पुणे,२१ : महाराष्ट्रातील धरणग्रस्त शेतकरी कुटुंबाची अवस्था फार भयानक असते. शासनाची मिळणारी तोकडी मदत स्वीकारून, नवीन आयुष्य, नवीन जग उभारायचं म्हटलं की खूप मोठ्या संघर्षाला धरणग्रस्त शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.
निसर्ग सौंदर्य लाभलेल्या ग्रामीण भागातील, पुणे जिल्ह्यातील, राजगड (वेल्हा) तालुक्यातील, वरसगावच्या भिका गोरड यांच्या धरणग्रस्त शेतकरी कुटुंबाने प्रतिकूल परिस्थितीत, प्रचंड संकटावरती मात करून त्यांचं नवीन जग उभारण्याचा जिद्दीन व चिकाटीने प्रयत्न केला. शेतात कष्ट मेहनत करणाऱ्या गोरड कुटुंबियांनी पुन्हा आपल्या मूळ गावी वरसगावला येऊन "हॉटेल वरसगाव चौपाटी" हा हॉटेल क्षेत्रातील सिंहगड रोड - पानशेत परिसरातील ब्रँड बनवून, चुलता - पुतण्याची जोडी काय करू शकते? कुटुंबातील सदस्यांची एकजूटता काय करू शकते हे गोरड कुटुंबियांच्या यशस्वी भरारीवरून दिसून येते.
"गुरुप्रसाद गोरड या गोरड कुटुंबातील ध्येयवेड्या तरुणाने त्यांचे चुलते प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक सचिन गोरड यांच्या खंबीर पाठिंब्याने व मार्गदर्शनाखाली व आई-वडिलांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली प्रचंड कष्ट व मेहनत करून, स्वप्नपूर्तीसाठी जिद्दीने, चिकाटीने व प्रचंड मेहनत घेऊन, पुणे पोलीस दलात भरती होऊन, पोलीस शिलेदार बनून ग्रामीण भागातील तरुणाईचे, राजगड(वेल्हा) तालुक्यातील तरुणाईचे मन जिंकलेले आहे."
गोरड कुटुंबियांची वरसगाव धरणात शेतजमीन गेल्यानंतर शासनाची तोकडी मदत मिळाल्यानंतर, हे कुटुंब पुणे जिल्ह्यातील,दौंड तालुक्यातील कानगाव येथे स्थलांतरित झाले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"आपले मूळ गाव सोडून नवीन तालुक्यात, नवीन ठिकाणी कुटुंब उभे करणे, कुटुंबाची प्रगतशील वाटचाल करणे, प्रतिकूल परिस्थिती असताना शेती करून कुटुंब चालवणे ही त्या काळात खूप कठीण गोष्ट होती. काही वर्ष दौंड तालुक्यातील कानगाव येथे गोरड कुटुंबियांनी शेती करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवली. प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत गोरड कुटुंबीय त्याकाळी कुटुंबाच्या प्रगतीच्या नवीन वाटा शोधत होते."
गोरड कुटुंबातील कष्टाळू व प्रामाणिक व्यक्तिमत्व असलेले सचिन गोरड यांनी वडिलांच्या निधनानंतर त्या मोठ्या धक्क्यातून सावरून, कुटुंबाच्या प्रगतशील वाटचालीसाठी आयुष्यात वेगळ्या वाटेवरून जाण्याचा निर्णय घेतला.
सचिन गोरड यांनी त्याकाळी विविध ठिकाणी नोकरी केल्यानंतर, आपल्या मूळ गावी वरसगावला येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
वरसगावला येऊन पुन्हा एकदा शून्यातून आपले विश्व निर्माण करणे हा संघर्ष खूप मोठा होता तरी देखील आयुष्यातील फार मोठे आव्हान स्वीकारून सचिन गोरड यांनी वरसगावला धरण परिसरात मक्याचे कणीस विक्रीचा स्टॉल ते स्नॅक्स सेंटर ते छोट्याशा हॉटेलच्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवात केली. कुटुंबातील सर्व सदस्यांची साथ,भावाची व चुलता - पुतण्याची एकजूट, शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्कृष्ट चव यामुळे "हॉटेल वरसगाव चौपाटी" अल्पावधीतच सिंहगड रोड व पानशेत परिसरातील उत्कृष्ट सेवा देणारा एक हॉटेल क्षेत्रातील चांगला ब्रँड बनला.
"हॉटेल वरसगाव चौपाटीचे सर्वेसर्वा सचिन गोरड यांचे पुतणे गुरुप्रसाद गोरड यांना महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षा देण्याची, पोलीस बनण्याची आवड होती."तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे तुला जे काय लागेल ती मदत, मार्गदर्शन माझ्याकडून मिळेल तू पोलीस झालाच पाहिजे." अशा प्रकारचा खंबीर पाठिंबा गुरुप्रसाद यांचे चुलते सचिन गोरड यांच्याकडून मिळाल्यामुळे तसेच आई-वडिलांचे आशीर्वाद व मार्गदर्शन पाठीशी असल्यामुळे गुरुप्रसाद गोरड यांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास जिद्दीने, चिकाटीने सुरू केला आणि प्रचंड कष्ट, मेहनत घेऊन पुणे पोलीस दलात भरती होऊन, पोलीस शिलेदार बनून त्यांचे स्वप्न पूर्ण करून मोठे यश मिळवले."
गुरुप्रसाद गोरड यांचा जन्म दौंड तालुक्यातील कानगाव या ठिकाणी धरणग्रस्त शेतकरी कुटुंबात झाला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा संघर्ष सुरू असतानाच गोरड कुटुंबियांची प्रतिकूल परिस्थितीशी लढा देण्याची वाटचाल त्याकाळी सुरू होती.
धरणग्रस्त शेतकरी गोरड कुटुंबियांना दौंड तालुक्यातील कानगाव येथे मिळालेली शेतजमीन कसण्याचे काम गुरुप्रसाद यांचे आजोबा भिका गोरड, चुलते सचिन गोरड व वडील संदीप गोरड हे प्रचंड कष्ट, मेहनत करून, कुटुंबातले सर्व सदस्य शेती करूनच त्याकाळी कुटुंबाची उपजीविका भागवत होते.
गुरुप्रसाद यांचे प्राथमिक शिक्षण कानगावच्या जिल्हा परिषद मराठी शाळेत झाले. गोरड कुटुंबीय पुन्हा त्यांच्या मूळ गावी वरसगावला स्थलांतरित झाल्यानंतर गुरुप्रसाद यांचे माध्यमिक शिक्षण पानशेत गावातील श्री शिवाजी वीर बाजी पासलकर माध्यमिक विद्यालयात झाले.
गुरुप्रसाद गोरड शालेय जीवनात खूप अभ्यासू वृत्तीचे होते व शाळेत हुशार असल्यामुळे शिक्षकांचे आवडते विद्यार्थी होते. गुरुप्रसाद गोरड दहावीला चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत त्यांनी प्रवेश घेतला.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"वरसगाव - पानशेत परिसरातील प्रसिद्ध हॉटेल वरसगाव चौपाटीमध्ये गुरुप्रसाद यांचे चुलते सचिन गोरड यांच्या खांद्याला खांदा लावून गुरुप्रसाद स्वतः व त्यांचा भाऊ सौरभ गोरड, वडील संदीप गोरड,आई मनीषा गोरड, चुलती सखू गोरड तसेच कुटुंबातील सर्व सदस्य हॉटेल व्यवसायाच्या प्रगतीसाठी आजही प्रचंड कष्ट व मेहनत घेत आहेत. गुरुप्रसाद यांचे महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना हॉटेल वरसगाव चौपाटीमध्ये देखील त्यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देऊन, कुटुंबाला मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आहे."
"पुण्यातील प्रसिद्ध सुधाकरराव जाधवर महाविद्यालयात शिक्षण घेऊन गुरुप्रसाद गोरड यांनी बीकॉमची पदवी घेतली. पदवीचे शिक्षण घेत असतानाच गुरुप्रसाद यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची आवड लागली आणि विशेषतः पोलीस बनण्याचे स्वप्न त्यांना त्याकाळी स्वस्थ बसून देत नव्हते. गुरुप्रसाद गोरड यांनी पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक व्यायाम, सराव,धावणे,शारीरिक चाचणीची तयारी तसेच लेखी परीक्षेची तयारी यासाठी प्रामाणिकपणे कष्ट व मेहनत घेतले."
"पोलिसांची वर्दी पाहिल्यानंतर मला खूप मोठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळायची. पोलीस बनण्याचे माझे स्वप्न होते. माझे चुलते सचिन गोरड यांचा खंबीर पाठिंबा व मार्गदर्शन माझ्या पाठीशी होतेच तसेच माझ्या आई-वडिलांचेही आशीर्वाद व मार्गदर्शन होते. पोलीस भरती होण्याच्या या प्रवासात मला मित्रांचीही खूप साथ मिळाली. कुटुंबाची भक्कम साथ असल्यावर तुम्ही जिद्दीने, चिकाटीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर कुठलेही स्वप्न पूर्ण होते याची प्रचिती मला पोलीस बनून माझे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मिळाली." अशी प्रतिक्रिया पुणे पोलीसदलात भरती झालेले पोलीस शिलेदार गुरुप्रसाद गोरड यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
आज महाराष्ट्राच्या राजकारणात आपण चुलता - पुतण्याची राजकीय स्पर्धा पाहतो. चुलता - पुतण्याचे राजकीय वैर पाहतो. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, शेकडो गावांमध्ये चुलता - पुतण्याची जमिनीवरून, वेगवेगळ्या संवेदनशील विषयांवरून भांडणे पाहतो. पण चुलत्याने पुतण्याला पाठिंबा दिला व मार्गदर्शन केले आणि चुलता,पुतण्या आणि कुटुंबातील सर्व सदस्य एक झाले तर कुटुंबाची कशी मोठी प्रगती होऊ शकते? कुटुंबातील तरुणांचे स्वप्न कसे पूर्ण होऊ शकते हे गोरड कुटुंबियांनी ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या प्रगतशील वाटचालीतून दाखवून दिलेले आहे.
हॉटेल वरसगाव चौपाटी हा गोरड कुटुंबियांनी त्यांच्या कष्टाने, मेहनतीने आणि एकजुटीने तसेच हजारो ग्राहकांना उत्तम सेवा देऊन सिंहगड रोडवरील हॉटेल क्षेत्रातील एक मोठा ब्रँड बनवलेला आहे. हॉटेल वरसगाव चौपाटीच्या प्रगतशील वाटचालीमध्ये सचिन गोरडे यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. पुणे शहरातून आयटी, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक, कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुणाईचा वर्ग तसेच व्यावसायिक तरुण वर्ग हॉटेल वरसगाव चौपाटीमधील व्हेज व नॉनव्हेज पदार्थांची उत्कृष्ट चव व उत्तम सेवा यामुळे हॉटेल वरसगाव चौपाटीचा खूप मोठा चाहता वर्ग बनलेला आहे. सचिन गोरडे यांची मुले रितेश गोरड व रुद्र गोरड हे देखील हॉटेलमध्ये आपल्या वडिलांना मदत करतात.
"हॉटेल वरसगाव चौपाटीच्या प्रगतशील वाटचालीमध्ये आमच्या गोरड कुटुंबातील सर्व सदस्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. माझा भाऊ, पुतणे, वहिनी, पत्नी, मुले कुटुंबातील सर्व सदस्य आमच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना उत्कृष्ट चवीचे जेवण देण्यासाठी व उत्तम सेवा देण्यासाठी तत्पर असतात. वरसगाव धरणाच्या निसर्गसंपन्न व सुंदर ठिकाणी आमच्या हॉटेलच्या माध्यमातून आम्ही सर्वांना प्रामाणिक सेवा देत असल्यामुळे, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी आवर्जून आमच्या हॉटेलमध्ये शाकाहारी व मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी येतात तसेच हिवाळ्यामध्ये कॅम्पिंग साठीही तरुण वर्ग आवडीने येत असतो आणि आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळते याचा खूप आनंद वाटतो." अशी प्रतिक्रिया हॉटेल वरसगाव चौपाटीचे सर्वेसर्वा सचिन गोरड यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"वरसगाव, पानशेत धरणातील ताज्या माशांची मच्छी थाळी, ग्रामीण भागातील अस्सल चवीची मटन थाळी व शाकाहारी पदार्थांच्या उत्कृष्ट थाळीचा आस्वाद घेण्यासाठी हजारो ग्राहक हॉटेल वरसगाव चौपाटीमध्ये आवडीने येत असतात. पानशेत धरण परिसरातील अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांच्या फार्म हाऊसवरतीही सचिन गोरड यांच्या हॉटेल वरसगाव चौपाटीच्या माध्यमातून उत्कृष्ट चवीचे जेवण त्यांना मिळत असते."
"माझा पुतण्या गुरुप्रसाद पोलीस भरती होण्यासाठी खूप कष्ट,मेहनत घेत होता. आमचे मार्गदर्शन व पाठिंबा त्याच्या पाठीशी होताच परंतु त्याची जिद्द खूप मोठी होती. आमच्या गोरड कुटुंबातील एक मुलगा पोलीस झालेल्याचा आनंद आमच्यासाठी खूप मोठा आहे. गुरुप्रसादचे कष्ट, मेहनत व प्रामाणिकपणा यामुळेच त्याचे पोलीस बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले. याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे." अशी प्रतिक्रिया हॉटेल वरसगाव चौपाटीचे सर्वेसर्वा सचिन गोरड यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
राजगड(वेल्हा) तालुक्यातील नागरिकांनी तसेच वरसगावच्या ग्रामस्थांनी, गुरुप्रसादच्या मित्रांनी, नातेवाईकांनी गुरुप्रसादच्या या पोलीस बनण्याच्या स्वप्नपूर्तीच्या यशस्वी प्रवासावरती कौतुकाचा वर्षाव केलेला आहे.
"पुणे पोलीस दलात भरती होऊन,पोलीस बनून माझे पहिले स्वप्न पूर्ण झालेले आहे. आता पुढे मोठा पोलीस अधिकारी बनण्यासाठी माझा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू आहे. एक चांगला पोलीस अधिकारी बनून महाराष्ट्रातल्या लोकांची सेवा करण्याची मला संधी मिळावी यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन." अशी प्रतिक्रिया पोलीस शिलेदार गुरुप्रसाद गोरड यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"ग्रामीण भागातील कुटुंबातील सर्व सदस्यांची एकजूट असेल तर, कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, कितीही मोठे संकट असले तरी कुटुंबातील सदस्यांची एकजूट व जिद्दीने,चिकाटीने प्रयत्न केले तर आपली स्वप्न पूर्ण होऊ शकतात. मोठे यश मिळू शकते व कुटुंबाची मोठी प्रगती होऊ शकते हा गोरड कुटुंबीयांचा प्रगतशील प्रवास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप प्रेरणादायी आहे."
महाराष्ट्राच्या तरुण पिढीने वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत व स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड कष्ट व मेहनत केली पाहिजे.
No comments:
Post a Comment