नागपूर,दि.२० : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण बीड जिल्हासह महाराष्ट्र हळहळला.
या गंभीर प्रकरणातील सर्व आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे व या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, सर्व आरोपींना कायदेशीर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनतेकडून करण्यात येत आहे.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या गंभीर प्रकरणाविषयी विधानसभेत बुलंद आवाज उठवून मागणी केली आहे की "या गंभीर प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मीक कराडला लवकरात लवकर अटक करा, सर्व आरोपींना अटक करा. राजकीय दबावाला बळी पडू नका व संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला सरकारने न्याय मिळवून द्या". अश्या भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी, काँग्रेसचे नेते नाना पटोले, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे या राजकीय नेत्यांनीही वाल्मिक कराडला अटक करून, सर्व आरोपींना अटक करून संतोष देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी सरकारकडे केलेली आहे. या गंभीर प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून आरोप केला गेलेला वाल्मीक कराड हा "राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध असल्याने त्याला वाचवले जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने विधानसभेत सभात्याग केला."
बीड जिल्ह्यातील लोकप्रिय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे वास्तव देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन दिल्लीत त्यांच्यासमोर मांडलेले आहे. बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा यांनी देखील विधानसभेत संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावरती आवाज उठवलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे वास्तव विधानसभेत खूप पोटतिडकेने मांडलेले आहे.
"बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मीक कराड याचे नाव समोर आल्यामुळे, त्याचे फोटो कोणासोबतही असू द्या त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल."अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांची गाडी अडवली. सहा ते सात जणांनी त्यांचं अपहरण केलं. त्यांना बेदम मारहाण करुन नंतर त्यांची हत्या करण्यात आली.
"सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याच राजकारण तापलं आहे. हे गंभीर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. बीडच्या या वाईट घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विरोधी पक्षातील अनेक राजकीय नेत्यांनी या क्रूर घटनेविषयी विधानसभेत आवाज उठवलेला आहे."
"बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल." अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
बीड, परभणी घटनांमधील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
त्यानुसार बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणी मधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"बीड मधील प्रकरणाची न्यायालयीन व एसआयटी मार्फत चौकशी करण्याबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करून बीड जिल्ह्यातील भूमाफिया, वाळूमाफियांसह इतर प्रकारच्या गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढू, अशी स्पष्ट भूमिकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली."
परभणीत पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून त्यांनी वाजवीपेक्षा अधिक पोलीस बळाचा वापर केला आहे काय, याची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बीड, परभणी येथील घटनेसंदर्भात विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "परभणी जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भारताच्या संविधानाचा अपमान हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. त्यामुळे हा अपमान सहन केला जाणार नाही.
परभणी येथील कृत्य एका मनोरूग्णाने केले आहे. तो मनोरुग्ण असल्याचा स्पष्ट वैद्यकीय अहवालही उपलब्ध आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. "
"या प्रकरणात कोंबिंग ऑपरेशन झाले नाही. परभणीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा हा सर्वपक्षीय होता. या मोर्चात बांग्लादेशमधील हिंदूंसंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ही हिंदू विरूद्ध दलित अशी दंगल नाही. परभणीत झालेल्या तोडफोडीत दुकाने, वाहने, सरकारी कार्यालयांचे नुकसान झाले आहे." असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीड येथील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेणार असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
"बीडमध्ये आवाडा ग्रीन एनर्जी कंपनीने गुंतवणूक केली आहे. या कंपनीची कामे आम्हालाच द्या किंवा खंडणी द्या अशी मानसिकता काहींची तयार झाली आहे. त्यामुळे बीड प्रकरणातील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. बीड जिल्ह्यातील पोलीसांनी देखील योग्य कारवाई करावी. गुन्हे दाखल करताना वस्तुस्थिती तपासावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले."
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे देशमुख कुटुंबाला खूप मोठा धक्का बसलेला आहे. मृत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न आहे. परंतु वडिलांच्या मृत्यूचा खूप मोठा धक्का तिला व तिच्या कुटुंबीयांना बसलेला आहे.
“सरकारने आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे. माझे वडील खूप चांगले होते, देवमाणूस होते. त्यांची अशाप्रकारे हत्या करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रात ही दहशत आहे की चांगल्या माणसाबरोबर असं झालं तर मग आपलं काय होईल? त्यामुळे गुन्हेगारांना लवकर अटक झाली पाहिजे. मी डॉक्टर व्हावं किंवा चांगलं काहीतरी मोठ्या पदावर जावं असंच माझ्या वडिलांना वाटत होतं आणि मी त्यांचं स्वप्न नक्की पूर्ण करणार” असे मृत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने म्हटले आहे.
“मला वडिलांचं जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी मला सरकारने सर्वतोपरी मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आत्ता पोलिसांकडून जो तपास सुरु आहे त्यावर आम्ही समाधानी नाही. या घटनेत एकूण सात आरोपी आहेत असं सांगितलं जातं आहे. त्यातल्या चौघांनाच अटक झाली आहे. बाकी तीन आरोपींना तातडीने अटक झाली पाहिजे. तसंच या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे. आज माझी ही मागणी आहे की माझ्या वडिलांना जसं ठार मारण्यात आलं तशीच शिक्षा आरोपींना झाली पाहिजे.” असं वैभवी देशमुखने म्हटलं आहे.
"महाराष्ट्राच्या राजकारणाला व समाजकारणाला काळिमा फासणारी ही बीडमधील ही खूप गंभीर घटना आहे. संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपींना लवकरात लवकर, कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्रातील कुठल्याही मोठ्या मंत्र्याचा राजकीय वरदहस्त असलेला वाल्मीक कराड असो की कोणीही आरोपी असो, सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी जनभावना महाराष्ट्रातील जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे."
राज्य सरकार या गंभीर प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी, योग्य ती पावले उचलून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील. अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment