"११ रुपयांसाठी संघर्ष करणारा मुलगा ते मुलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणारी कर्तृत्ववान आई ते हॉटेल व्यवसायाच्या प्रगतीसाठी कोंडे कुटुंबातील भावांची एकजुटता ते जिद्दीने, मेहनतीने लाखो - करोडो रुपयांची उलाढाल करणारा प्रसिद्ध युवा उद्योजक,प्रेरणादायी शिलेदार कल्पेश कोंडे"
ग्रामीण भागातील तरुण पिढी कष्ट करणारी, मेहनत करणारी, आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये यशाची नवनवीन शिखरे गाठण्यासाठी धडपडणारी व नवनवीन मोठी स्वप्नं पाहणारी आहे.आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जिद्दीने, चिकाटीने, जीव तोडून मेहनत करणारी आहे. शालेय जीवनात 11 रुपयांसाठी संघर्ष करणारा मुलगा ते लाखो - करोडो रुपयांची उलाढाल करणारा युवा उद्योजक कल्पेश कोंडे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील, हवेली तालुक्यातील, खेडशिवापूर या गावात अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात झाला.
घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे तसेच जिरायती शेतीमुळे कल्पेश कोंडे यांचे वडील गोपाळ विठ्ठल कोंडे हे खाजगी कंपनीमध्ये 900 रुपये पगारावरती वॉचमनची नोकरी करत होते. कल्पेश कोंडे लहान असताना त्यांचे वडील गोपाळ कोंडे खेडशिवापूरमध्ये फुल विक्रीचा छोटासा व्यवसायही करत होते.तीन भावंडांचे कुटुंब आपल्या आई-वडिलांबरोबर खेडशिवापूरमध्ये दहा - बाय दहाच्या छोट्या घरामध्ये प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत होते.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कल्पेश कोंडे यांचे वडील त्याकाळी धडपडत होते. 1999 ला कल्पेश कोंडे यांच्या वडिलांनी खेडशिवापूरच्या हायवेलगत असलेल्या आपल्या छोट्या जागेवरती "हॉटेल तारांगण" नावाचं चहा - नाष्टयाचे छोटेसे हॉटेल नातेवाईकांच्या मदतीने सुरू केले.
"कल्पेश कोंडे यांच्या चुलत आत्याने त्याकाळी त्यांच्या बँकेतील एफडी वरती 45 हजाराचे कर्ज काढून हॉटेल तारांगण साठी मदत केली. कल्पेश कोंडे यांच्या वडिलांकडे असलेले छोटेसे भांडवल तसेच चुलत्यांनी केलेली मदत व इतर नातेवाईकांनी केलेली मदत यामुळे 1999 ला हॉटेल तारांगणची सुरुवात करता आली." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील अस्सल घरगुती स्वादिष्ट चवीचे, प्रसिद्ध मटन खानावळ असलेले खेड शिवापूर येथील प्रसिद्ध हॉटेल तारांगणच्या 25 वर्षाच्या यशस्वी वाटचालीमध्ये कल्पेश कोंडे यांच्या आई नलिनी गोपाळ कोंडे यांचे खूप मोठे योगदान आहे. 1999 ला एक लाखाच्या कमी भांडवलामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेल तारांगणची त्याकाळी सुरुवात झाली. हॉटेल सुरू करत असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये कल्पेश कोंडे यांच्या चुलत आत्याने केलेली मदत तसेच नातेवाईकांनी केलेली मदत त्याकाळी खूप मौल्यवान होती. हॉटेल तारांगण सुरू केले त्यावेळेस ग्राहकांसाठी सुरुवातीला चहा - नाष्टा सुरू केला होता. चहा, भजी, भेळ, वडापाव हे त्यावेळेसचे हॉटेल तारांगणचे नाष्टयाचे मेनू प्रसिद्ध होते.
1999 ला हॉटेल तारांगण सुरू केल्यावर कल्पेश कोंडे यांच्या आई नलिनी कोंडे यांनी कल्पेश कोंडे यांचे वडिल गोपाळ कोंडे यांना हॉटेलसाठी खूप चांगली साथ दिली.
1999 ला हॉटेल तारांगणची सुरुवात झाली त्यावेळेस कल्पेश कोंडे यांचे वय नऊ वर्ष होते त्यांचा मोठा भाऊ ऋषिकेश कोंडे यांचे वय बारा वर्षे होते. हॉटेल तारांगणमध्ये सुरुवातीच्या काळात सुरू केलेल्या चहा, नाष्ट्याला खेड शिवापूर पंचक्रोशीतील ग्राहकांनी खूप चांगला प्रतिसाद दिल्यामुळे काही महिन्यानंतर ग्राहकांसाठी त्यांनी जेवण, राईसप्लेट चालू केली.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
नलिनी कोंडे यांना त्यांच्या कुटुंबातील मुलांच्या भविष्याची चिंता होती. त्यांना त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे होते. त्यांचे भविष्य चांगले घडवायचं होतं त्यामुळेच त्यांनी त्यांच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे, कष्ट, मेहनत करून हॉटेल व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे साथ दिली.
"आई ही जगातील खूप मोठी संघर्षयोद्धा असते. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ज्यावेळेस आई मैदानामध्ये उतरते त्यावेळेस जगातील कितीही मोठे संकट आले तरीही त्यावरती मात करून ती यशस्वी होतेच. नलिनी कोंडे यांनी 99 च्या दशकामध्ये हॉटेल तारांगणच्या यशस्वी प्रवासासाठी, मुलांचे चांगले भविष्य घडवण्यासाठी हॉटेल व्यवसायात जी गरुडझेप घेतली. जे कष्ट, मेहनत घेतली त्यामुळेच हॉटेल तारांगण अल्पावधीतच पश्चिम महाराष्ट्रातील अस्सल घरगुती स्वादिष्ट चवीचा, मटन खानावळींमधील हॉटेलचा प्रसिद्ध ब्रँड झाला."
1999 ला हॉटेल तारांगण सुरू केल्यानंतरचा पहिला काही वर्षातला काळ कोंडे कुटुंबियांसाठी खूप संघर्षाचा होता. सकाळी आठ वाजता सुरू केलेले हॉटेल रात्री बारा वाजेपर्यंत जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना प्रामाणिकपणे सेवा दिल्यानंतर, हॉटेल बंद करून पुन्हा सर्व कामे आटपून, रात्रीच्या दोन वाजता हॉटेल तारांगण ते खेड शिवापूर मधील त्यांच्या घरापर्यंत तीन किलोमीटरचा प्रवास त्याकाळी कल्पेश कोंडे यांचे आई-वडील व सर्व भावंडे रात्रीच्या वेळी, घनदाट झाडे असताना चालत करत होते.
खेडशिवापूरमध्ये दहा बाय दहाच्या छोट्याश्या खोलीत वास्तव्य करणारे कोंडे कुटुंब गरीब परिस्थितीशी संघर्ष करत होते. गावाकडचे मातीच्या भिंतीतले छोटेसे घर पावसाळा आला की घराच्या ओसरीतून उठून, दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत गर्दीमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना झोपावे लागायचे.
"आमच्या लहानपणी आमची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची होती. गरीबी होती परंतु गावाकडची माणुसकी, प्रेम व जिव्हाळा आम्हा सर्व कुटुंबातल्या लोकांना एकत्र ठेवायचा. आमच्या घरच्या ओसरीत आमच्या वाड्यातील सर्व वीस भावंड एकत्र आम्ही जेवण करायला बसायचो. आजही ती आमची एकी आहे. त्याकाळी पैसे कमी होते परंतु माणुसकी, प्रेम, समाधान खूप होते." असे कल्पेश कोंडे सांगतात.
"मला माझ्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता होती. मला माझ्या मुलांचे भविष्य चांगलं घडवायचे होते. माझ्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे होते त्यामुळेच मी आमच्या हॉटेल तारांगणचे काम जिद्दीने, चिकाटीने व प्रामाणिकपणे सांभाळायचे ठरवले. सुरुवातीला काही लोकांनी टीका केली परंतु माझ्या पतीच्या खांद्याला खांदा लावून हॉटेल तारांगणचा व्यवसाय वाढवण्यासाठी साथ देणे हे माझे कर्तव्य होते." असे नलिनी कोंडे यांनी सांगितले.
"1999 च्या दशकामध्ये गावाकडच्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये गृहिणी म्हणून काम करणारी स्त्री प्रतिकूल परिस्थितीशी लढा देऊन, आपल्या पतीला हॉटेल व्यवसाय वाढवण्यासाठी जिद्दीने, चिकाटीने आणि धैर्याने उभी राहते आणि तो हॉटेल व्यवसाय पुढे यशस्वीपणे चालवते हा संघर्षमय प्रवास महाराष्ट्रातील सर्वच महिला वर्गांसाठी खूप प्रेरणादायी आहे."
हॉटेल तारांगण सुरू झाल्यानंतर पहिले काही महिने हॉटेलमध्ये आचारी काम करायला होता. त्या काळातच कल्पेश कोंडे यांच्या आईने आचारी करत असलेल्या वेगवेगळ्या भाज्या, ग्रेव्ही, वेगवेगळे पदार्थ या सर्व रेसिपी पाहून,निरीक्षण करून शिकल्या.
हॉटेलमध्ये फक्त निरीक्षण करून, पाहून हॉटेलमधील वेगवेगळ्या भाज्या बनवण्यामध्ये तरबेज होणं त्याकाळी सोपी गोष्ट नव्हती. हॉटेल तारांगणचा आचारी काही महिन्यातच सोडून गेल्यानंतर हॉटेलमधील स्वादिष्ट जेवण बनवण्यापासून ते ग्राहकांना उत्तम सेवा देईपर्यंतची संपूर्ण हॉटेलची जबाबदारी नलिनी कोंडे यांच्यावर पडल्यानंतर त्यांनी ती लिलया पेलली.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
हॉटेल तारांगणची सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात खेडशिवापूरच्या पंचक्रोशीतील ग्राहकांनी दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे, येणाऱ्या अडचणींमधून मार्ग काढून हॉटेलमधील नव नवीन साहित्य विकत घेऊन, प्रतिकूल परिस्थितीशी लढा देऊन हॉटेल व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न कोंडे कुटुंबियांनी त्याकाळी केला.
रात्रीच्या वेळी हॉटेल बंद केल्यानंतर पावसाळ्यात पाऊस चालू असताना भिजू नये म्हणून पोत्याची कोफ करत सर्व कोंडे कुटुंबातील सदस्यांना अंधारात 3 किमी. चालतच घरी जावे लागे. हॉटेल तारांगण सुरू केल्यानंतर सुरुवातीचा काही वर्षाचा काळ कोंडे कुटुंबियांसाठी खूप संघर्षाचा होता परंतु कल्पेश कोंडे यांच्या आई व वडील यांनी जिद्दीने, चिकाटीने संकटांवरती मात करून हॉटेल व्यवसाय प्रामाणिकपणे उभा केला.
रात्रीच्या वेळेस हॉटेल बंद करून कल्पेश कोंडे यांचे आई वडील व सर्व भावंडे घरी चालत जात असताना रस्त्याला एका ट्रक ड्रायव्हरने कल्पेश कोंडे यांच्या आई नलिनी कोंडे यांच्या अंगावरती पाणी ओतले. या विचित्र व धक्कादायक प्रसंगानंतर कल्पेश यांचे वडील गोपाळ कोंडे यांनी प्रवासासाठी जुनी एमएटी दुचाकी विकत घेण्याचा निर्णय घेतला.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"आम्ही रात्रीच्या वेळेस हॉटेल बंद करून घरी चालत जात असताना रस्त्याने ट्रक ड्रायव्हरने माझ्या अंगावरती पाणी ओतले. त्यावेळेस आम्हाला खूप धक्का बसला.परंतु या वाईट प्रसंगातून खचून न जाता आम्ही यातून बाहेर पडून, माझ्या पतीने प्रवासासाठी जुनी एमएटी विकत घेतली. आमच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आम्हाला लढणे खूप गरजेचे होते." असे नलिनी कोंडे यांनी सांगितले.
हॉटेल तारांगण चालू झाल्यानंतर काही महिन्यातच हॉटेलच्या 20 गुंठे जागेची केस कोर्टामध्ये चालू होती. कल्पेश यांचे वडील गोपाळ कोंडे न्यायालयातून न्याय मिळण्यासाठी या केससाठी लढत होते. यावेळी नलिनी कोंडे संपूर्ण हॉटेलचे व्यवस्थापन, हॉटेल तारांगणचा संपूर्ण कारभार उत्तमरीत्या सांभाळत होत्या.
कल्पेश कोंडे इयत्ता चौथीमध्ये असल्यापासून हॉटेल तारांगणमध्ये आपल्या आई-वडिलांना छोटी-मोठी मदत करत होते. कल्पेश कोंडे यांना व्यवसायाचे बाळकडू हॉटेल तारांगणमध्येच बालपणापासूनच त्याकाळी मिळत होते.
मुलांच्या भविष्यासाठी लढणाऱ्या आई-वडिलांना त्यांची छोटी - छोटी मुले देखील त्याकाळी हॉटेलमध्ये लहान सहान मदत करत होते. कल्पेश कोंडे यांचा त्यावेळेसचा बारा वर्षाचा मोठा भाऊ ऋषिकेश कोंडे हे देखील हॉटेलमध्ये आई-वडिलांना मदत करत असे.
"आमच्या हॉटेल तारांगणच्या 20 गुंठे जागेची केस ज्यावेळेस न्यायालयमध्ये चालू होती तो काळ आमच्यासाठी खूप खडतर होता. माझे वडील त्यावेळेस स्वारगेट पासून शिवाजीनगर कोर्टापर्यंत चालत जात असे. माझी आई हॉटेल तारांगणचे संपूर्ण व्यवस्थापन पाहत असे. त्याकाळी काही लोक जमीन विकून दुसरा व्यवसाय करा असा सल्ला द्यायचे परंतु माझ्या आई-वडिलांनी हॉटेल तारांगणचा व्यवसाय जिद्दीने, चिकाटीने उभा केला आणि तो यशस्वीपणे पुढे चालवला याचा आम्हा सर्वांनाच खूप अभिमान आहे." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
हॉटेल तारांगणचे त्याकाळी गावरान कोंबडीचे जेवण खूप प्रसिद्ध होते. गावरान कोंबडीचा रस्सा, भाकरी, गावरान कोंबडीची सुक्के फ्राय डिश लोकांना खूप आवडायची. कल्पेश कोंडे यांचे प्राथमिक शिक्षण खेडशिवापूर मधील जिल्हा परिषद शाळेमध्ये मराठी माध्यमात झाले. कल्पेश यांचे माध्यमिक शिक्षण खेडशिवापूरमधीलच शिवभूमी माध्यमिक विद्यालयात झाले.
कल्पेश कोंडे इयत्ता चौथी पासूनच शाळा सुटल्यानंतर अनवाणी चालत हॉटेलवरती मदत करण्यासाठी येत. कल्पेश दहा वर्षाचे असल्यापासूनच कोंबड्या कापून हॉटेल तारांगणसाठी देत. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये हॉटेलमध्ये येऊन हॉटेलसाठी लागणाऱ्या कोंबड्या कापून, कोंबड्यांचे पीस व्यवस्थित तोडून हॉटेलमध्ये देत. परिस्थिती माणसाला घडवत असते. एवढ्याशा लहान वयात देखील कल्पेश कोंडे हॉटेलमध्ये आपल्या आई-वडिलांना साथ देण्यासाठी कोंबड्या कापायला, तोडायला शिकले. कल्पेश कोंडे यांचा मोठा भाऊ ऋषिकेश कोंडे हे देखील कोंबड्या कापणे, तोडणे यासाठी त्यावेळी मदत करत असे.
कल्पेश यांचे वडील गोपाळ कोंडे हे हॉटेल बंद झाल्यानंतर रात्रीच्या वेळी एमएटी दुचाकीवरून कुटुंबातील सर्व सदस्यांना सुरक्षित घरी घेऊन जात असे. त्यावेळेसच्या रात्रीच्या प्रवासात एमएटी दुचाकीवरती कल्पेश कोंडे यांचे वडील,आई, दोन्ही भावंड असे सर्वजण मिळून गाडीवरून घरी जात असे.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"आमच्या कुटुंबातील पहिली गाडी एमएटी दुचाकी होती. आज आम्ही 25 लाखाची इनोवा क्रिस्टा चार चाकी लक्झरीयस कार जरी घेतलेली असली तरी त्यावेळेसची कुटुंबातील पहिली दुचाकी गाडी - एमएटी घेतलेला आनंद खूप मोठा आहे." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
कल्पेश कोंडे इयत्ता तिसरीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची कौटुंबिक परिस्थिती खूप नाजूक होती. शाळेमध्ये सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी 11 रुपयाची वर्गणी काढलेली होती. कल्पेश यांनी घरी या कार्यक्रमासाठी पैसे मागितले होते परंतु घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांना ते त्यावेळेस अकरा रुपये जमा करता आले नाही. त्यामुळे इयत्ता तिसरीतील त्या सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमाला येण्यास कल्पेश यांनी नकार दिला परंतु कल्पेश कोंडे यांच्या वर्गातील सर्व वर्ग मित्रांनी 50 पैसे, एक रुपया गोळा करून कल्पेश कोंडे यांची अकरा रुपयांची वर्गणी दिली.
"इयत्ता तिसरीमध्ये मी शिकत असताना शाळेतील सामुदायिक भोजनाच्या कार्यक्रमासाठी अकरा रुपये वर्गणी देण्यासाठी देखील आमच्याकडे त्याकाळी पैसे नव्हते. ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाला गरिबीचे चटके सोसावे लागतात. त्यावेळी माझ्या वर्गातील सर्व वर्ग मित्रांनी 50 पैसे, एक रुपया असे गोळा करून माझी 11 रुपयाची वर्गणी सामुदायिक भोजनाच्या कार्यक्रमासाठी भरली. तो प्रसंग माझ्यासाठी आजही खूप हृदयस्पर्शी आहे. लहानपणीच गरिबीची जाणीव झाल्यामुळे मोठे झाल्यावर काहीतरी चांगले काम करायचे,मोठे व्हायचे असा ध्यास त्यामुळेच घेतला होता." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
"जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीमध्ये शिकत असताना 11 रुपयांसाठी संघर्ष करणारा एक मुलगा पुढे भविष्यात जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने आणि प्रामाणिकपणे काम करून लाखो - करोडो रुपयांची उलाढाल करणारा युवा उद्योजक बनतो. आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करतो. ही गोष्ट महाराष्ट्रातील तरुण पिढीसाठी खूपच प्रेरणादायी आहे."
कल्पेश कोंडे यांचे ग्रामीण भागातील घर दहा - बाय - दहाचे छोटे असले तरी त्यांच्याकडे एक गाय होती. कुटुंबातील मुलांना गाईचे चविष्ट दुध पिण्यासाठी मिळावे यासाठी कल्पेश यांचे आजोबा विठ्ठल कोंडे यांनी गाईचे पालन केले होते. पावसाळ्यामध्ये एकदा त्यांच्या गावातील घराची भिंत देखील पडलेले होती. ग्रामीण भागातील सामान्य लोकांना वेगवेगळ्या अडचणींचा,संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो.
आई-वडिलांचा संघर्ष पाहत तसेच प्रतिकूल परिस्थितीशी दिलेला लढा पाहतच कल्पेश कोंडे लहानाचे मोठे झाले. कल्पेश कोंडे दहावीला चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढे अकरावी व बारावीसाठीचे शिक्षण शिवभूमी कनिष्ठ महाविद्यालयात कला (आर्ट)शाखेतून घेतले.माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असतानाच वकील व्हायची कल्पेश कोंडे यांना आवड होती परंतु हॉटेल व्यवसायात चांगला जम बसल्याने वकील बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत कल्पेश कोंडे यांनी व्यक्त केली.
कमी वयामध्ये अंगावरती येणाऱ्या जबाबदाऱ्या माणसाच्या आयुष्याला चांगला आकार देत असतात. इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असताना कल्पेश कोंडे यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश करून, जमीन विक्रीच्या व्यवहारातून त्यांच्या आयुष्यातला पहिला व्यवहार पूर्ण केल्याचे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"माझ्या आयुष्यातला रिअल इस्टेट क्षेत्रातील जमीन विक्रीचा पहिला व्यवहार 2007 साली झाला. त्या व्यवहारामध्ये मला चाळीस हजार रुपये मिळाले. ही माझ्या आयुष्यातील पहिली मोठी कमाई. मला त्यावेळेस करोडपती झाल्यासारखे वाटले. परंतु माझ्या आई-वडिलांनी मला वास्तवाची जाणीव करून देऊन, पुन्हा मला जमिनीवरती आणले. हॉटेल व्यवसायामध्ये मी लक्ष देत असल्यामुळे विविध क्षेत्रातील अनेक लोकांची ओळख झाल्यामुळेच रिअल इस्टेट क्षेत्रात मला प्रवेश करता आला." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
कमी वयामध्ये मुलांच्या हातात जास्त पैसा आल्यानंतर त्या मुलांची भविष्यात काय वाईट अवस्था होते? हे आपण समाजात पाहतोच परंतु कल्पेश कोंडे यांच्या आई - वडिलांनी त्यांच्या मुलांवरती केलेले चांगले संस्कार, योग्य मार्गदर्शन यामुळेच कोंडे कुटुंबातील सदस्यांना यशाची मोठी झेप घेता आली.
हॉटेल तारांगणच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो ग्राहकांना उत्तम सेवा दिल्यामुळेच कोंडे कुटुंबियांची चांगली ओळख निर्माण झाली. यशस्वी हॉटेल व्यवसायामुळेच कोंडे कुटुंबियातील सदस्यांना इतर व्यवसायातही प्रगती करता आली.
पुण्यातील प्रसिद्ध एस.पी. कॉलेजमधून कल्पेश कोंडे यांनी बॅचलर ऑफ आर्टस् ही पदवी मिळवली. पुण्यात बी.ए. चे शिक्षण सुरू असतानाच कॉलेज वरून रोज घरी आल्यानंतर हॉटेल व्यवसायात कल्पेश कोंडे प्रामाणिकपणे, जीव ओतून मदत करत होते. रियल इस्टेट क्षेत्रातील नवनवीन संधी शोधण्याचा कल्पेश प्रयत्न करत होते. तरुण वय आणि जोश असल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठीही कल्पेश कोंडे यांनी त्याकाळी प्रयत्न केले. 2013 ला कल्पेश कोंडे यांनी रियल इस्टेट क्षेत्रात प्रामाणिकपणा, लोकसंपर्क व उत्तम सेवा यामुळे जमीन खरेदी - विक्रीचे ग्राहकांचा विश्वास जिंकणारे चांगले व्यवहार केल्याचे कल्पेश यांनी सांगितले.
आपले आई-वडील व भाऊ कुटुंबाच्या प्रगतीसाठी, हॉटेल व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे झटताना बघितल्यामुळेच कल्पेश कोंडे यांनी कुटुंबाला एक चांगला हातभार लावण्यासाठीच, कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी रिअल इस्टेट क्षेत्रात चांगले काम करून, त्या क्षेत्रातही उत्तम जम बसवला. रियल इस्टेट क्षेत्रात कल्पेश कोंडे यांना मिळालेल्या यशामुळे, हॉटेल व्यवसायातील आवडीमुळे त्यांनी वकील बनण्याच्या त्यांच्या स्वप्नाकडे दुर्लक्ष केल्याचे कल्पेश यांनी सांगितले.
कोंडे कुटुंबियांनी हॉटेल तारांगणच्या यशस्वी भरारीसाठी केलेले कष्ट, मेहनत, चिकाटी यामुळेच 2011- 12 ला कोंडे कुटुंबीयांनी 35 लाखाचा बंगला बांधला. दहा - बाय - दहाच्या छोट्याशा, मातीच्या भिंती असलेल्या खोलीमध्ये राहणारे कोंडे कुटुंब जिद्दीने, चिकाटीने, कष्टाने, एकजुटीने प्रचंड मेहनत करून हॉटेल व्यवसायात संपूर्ण पुणे जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात चांगले नाव कमावून, 35 लाखाचा बंगला बांधून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांसाठी खूपच प्रेरणादायी गोष्ट आहे.
जमीन विकून घर बांधा व हॉटेल व्यवसाय वाढवा असा सल्ला देणाऱ्या लोकांचे न ऐकता कोंडे कुटुंबीयांनी आवडीच्या क्षेत्रात संपूर्णपणे झोकून देऊन, जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने आणि दूरदृष्टी ठेऊन आपल्या नवीन घराचे स्वप्न पूर्ण करून, हॉटेल व्यवसायही यशस्वीपणे चालवुन दाखवला हा खूप कौतुकास्पद व प्रेरणादायी प्रवास आहे.
खेडशिवापुर मधील प्रसिद्ध "हॉटेल तारांगण" हा अस्सल मटन खानावळीचा पंचवीस वर्ष ग्राहकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा ब्रँड होण्यासाठी कोंडे कुटुंबातील दोन पिढ्यांनी महाराष्ट्रातील हजारो ग्राहकांना प्रामाणिकपणे दिलेली सेवा, जेवणाची उत्कृष्ट चव, घरगुती जेवणाचा आस्वाद, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो ग्राहकांना दिलेल्या उत्कृष्ट सेवेमुळे मिळालेली पसंती यामुळेच हॉटेल तारांगणने महाराष्ट्रातील हजारो ग्राहकांची मने जिंकली.
"हॉटेल तारांगणचा 2005 ते 2012 हा सुवर्णकाळ मानावा लागेल. या काळातच हॉटेल तारांगणने हॉटेल व्यवसायात मोठी झेप घेतली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो ग्राहकांचे आमच्या प्रामाणिक सेवेमुळे, स्वादिष्ट भोजनामुळे झालेले समाधान आम्हाला खूप ऊर्जा देते. 'माझी आई स्वादिष्ट जेवण बनवते' हाच खरा आमच्या हॉटेल तारांगणचा मोठा ब्रँड आहे. आईच्या हातचे घरगुती चविष्ट जेवण हीच आमच्या हॉटेल तारांगणची खरी ओळख आहे." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील हजारो ग्राहकांची मने जिंकणाऱ्या हॉटेल तारांगणचा मागील पंचवीस वर्षांचा प्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हता. मुंबई - पुणे बेंगलोर हायवे लगत असणाऱ्या हॉटेल तारांगणला मागील पंचवीस वर्षात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
मुंबई - पुणे - बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना 2006 ला हॉटेल तारांगण समोरील झाडे काढावी लागली. या झाडांखाली हॉटेल तारांगणचे अनेक ग्राहक चविष्ट भोजनाचा आनंद घेत होते. अनेक ग्राहक या महामार्गावरून प्रवास करत असताना या झाडांची खूण लक्षात ठेवूनच या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी येत असत. त्याकाळी विविध अडचणींना सामोरे जाऊन या अडचणींवर मात करून कोंडे कुटुंबियांनी हॉटेल तारांगणच्या माध्यमातून हजारो ग्राहकांना उत्तम सेवा देऊन, हॉटेल व्यवसाय यशस्वीपणे चालविला.
2012 ला राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना रोड वाइंडिंगमध्ये हॉटेल तारांगण पाडावे लागले हा खूप मोठा धक्का कोंडे कुटुंबियांसाठी होता. यशाची नवनवीन शिखरे गाठणाऱ्या हॉटेल तारांगणसाठी हे खूप मोठे संकट होते तसेच हा खूप खडतर काळा होता.
"आमच्या हॉटेल तारांगणमध्ये हजारो ग्राहकांनी स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेऊन त्यांना मिळालेले समाधान व त्यांनी आम्हाला दिलेले प्रेम आमच्यासाठी खूप मोठे असते. 2012 ला राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना रोड वाइंडिंगमध्ये आमचे हॉटेल तारांगण पाडावे लागले हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता आणि खूप मोठी दुःखद घटना होती. ज्या हॉटेलने आमच्या कोंडे कुटुंबीयांच्या प्रगतशील वाटचालीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. आम्हाला खूप मोठी उभारी दिली. त्या हॉटेलचे नुकसान होत असताना आम्हाला प्रचंड वेदना होत होत्या. या प्रचंड मोठ्या धक्क्यातून आम्ही सावरून पुन्हा एकदा हॉटेल तारांगणची नव्याने उभारणी करून, आमच्या हॉटेलच्या प्रगतशील वाटचालीसाठी आम्ही सर्वांनीच खूप मेहनत घेतली." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
"राष्ट्रीय महामार्गासाठी जागा लागत असल्यामुळे हॉटेल तारांगण पाडल्यानंतर शासनाकडून योग्य त्या मदतीची आम्हाला अपेक्षा होती परंतु पाच लाख रुपयांचे त्या जागेचे व शेडचे मूल्यांकन असताना शासनाकडून फक्त 60 हजार रुपये जागेचे व 59 हजार रुपये शेडची नुकसान भरपाई मिळाली. पुन्हा नव्याने व जोमाने काम करून आणि आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकजुटीने प्रयत्न करून, हॉटेल तारांगणच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना प्रामाणिक सेवा देण्यास आम्ही सुरुवात केली." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"एका सर्वसामान्य कुटुंबाने तेरा वर्ष जिद्दीने, चिकाटीने, प्रचंड मेहनतीने संपूर्ण जीव ओतून उभा केलेला आणि यशस्वीपणे चालवलेला हॉटेल क्षेत्रातील व्यवसाय एका क्षणात आपल्या डोळ्यासमोर ढासळत असताना पाहून किती भयानक वेदना झाल्या असतील कोंडे कुटुंबियांना? या मोठ्या धक्क्यातून सावरून कोंडे कुटुंबीयांनी पुन्हा एकदा हॉटेल तारांगणची जिद्दीने नव्याने उभारणी करून हॉटेल तारांगणच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या हजारो ग्राहकांना प्रामाणिक व उत्कृष्ट सेवा दिली. ही महाराष्ट्रातील सर्व तरुण व्यवसायिकांसाठी खूप प्रेरणादायी गोष्ट आहे."
"आमच्या हॉटेलचा सुरुवातीचा काळ आम्हाला खूप काही शिकवण देणारा होता. आमच्या हॉटेल तारांगणला आठवड्यातील तीन-चार दिवस खूप गर्दी असायची. मंगळवार, शुक्रवार, रविवार या तीन दिवशी रोजचा हॉटेलचा धंदा कमीत कमी 35 ते 40 हजार रुपये व्हायचा. आमच्या हॉटेलच्या दोन दशकांच्या काळाने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे घडवलं. आयुष्यात मोठी संकटे आली तरच माणसांची चांगली जडणघडण होते." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
"एक निर्भीड,ध्येयवादी स्त्री आपल्या कुटुंबासाठी कणखरपणे उभी राहून कुटुंबाची मोठी प्रगती कशी करू शकते, अनेक अडचणींवरती, संकटांवरती मात करून कुटुंबातील सदस्यांच्या एकजुटीने, कष्टाने, मेहनतीने पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध, अस्सल मटन खानावळीचा ब्रँड "हॉटेल तारांगणची" कशी यशस्वी वाटचाल करू शकते? हे नलिनी कोंडे यांच्या मागील 25 वर्षातल्या प्रेरणादायी प्रवासातून दिसून येते.
"25 रुपयांच्या मटन मसाल्यापासून ते 250 रुपयापर्यंतचा मटन मसाला हे उत्कृष्ट चवीचे जेवण महाराष्ट्रातील हजारो ग्राहकांना प्रामाणिकपणे देण्याचा हा हॉटेल तारांगणमधील 25 वर्षांचा प्रवास नलिनी कोंडे यांनी जिद्दीने व मोठ्या कष्टाने उभा केलेला आहे. हॉटेल तारांगणमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व शाकाहारी व मांसाहारी भोजनाचा आनंद घ्यायला येत असतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध आमदार, खासदार, मंत्री, कलाकार, सेलिब्रिटी, खेळाडू, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी हॉटेल तारांगणमधील अस्सल घरगुती चवीच्या, चविष्ट मटणाचा, शाकाहारी भोजनाचा आस्वाद घ्यायला येत असतात.
"आमच्या हॉटेल तारांगणमध्ये मुंबईवरून ग्राहक खास पिठलं भाकरी खाण्यासाठी येतात. व्हेज मधील वेगवेगळे मेनू चना मसाला, अख्खा मसूर, बैंगन मसाला ,मटकी मसाला हे शाकाहारी पदार्थ खाण्यासाठी अनेक ग्राहक येतात. आमच्या हॉटेल तारांगणचे अस्सल घरगुती चवीचे, स्वादिष्ट मटन फ्राय, मटन आळणी, मटन थाळी खाण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ग्राहक येत असतात. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक साहेब यांचे कुटुंब, खासदार निलेश लंके, आमदार भीमराव तापकीर, आमदार रवींद्र धंगेकर, पुण्यातील अनेक नगरसेवक तसेच अनेक मोठी - मोठी राजकारणातील दिग्गज मंडळी आमच्या हॉटेल तारांगणमधील स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नागेश भोसले, जितेंद्र जोशी, तसेच अनेक कलाकार मंडळी आवर्जून आमच्या हॉटेल तारांगणमधील शाकाहारी व मांसाहारी भोजनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात." असे नलिनी कोंडे यांनी सांगितले.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो ग्राहक हॉटेल तारांगणचे चविष्ट मटन फ्राय, मटण आळणी, मटन थाळी व शाकाहारी उत्तम चवीचे पदार्थ खाण्यासाठी आवर्जून येत असतात.
हॉटेल तारांगणमध्ये रात्रीच्या एक - दोन वाजे पर्यंत सुद्धा भूक लागलेल्या ग्राहकांना चविष्ट जेवणाची उत्तम सेवा दिलेली आहे.
पुण्यातील खास मटन खवय्ये असणारे मित्रांचे मोठे ग्रुप हॉटेल तारांगणमध्ये येऊन येथील उत्कृष्ट चवीमुळे दिवसभर आठ - दहा किलो मटण सुद्धा फस्त करतात. आज पुणे शहरात शेकडो मटण खानावळीचे हॉटेल्स आहेत. परंतु खेडशिवापूरच्या हॉटेल तारांगणमध्ये आवर्जून पुण्यातून मटन खाण्यासाठी येणारा हौशी वर्ग आहे.
एका - एका टेबलचे खास मटणाचे बिल पाच हजार रुपये होते. हॉटेलमध्ये मटन फ्राय, मटण थाळी खाण्यासाठी येणारा ग्राहक वर्ग जेवण झाल्यानंतर खूप समाधानाने जातो. ती आमच्यासाठी खूप मोठी ऊर्जा असते. असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
कोंडे कुटुंबियांना हॉटेल तारांगण यशस्वीपणे चालवत असताना अनेक अडचणींचा, अनेक संकटांचा सामना करावा लागला. 2012 नंतर हॉटेल व्यवसायात अनेक चढउतार आले तरीही निराश न होता, खचून न जाता कोंडे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकजुटीने, जिद्दीने, चिकाटीने, प्रचंड मेहनत केली व हॉटेल तारांगणबद्दल ग्राहकांच्या मनात असलेला विश्वास उत्तम सेवेच्या माध्यमातून कायम ठेवून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो ग्राहकांना उत्तम सेवा देऊन, स्वादिष्ट शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा ग्राहकांना आनंद देऊन हॉटेल तारांगणची प्रगतशील वाटचाल चालू ठेवली.
कल्पेश कोंडे व त्यांचे दोन्ही भाऊ ऋषिकेश कोंडे व अक्षय कोंडे हॉटेलमध्ये आल्यानंतर मालकासारखे न वागता, हॉटेलमधील सर्व प्रकारची कामे, हॉटेल स्वच्छ करण्यापासून, झाडण्यापासून, टेबल पुसण्यापासून ते ग्राहकांना ऑर्डर देण्यापासून, विविध पदार्थ हॉटेलमध्ये बनवण्यापासून ते सर्व पातळीवरती या तीनही भावंडांनी कष्ट करून मेहनत करून, ग्राहकांना प्रामाणिक सेवा दिल्यामुळे व आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने काम केल्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील हजारो ग्राहकांच्या मनात हॉटेल तारांगणने एक चांगले स्थान कमावले.
"रिअल इस्टेट क्षेत्रातही खूप चांगले यश मिळवणारे कल्पेश कोंडे तसेच हॉटेल व्यवसायात प्रामाणिकपणे सेवा देऊन यश मिळवणारे व विविध क्षेत्रांमध्ये व्यावसायिक गुंतवणूक करणारे युवा उद्योजक कल्पेश कोंडे लाखो - करोडो रुपयांची उलाढाल करत असताना देखील हॉटेल तारांगणमध्ये आल्यानंतर हॉटेल स्वच्छ करण्यापासून ते टेबल पुसण्यापासून ते सर्व प्रकारची कामे करायला कुठलीही लाज न बाळगता, आजही ते आनंदाने व अभिमानाने हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सेवा देतात. ही गोष्ट महाराष्ट्रातील तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे."
आजच्या काळातील काही तरुण कुठल्याही व्यवसायात काम करताना जास्त पैसे कमवायला लागले की त्यांच्यामध्ये लगेच अहंकार येतो. महागड्या व दिखाऊ जीवनशैलीत ते अडकतात. लाखो - करोडो रुपयांची उलाढाल करणारा उद्योजक असताना देखील जमिनीवरती पाय ठेवून कसे माणुसकीने,प्रेमळ राहिले पाहिजे. लोकांशी नम्रपणे व प्रेमाने कसा संवाद साधला पाहिजे? व्यावसायिक क्षेत्रात नवनवीन चांगले मित्र कसे जोडले पाहिजेत? हे कल्पेश कोंडे यांच्या प्रवासातून शिकण्यासारखे आहे.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
हॉटेल तारांगणच्या प्रगतशील वाटचालीमध्ये 2018 नंतर खूप मोठे स्थित्यंतर आले. कोंडे कुटुंबियांनी 70 ते 80 लाख रुपये खर्च करून 2019 ला नव्याने पुन्हा एकदा हॉटेल तारांगण ग्राहकांच्या सेवेमध्ये नव्या रुपात, नव्या ढंगात, आधुनिक सुविधांनी सज्ज असे, अनेक वर्षांची उत्कृष्ट चव जशीच्या तशी ग्राहकांना देऊन त्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी 24 डिसेंबर 2019 ला नव्या जोशात पुन्हा एकदा सुरुवात केली. हॉटेल तारांगणच्या शेकडो - हजारो ग्राहकांना या हॉटेल तारांगणचे नवीन रूप, उत्कृष्ट चव, उत्तम सेवा खूप आवडली. तीन-चार महिने खूप चांगला व्यवसाय केला. परंतु 2020 मार्चमध्ये आलेल्या कोरोना संकटामुळे पुन्हा हॉटेल तारांगणला व कोंडे कुटुंबीयांना खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले.
पाऊण कोट रुपये खर्च केलेल्या हॉटेल तारांगणला तीन महिन्यानंतर कोरोना, लॉकडाऊन या खूप मोठया संकटाला सामोरे जावे लागले. भारतातील कोरोनाच्या महाभयंकर लाटेने अनेक व्यावसायिकांचे या काळात कंबरडे मोडले. अनेक व्यावसायिक कर्जबाजारी झाले. अनेक व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या, हा एवढा भयंकर काळ होता.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Be
कितीही मोठे संकट आले, कितीही मोठी अडचण आली तरी "कोंडे कुटुंबातील सर्व सदस्यांची एकजूट" ही त्यांची खूप मोठी ताकद आहे. या कोरोना सारख्या संकटा विरोधातही जिद्दीने, चिकटीने आणि मेहनतीने लढले आणि काही महिन्यानंतर पुन्हा एकदा हॉटेल तारांगणच्या प्रगतशील वाटचालीसाठी प्रामाणिकपणे योगदान द्यायला त्यांनी सुरुवात केली. पंचवीस वर्षांपासून हॉटेल तारांगणमध्ये ग्राहकांच्या दोन - दोन पिढ्या जेवण करायला येतात ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. कल्पेश कोंडे यांच्या आईने बनविलेले मटण फ्राय, मटण आळणी, मटन रस्सा, पिठलं भाकरी, बैंगन मसाला, अख्खा मसूर याची पंचवीस वर्षातली चव अजूनही बदललेले नाही. आजही या उत्कृष्ट चवीसाठी व स्वादिष्ट भोजनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ग्राहक आवर्जून हॉटेल तारांगणमध्ये शाकाहारी व मांसाहारी जेवण करण्यासाठी येतात.
कल्पेश कोंडे यांनी हॉटेल व्यवसायाबरोबर रिअल इस्टेट क्षेत्रात जसे यश मिळवले तसेच कोंडे कुटुंबियांनी आधुनिक शेती करून कृषी क्षेत्रातही चांगले काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोंडे कुटुंबीयांची शेती कल्पेश कोंडे यांचे वडील गोपाळ कोंडे सांभाळतात. शेतीचे क्षेत्र कमी जरी असले तरी त्या अडीच एकर क्षेत्रामध्ये कोंडे कुटुंबीय कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काकडी पालेभाज्या यांचे चांगले उत्पादन घेत असतात. गोपाळ कोंडे यांनी उत्तम शेती करून हॉटेल व्यवसायाला हातभार लावून कुटुंबासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. हॉटेल तारांगणमधील अनेक स्वच्छ व ताज्या भाज्या त्यांच्या शेतामधीलच असतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीच्या माध्यमातून आपले उत्पन्न वाढवले पाहिजे.
कुठल्याही सामान्य माणसाचं त्याच्या आयुष्यात चार चाकी गाडी घेण्याचे स्वप्न खूप हृदयस्पर्शी असते. कोंडे कुटुंबियांनी 2008 ला पहिली चार चाकी गाडी हुंडाई कंपनीची सेंट्रो कार विकत घेतली. गोपाळ कोंडे यांनी एक व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 2008 ला सेंट्रो कार विकत घेतली.
"आमच्या आयुष्यातील पहिली कार हुंडाई कंपनीचे सेंट्रो कार, ती विकत घेतली तो खूप आनंदाचा क्षण होता आमच्या सर्वांसाठीच.आमच्या कुटुंबातील कोणालाच त्यावेळेस कार चालवता येत नव्हती तरी देखील हॉटेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून माझ्या वडिलांनी ती कार विकत घेतली होती. काही महिन्यांनी कार चालवायला शिकल्यानंतर आमच्या कुटुंबियांनी त्या आमच्या पहिला कारच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खूप चांगला प्रवास केला. आज आमच्याकडे 27 लाखाची टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा ही लक्झेरियस कार जरी असली तरी आमच्या आयुष्यातील पहिल्या कारने जो आनंद आमच्या कुटुंबाला दिलेला आहे तो खूप अनमोल आहे." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
"आमच्या आयुष्यातील पहिली कार हुंडाई कंपनीची सेंट्रो कार विकत घेताना माझ्या वडिलांचा खूप मोठा व्यावसायिक दृष्टिकोन होता. एक चांगली दूरदृष्टी होती. त्यावेळेस आमच्या घराचे कामही पूर्ण झाले नव्हते तरी देखील त्यांनी कार विकत घेण्याचे धाडस केले. त्याचा भविष्यात आम्हाला खूप फायदा झाला." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
कुठल्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे मेहनत घेतली तर नक्कीच यश मिळते हे कल्पेश कोंडे यांनी रियल इस्टेट क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून दिलेल्या उत्तम सेवेमुळे, त्यांना जे घवघवीत यश मिळाले. यावरून दिसून येते. रिअल इस्टेट क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून कल्पेश कोंडे यांना त्यांच्या नवीन बंगल्यासाठी, नवीन लक्झरीयस कार साठी तसेच हॉटेल तारांगण साठी साठी मदत करता आली. याचे समाधान असल्याचे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
"रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असेल तर विश्वास खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही लोकांशी प्रामाणिक राहून, लोकांचा विश्वास संपादन करून कशी उत्तम सेवा देतात यावरच त्या क्षेत्रातील यश अवलंबून असते. हॉटेल तारांगणच्या भरभक्कम पाठिंब्यामुळेच मला रिअल इस्टेट क्षेत्रात चांगले काम करता आले.लोकांना चांगली सेवा देता आली." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
खेडशिवापूर परिसरामध्ये औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपन्या असल्यामुळे त्या ठिकाणी वेअरहाऊस क्षेत्रातील संधी ओळखून कल्पेश कोंडे यांनी आपल्या कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे, खेडशिवापूर येथे हायवे जवळच, आधुनिक सुखसुविधा असलेले वेअर हाऊस बांधलेले आहे.
"हॉटेल तारांगणच्या प्रगतशील वाटचालीमुळेच आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे काम करता आले. खेडशिवापुर परिसरातील वेअरहाऊस क्षेत्रातील व्यावसायिक संधी ओळखून आम्ही एक करोड रुपये मूल्यांकन असलेले वेअरहाऊस बांधले. 30 हजार स्क्वेअरफुटच्या या गोडाऊनमध्ये ऑटोमोबाईल मटेरियल,कोरोगेटेड बॉक्स स्टोरेज याची खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे. औद्योगिक क्षेत्रातील नामवंत कंपन्यांना हे गोडाऊन भाड्याने दिलेले आहे. त्याचेही आम्हाला चांगले उत्पन्न मिळते." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
"अकरा रुपयांसाठी संघर्ष करणारा मुलगा त्याच्या आयुष्यात जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने हॉटेल व्यवसायात चांगले काम करून चांगले यश मिळवतो. रियल इस्टेट क्षेत्रातही उत्तम काम करून लाखो - करोड रुपये कमवतो. आई-वडिलांच्या संस्कारांचे पालन करून, निर्व्यसनी राहुन त्यांचे स्वप्न पूर्ण करतो. नवनवीन क्षेत्रात व्यवसायाच्या संधी ओळखून गुंतवणूक करून, प्रगतीच्या नवनवीन शिखरांवरती पोहोचतो. व्यावसायिक प्रगतीबरोबर माणुसकीही जपतो. हा प्रवास महाराष्ट्रातील तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे."
"कोंडे कुटुंबातील एकजूटता, प्रामाणिकपणा,मेहनत व लोकांना प्रामाणिक सेवा देण्याचा त्यांचा ध्यास यामुळेच या कुटुंबाला समाजामध्ये एक चांगली प्रतिष्ठा मिळाली. कल्पेश कोंडे यांचा छोटा भाऊ अक्षय कोंडे सिव्हिल इंजिनिअर आहे. अक्षय कोंडे मागील काही वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात छोटे - मोठे प्रकल्प प्रामाणिकपणे व दर्जेदार सेवा देऊन चांगले काम करताना दिसत आहे. अक्षय कोंडे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये खूप चांगला अभ्यास करून ते सिव्हिल इंजिनिअर झाले. बांधकाम क्षेत्रातील प्रकल्पांवरती काम करत असतानाही ते हॉटेल तारांगणच्या व्यवसायिक वाटचालीतही चांगल्या प्रकारे मदत करत आहेत."
"माझी तीनही मुले खूप हुशार, प्रामाणिक आणि मेहनती आहेत. माझा मोठा मुलगा ऋषिकेश हॉटेल तारांगण खूप चांगल्या प्रकारे सांभाळतो. अक्षयने खडतर परिस्थिती असताना देखील खूप चांगला अभ्यास करून, मेहनत करून तो सिविल इंजिनिअर झाला आणि त्याच्या आवडीच्या क्षेत्रात चांगले काम करत आहे. कल्पेशने रिअल इस्टेट क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून चांगले यश मिळवलेले आहे. त्याबरोबर हॉटेल तारांगणच्या प्रगतशील वाटचालीतही त्याचे महत्त्वाचे योगदान आहे. अक्षयही हॉटेल तारांगणच्या व्यवसायिक वाटचालीमध्ये चांगली मदत करतो. माझी तीनही मुले,माझे पती गोपाळ कोंडे,आमच्या कुटुंबातील सर्वच सदस्य, हॉटेल तारांगणच्या प्रगतशील वाटचालीसाठी प्रामाणिकपणे मेहनत करतात आणि त्यांची ही एकजूट आमच्यासाठी खूप समाधान देणारी गोष्ट आहे."असे नलिनी कोंडे यांनी सांगितले.
"माझा भाऊ अक्षय कोंडे सिव्हिल इंजिनिअर झाल्यानंतर बांधकाम क्षेत्रामध्ये खूप चांगले काम करत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अक्षयने बांधकाम क्षेत्रामध्ये छोट्या - मोठ्या प्रकल्पांवरती चांगले काम केलेले आहे. खेडशिवापूर परिसरातील काही बंगले, वेअरहाऊस या प्रकल्पांमध्ये अक्षयने चांगले काम केलेले आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये चांगले प्रकल्प करण्यासाठी माझ्या भावाला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. भविष्यात खेड शिवापूर परिसरामध्ये रेसिडेन्शिअल (निवासी प्रकल्प) व कमर्शिअल (व्यावसायिक प्रकल्प) चांगले प्रकल्प करण्याचा आमचा मनोदय आहे." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
"आयुष्यात कितीही अडचणी, संकटे आली तरी कुटुंबातील सदस्यांची एकजुटता असेल आणि जिद्दीने,चिकाटीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर कुठल्याही संकटावरती मात करून आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात चांगले यश मिळवू शकतो हे कोंडे कुटुंबियांनी त्यांच्या हॉटेल तारांगणच्या यशस्वी व्यावसायिक प्रवासातून सर्वांना दाखवून दिलेले आहे."
"माझ्या आई-वडिलांचे व माझ्या भावंडांचे तसेच आमच्या हॉटेल तारांगणच्या उत्कृष्ट चवीवर प्रेम करणारे महाराष्ट्रातील हजारो ग्राहक तसेच आमचा मित्रपरिवार व हितचिंतक या सर्वांचेच आमच्या हॉटेल तारांगणच्या यशस्वी प्रवासामध्ये खूप महत्त्वाचे योगदान आहे. माझ्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली माझा मोठा भाऊ ऋषिकेश यांचे हॉटेल तारांगणच्या प्रगतशील वाटचालीमध्ये तसेच जडणघडणीमध्ये महत्वाचे योगदान आहे. आमच्या कोंडे कुटुंबाची एकजूटता हीच आमची ताकद आहे." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
"आजच्या तरुण पिढीने निर्व्यसनी राहून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कष्ट, मेहनत करून आपल्या आई वडिलांचे स्वप्नं पूर्ण केले पाहिजे. आज आपल्याला तरुण मराठी उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील तरुण मुलांनी मोठी स्वप्ने पाहिले पाहिजेत. ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करून, तन-मन-धन अर्पण करून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली पाहिजे." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
"आमच्या हॉटेल तारांगणच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हजारो ग्राहकांना उत्तम सेवा देता आली याचे खूप समाधान आहे. भविष्यात हॉटेल तारांगण हा अस्सल घरगुती मटण खानावळीचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतभर 'फ्रॅंचायजी मॉडेलच्या' हॉटेलच्या विविध शाखेंच्या माध्यमातून राज्यातील व देशातील लाखो ग्राहकांना उत्तम सेवा द्यायची आहे. हॉटेल क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण व महत्वकांक्षी प्रकल्प राबवायचे आहेत." असे कल्पेश कोंडे यांनी सांगितले.
कल्पेश कोंडे यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील चांगला मित्रपरिवार लाभलेला आहे. खेडशिवापूरमध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात कल्पेश कोंडे यांचा सक्रिय सहभाग असतो. चांगली माणसे जोडणे. चांगला मित्रपरिवार जोडणे. अडचणीच्या काळात मित्रांना,लोकांना मदत करणे यामुळे कल्पेश कोंडे त्यांच्या मित्रपरिवारामध्ये प्रसिद्ध आहेत. भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे कल्पेश कोंडे यांचे आवडते उद्योजक आहेत. ग्रामीण भागातील एक सर्वसामान्य कुटुंब प्रामाणिकपणा व कष्टाच्या जीवावरती हॉटेल क्षेत्रात किती चांगले व मोठे काम करू शकते हे कोंडे कुटुंबियांनी सर्वांना दाखवून दिलेले आहे.
"अकरा रुपयांसाठी संघर्ष करणारा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक सामान्य मुलगा ते चौथीत शिकत असल्यापासून आई-वडिलांच्या हॉटेल व्यवसायासाठी प्रामाणिकपणे मदत करून जिद्दीने, चिकटीने, मेहनतीने हॉटेल तारांगणच्या यशस्वी वाटचालीमध्ये महत्त्वाचे योगदान देणारा ध्येयवादी तरुण ते प्रामाणिकपणा, विश्वास व उत्तम सेवेच्या जीवावर रिअल इस्टेट क्षेत्रातही चांगले यश मिळवणारा लढवय्या उद्योजक ते नवनवीन क्षेत्रातील व्यावसायिक संधी पाहून एक करोड रुपयाचे वेअरहाऊस उभारुन कॉर्पोरेट क्षेत्रातील नामांकित कंपन्यांना उत्तम सेवा देणारा युवा उद्योजक हा प्रवास तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे. अकरा रुपयांसाठी संघर्ष करणारा मुलगा आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून, माणुसकी जपून, लाखो - करोडो रुपयांची उलाढाल करणारा प्रसिद्ध युवा उद्योजक होतो. हा हृदयस्पर्शी प्रवास महाराष्ट्रातील तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे."
महाराष्ट्रातील प्रेरणादायी शिलेदार कल्पेश कोंडे यांच्या भावी प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा...
लेखक : - अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.
No comments:
Post a Comment