बारामती, दि. 26 : - बारामती तालुक्यातील वाकी येथे पंचायत समिती बारामती, आरोग्य विभाग यांच्या वतीने आज घेण्यात आलेल्या कोरोना चाचणी शिबिरात 116 लोकांची अँटीजन (ANTIGEN) चाचणी व 25 लोकांची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी करण्यात आली. या कोरोना चाचणी शिबिरात चार गावांमधील पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळले.
या कोरोना चाचणी शिबिरात बारामती तालुक्यातील जोगवडी गावचे 2, सोरटेवाडी गावचा 1, मगरवाडी गावचा 1 व होळ गावचा 1 असे एकूण 5 कोरोना बाधित रुग्ण सापडले अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतुल उबाळे यांनी दिली.
या कोरोना चाचणी शिबिरासाठी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतुल उबाळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सलीम मुलानी, आरोग्य सेवक किशोर काळोखे, आरोग्य सेविका कारंडे सिस्टर व सर्व आरोग्य कर्मचारी तसेच वाकी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
"आज झालेल्या कोरोना चाचणी शिबिरात वाकी गावातील एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही. भविष्यात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे अशी प्रतिक्रिया वाकी गावचे पोलीस पाटील हनुमंत जगताप यांनी दिली.
कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी बारामती तालुक्यातील सर्वच नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment