Saturday, May 28, 2022

"कोरोनाच्या "या" नव्या व्हेरीएंटची महाराष्ट्रात धडक; पुण्यात आढळले कोरोनाच्या "या" नव्या व्हेरीएंटचे सात रुग्ण,कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनाच्या लसीच्या बूस्टर डोसची गरज"...



पुणे,दि.२८ : भारतात व महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झालेला असला तरी महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या रुग्णाचं निदान झालेले आहे. राज्यात पुणे शहरात कोरोनाच्या विषाणूच्या नव्या व्हेरिएंटने  धडक दिल्याचं पाहायला मिळत आहे. 




कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA4 आणि BA5 चे 7 रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य खातं खडबडून जागं झालं आहे. पुण्यात ओमायक्रॉनचे 2 नवे सब व्हेरिएंट BA4 चे चार आणि BA5 चे तीन रुग्ण आढळले आहेत. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


त्यात 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. त्यातील चार रुग्ण हे 50 पेक्षा जास्त वय असलेले, 2 रुग्ण 20 ते 40 मधील, तर एक रुग्ण हा 10 वर्षाखालील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय.




 महत्वाची बाब म्हणजे हे नवे व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य  असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. दरम्यान. आज राज्यात 529 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


ओमायक्रॉनच्या BA 2 या व्हेरिएंटप्रमाणेच BA4 आणि BA5 व्हेरिएंटची लक्षणं आहे. या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण तामिळनाडू तर दुसरा रुग्ण तेलंगणात आढळला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील पुण्यात 7 रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज असल्याचं इंडियन सार्स कोव्ह – 2 जिनोमिक्स कंसोर्टियमने म्हटलंय.





ओमायक्रॉनचा BA4 आणि BA5 हे सब व्हेरिएंट जगात कोरोनाचा केसेसमध्ये मोठी वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. 16 देशांमध्ये BA4 चे जवळपास 700 पेक्षा अधिक रुग्ण तर 17 देशात BA5 चे 300 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. 



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


कोरोनाचे विषाणूचा हे नवे व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असले तरी ते घातक नसल्याचं तज्ज्ञ सांगत आहे. असं असलं तरी काळजी घेणं आणि सतर्क राहणं अधिक गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.




कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्यातील सर्वच नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.


Saturday, May 14, 2022

"शंभुराजेंच्या जन्माने अवघा मराठा मुलुख धन्य झाला, पुरंदरावर स्वराज्याच्या शत्रूचा कर्दनकाळ जन्माला आला; सह्याद्रीला आणि संपूर्ण भारत वर्षाला आनंद झाला" - इतिहास संशोधिका डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांचा छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख..



"शंभुराजेंच्या जन्माने अवघा मराठा मुलुख धन्य झाला, पुरंदरावर स्वराज्याच्या शत्रूचा कर्दनकाळ जन्माला आला; सह्याद्रीला आणि संपूर्ण भारत वर्षाला आनंद झाला"


गुरुवारचा शिशिरॠतुतला  फाल्गुन महिन्यातील वद्य तृतीयेला हस्त नक्षत्रावर सईबाई राणीसाहेबांनी शंभू बाळाला जन्म दिला.या बाळाच्या जन्माने अवघा मराठा मुलूख धन्य  धन्य झाला. या छाव्याच्या जन्माचा  मान आमच्या पुरंदर किल्ल्याला मिळाला होता. पुरंदरावर आनंदी- आनंद झाला. 




गडावर तोफांचे आवाज होत होते. स्वराज्याच्या गादीचा वारस , शत्रुंचा कर्दनकाळ पुरंदरावर आला होता. तिन्ही लोकीचे ऐश्वर्य भरून राहिले होते. नियती  प्रसन्न झाली. आई भवानीचा ,आई निमजाईचा वरदहस्त सईबाई  राणीसाहेबांच्या मस्तकी पडला होता.बाळराजांच्या आगमनाने सर्वत्र आनंदी आनंद झाला. या बाळाच्या आगमनाने सईबाई राणीसाहेब यांचे जीवन धन्य धन्य झाले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


क्षणार्धात पुरंदरावर चारही बुरुजावरून तोफा चराचराला खबर देत होत्या .राजश्रिया ,विराचित सकलगुणमंडीत, भोसले कुलावतांस, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणीसरकार सकल -सौभाग्यसंपन्न वज्रचुडेमंडित  श्रीमंत सईबाई राणीसाहेब  प्रसूत जाहल्या ! श्रीकृपेकरून पुत्ररत्न प्राप्त झाले.नगारे दुमदुमू लागले. मराठ्यांच्या स्वराज्याला पुत्र झाला. पुत्र शिवाजीराजांना झाला,पुत्र सईबाई राणीसाहेबांना झाला. 




जिजाऊसाहेबांनी घाई घाईने खलिते लिहायला सांगितले.हजार वाटांनी खलिते निघाले .पहिला खलिता फलटणच्या नाईक निंबाळकरांकडे पोहोचला. साखर थैलीसह खलिता निघाला.  गादीचा वारस जन्माला आला होता.शत्रुंचा कर्दनकाळ पुरंदरावर आला होता. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


तिन्ही लोकीचे ऐश्वर्या भरभरून राहिले.नियती प्रसन्न झाली होती.आई भवानीचा वरदहस्त सईबाई राणीसाहेबांच्या मस्तकी पडला होता. बाळराजाच्या आगमनाने सर्वत्र आनंदी आनंद होऊन राणीसाहेबांचे  आयुष्य धन्य धन्य झाले होते.




फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या लेकीचे जीवन या पुत्र जन्माने सत्कारणी लागले होते .बाळाचे मोहक रूप राणीसाहेब डोळ्यात साठवत होत्या. तो चिमणा जीव, त्याचा उभटसा चेहरा, इवलीशी हनुवटी ,रंग गोरा, डोळे किंचित मोठे,  पाणीदार व टपोरे, इवल्याशा बाहूंना बाळसेदार आकार होता.


भालप्रदेशावरून हे बाळ मोठेपणी बुद्धिमान होणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हती. सईबाई साहेबांना आता आपली जबाबदारी वाढल्याची जाणीव होऊ लागली होती. स्वराज्याच्या या भावी राजाला त्यांना घडवायचे होते. " माँसाहेबांनी नव्हते का स्वारींना घडवले. तसेच सईबाई राणीसाहेबांना या छाव्याला घडवायचे होते.




या छाव्याची  जबाबदारी आई म्हणून राणीसाहेबांवरच होती.बाळाचे भवितव्य आईच्याच हातात असते .आईच्या साध्या स्पर्शाने बाळाला उत्तुंग  गिरीशिखरांना धडक देण्याचे सामर्थ्य पैदा होत असते.



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


शिवरायांच्या राणीवशात कन्यारत्नांचे उंच टिपेचे रडणे कैक वेळा घुमले होते; पण बाळकृष्णाचे रडणे आज पहिल्यांदाच ऐकायला येत होते.कृतार्थतेने जिजाऊं माँसाहेबांचे डोळे पाणावले होते.मुलाच्या दर्शनाने 'आऊपण ' धन्य होते. पण नातवाच्या दर्शनाने अवघे स्त्री पण धन्य होते. 


किल्ले पुरंदरच्या चारी बाजूंचे बुलंद बुरूज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी, निळ्या आभाळाला खबर देत होते. राजाश्रीया विरजित,सकलगुण मंडित, भोसले कुलावतंस श्रीमंत शिवाजीराजे भोसले  यांच्या थोरल्या राणीसरकार वज्रचुडेमंडित सईबाई राणीसाहेब प्रसूत जाहल्या! पुत्ररत्न जाहले!आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरच्या सगळ्या राऊळातले देव आपोआपच सोयरात पडले होते.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पुरंदरच्या किल्ल्यावर आनंदी आनंद झाला होता." बारा दिवस झाले होते. पुरंदरावर जोरदार बारशाचा घाट घातला गेला .हलग्या , लेझीमांच्या तालावर वाजत -गाजत बाळंतविडे  गड चढू लागले होते. नात्या - गोत्यातील माणसे ,फलटणचे नाईक-निंबाळकर तर पाचवीलाच आपल्या भाच्याच्या कौतुकासाठी गड चढून आले होते. सर्व राणीवसा भरजरी शालू -पैठणी नेसून बारशासाठी सज्ज झाला होता. 


राजो पाध्यांनी मुहूर्तासाठी घंगाळात घटिकापात्र सोडले होते. चंद्रकळी शालु नेसलेल्या सईबाई राणीसाहेब बाळंतपणाच्या तेजाने अधिकच सुंदर दिसत होत्या .हिरे-मोती ,माणिक, सोन्याची फुले मढवलेले कुंची ,जरीचे अंगडे टोपडे ल्यायलेले बाळ अधिकच सुंदर दिसत होते .सईबाई राणी साहेबांनी जणू "आकाशीचा चंद्रमाच खुडून "आणून सर्वांच्या हाती दिला होता.

           


नाव काय ठेवायचे आऊसाहेबांना  विचारणा झाली!" बाळ राजांचे नाव संभाजी ठेवा ! त्यांच्या काकामहाराजांची ती यादगार आहे! " आपल्या पुत्राच्या आठवणीने माँसाहेबांचे  डोळे पाणावले.


नेताजी पालकरांनी बत्ती दिलेल्या पुरंदरच्या चारी बुरुजावरच्या तोफांच्या भांड्याने आभाळाला खबर दिली." राजश्रियाविराजित, सकलगुणमंडित भोसले कुलावतंस, श्रीमान छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या बाळराजांचे नामाभिधान जाहले!  संभाजीराजे ऐसे शुभनाम ठेवले." सईबाई राणीसाहेबांना  संभाजी हे नाव खूप आवडले . 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


महाराजांच्या वडील बंधूंचे हे नाव , परंतु ते केवळ स्वारींच्या वडील बंधूचे होते म्हणून नव्हे ,तर ते  धारातीर्थी पतन पावलेल्या एका शूर वीराचे ते नाव होते . या वीराने दुश्मनांशी लढताना  प्रत्यक्ष मरणाचीही भीती बाळगली नव्हती. असे नाव धारण करण्यासाठी तसेच मोठे भाग्य असावे लागते. ते भाग्य दैवाने आपल्याबाळाराजांच्या हवाली केले होते. म्हणूनच  संभाजी हे नाव  सईबाई राणीसाहेब यांना खूप खूप आवडले होते.




माँसाहेबांनी तर ते  सुचवले होते .माँसाहेब म्हणाल्या होत्या , "सई  अफजलखानासारख्या दगाबाजाच्या हल्ल्यात  निष्काळजीपणामुळे आमचे लाडके जेष्ठ पुत्र संभाजी कनकगिरीच्या लढाईत मारले गेले. संभाजी लढता लढता पडले." त्यांचे सोने झाले ,पण आम्ही  मात्र त्यांना कधीच विसरू शकलो नाही.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


 त्यांची आठवण म्हणून बाळाचे नाव संभाजी राजे ठेवले . " बाळराजांच्या पायाने वैशाखीचा मार्तंड कुळात उपजला होता . साक्षात रुद्र जन्माला आला होता. स्वराज्यात आनंदी आनंद झाला होता. जिजाऊसाहेब आपले पुत्र संभाजींचे  रूप आपल्या नातवात शोधत राहिल्या.




पुढे छत्रपती शंभूराजे यांनी आपल्या कर्तुत्वाने व पराक्रमाने अशी काही दहशत निर्माण केली की मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही,इंग्रज, पोर्तुगीज, डच यांसारख्या बलाढ्य पातशाहींना नामोहरम करून सोडले. जगातील प्रत्येक माता-पित्याला हेवा वाटेल, असा पुत्र माता महाराणी सईबाई व पिता छत्रपती शिवरायांना लाभला.


"शंभूराजे यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा "

    


"पुत्र सईबाईंना झाला,

पुत्र शिवाजीराजांना झाला,

पुत्र सह्याद्रीला झाला,

पुत्र महाराष्ट्राला झाला,

पुत्र भारतवर्षाला झाला."


लेखिका : - इतिहास संशोधिका, प्रसिद्ध लेखिका डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर 

         


     



Saturday, May 7, 2022

"लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना ऐतिहासिक सासवड नगरीत "या" अनोख्या पद्धतीने दिली मानवंदना; पुरंदरच्या वीरकन्या, राजर्षी शाहू महाराजांच्या स्नुषा इंदुमतीदेवी राणीसाहेब यांच्या शैक्षणिक कार्याच्या आठवणींना उजाळा...


सासवड, दि.७ : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक सासवडनगरीत लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या १००व्या स्मृती दिनानिमित्त  १०० सेकंद स्तब्ध आणि मौन राहून सासवडकरांनी,   अनोखी मानवंदना दिली.




लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. दि.६ मे रोजी  शाहू महाराजांची १०० वी पुण्यतिथी निमित्ताने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज  कृतज्ञता पर्वाचं आयोजन करण्यात आले. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


यावेळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांना कृतज्ञता वाहण्यासाठी १०० सेकंद स्तब्ध आणि मौन राहून सासवडकरांनी  लोकराजा शाहू महाराज यांना अनोखी मानवंदना देऊन, अभिवादन केले.




आपल्या महान कार्याने कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्ताने सासवडकरांककडून शाहूराजांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली .दि ६ मे रोजी  सकाळी १०  वाजता सासवड येथील शिवतीर्थावर १०० सेकंदासाठी स्तब्धता पाळण्यात  आली . 




यावेळी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्नुषा व ऐतिहासिक जगताप घराण्यातील वीरकन्या  इंदूमतीदेवी राणीसाहेब यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याच्या आठवणींना उजाळा देत, शाहू महाराजांच्या अनेक आठवणी विषद करत शंभर सेकंद स्तब्धता बाळगण्यात आली.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


राजर्षी शाहू महाराजांनी इंदुमतीदेवींना सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात पूर्णपणे मोकळीक दिली होती. त्यांनी पोटच्या मुलीप्रमाणे त्यांना आधार दिला, उर्वरीत आयुष्य शैक्षणिक,सामाजिक कार्यासाठी वाहून घ्यावे म्हणून प्रोत्साहन दिले.




या राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष गणेश मुळीक, सासवड शहर अध्यक्ष संदिप जगताप,संजय चव्हाण, बाबुराव गायकवाड ,नगरसेवक नंदकुमार जगताप,संजय पापळ ,दिपक जगताप, अध्यक्ष स्वप्निल गायकवाड , बंडूकाका जगताप, शांताराम पोमण,विराज पवार, महेश जगताप, अभिजित जगताप, साकेत जगताप, शलील महाराज जगताप, नंदकुमार कड , प्रल्हाद कारकर, प्रकाश जगताप, विजय जगताप, बाळासाहेब फडतरे ,आदी उपस्थित होते.


Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now




Thursday, May 5, 2022

"अभिमानास्पद, बारामतीच्या "या" कर्तृत्ववान तरुणीच्या "या" खास कामगिरीची " फोर्ब्स" या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित मासिकाने घेतली दखल; वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी "स्टार्टअप" सुरू करून, जगप्रसिद्ध "फोर्ब्स" मासिकातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मिळवले स्थान"...



बारामती,दि. ५ : आज जगभरात मराठी लोकं वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवताना दिसत आहेत.  जिद्द, चिकाटी, मेहनत, उच्चशिक्षण व उत्कृष्ट कौशल्याच्या आधारे आज महाराष्ट्रातील कर्तुत्ववान महिला जगभरात चांगले काम करताना दिसत आहेत. बारामतीच्या आर्या तावरे यांनी ब्रिटनमधील लघू व मध्यम बांधकाम व्यवसायिकांना निधी उपलब्ध करून देऊन केलेल्या खास कामगिरीची दखल "फोर्ब्स" या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध मासिकाने घेतलेली आहे.


जगप्रसिद्ध  "फोर्ब्स" मासिकात मूळ बारामतीकर असलेल्या आर्या तावरेचा    'फोर्ब्स' आर्थिक बाबींविषयक मासिकात पहिल्या तीसमध्ये समावेश झाला आहे. युरोपमधील तीस वर्षांखाली प्रभावशाली पहिल्या तीस व्यक्तींमध्ये आर्याला स्थान मिळाले आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


मूळची बारामतीकर असलेली आर्या  सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. आर्या कल्याण तावरेचा फोर्ब्स या आर्थिक बाबींविषयक मासिकात पहिल्या तीस व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे. आर्याने पुण्यात प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेतले आहे. 




पुढील शिक्षणासाठी आर्या लंडनला गेली आहे. आर्याला लहानपणापासून लॉन टेनिस खेळण्याची आवड होती.आर्या ही प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कल्याण तावरे यांची कन्या आहे.कल्याण तावरे यांच्या पुण्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी साईट सुरू आहेत.आर्याने लंडन विद्यापीठात अर्बन प्लॅनिंग अँड रिअल इस्टेट अँड फायनान्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

त्यानंतर नोकरी करताना तेथील बांधकाम व्यावसायिकांना निधी उभारणीसाठी ज्या अडचणी येत होत्या त्याचा अभ्यास करत आर्या हिने अवघ्या वयाच्या बाविसाव्या वर्षी स्वताःची स्टार्ट अप कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. 



नव उद्योजकांना उद्योग सुरू करताना सुरुवातीला तिला निधी उभा करण्यात अडचण निर्माण झाली. परंतु आर्याने निधी उभारणीची अडचण दूर करण्यासाठी तिने क्राऊड फंडींग ही नवीन संकल्पना आणली आणि त्याला यश मिळाले.


Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


फ्यूचरब्रीक या नावाने तिने कंपनी सुरु करुन बांधकाम व्यवसायातील विविध अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. आज तिच्या हाताखाली ब्रिटीश लोक काम करतात ही अभिमानास्पद बाब आहे. 


लंडनमध्ये काम करताना तेथील व्यावसायिकांना ज्या अडचणी येत होत्या निधी कमी पडत होता त्याचा अचूक अभ्यास करुन आर्या हिने फ्यूचरब्रीकच्या माध्यमातून त्यातून मार्ग काढला. 




युरोपमधील तीस वर्षांखाली प्रभावशाली पहिल्या तीस व्यक्तींमध्ये आर्याला स्थान मिळाले आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. याआधी देखील आर्याला ब्रिटिश सरकारकडून स्टार्टअपसाठी दिला जाणारा 25 वयोगटातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


बारामतीकर आर्या तावरे यांचा प्रेरणादायी प्रवास महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्व महिला वर्गांसाठी खूप आशादायी आणि प्रेरणादायी आहे.





Sunday, May 1, 2022

"तरुण व नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी, महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन; विजेत्या २४ स्टार्टअप्सना मिळणार "एवढया" लाख रुपयांपर्यंत शासकीय कामाची वर्क ऑर्डर; "या" संकेतस्थळावर नवउद्योजक करू शकतात अर्ज"...


मुंबई, दि. ०१ : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. अर्ज करण्याची मुदत दि. ३० मे २०२२ पर्यंत आहे.




स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून  प्रशासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


याअंतर्गत प्राप्त अर्जांपैकी अव्वल १०० स्टार्टअप्सना त्यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितीसमोर करण्याची संधी भेटते व त्यातील विजेत्या २४ स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा प्रायोगिक तत्त्वावर संबंधित शासकीय विभागांबरोबर राबविण्यासाठी नाविन्यता सोसायटीमार्फत १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश (वर्क-ऑर्डर्स) दिले जातात.  




यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य, प्रशासन, शाश्वतता (स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन), स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता आणि संकीर्ण या क्षेत्रांचा समावेश आहे, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.




स्टार्टअपविषयक उपक्रमांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने गौरव

 

यासंदर्भात अधिक माहिती देताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्र ‘स्टार्टअप सप्ताह’ या उपक्रमाच्या आतापर्यंत चार आवृत्त्या आयोजित केल्या गेल्या असून विजेत्या स्टार्टअप्सनी राष्ट्रीय आरोग्य मिशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, ग्रामविकास विभाग, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था, विभागांसोबत काम पूर्ण केले आहे. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीस नुकताच मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता उपक्रमाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यंदा आयोजित केलेल्या स्टार्टअप सप्ताहामध्ये राज्यासह देशभरातील कल्पक नवउद्योजक, तरुण-तरुणींनी निश्चित सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यंदाच्या सप्ताहातूनही नवनवीन संकल्पना, कल्पक संशोधन पुढे येईल, असा विश्वास श्रीमती वर्मा यांनी व्यक्त केला.

 


 

 

नाविन्यता सोसायटीमार्फत विविध उपक्रम

 

महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


या धोरणांतर्गत स्टार्टअप सप्ताहाव्यतिरिक्त इनक्यूबेटर्सची स्थापना, स्टार्टअप व नाविन्यपूर्ण यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर आणि हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची यांसारख्या अनेक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे, अशी माहिती नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी दिली.


अधिक माहितीसाठी ईमेल team@msins.in अथवा 022-35543099 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.