Thursday, February 5, 2026

"पुणे शहरात सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघ व हृदयमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयविकारासंबंधी जनजागृती करणारे आरोग्य शिबिर उत्तम प्रतिसादात संपन्न; 106 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, 55 ज्येष्ठ नागरिकांची मोफत ईसीजी; ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढणारे शिलेदार भरतकाका बाबर यांच्या कार्याचे कौतुक"....


पुणे, 05 : पुणे शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय व हक्कांसाठी लढणारी प्रसिद्ध सामाजिक संघटना "आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघ" नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून समाजातील विविध घटकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. आंबेगाव पठार परिसरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते भरत काका बाबर त्यांच्या ज्येष्ठ नागरिक संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी यांच्या मदतीने नेहमीच आंबेगाव पठार परिसरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात.


आंबेगाव पठार जेष्ठ नागरिक संघ आणि हृदयमित्र फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शंकर मंदिर, दांगट इस्टेट, आंबेगाव पठार येथे 'हृदयविकार संबंधी' विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. हे शिबीर रविवारी २५ जानेवारीला घेण्यात आले त्याला आंबेगाव पठार परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या आरोग्य शिबिरात स्थानिक जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली.


या शिबीरात एकूण १०६ जेष्ठ नागरिक (महिला व पुरुष) यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी ५५ ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या ECG तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या.या शिबीराचे आयोजन जेष्ठ नागरिकांच्या हृदयआरोग्याबाबत जागृती निर्माण करणे आणि वेळीच योग्य तपासणी व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.


हे शिबीर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. डॉ. सावंत हे MBBS, MD, MRCP (लंडन), CCT Cardiology (केंब्रिज, यूके), FACC (USA) असे उच्च पदवीधर तज्ज्ञ असून, हृदयमित्र फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. त्यांनी शिबीरात जेष्ठ नागरिकांना हृदयाच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. हृदयविकाराच्या जोखीम घटक, जीवनशैलीतील बदल, नियमित व्यायाम, आहार नियंत्रण, तणाव व्यवस्थापन आणि वेळीच तपासणीचे महत्त्व याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


त्यांच्या सोप्या आणि प्रभावी शैलीमुळे जेष्ठांना हृदयआरोग्याचे महत्त्व पटले. आजच्या काळामध्ये हृदय रोगाचे प्रमाण खूप वाढलेले आहे अशा वेळेस असे हृदयरोगासंदर्भात जनजागृती करणारे आरोग्य शिबिर होणे खूप गरजेचे आहे.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

या आरोग्य शिबीराला पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३८ मधील नवनिर्वाचित नगरसेविका सौ. प्रतिभाताई  चोरघे यांनी भेट दिली. जेष्ठ नागरिक संघाच्या संचालिका श्रीमती अंजली कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी शिबीराच्या आयोजनाचे कौतुक करताना, जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.


आंबेगाव पठारावरील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्तात्रय  वीर, श्री. दशरथ पवार, श्री. सचिन शेवते, श्री. सतीश जगताप, श्री. नंदकुमार देवगिरीकर आणि श्री.दत्तात्र्य बोरगे यांनीही शिबीरास भेट देऊन सहभाग वाढवला. 


जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष प्रा. काका सुर्यवंशी, श्री. भास्कर सातपुते,श्री. नारायण उल्हाळकर,श्री. सुर्यकांत ढोरे, श्री. भीमराव चव्हाण,वर्धमान सोसायटीचे चेअरमन श्री. बापूसाहेब शिरोळे,श्री. रुपनवर आणि श्री. सोमनाथ पाटील यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


या आरोग्य शिबीराच्या यशात जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक व अध्यक्ष श्री. भरत काका बाबर यांचे मोलाचे योगदान राहिले. जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी ते सातत्याने स्तुत्य उपक्रम राबवित असतात. त्यामुळे उपस्थितांनी त्यांचे विशेष आभार मानले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"आमच्या आंबेगाव पठार जेष्ठ नागरिक संघामार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात. हे आरोग्य शिबीर आंबेगाव पठार परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून, समाजातील विविध स्तरांतील लोकांनी एकत्र येऊन जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी केलेला हा सामूहिक प्रयत्न कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे जेष्ठ नागरिकांना आरोग्यसेवा मिळण्यासाठी आमचे ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी, हृदयमित्र फाउंडेशन व  नागरिकांचेही आम्हाला नेहमीच सहकार्य असते. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते हे आम्ही आमचे भाग्य समजतो." अशी प्रतिक्रिया जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत काका बाबर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


आंबेगाव पठार जेष्ठ नागरिक संघ व हृदयमित्र फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेचा हृदयविकारासंबंधीचा जनजागृती करणारा हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे.


"पुणे शहरातील आंबेगाव पठार परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत काका बाबर नेहमीच या परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. या परिसरातील पाणी प्रश्न असो, रस्त्याचे प्रश्न असो अशा नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी नेहमीच आवाज उठवताना दिसतात. ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवताना दिसतात. तरुण पिढीलाही लाजवेल अशा ऊर्जेने काम करणाऱ्या भरत काका बाबर यांच्या सामाजिक कार्याला या परिसरातील लोकांकडून खूप मोठी पसंती मिळत आहे."


भारतात तसेच महाराष्ट्रात आज हृदयविकारांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहे अशा वेळेस जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून हृदयरोग विषयी जनजागृती करणारे व ज्येष्ठ नागरिकांच्या हृदयाची काळजी घेणाऱ्या असे सामाजिक उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे.

No comments:

Post a Comment