Saturday, December 30, 2023

"कुठे नेऊन ठेवलाय देश आमचा? देशावर 205 लाख कोटी कर्ज; 6000 रुपयांचे गाजर दाखवून शेतकरी उद्धवस्त, विरोधी पक्ष संपवणे हेच तुमचे ध्येय" - विकास लवांडे



पुणे, दि.३० : "भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी तथाकथित अर्थव्यवस्था आहे. पण त्याचबरोबर देशावरील कर्जाचा बोजाही वाढत आहे हे भीषण वास्तव आकडेवारी सांगत आहे." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.



विकास लवांडे म्हणाले, "चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशाचे एकूण कर्ज वाढून 2.47 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 205 लाख कोटी रुपये झाले आहे.कधी नव्हे इतका देश कर्ज बाजारी केला, कधीच नव्हती इतकी बेरोजगारी आज आपल्या देशात वाढलेली आहे. प्रचंड महागाईने सामान्य माणूस हवालदिल झाला आहे."

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"6000 रूपयेचे गाजर दाखवून शेती व शेतकरी उध्वस्त केला , देशभर धार्मिक तेढ वाढवला , धर्म व देवाच्या नावाने जनतेच्या श्रद्धा व भावनेशी रोज खेळ खेळता, शिवाय ठरवल्याप्रमाणे संसदीय लोकशाहीला नख लावले." अश्या शब्दात विकास लवांडे यांनी मोदी सरकारवर टीका केली.




"तुम्ही प्रथम निवडून आला तेव्हा संसदेच्या पायरीवर डोकं ठेवले होते मात्र त्या संसदेची तुम्हाला जरा ही किंमत नाही हेच आजपर्यंत तुम्ही गैरहजर राहून व संसदेत सतत फक्त प्रचारकी भाषण करत आलात. आपण प्रधानमंत्री होऊन फक्त गुजरात आणि भाजपचेच राहिलात  सतत पक्ष प्रचार करत राहिलात पण तुम्ही देशाचे कधीच झाला नाहीत हे तुमच्या दहा वर्षात दिसले. अशा कडक  शब्दात विकास लवांडे यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर टीका केली.



"मा.मोदी साहेब आपण कायम मन की बात ऐवजी एक तरी राष्ट्रीय पत्रकार परिषद घेण्याची हिम्मत दाखवावी. सत्तेसाठी जनतेची दिशाभूल करून देशाचे वाटोळे करू नका. विरोधी पक्ष संपवणे हेच तुमचे ध्येय आहे कारण तुम्हाला देशाचा हुकूमशहा व्हायचं आहे ना ? असा सवाल विकास लवांडे यांनी उपस्थित केला.




समस्त सुशिक्षित युवा पिढी या सर्व गंभीर विषयांवर विवेकी विचार करेल काय ? हा प्रश्न विकास लवांडे यांनी युवा पिढीला विचारला आहे.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"नॅशनल क्राईम रेकॅार्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये, महिलांविरोधातील अत्याचाराच्या देशभरात एकूण 4,45,256 केस दाखल झाल्या. 2021 च्या तुलनेत ही महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण 4 टक्क्यांनी वाढले आहे. यापेकी 31.4 % प्रकरणं ही कौटुंबिक हिंसाचाराची आहेत.यात गुन्हे नोंद न झालेल्या घटना किती असतील त्याचा अंदाज आपण करावा." अशी प्रतिक्रिया विकास लवांडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"तरी ही देश मोदींच्या हातात सुरक्षित आहे असे बोलणारे किती थापाडे व लाचार आहेत ते समजते. कुठे गेला महिला आयोग ?  कुठे गेल्या भाजपाच्या सर्व महिला आघाडीच्या नेत्या ? सीतामाई कितीही अडचणीत असली तरी पण फक्त जय श्रीराम म्हणा! सीतेला न्याय मिळेल की नाही हे विचारू नका. अशी स्थिती आहे. असे मत विकास लवांडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


देशातील महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या या गंभीर प्रश्नांवर केंद्र सरकार व राज्य सरकारने गांभीर्याने काम करणे गरजेचे आहे.

Friday, December 22, 2023

"वडापाव विक्रेता ते दिव्यांग इंजिनिअर ते आईचे "स्वप्न" पूर्ण करणारे, प्रभावशाली कामगिरीने लंडन,ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड गाजवणारे महाराष्ट्राचे प्रसिद्ध आरोग्यविमा अधिकारी, महाराष्ट्राचे प्रेरणादायी शिलेदार अविनाश रणदिवे"....


"वडापाव विक्रेता ते दिव्यांग इंजिनिअर ते आईचे "स्वप्न" पूर्ण करणारे, प्रभावशाली कामगिरीने लंडन,ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड गाजवणारे महाराष्ट्राचे प्रसिद्ध आरोग्यविमा अधिकारी,महाराष्ट्राचे प्रेरणादायी शिलेदार अविनाश रणदिवे"....


भारत हा तरुणांचा देश आहे. आपल्या महाराष्ट्रात ही वेगवेगळ्या क्षेत्रात तरुण पिढी कर्तुत्व गाजवताना दिसत आहेत. आपल्या महाराष्ट्रात सामान्य लोकांच्या कुटुंबात अनेक असामान्य व्यक्तिमत्त्व जन्माला येत असतात. सामान्य माणसाच्या आयुष्यातील संकटे,अडचणी व त्यांना आत्मविश्वासाने तोंड देणारा असामान्य प्रवास सामान्य माणसाला समृद्ध करतो. पुणे शहरातील, शुक्रवार पेठेत एका सर्वसामान्य, गरीब कुटुंबात अविनाश रणदिवे यांचा जन्म 1 एप्रिल 1985 रोजी झाला. शुक्रवार पेठेत 120 स्क्वेअर फुटच्या छोट्याशा खोलीत दहा ते बारा जणांचे कुटुंब प्रतिकूल परिस्थितीत राहत होते.




जन्मापासूनच दिव्यांग असणारे अविनाश रणदिवे आपल्या आई-वडिलांच्या वडापावच्या व्यवसायासाठी लहानपणापासूनच मदत करत होते. जन्मापासूनच एका हाताचे अपंगत्व असणारे अविनाश रणदिवे इयत्ता दुसरी मध्ये असतानाच एका दुर्दैवी अपघातात त्यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले. बालपणातील या अत्यंत दुःखद घटनेचा बालमनावर आघात झाला. गरिबीशी, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या या कुटुंबातील ही दोनही भावंड,थोरली बहीण, आई-वडिलांच्या वडापावच्या व्यवसायात मदत करून शालेय शिक्षण प्रामाणिकपणे घेत असतानाच हा फार मोठा धक्का सर्वांना सहन करावा लागला.




मोठ्या भावाच्या निधनाच्या धक्क्यामुळे इयत्ता दुसरीत  अविनाश रणदिवे नापास झाले.बालपणापातील दुःखद घटनेचा आघात मोठा असतो. यानंतरच्या जीवन प्रवासात अविनाश रणदिवे यांच्या आईने दिलेल्या प्रोत्सानामुळे, वडिलांच्या पाठिंब्यामुळे अविनाश रणदिवे यांनी पुणे शहरातील पुणे महानगरपालिकेच्या शाळेत त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण चिकाटीने पूर्ण केले.




"आई-वडिलांच्या वडापावच्या गाडीवरती वडापाव विकत असताना अविनाश रणदिवे यांना मिळालेलं सामान्य ज्ञान,संवाद कौशल्य, अनुभव, सामाजिक भान भविष्यातील त्यांच्या कारकीर्दीमध्ये खूप मोलाचे ठरले."




मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर हळव्या झालेल्या आणि धक्का बसलेल्या अविनाश रणदिवे यांच्या आईला आपल्या धाकट्या मुलाच्या शिक्षणाबद्दल आणि भावी कारकिर्दीबद्दल चिंता होती त्यामुळेच अविनाश रणदिवे यांच्या आई खंबीरपणे, कणखरपणे त्यांच्या मुलाच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या शिक्षणासाठी व भावी कारकीर्दीसाठी त्यांनी प्रचंड कष्ट व मेहनत केली. 




दहावीला 53% गुण मिळाल्यानंतर अविनाश रणदिवे यांना दिव्यांग कोट्यातून पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमा कंप्यूटर इंजीनियरिंगसाठी प्रवेश मिळाला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


आई-वडिलांच्या संघर्षाची जाणीव असल्यामुळे, लवकरात लवकर शिक्षण पूर्ण होऊन आपल्या कुटुंबाला कसा आर्थिक हातभार लावता येईल असाच विचार  अविनाश रणदिवे यांच्या मनामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत  असताना  होता.




तांत्रिक शिक्षणात अडकून न राहता आपलं वेगळं स्वतःचं काहीतरी मोठं ध्येय स्वप्न असावे आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपण खूप मोठे कार्य करावे आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा असे विचार डोक्यामध्ये असल्यामुळेच अविनाश रणदिवे यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नशीब आजमवायला सुरुवात केली.




पुण्यातील प्रसिद्ध गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमा कंप्यूटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात एक विषय राहिल्यामुळे पुढे अविनाश रणदिवे यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली. पुण्यात पिंपरी चिंचवड मध्ये आयटी सेवा देणाऱ्या एका छोट्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर विक्री क्षेत्रात अविनाश रणदिवे यांना नोकरी मिळाली.


शुक्रवार पेठेतून पीएमटी बसने  आप्पा बळवंत चौक, आप्पा बळवंत चौकातून शिवाजीनगर, शिवाजीनगर वरून रेल्वेने पुन्हा  चिंचवड रेल्वे स्टेशन व तिथून छोटाश्या सिक्स सीटर रिक्षाने चिंचवड मधील कंपनीमध्ये असा खडतर प्रवास  त्यांचा रोजच नोकरीसाठी  चालू झाला.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


चिंचवड मधील सॉफ्टवेअर विक्री क्षेत्रातील त्या कंपनीत काम करत असताना अविनाश रणदिवे यांना सातही दिवस काम करावे लागायचे. एकही दिवसाची सुट्टी मिळत नसायची. तीन-चार महिने सलग काम केल्यानंतरही एकही दिवस सुट्टी मिळत नसल्याने व दसऱ्याच्या दिवशी सणाच्या दिवशीही सुट्टी दिली नसल्यामुळे, वरिष्ठांशी मतभेद झाल्यानंतर अविनाश रणदिवे यांनी ती कंपनी सोडली.


यानंतर डिप्लोमा कंप्यूटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील राहिलेला एक विषय सोडवून त्यांनी पुन्हा नोकरीसाठी प्रयत्न चालू केले. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागासाठी अविनाश रणदिवे यांना नोकरी मिळाली. तिथे दोन-तीन महिने नोकरी केल्यानंतर त्यांच्या त्या क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळे पुन्हा त्यांना ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागासाठी कंपनीच्या पेरोलवर नोकरी मिळाली.




तो 2006 -2007 चा काळ बँकांच्या क्रेडिट कार्ड प्रतिनिधींसाठी खूपच संघर्षाचा आणि आव्हानात्मक होता. आपल्या बँकेच्या नोकरीच्या पगारातून आपल्या कुटुंबासाठी छोटासा का होईना हातभार लागतोय याचे समाधान अविनाश रणदिवे यांना त्या कालावधीमध्ये होते.




ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागासाठी काही महिने काम केल्यानंतर अविनाश रणदिवे यांनी मॅक्स लाइफ इन्शुरन्सच्या जीवन विमा विभागासाठी काम करण्यास सुरुवात केली. मॅक्स लाइफ इन्शुरन्स मध्ये अविनाश रणदिवे यांना मिळालेले दर्जेदार प्रशिक्षण त्यांच्या भावी कारकीर्दीसाठी खूप महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी मनोगतातुन सांगितलेले आहे.




मॅक्स लाइफ इन्शुरन्सच्या प्रशिक्षणामध्ये एक महत्त्वाची घटना अविनाश रणदिवे यांच्या आयुष्यात घडली. त्या प्रशिक्षण कार्यक्रमात सर्वांना डोळे बंद करण्यास सांगितले. सर्वांना अशी कल्पना करायला सांगितले की, तुम्ही गाडीने प्रवासासाठी निघालेले आहात आणि त्यामध्ये तुमचा अपघात होतो त्यात तुमचा मृत्यु होतो असे समजा आणि अपघात झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा मृतदेह घरी येतो, त्यावेळेस तुमच्या कुटुंबातील तुमची पत्नी, तुमची मुले रडत असतात तो प्रसंग पाहून तुम्हाला काय वाटते याची कल्पना सर्वांना करायला सांगितली आणि त्यावेळेस सर्वजण त्या प्रशिक्षणात रडत होते. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


परंतु अविनाश रणदिवे यांचे लग्न झालेले नसल्यामुळे त्यांना तशी कल्पना नीटशी करता आली नाही परंतु त्यावेळेस त्यांना लहानपणी त्यांचा भावाचा अपघातात मृत्यू झालेली घटना आठवली आणि त्या प्रसंगाचा परिणाम त्यांच्या आयुष्यावरती झाला आणि तो दुःखद प्रसंग आठवल्यानंतर त्यांना त्यावेळेस असे वाटले की आपल्या भावाचा जर जीवन विमा असता तर नक्कीच कुटुंबाला काही ना काही आर्थिक मदत मिळाली असती. इथून पुढे आपण विमा क्षेत्राचे प्रामाणिकपणे आणि निष्ठावंत काम करायचे असे त्यांनी ठरवले.




मॅक्स लाइफ इन्शुरन्स या कंपनीत विमा सल्लागार म्हणून त्यांचे चांगले काम चालू असताना अनेक ग्राहक त्यांना आरोग्यविम्या विषयी विचारायचे त्यामुळेच त्यांनी पुढे आरोग्य विम्याचे महत्त्व जाणून घेऊन स्टार हेल्थ इन्शुरन्स या कंपनीची एजन्सी घेण्याचे ठरवले.


2007 ला अविनाश रणदिवे यांनी स्टार हेल्थ कंपनीचे आरोग्यविमा सल्लागार म्हणून काम चालू केले. त्यावेळेसच त्यांनी त्यांचे बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन बीसीएचे डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले. स्टार हेल्थ कंपनीसाठी आरोग्यविमा सल्लागार म्हणून काम करत असतानाच काही महिन्यानी त्यांना भारतातील प्रसिद्ध, अग्रमानांकित स्टार हेल्थ कंपनीसाठी सेल्स मॅनेजर, आरोग्यविमा अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.




स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये विक्री अधिकारी,विक्री व्यवस्थापक म्हणून काम चालू केलेले असताना अविनाश रणदिवे यांना त्यावेळेस अवघा चार हजार पगार होता. परंतु त्यांनी  कष्टाने, मेहनतीने, आणि प्रामाणिकपणे ग्राहकांना आरोग्यविम्याचे महत्त्व सांगून, ग्राहकांना उत्तम सेवा देऊन, स्टार हेल्थ कंपनीचे प्रामाणिकपणे काम केल्यामुळे, अल्पावधीतच त्यांनी स्टार हेल्थ कंपनीसाठी आरोग्य विमा क्षेत्रातील लाखो रुपयांचा चांगला व्यवसाय करून चांगले नाव कमावले.




स्टार हेल्थ इन्शुरन्स या कंपनीमध्ये काम करत असताना, पगार कमी असताना, अनेक अडचणींशी सामना करून अविनाश रणदिवे यांनी 'पुणे शहरात नवीन व प्रशस्त घराचे' आईचे स्वप्न जिद्दीने, चिकाटीने पूर्ण केले.




वेगवेगळ्या खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांपासून, डॉक्टर, इंजिनिअर, मॅनेजर, व्यावसायिक सर्वांना अविनाश रणदिवे यांनी आरोग्यविम्याचे महत्त्व सांगून, सर्वांना प्रामाणिक व दर्जेदार सेवा देऊन त्यांचा आरोग्यविम्याचा व्यवसाय वाढवला. 




अविनाश रणदिवे यांना आरोग्यविमा क्षेत्रात प्रगतशील वाटचालीसाठी सचिन महाजन, शुभांगी कुलकर्णी, मधुर फादिया या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या कंपनीचे सर्व पदाधिकारी, संपूर्ण टीम व सर्व सहकारी यांचेही महत्वाचे योगदान आहे.




"ग्राहक हाच परमेश्वर" या उक्तीप्रमाणे अविनाश रणदिवे यांनी त्यांच्या 200 लोकांच्या टीमला आर्थिक नियोजन, आरोग्यविम्याच्या नियोजन यांचे सर्व प्रशिक्षण देऊन स्टार हेल्थ कंपनीच्या मेडिक्लेमच्या, आरोग्य विम्याच्या व्यवसायात यशस्वी भरारी घेतली.


"जिद्द, चिकाटी, मेहनत, प्रामाणिकपणा आणि उत्तम कामगिरीमुळे अविनाश रणदिवे यांना स्टार हेल्थ कंपनीकडून आंतरराष्ट्रीय विमा परिषदेसाठी 2015 व 16 ला दुबई देशात, 2017 ला श्रीलंका देशात  जाण्याची संधी मिळाली. 2018 ला लंडन, सिंगापूर देशात,  आणि 2019 ला ऑस्ट्रेलिया देशात, 2022 ला स्वित्झर्लंड, पॅरिस या ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय विमा परिषदेसाठी जाण्याची संधी अविनाश रणदिवे यांना स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून मिळाली. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिके व सन्मान ही परदेशामध्ये अविनाश रणदिवे यांना मिळाला."




मेडिक्लेम, आरोग्य विमा क्षेत्रातील अविनाश रणदिवे यांचे प्रामाणिक व प्रभावशाली काम त्यांना या क्षेत्रातील नवनवीन यशाच्या उंची वरती घेऊन गेले. अविनाश रणदिवे यांच्या दमदार व उत्तम कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे "सी एमडी क्लब मेंबर" सारखे अनेक किताब त्यांना मिळाले. अविनाश रणदिवे यांच्या कार्य कुशल टीमच्या माध्यमातून करोडो रुपयाचा आरोग्यविम्याचा व्यवसाय प्रत्येक वर्षी ते स्टार हेल्थ मेडिक्लेम इन्शुरन्स कंपनीसाठी करत असतात.




अविनाश रणदिवे यांचे दिव्यांग लोकांच्या वधू-वर मेळाव्यातील भाषण खूप गाजले होते. त्या भाषणात ते बोलले होते की "सॉफ्टवेअर इंजिनियरच्या पगारापेक्षाही माझी जास्त कमाई आहे तरी देखील दिव्यांग लोकांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन फार संकुचित आहे. ज्यांची शरीरसंपदा चांगली आहे अशा लोकांचा  अपघात झाल्यानंतर, त्यांनाही अपंगत्व आल्यानंतर खूप अडचणींना, संकटांना सामोरे जावे लागते. परंतु आम्ही जन्मापासूनच दिव्यांग असल्यामुळे दिव्यांगांच्या अडचणी, संकटे याविषयी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती असते. 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


समाज हा दिव्यांग लोकांच्या शारीरिक व्यंगाकडे पाहत असतो परंतु  त्यांच्या मनाची वेदना त्यांना माहीत नसते. दिव्यांग बांधवांना चुकीच्या दृष्टीने, असंवेदनशीलतेने  पाहणे हे  समाजाचे मानसिक व्यंग असते. आज दिव्यांग लोक विविध क्षेत्रात खूप चांगली कामगिरी करून, चांगले कर्तृत्व गाजवताना दिसत आहेत." या प्रेरणादायी भाषणाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला होता. 


"अविनाश रणदिवे यांची मोठी बहीण ज्योती खुटवड व त्यांचे दाजी उल्हास खुटवड यांचीही मोलाची साथ, मार्गदर्शन व मदत अडचणीच्या काळात अविनाश रणदिवे यांना मिळाली. अविनाश रणदिवे यांच्या पत्नी सुषमा रणदिवे यांनी देखील संघर्षमय प्रवासात तसेच अविनाश रणदिवे यांच्या आरोग्यविमा क्षेत्रातील यशस्वी प्रवासासाठी मोलाची साथ दिली. अविनाश रणदिवे यांची दोन्ही मुले आदित्यराज व ओम हुशार व गुणी आहेत." 




अविनाश रणदिवे यांच्या आईला गंभीर आजार झालेला असताना त्यावेळी खूप खडतर परिस्थिती होती तरी देखील अविनाश रणदिवे यांनी आईला वेळेवर चांगले उपचार देऊन, तो गंभीर आजार पूर्ण बरा करून त्या परिस्थितीत देखील त्यांनी त्यांच्या कामावरती व्यवस्थित लक्ष केंद्रित करून संकटांवरती मात केली.




एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील दिव्यांग तरुण, जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने त्याच्या आवडीच्या क्षेत्रात एक मोठ्या उंची वरती गेलेला दिसत असला तरी त्या मागचे कष्ट व संघर्ष खूप महत्त्वाचा आहे. अविनाश रणदिवे यांचा वडापाव विक्रेता ते आरोग्य विमा क्षेत्रातील यशस्वी अधिकारी ते करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक ते  ध्येयवादी व्यवस्थापक हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.




अविनाश रणदिवे यांनी मागील काही वर्षात दहा हजार कुटुंबांपर्यंत स्टार हेल्थ मेडिक्लेम कंपनीचे आरोग्यविमा सुरक्षा कवच पोहोचवलेले आहे. महाराष्ट्रातील एक लाख कुटुंबांना आरोग्यविम्याचे सुरक्षा कवच देण्याचे ध्येय अविनाश रणदिवे यांनी पुढील पाच वर्षांमध्ये ठेवलेले आहे. आरोग्यविमा व  वैयक्तिक अपघात विमा याविषयी अविनाश रणदिवे  समाजात प्रबोधन करत आहेत तसेच आर्थिक नियोजन, आर्थिक व्यवस्थापन याचे शिक्षण लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहेत.




स्टार हेल्थ मेडिक्लेम इन्शुरन्स या कंपनीसाठी वरिष्ठ आरोग्यविमा अधिकारी म्हणून अविनाश रणदिवे यांनी काम करत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विमा सल्लागार घडवले. त्यातूनच काहीजण आरोग्य विमा अधिकारी म्हणून चांगले काम करत आहेत.




अविनाश रणदिवे यांनी तरुण वयातच कष्टाने, मेहनतीने पुणे शहरात चांगल्या उच्चभ्रू परिसरामध्ये आपले दोन ऑफिसेस, तसेच चार आरामदायी कार  व नवीन घर ही स्वप्ने पूर्ण केलेली असली तरी समाजासाठी आरोग्य विमा क्षेत्रातील प्रामाणिक सेवा देण्याचा नक्कीच त्यांचा प्रयत्न असतो.




आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करून जिद्दीन, चिकाटीने, प्रामाणिकपणे झोकून देऊन तरुण पिढीने आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम केले पाहिजे, तसेच समाजासाठी ही प्रामाणिकपणे काम केले पाहिजे असा सल्ला अविनाश रणदिवे आजच्या तरुण पिढीला देतात.




आर्थिक नियोजन, आर्थिक व्यवस्थापन व विमा क्षेत्रातील प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय दर्जाची एक मोठी अकॅडमी चालू करण्याचा मनोदय अविनाश रणदिवे यांचा आहे.


जन्मापासूनच असलेल्या आपल्या दिव्यांग परिस्थितीला आपली स्वतःची ताकद बनवुन व त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून, आपल्या आवडीच्या क्षेत्रात जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने खूप मोठी यशाची भरारी घेता येते हे अविनाश रणदिवे यांनी त्यांच्या संघर्षमय व असामान्य प्रवासातून दाखवून दिलेले आहे. हा त्यांचा संघर्षमय व  असामान्य प्रवास समाजातील सर्व घटकांसाठी व तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे.

महाराष्ट्राचे प्रेरणादायी शिलेदार अविनाश रणदिवे यांना भावी प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा....

लेखक : -  अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.

Tuesday, December 19, 2023

"मराठा आरक्षणासाठी "या" महिन्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; राज्य मागासवर्गीय आयोगाला "इतक्या" कोटींचा निधी"....



नागपूर, दि. १९ :  राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली.


मराठा आरक्षणाबाबतच्या चर्चेवरील उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषद आणि विधानसभेत बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यात येईल. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी निसंदिग्ध ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी उत्तरात दिली.




मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी जे-जे काही करायचे आहे, ते सगळे करण्याची आमची तयारी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेऊन वचन दिले होते. आजही त्यावर मी ठाम आहे. मराठा समाजाशिवाय इतर कोणताही समाज अडचणीत राहिला असता तर अशीच शपथ घेतली असती, त्यामुळे या प्रश्नात कुठेही मागे हटणार नाही, असा पुनरूच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला.




तसेच त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना आवाहन केले की, सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे आंदोलकांनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणे हे राज्याला भूषणावह नाही. पुरोगामी महाराष्ट्राला हे तर अजिबातच शोभणारे नाही. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


महाराष्ट्रामध्ये कुठेही तणाव वाढणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी, विरोधी पक्षांनी आणि एकूणच समाजानेही आजवर घेतली आहे. आणि आपण आज घेतोय आणि यापुढेही घेत राहू. त्यामुळेच, मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरु आहे, त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनीच सावध राहण्याची, विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था, बंधुभाव कायम राहिला पाहिजे. कोणत्याही निमित्ताने समाजा-समाजात वितुष्ट येता कामा नये. चर्चेतून आणि योग्य भूमिका घेतली गेली तर सर्व प्रश्न सुटतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.




"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण मिळायला पाहिजे, हीच आमची भावना आहे. अन्य मागास समाजाप्रमाणे मराठा समाजालाही आरक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करायची आहे. या मागणीसाठी काहींनी भावनेच्या भरात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलले. हे सर्व विषण्ण करणारे आणि वेदनादायी आणि आपल्याला परवडणारे नाही. राज्यातल्या इतर सर्व समाजाशी मिळून मिसळून मराठा समाजाने आजवर महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक बांधणी घट्ट केली आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा हातभार लावला." असेही त्यांनी सांगितले.




गेल्या दोन अडीच महिन्यात शासनाने एकतर्फी निर्णय घेतलेले नाहीत. तर सर्व पक्ष आणि संघटना यांना सुद्धा मराठा समाजासाठीचे निर्णय घेताना विश्वासात घेतल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, दरम्यान १० बैठका घेतल्या. उपसमितीच्या १२ बैठका झाल्या, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १ आणि सल्लागार मंडळाच्या ७ अशा एकूण ३० बैठका झाल्या. सर्वपक्षीय बैठका देखील घेतल्या आहेत.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबईत झालेल्या बैठकीत मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांबाबतची भूमिका स्पष्ट केली होती. अंतरवाली-सराटीतल्या आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्रांची मागणी ऐरणीवर आली. ७ सप्टेंबर २०२३ रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याचे त्यांनी सांगितले.



"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठवाड्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित केली. तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली. निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकालीन करार, त्यावेळच्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज या पुराव्यांची तपासणी कशी करायची हे या समितीने ठरविले. न्या. शिंदे समितीस सादर करण्यात आलेले १२ विभागांचे पुरावे, ४८ दस्ताऐवज ग्राह्य धरण्यासाठी तशी सुधारणा सामाजिक न्याय विभागाच्या नियमांत करण्यात येत आहे. त्यामुळे कुणबी लिहिले आणि प्रमाणपत्र दिले एवढे ते सोप नाही. त्यामुळे कुणीही भीती बाळगू नका. सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार कागदपत्रांची तपासणी करून कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहेत, हे दाखले अतिशय काटेकोरपणे दिले जात आहेत. समितीच्या समन्वयासाठी राज्यभरात १८५८ कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्यात ६६ हजार ६४४ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल ३१ ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला. दुसरा अहवाल समितीने काल आम्हाला सादर केला आहे. ४०७ पानांचा हा अहवाल आहे. हा अहवाल विधी व न्याय विभागाला छाननी आणि विश्लेषणासाठी पाठवत आहोत."


मागासवर्ग आयोगाला निधी

राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या आयोगाचे पुनर्गठण केले आहे. सर्वेक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला ३६० कोटी रुपयांच्या निधीची पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज मागासलेला आहे हे सिध्द करण्यासाठी इम्पिरिकल डेटा युध्दपातळीवर गोळा केला जातोय. सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा आणि निधी उपलब्ध करून दिला जात आहे. अत्यंत वेगाने ताकदीने काम करुन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. सर्व शक्ती पणाला लावणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

एसईबीसी कायदा निर्मितीबाबतचा कालानुक्रम, तसेच विविध समाज घटकांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचीही सविस्तर माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.