Sunday, November 30, 2025

"HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी "या" तारखेपर्यंत नवीन मुदतवाढ; पाचवी मुदतवाढ देऊनही पुण्यात "इतक्या" लाखांपेक्षा जास्त वाहनांना अजून सुरक्षा नंबरप्लेट बसवणे बाकी; 'खड्डेमुक्त रस्ते करा' आधी, फक्त कडक नियम करून,दंड करू नका"

पुणे,दि.३० :  1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंर राज्य परिवहन विभागाने यावरती कार्यवाही चालू केल्यानंतर, वाहनधारकांना चार वेळा मुदत दिल्यानंतरही  HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी पुन्हा परिवहन विभागाने 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिल्याची माहिती समोर आलेली आहे. राज्यातील वाहन धारकांना HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी पाचवी मुदतवाढ देऊनही पुण्यात पंधरा लाखांपेक्षा जास्त वाहनधारकांनी अजूनही सुरक्षा नंबरप्लेट बसवलेली नाही.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात विविध ठिकाणी खड्डे असलेले खराब रस्ते आहेत. खड्डे असणाऱ्या खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात होत असतात.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

"वाहतुकीचे नियम आम्ही पाळतो.HSRP नंबरप्लेटही बसवू. सरकारला आम्ही विविध मार्गाने एवढा लाखो - करोडो रुपयांचा कर देत असतो. परंतु मूलभूत सुविधांच्या नावाने नेहमीच बोंबाबोंब असते. वाहतुकीचे नियम कडक करून फक्त दंड जास्त आकारू नका तर खड्डेमुक्त रस्ते आम्हाला द्या, अपघात मुक्त, ट्रॅफिक मुक्त वाहतूक व्यवस्था निर्माण करा.लोकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी सरकारने गांभीर्याने प्रयत्न केले पाहिजेत. अशा भावना राज्यातील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत."

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परिवहन विभागाने नंबरप्लेट बसवण्यासाठी दिलेली ही पाचवी मुदतवाढ आहे. मात्र अद्यापही पुण्यात १५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना सुरक्षानंबर प्लेट बसविणे बाकी आहे. त्यामुळे एका महिन्यात एवढ्या नंबरप्लेट बसवून होणार का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. राज्याच्या परिवहन विभागाने चार वेळा मुदतवाढ देऊनही पुण्यातील वाहन चालकांनी HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी पाठ फिरवलेली दिसत आहे.


HSRP नंबरप्लेट फायदेशीर आहे का?

उच्च  न्यायालयाच्या आदेशानुसार एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले होते. त्यानुसार जानेवारी महिन्यापासून ही नंबरप्लेट बसविण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

अपघात किंवा गुन्ह्यात सहभागी होणारी वाहने सहजपणे पकडता यावीत, प्रत्येकाचे वाहन सुरक्षित रहावे म्हणून सर्व वाहनांना सुरक्षा नंबरप्लेटचे बंधन घालण्यात येत आहे; तसेच अनेक गुन्हे व अपघातातील वाहने या नंबरप्लेटमुळे सहजपणे शोधता येणे शक्य असल्याचे सांगितले जात आहे.

आतापर्यंत पुण्यातील 7 लाख 62,274 वाहनधारकांनी सुरक्षा नंबरप्लेट बसवून घेतली आहे, तर 9 लाख 55,811 वाहनधारकांनी सुरक्षा नंबरप्लेटसाठी नोंदणी केलेली आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

६५ टक्के वाहनांना HSRP नंबरप्लेट नाही.पुण्यात साधारण २५ लाखांच्या पुढे वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे; पण अद्यापपर्यंत दहा लाखांच्या आसपास वाहनांनी नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच, पुण्यातच जवळजवळ १५ लाख वाहनांनी अद्यापही सुरक्षा नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. परिवहन विभागाकडून अनेक वेळा मुदतवाढ देऊनही याकडे वाहनधारकांनी पाठ फिरवली आहे. 

पुण्यात अद्यापही ६५ टक्के वाहनांना नंबरप्लेट बसविलेली नाही. सध्या तरी सुरक्षा नंबरप्लेट नसलेल्या वाहनांची आरटीओतील कोणतीही कामे होत नाहीत. ३१ डिसेंबरनंतर नंबरप्लेट न बसविलेल्या वाहनांवर दंड होणार असल्यामुळे तातडीने त्या बसवून घ्याव्यात, असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रभरात HSRP नंबरप्लेट काय स्थिती?

राज्यात एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांची संख्या साधारण २.१० कोटी इतकी आहे. यातील ९० लाख वाहनांची एचएसआरपीसाठी नोंदणी झाली आहे. त्यातील ७३ लाख वाहनांना एचएसआरपी बसवण्यात आली आहे. पाटीचा दर्जा अतिशय खराब असणे, एक पाटी तुटल्यास किंवा खराब झाल्यास दोन्ही पाट्या विकत घेणे असा भुर्दंड वाहनचालकांना सहन करावा लागतो. 

यामुळे राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी एचएसआरपीला मुदतवाढ देण्याची मागणी सरकारकडे केली होती. यापूर्वी ३० एप्रिल, ३० जून, १५ ऑगस्ट, ३० नोव्हेंबर रोजी यासाठीची मुदतवाढ देण्यात आली होती.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

HSRP मध्ये असलेले खास सिक्युरिटी फीचर्स आणि होलोग्राममुळे नंबरप्लेटची डुप्लिकेट कॉपी बनवणे जवळजवळ अशक्य होते. या योजनेची अंमलबजावणी होऊनही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

31 डिसेंबरनंतर एचएसआरपी नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनधारकांवरती दंड आकारला जाईल.  परिवहन विभागाने अनेकवेळा मुदतवाढ देऊनही नागरिकांनी याकडे लक्ष दिले नाही. आता, ज्या वाहनांवर HSRP नाही, त्यांची कोणतीही कामे आरटीओमध्ये (RTO) होत नाहीत. वाहन मालकांना त्वरित HSRP बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण 31 डिसेंबरनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर मोठा दंड आकारला जाईल.

राज्यातील लाखो नागरिकांनी वाहन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर HSRP नंबरप्लेट बसवणे गरजेचे आहे. तसेच सरकारनेही राज्यातील करोड लोकसंख्या असलेल्या जनतेला मूलभूत सुविधा देणे, चांगले रस्ते, चांगली वाहतूक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.