Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठान दरवर्षी करवीर छत्रपती इंदुमती राणी साहेब यांचा स्मृतिदिन साजरा करत असते. यावर्षी ज्येष्ठ इतिहास संशोधिका आणि सिद्धहस्त लेखिका डॉ.सुवर्णा नाईक निंबाळकर लिखित पुरंदरच्या, सासवड कन्या "करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब"या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे कोल्हापूरच्या युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांच्या शुभहस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी इंदुमती राणीसाहेब यांच्या जीवनातील संघर्षमय प्रवास आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
"इंदुमती राणीसाहेब यांच्या संघर्षमय वाटचालीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सासरे म्हणून नव्हे तर वडील म्हणून कशा पद्धतीने इंदुमती राणी साहेबांचे पालन पोषण करून शिक्षण दिले याची माहिती दिली. "अडाणी मनुष्य हा डोळे असूनही आंधळा असतो !"( Man is blind without education) ही छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली शिकवण इंदुमती राणीसाहेबांनी जीवनामध्ये संघर्ष करताना महत्त्वाची ठरली. "
छत्रपती शाहू महाराजांनी इंदुमती राणेसाहेबांना घोडेस्वारी, युद्ध कला, गाडी चालवणे, प्रसंग आल्यास गाडी दुरुस्त करणे इत्यादींचेही शिक्षण दिले." असे आपल्या मनोगतातुन युवराज्ञी संयोगीता राजे यांनी सांगितले.
"सुशीला" या वाघीणचे इंदुमती राणीसाहेबांनी पालन पोषण केले होते. एकदा इंदुमती राणीसाहेब शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेल्या असताना एक चार महिन्याचं लहान बाळ त्या वाघिणीने तोंडात पकडलं. कोणीतरी छत्रपती शाहू महाराजांना ही बातमी सांगितली."
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"तात्काळ छत्रपतींनी इंदुमती साहेबांना शाळेमध्ये यासंबंधीची माहिती पोहोचवली. लागलीच राणीसाहेब शाळेतून धावत आल्या आणि त्यांनी त्या वाघिणीकडे फक्त "पाहिले." अन काय चमत्कार त्या वाघिणीने ते बाळ जमिनीवर ठेवले आणि शांतपणे बाजूला निघून गेली. राणीसाहेबांनी धावत जाऊन त्या बाळाला उचलून घेतले आणि सगळीकडे तपासून बघितले असता साधे खरचटले सुद्धा नव्हते. त्याचे कारण "सासवडच्या या वाघिणीने सुशीला वाघिणीच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले होते." हा प्रसंग युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी सांगितला आणि आचार्य अत्रे सभागृह टाळ्यांच्या गजरात बुडून गेले.
इंदुमती राणीसाहेबांच्या बाबतीत घडलेले अनेक प्रसंग जसेच्या तसे युवराज्ञी साहेबांनी आचार्य अत्रे सभागृहामध्ये कथन केले आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
तत्पूर्वी सकाळी १० वाजता लेखिका डॉ.सुवर्णा नाईक निंबाळकर, बापूसाहेब निंबाळकर, कृष्णराव नाईक- निंबाळकर, तेजला दाभाडे, सुलेखा शिंदे, हेमलता भोसले, शिवांजली नाईक निंबाळकर, राजलक्ष्मी भोसले यांचे डॉ.दीपक जगताप यांच्या निवासस्थानी आगमन झाले. बरोबर ११:१५ मिनिटांनी युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांचे गोदाजीराजे जगताप चौकात आगमन झाले. आणि फटाक्यांची आतिषबाजी झाली.
युवराज्ञी संयोगीता राजे यांनी सरदार गोदाजीराजे जगताप पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप, माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप , डॉ. वृषाली जगताप, मा. नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, राजवर्धिनी जगताप, बंडूकाका जगताप, दीपकआप्पा जगताप यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला.आणि आचार्य अत्रे सभागृहामधे त्यांचे आगमन झाले.

Snapdeal Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. ज्याचे आयोजन महेश जगताप, गिरीश जगताप यांनी केले होते. पुढे सत्काराचा कार्यक्रम पार पडला यामध्ये ग्रामीण संस्थेच्या संस्थापिका राजवर्धिनी जगताप, डॉ. वृषाली जगताप, डॉ.अश्विनी जगताप यांनी युवराज्ञी संयोगीता राजे यांचा सत्कार केला. त्यानंतर प्रतिष्ठानच्या वतीने संतोष एकनाथकाका जगताप यांनी प्रास्ताविक केले.
चरित्र ग्रंथाचे प्रकाशक मेहता पब्लिकेशन्स, पुणे यांचे वतीने अखिल मेहता यांनी मनोगत व्यक्त करून सर्व मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन केले.
सदर पुस्तकावर रावसाहेब पवार ,(सरचिटणीस- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद) यांनी परीक्षणात्मक प्रतिक्रिया नेमक्या शब्दांत नोंदविली.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब चरित्र ग्रंथाच्या लेखिका, इतिहास संशोधिका डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या भाषणातून या चरित्र ग्रंथाचा प्रवास तसेच इंदुमती राणीसाहेब यांच्या जीवन प्रवासातील प्रेरणादायी प्रसंग सांगून लोकांची मने जिंकली.
पुरंदरचे युवा नेते बाबाराजे जाधवराव यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये कोल्हापूरच्या काही महत्वपूर्ण आठवणी सांगितल्या.
या कार्यक्रमांमध्ये पुरंदर-हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांनी शुभेच्छापर आपले मत व्यक्त केले. आमदार संजय जगताप यांनी लेखिका डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांच्या पुस्तकाचे कौतुक करून संशोधन कार्यात सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
भाजप पुणे जिल्हा महिला अध्यक्षा संगीताराजे निंबाळकर यांनी देखील इंदुमती राणीसाहेब आणि युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांचे बद्दल गौरव उदगार काढले.
पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी इंदुमती राणीसाहेबांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचे विश्लेषण केले.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील यांनी अध्यक्षीय भाषण करून लोकांची मने जिंकली. मा. आमदार दीपक आबा पाटील यांनी इतिहास संशोधिका डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांच्या शैक्षणिक प्रवासाविषयी जुन्या आठवणी सांगून संशोधन कार्याचे कौतुक केले.
सूत्रसंचालन करताना डॉ. दीपक जगताप यांनी कोल्हापूरला सासवडहून "मल्लविद्या" शिकण्यासाठी जाणाऱ्या पैलवानांची राहण्याची सोय संभाजीराजे छत्रपती महाराजांनी करावी तसेच कोल्हापूरच्याअंबाबाई मातेच्या दर्शनासाठी सुद्धा सासवडच्या मंडळींची सोय प्राथमिकतेनं करावी अशी विनंती केली आणि त्यास दुजोरा देत युवराज्ञी संयोगीताराजे यांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी सागर जगताप यांनी बहारदार असे आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रमोददादा सुभानराव जगताप , वामनराव जगताप , नंदकुमार जगताप, सुरज उत्तमराव जगताप , बंडूकाका जगताप, समीर जगताप, पै. प्रकाश जगताप, डॉ.प्रवीण जगताप ,डॉ.उत्कर्ष जगताप , प्रसाद जगताप, दिपाली जगताप, राजगौरी जगताप यांनी मोलाचे सहकार्य केले. मार्गदर्शक म्हणून दीपक माधवराव जगताप यांनी जबाबदारीने काम केले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या याचे युवराज्ञी संयोगीता राजे यांनी विशेष कौतुक केले.