सासवड, दि.७ : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक सासवडनगरीत लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या १००व्या स्मृती दिनानिमित्त १०० सेकंद स्तब्ध आणि मौन राहून सासवडकरांनी, अनोखी मानवंदना दिली.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. दि.६ मे रोजी शाहू महाराजांची १०० वी पुण्यतिथी निमित्ताने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचं आयोजन करण्यात आले.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
यावेळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांना कृतज्ञता वाहण्यासाठी १०० सेकंद स्तब्ध आणि मौन राहून सासवडकरांनी लोकराजा शाहू महाराज यांना अनोखी मानवंदना देऊन, अभिवादन केले.
आपल्या महान कार्याने कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्ताने सासवडकरांककडून शाहूराजांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली .दि ६ मे रोजी सकाळी १० वाजता सासवड येथील शिवतीर्थावर १०० सेकंदासाठी स्तब्धता पाळण्यात आली .
यावेळी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्नुषा व ऐतिहासिक जगताप घराण्यातील वीरकन्या इंदूमतीदेवी राणीसाहेब यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याच्या आठवणींना उजाळा देत, शाहू महाराजांच्या अनेक आठवणी विषद करत शंभर सेकंद स्तब्धता बाळगण्यात आली.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
राजर्षी शाहू महाराजांनी इंदुमतीदेवींना सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात पूर्णपणे मोकळीक दिली होती. त्यांनी पोटच्या मुलीप्रमाणे त्यांना आधार दिला, उर्वरीत आयुष्य शैक्षणिक,सामाजिक कार्यासाठी वाहून घ्यावे म्हणून प्रोत्साहन दिले.
या राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष गणेश मुळीक, सासवड शहर अध्यक्ष संदिप जगताप,संजय चव्हाण, बाबुराव गायकवाड ,नगरसेवक नंदकुमार जगताप,संजय पापळ ,दिपक जगताप, अध्यक्ष स्वप्निल गायकवाड , बंडूकाका जगताप, शांताराम पोमण,विराज पवार, महेश जगताप, अभिजित जगताप, साकेत जगताप, शलील महाराज जगताप, नंदकुमार कड , प्रल्हाद कारकर, प्रकाश जगताप, विजय जगताप, बाळासाहेब फडतरे ,आदी उपस्थित होते.
Snapdeal Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
No comments:
Post a Comment