Monday, February 2, 2026

"महाराष्ट्रातील लाखो भाविक - भक्तांना भक्तीचे वेड लावणारा, लाखो भाविकांना ऊर्जा देणारा, माघ पौर्णिमेच्या चांदण्या रात्री रंगला श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी मातेचा पारंपरिक विवाह सोहळा; श्री क्षेत्र वीर येथे सवाई सर्जाचं चांगभलं च्या जयघोषात मंत्रमुग्ध झाला लाखो भाविक - भक्तांचा जनसागर".


पुरंदर, वीर, दि.02 :  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांचा ऐतिहासिक विवाह सोहळा रविवारी मानकरी, सालकरी, पाटील, पुरोहित  यांच्या उपस्थितीत, फटाक्यांच्या आतिषबाजीत, माघ पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात, ढोल-ताशांच्या गजरात, उत्साहात, पारंपारिक पद्धतीने, भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.


महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला भक्तीची ऊर्जा देणारा महाउत्सव असतो.

क्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या पारंपरिक विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेला लाखो भाविक भक्तांचा जनसमुदाय "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या गजरात, भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध होऊन गेला.

रविवारी पहाटे ५ वाजता मंदिरात देवाची पूजा होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला, सहा वाजता मुख्य गाभारा  खुला करून सकाळी देवाला अभिषेक करण्यात आला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

यानंतर सकाळी १०.३० वाजता देवाला दहीभाताची पूजा बांधण्यात आली. दुपारी बारा वाजता धुपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. यानंतर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.

पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध  श्री क्षेत्र कोडीतची मानाची काठी - पालखी घेऊन  मानकरी, सालकरी, ग्रामस्थ मंडळी यांचे सायंकाळी सात वाजता क्षेत्र वीर येथे आगमन झाल्यानंतर, देवाची धुपारती घेऊन वीर गावचे मुकादम पाटील, सर्व विश्वस्त व ग्रामस्थ मंडळी, मानकरी, दागिनदार, सालकरी मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांची सन्मानाने भेटाभेट होऊन, वाजत गाजत स्वागत करण्यात आले. 

यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून, योग्य ती काळजी घेऊन व्यवस्थित नियोजन केले. यानंतर मानाची काठी, देवाची पालखी पालखी स्थळावर स्थानापन्न झाली. रात्री ११.३० वाजता समस्त राऊत मंडळींच्या वतीने देवाला पोषाख करून, देवदेवतांना आवाहन करून,विधी करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवून ढोल ताशाच्या गजरात तसेच कोडीतचीही पालखी बाहेरून अंधारचिंच येथे मानाच्या काठीच्या भेटाभेटीच्या पारंपरिक सोहळ्यासाठी  आल्या.

यावेळी शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्हटकर, ढवाण या मानकऱ्यांना फुलांच्या माळा घालण्यात आल्या. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

वाई व कन्हेरी पालख्यांसह मानाच्या काठ्यांची भेटाभेट होऊन,भक्तिमय वातावरणात सर्व पालख्या देऊळवाड्यात आल्या.

एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ (मुकादम पाटील) यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन मध्यरात्री पावणे तीन वाजता श्रीनाथ म्हस्कोबा  व जोगेश्वरी माता  यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. 

रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात लग्नाच्या सात मंगलाष्टका होऊन, २ वाजून ५५ मिनिटांनी पारंपरिक शाही लग्न सोहळा संपन्न झाला. यावेळी पुरोहित दिपक थिटे, संतोष थिटे यांनी पौराहित्य केले. यानंतर सर्व काठ्या - पालख्या पारंपारिक प्रदक्षिणेसाठी गेल्या.

वीर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांचा शाही, पारंपरिक विवाह सोहळा महाराष्ट्रातील हजारो भाविकांना ऑनलाईन यूट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून पाहता आला.

"श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत  या पारंपरिक लग्न सोहळ्यासाठी लाईट, जनरेटर, पालखी मार्ग व्यवस्थापन, विद्युत रोषणाई, परिसर स्वच्छता, आवश्यक कर्मचारी, स्वयंसेवक, ट्राफिक पोलीस इत्यादीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त  मोहनराव धुमाळ यांनी दिली."

मंदिरात वीर देवस्थान ट्रस्ट व दिलीप धुमाळ मित्र परिवारातर्फे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त, सर्व विश्वस्त आणि सल्लागार उपस्थित होते. सर्व विश्वस्त व सर्व सल्लागार या सर्व मंडळींनी वीर देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व व्यवस्था पाहून, उत्तम नियोजन केले.

पुरंदर तालुका पंचायत समिती, पुरंदर आरोग्य विभाग, पुरंदर तहसीलदार कार्यालय, विद्युत वितरण कंपनी, पोलीस प्रशासन व वीर ग्रामपंचायत यांच्याकडूनही या ऐतिहासिक यात्रा सोहळ्यासाठी उत्तम व्यवस्था केली जाते.

"श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी देवीचा पारंपरिक विवाह सोहळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत,पारंपारिक पद्धतीने, आनंदमय वातावरणात, उत्साहात संपन्न झाला. आमच्या देवाचा कृपाआशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविक - भक्तांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते हे आमचे खूप मोठे भाग्य आहे." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा वीर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"काशीखंडाचे काळभैरव श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि माता जोगेश्वरी यांचा पारंपरिक विवाह सोहळा रविवारी संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्र तथा देश विदेशातून भाविक - भक्तांनी या सोहळ्याला हजेरी लावली. काशीचे क्षेत्रपाल काळभैरव आपल्या दक्षिण अवतारात वेगवेगळ्या लीला करत अनेक ठिकाणी गेले. त्यापैकी श्री क्षेत्र वीर हे एक ठिकाण आहे. पौराणिक लोककथेनुसार माघ पौर्णिमेला रविवारच्या दिवशी देव वीरगावी आले. त्यांनी भक्त कमळसिद्ध यांची सत्व परीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी वीर गावाला आपले क्षेत्र बनवले. भक्त कमळसिद्ध आणि त्यांची पाच मुले, राऊत, जमदाडे व वीरगावचे गावकरी यांनी देवाचा एक उत्सव सुरू केला तोच हा वीर यात्रेचा उत्सव. या ठिकाणी प्रत्येक समाजाने आपली आपली सेवा अर्पण केली. त्यानुसार नवीन रितीरिवाज सुरू झाले. दिवसेंदिवस अनेक भाविक - भक्तांना प्रचिती येत गेली तसे या उत्सवाचे स्वरूप वाढत आहे.यंदा योगायोगाने विवाह सोहळ्यासह यात्रेची सुरुवातही रविवारच्या दिवशी झाली. विवाह आणि यात्रा उत्सव सोहळा हा सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवतो. इथे सर्व स्तरातील लोक, गावकरी, पाहुणे, विविध गावच्या पालख्या, सासन काठ्या, मानकरी, सेवेकरी, शेतकरी, चाकरमानी, व्यावसायिक हे एक होऊन लाल रंगात न्हाऊन जातात.वर्षभर कामानिमित्त परदेशी राहत असलो तरी वर्षातून एकदा यात्रेचे दहा दिवस आम्ही वीरला येतो. इथं पावलेलं दान वर्षभर पुरते. दहा दिवसाची सेवा यात्रा वर्षभर ऊर्जा आणि प्रेरणा देत राहते." अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक, श्रीनाथभक्त अजय समगीर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"महाराष्ट्रातील अठरापगड जाती-जमातींमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा अठरापगड जातीतील लोकांना एकत्र आणून, भक्तीच्या धाग्यात जोडून, माणुसकी समृद्ध करणारा हा उत्सव आहे.महाराष्ट्रातील लाखो भाविकांना ऊर्जा, प्रेरणा देणाऱ्या या भक्तिमय सोहळ्याची, प्रत्येक वर्षी क्षेत्र वीर येथील या ऐतिहासिक यात्रा सोहळ्याची लाखो भाविक भक्तांना ओढ असते." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा लाखो भाविक भक्तांना भक्ती - शक्तीची, ऊर्जा देणारा महान सोहळा असतो. 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना यात्रा काळात श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मिळणारा भक्तीचा आनंद हा अनमोल असतो.

No comments:

Post a Comment