पुणे,दि.२४ : महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाचा व व्यक्तिमत्व विकासाचा पाया चांगल्या प्रकारे भक्कम करण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे आठ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचा इयत्ता पाचवीचा गुणवंत विद्यार्थी ओम अजित जगताप व इयत्ता आठवीचा गुणवंत विद्यार्थी सार्थक प्रवीण गाढवे या दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत देदीप्यमान यश मिळवून, दोघेही जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकलेले आहेत.
"महाराष्ट्र राज्य परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या ओम अजित जगताप या गुणवंत विद्यार्थ्यांने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश मिळवुन, शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत झळकून शाळेचे व पालकांचे नाव उंचावलेले आहे."
"महाराष्ट्र राज्य परिषदेने घेतलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या सार्थक प्रवीण गाढवे या गुणवंत विद्यार्थ्याने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश मिळवून, शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत झळकून शाळेचे व पालकांचे नाव उंचावलेले आहे."
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. पुणे शहरात संपूर्ण देशभरातून व जगभरातून अनेक विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी येत असतात.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
पुणे शहरातील दक्षिण उपनगरांमधील, धनकवडी येथील प्रसिद्ध प्रियदर्शन विद्यामंदिर प्रशाला ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते. प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे अनेक विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, चित्रकला स्पर्धा यासारख्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उत्तुंग यश मिळवून चमकलेले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील हॉलीबॉल या खेळाच्या स्पर्धेत प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेची मुले राष्ट्रीय स्तरावरील हॉलीबॉल स्पर्धेमध्ये पोहचून विविध पदके, बक्षिसे मिळवलेली आहेत.प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे क्रीडाशिक्षक संदीप भोसले यांनी अनेक राज्यस्तरीय खेळाडू घडवलेले आहेत.
"आई ही जगातील खूप मोठी मार्गदर्शक, आधारस्तंभ असते. ओम जगताप या गुणवंत विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतशील वाटचालीमध्ये त्याची आई मंजुषा जगताप यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या इयत्ता पाचवीच्या ओम अजित जगताप या गुणवंत विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील देदीप्यमान यशामध्ये ओम जगताप याचे कष्ट, मेहनत व शिक्षकांचे मार्गदर्शन व त्याच्या आई-वडिलांचे संस्कार, प्रेरणा व मार्गदर्शन याचे खूप महत्त्वाचे योगदान आहे."
"मला कितीही अभ्यास करावा लागला तरी चालेल. कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल. पण यावर्षी मी पाचवीच्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत, गुणवत्ता यादीत झळकणारच. मी शिष्यवृत्तीधारक बनणारच." हा शब्द ओम जगताप याने आपल्या आई- वडिलांना दिला आणि पाळला व राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले यश संपादन करून शब्द पूर्ण केल्यामुळे ओम जगतापवरती शाळेतील शिक्षकांनी व नातेवाईकांनी,पुणे शहरातील नागरिकांनी, मित्रपरिवारांनी कौतुकाचा वर्षाव केला."
शालेय जीवनात लहान मुलांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये मिळालेले यश जरी शालेय जीवनात छोटे वाटत असले तरी मोठ्या यशाची सुरुवाती ही छोट्या यशानेच होत असते.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
शालेय जीवनामध्ये शिक्षकांचे विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये खूप महत्त्वाचे योगदान असते. प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश मिळवलेला सार्थक प्रवीण गाढवे याच्या यशामध्ये सार्थक गाढवेने केलेले कष्ट, मेहनत व त्याच्या आई-वडीलांचे मार्गदर्शन व त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक वर्गाचेही खूप महत्त्वाचे योगदान आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सार्थक गाढवे याला मिळालेल्या देदीप्यमान यशामुळे सार्थक गाढवे वरती त्याच्या शाळेतील शिक्षक वर्ग, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी कौतुकाचा वर्षाव केला.
"महाराष्ट्र राज्य परिषदेने घेतलेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे वैदही विजयकुमार थोरात, ओम अजित जगताप, सारा अशोक गलांडे, आराध्या विशाल जगताप हे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ओम जगताप हा विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकला."
"पूर्व माध्यमिक इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे आंचल गणेश पाटील, सोहम धनराज बिराजदार, सार्थक प्रवीण गाढवे व जान्हवी अशोक गलांडे हे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि सार्थक गाढवे हा गुणवंत विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकला."
"दक्षिण पुण्यातील धनकवडी परिसरातील असलेल्या आमच्या प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातच सुखद अशा घटनेने झाली आणि ती म्हणजे राज्यस्तरीय शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल होय. यंदाच्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आमच्या प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले. आमच्या प्रशालेतील विद्यार्थी ओम अजित जगताप याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवीच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळवुन, जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये झळकुन आमच्या प्रशालेचा गौरव वाढवला तर आमच्या प्रशालेच्या सार्थक प्रवीण गाढवे या विद्यार्थ्याने माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवीच्या परीक्षेत 70 टक्के गुण मिळवून, जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकून शाळेचे नाव उंचावले आहे. या आमच्या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या व पालकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून, जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळून आमच्या प्रशालेचा यशाचा आलेख उंचावला आहे. हे यश निश्चितच सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे. आमच्या प्रशालेच्या या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन व भावी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा." अशी प्रतिक्रिया प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या प्राथमिक विभागाच्या आदर्श मुख्याध्यापिका राजश्री निंगुणे/दिघे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहेत. या परीक्षा भविष्यात देण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा पाया समजला जातो. अशा परीक्षेमध्ये आमच्या प्रशालेतील ओम अजित जगताप इयत्ता पाचवी व सार्थक प्रवीण गाढवे इयत्ता आठवी यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान संपादन करून शाळेचा व पालकांचा गौरव वाढवला आहे. या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हे दोन्ही विद्यार्थी आमच्या प्रशालेचे चमकते तारे आहेत.अशा परीक्षांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बसले पाहिजे." अशी प्रतिक्रिया प्रियदर्शनी माध्यमिक विद्यामंदिरच्या आदर्श मुख्याध्यापिका, रूपाली मालुसरे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी विविध शालेय उपक्रमांमध्ये सहभाग घेतला पाहिजे.राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा दिल्या पाहिजेत. आमच्या ओमची जिद्द, चिकाटी, मेहनत व ओमच्या वडिलांचे मार्गदर्शन व प्रेरणा व ओमच्या शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे ओमला शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले यश मिळाले. ओमने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकून शिष्यवृत्तीधारक बनणारच हा आम्हाला दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला याचे आम्हाला खूप समाधान आहे. आई म्हणून त्याच्यावरती केलेले संस्कार व त्याला केलेले मार्गदर्शन यामुळे तो शालेय जीवनात चांगली प्रगती करतोय याचे खूप समाधान आहे. प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. आपल्या मुलांनी आपल्यापेक्षाही खूप मोठे व्हावे.चांगली प्रगती करावी हीच अपेक्षा आम्ही व्यक्त करतो." अशी प्रतिक्रिया ग्रेट सक्सेस अकॅडमीच्या संचालिका, ओमच्या आई मंजुषा जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
शालेय जीवनामध्ये मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील कलागुण जोपासावेत तसेच शालेय जीवनात अभ्यासातही चांगली प्रगती करावी यासाठी प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचा संपूर्ण शिक्षक वर्ग प्रामाणिकपणे कार्यरत असतो.
राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत प्रियदर्शी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळावे म्हणून मुख्याध्यापक संघाच्या कार्यशाळा,उपक्रम व शिक्षकांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"आमच्या प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे अनेक गुणवंत विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करून,मेहनत करून उज्वल यश मिळवत असतात. महाराष्ट्र राज्य परिषदेने घेतलेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीच्या ओम अजित जगताप व इयत्ता आठवीच्या सार्थक प्रवीण गाढवे या गुणवंत विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून, आमच्या शाळेचा व शिक्षकांचा गौरव वाढवलेला आहे. आमच्या प्रशालेसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे यश आमच्या प्रशालेतील मुलांना प्रेरणा देईल." अशी प्रतिक्रिया प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे आदर्श कलाशिक्षक सुनील सोनवणे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
पुणे शहरातील अनेक आदर्श मराठी शाळांनी मराठी संस्कृतीचा गौरव वाढवलेला आहे. मुलांचे मातृभाषेतील शिक्षण बौद्धिक, मानसिक व भावनिक विकास करते. पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशाला मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून, मुलांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असते.
महाराष्ट्र राज्य परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा इयत्ता आठवी अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीचा एकूण निकाल 22.06% लागला आहे. इयत्ता पाचवीचा निकाल 23.09 टक्के तर इयत्ता आठवीचा निकाल 19.30 टक्के लागला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचा एकूण निकालांमधील 31 हजार 786 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, त्यात इयत्ता पाचवीमधील 16,693 विद्यार्थ्यांचा तर आठवीतील 15 हजार 93 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी 9 फेब्रुवारी 2025 रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून नऊ लाख 44 हजार 463 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केलेल्यांमध्ये इयत्ता पाचवीतील पाच लाख 66 हजार 368 तर इयत्ता आठवीसाठी तीन लाख 78 हजार 95 विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी नऊ लाख 13 हजार 268 विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पाचवीतील पाच लाख 47 हजार 504 तर इयत्ता आठवीतील 3 लाख 65,754 विद्यार्थ्यांचा समावेश होतो. या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतरिम निकाल 25 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला.
गुणपडताळणीसाठी शाळांकडून 25 एप्रिल ते 4 मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. परिषदेने या कालावधीमध्ये आलेले अर्ज निकाली काढून अंतिम निकाल व गुणवत्तायादी जाहीर केली. परिषदेने जाहीर केलेल्या निकालानुसार इयत्ता पाचवीतील एक लाख तीस हजार 846 आणि इयत्ता आठवीतील 70 हजार 571 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शिष्यवृत्तीचा एकूण निकाल 22.06% इतका लागला असून, इयत्ता पाचवीचा निकाल 23.09% तर इयत्ता आठवीचा निकाल 19.30% इतका लागलेला आहे. तसेच शासनमान्य मंजूर संचानुसार शिष्यवृत्तीसाठी पाचवीतील 16 हजार 693 विद्यार्थी तर आठवीतील 15 हजार 93 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे मिळणारी ही शिष्यवृत्ती एक चांगले प्रोत्साहनपर पाऊल आहे. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षासाठी वार्षिक पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते तर इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षासाठी वार्षिक साडेसात हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळते.
"महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसतात. त्यामधून जिद्दीने, चिकाटीने, मेहनत करून स्वप्नांचा पाठलाग करणारे यशवंत विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकतात. आणि आपल्या शाळेचे, पालकांचे गावाचे, शहराचे नाव मोठे करतात व अभिमानाने उंचावतात."
पुणे शहराच्या दक्षिण उपनगरातील धनकवडी येथील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक वर्षांनी, ओम जगताप व सार्थक गाढवे हे दोन विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले. त्यामुळे शिक्षकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
महाराष्ट्रातील लाखो - करोडो मुलांच्या आयुष्यात शिक्षकांचे, शाळेचे, पालकांचे योगदान खूप महत्त्वाचे असते. राज्यस्तरीय विविध शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, कला क्षेत्रातील स्पर्धा या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी खूप महत्त्वाच्या असतात.