुणे, नवनिर्वाचित नगरसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

या कार्यक्रमात भावनिक क्षणांसह, ज्येष्ठ नागरिक संघाच्या सामाजिक कार्याचा आढावा, सत्कार आणि भविष्यातील मागण्यांचा समावेश होता.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

या कार्यक्रमाची सुरुवात आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले पुण्यातील प्रसिद्ध सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. 

यानंतर आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघ या सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष भरत (काका) बाबर यांनी शोकप्रस्ताव मांडला. महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळ विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, यावेळी सभागृहात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच संस्थेचे सभासद दत्तात्रय धुमाळ आणि संचालिका हिराबाई गिंदे यांचे  अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त  राहुल आवारे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक  खिलारे उपस्थित होते. त्यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. 

या आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३७ आणि ३८ मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचाही विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये नवनिर्वाचित नगरसेविका प्रतिभा  चोरघे, स्मिता कोंढरे, सिमा बेलदरे, नगरसेवक संदिप बेलदरे, व्यंकोजी खोपडे, नगरसेविका वर्षा तापकीर आणि  तेजश्री बदक यांचा समावेश होता. या नवनिर्वाचित नगरसेवकांनी परिसरातील विकास कामे करून, मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अश्या अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या.

संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. काकासाहेब सूर्यवंशी यांनी संस्थेच्या गेल्या तीन वर्षांच्या कार्याचा सविस्तर आढावा सादर केला. त्यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा आणि आरोग्यसेवा यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. नामांकित रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. 

आंबेगाव पठार परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, आरोग्य सुविधा आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी संस्था प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.

महिला सक्षमीकरणासाठी संस्थेच्या माध्यमातून ३५ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असून, त्यांना पुणे महानगरपालिकेशी संलग्न केले आहे. हे गट महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत. शासनाचे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये देखील संस्थेचे सदस्य स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतात.

आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भरत (काका) बाबर यांनी लोकप्रतिनिधींकडे महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण केंद्र आणि साई सिद्धी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठ दरम्यान ज्येष्ठांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यांवर युवा शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास (बापू) चोरघे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सर्व नगरसेवकांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून  परिसरातील मूलभूत सुविधा, विरंगुळा केंद्र आणि स्वच्छतागृहांची निर्मिती प्राधान्याने करण्याचे आश्वासन दिले.

"पुणे शहरात आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य तरुण पिढीसाठी,आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी व समाजाच्या विविध घटकांसाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक व खूप कौतुकास्पद आहे." अशी प्रतिक्रिया पुणे शहरातील प्रसिद्ध सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांनी दिली.

"आमच्या आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी तसेच समाजातील विविध घटकांसाठी सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते. आमच्या संस्थेतील सर्व सदस्यांचे योगदान सर्वच सामाजिक उपक्रमांमध्ये खूप महत्त्वाचे आहे. आमच्या प्रभागातील सर्वच नवनिर्वाचित नगरसेवकांनी आंबेगाव पठार परिसरात मूलभूत सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, स्वच्छतागृह ही कामे प्राधान्याने करावीत.आंबेगाव पठार परिसरातील पाणी प्रश्नही लवकरात लवकर सोडवावा.अशा आमच्या सर्व नागरिकांच्या भावना आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या संस्थेतील सर्व सदस्य प्रामाणिकपणे काम करत राहतील." अशी प्रतिक्रिया या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष भरत काका बाबर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुटुंब सोसायटीचे अमित गायकवाड, सोनावणे, सागर खळदकर, सुमित कांबळे, आंबवले,बावधनकर आणि सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.

संस्थेचे संचालक रमेश गरुड, सुधाकर महाडिक, नारायण उल्हाळकर, विष्णू कातोरे, सूर्यकांत ढोरे, भीमा चव्हाण, जयश्री चांडगे, अंजली कुलकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  भास्कर सातपुते यांनी केले. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

समाजातील विविध घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य तरुण पिढीसाठी तसेच समाजातील सर्व घटकांसाठी खूप प्रेरणादायी आहे.

हा तिसरा वर्धापन दिन केवळ संस्थेच्या प्रगतीचा उत्सव नव्हता, तर ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाचा सन्मान आणि परिसरातील सामाजिक विकासासाठी एकत्र येण्याचा संदेश देणारा ठरला. संस्था भविष्यातही ज्येष्ठांच्या कल्याणासाठी आणि परिसराच्या उन्नतीसाठी सक्रिय राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment