पुणे, दि. १९ : पुणे शहरातील धनकवडी येथील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशाला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच क्रीडा क्षेत्रातील राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यासाठी विशेष प्रयत्न करत असते.
टेनिस हॉलीबॉल राष्ट्रीय स्पर्धेत रणवीर भोसले, श्रेया ढवान, प्रांजल सूर्यवंशी यांची दमदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघात निवड झाली.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
ओडिसा येथे 23 ते 25 डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये प्रियदर्शनी विद्यामंदिरचे 2 खेळाडू व प्राईड इंग्लिश स्कूलचा 1 खेळाडू अश्या तीन खेळाडूंची निवड झाली.
टेनिस हॉलीबॉल महाराष्ट्र संघाचे संघव्यवस्थापक म्हणून प्रियदर्शनी विद्यामंदिर धनकवडीचे क्रीडाशिक्षक संदीप भोसले यांची निवड झाली.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
जालना येथील 1 ते 3 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या राज्यस्तरीय टेनिस हॉलीबॉल युथ व मिनी मुले, मुली स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी करत मिनी मुली व मिनी मिश्र डबल टेनिस हॉलीबॉल स्पर्धेत राज्यांमध्ये तृतीय क्रमांक मिळवला.
या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा कडून मिनी बॉईज रणवीर भोसले (संघनायक) राजवीर भोसले, वेदांत म्हमाने, लोकेश वायबसे, कुशल राठोड, समर्थ नांगरे. मिनी गर्ल्स कडून श्रेया ढवाण (संघनायक)प्रांजल सूर्यवंशी, रुद्रानी उत्तेकर, समृद्धी सपकाळ, दिया झगडे, मयुरी तोडकर.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
मिक्स डबल टेनिस हॉलीबॉल स्पर्धेमध्ये- शिवम कदम व सोनाक्षी कदम. युथ मुले टेनिस हॉलीबॉल स्पर्धेमध्ये हर्ष खोत, पार्थ राजने, सिधन देबर्मा, संग्राम थोरात, वेदांत सोनवणे, वरद नाईक हे 20 खेळाडू खेळले.या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पुणे जिल्ह्यातील तीन खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
रणवीर भोसले (प्राईड इंग्लिश स्कूल पुणे).श्रेया ढवान व प्रांजल सूर्यवंशी (प्रियदर्शनी विद्यामंदिर धनकवडी पुणे)या सर्व खेळाडूंचे व व्यवस्थापकांचे दोन्ही शाळेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक आप्पासाहेब रेणुसे व स्वीकृत नगरसेवक युवराज रेणुसे (अध्यक्ष टेनिस हॉलीबॉल असोसिएशन पुणे शहर), डॉक्टर संतोष पवार (सचिव टेनिस हॉलीबॉल असोसिएशन पुणे शहर), प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजश्री दिघे, रूपाली मालुसरे, शर्मिला पांडे यांनी अभिनंदन केले व पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment