Saturday, January 28, 2023

"पुण्यातील प्रसिद्ध 'गणेश इंटरनॅशनल स्कुल प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात, देशभक्तीमय वातावरणात साजरा; भारतीय लष्करातील शिलेदार मधुकर शिंदे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाची ध्वजवंदना"...



पुणे, दि.२८ : पिंपरी चिंचवड परिसरातील प्रसिद्ध प्रशाला गणेश इंटरनॅशनल स्कुल आपल्या देशाचे राष्ट्रीय सण देशभक्तिमय वातावरणात साजरी करत असते. एस्.एस् .पी. ग्रुप ऑफ़ इन्स्टिटय़ूटचे गणेश इंटरनॅशनल स्कूल आणि सीनियर सेकंडरीचा ७४ वा प्रजासत्ताक दिन  मोठया उत्साहपूर्ण,देशभक्तीमय वातावरणात पार पडला.

     


              

या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी भारतीय लष्करातील शिलेदार श्री मधुकर मारुती शिंदे उपस्थित होते. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


सन १९७९ मध्ये श्री मधुकर शिंदे इंडियन आर्मीशी संलग्न व कार्यरत होते. त्यांच्या हस्ते ध्वजवंदना करण्यात आली. तसेच  मान्यवर श्री यश साने  व श्रीमती सारिका ताई नेवाळे यांच्या आगमनाने सुद्धा कार्यक्रमाची शोभा वाढली.



विद्यार्थ्यांनी परेड करुन ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी झेंडा गीत सादर केले.




मुख्य अतिथींना  संस्थेचे मान्यवर  श्री. सतीश पाटील (संस्थचे चेअरमन) श्री मंगेश पाटील (संस्थेचे विश्वस्त) सौ. स्नेहल गणेश पाटील (संस्थेचे विश्वस्त) यांच्या हस्ते 'सन्मानचिन्ह' देऊन  गौरवण्यात आले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


शाळेतील अनुशासन पालन करणाऱ्या उत्तम विद्यार्थ्यांना 'उत्तम अनुशासित विद्यार्थी पुरस्कार' व मानपत्रक देऊन गौरवण्यात आले. 




७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बस सेवा सुरू करण्यात आली."जीआयएस प्लेस्कुलच्या" चिमुकल्यांनी देशभक्ती पर नृत्य सादर केले. 


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


प्रायमरी व सेकंडरीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर करत आपले देशप्रेम व्यक्त केले. प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी 'कर चले हम फिदा' व सेकंडरीच्या  विद्यार्थ्यांनी ‘दिल दिया है जान भी देंगे' हे गीत सादर करत सर्व देशप्रेमीयांचे मन जिंकून घेतले. 




तसेच विद्यार्थ्यांनी  नृत्याच्या आधारे आपल्या  देशातील जवानांच्या कार्याला सलामी दिली. यावेळी  शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे आपल्या देशावरील प्रेमभावना व्यक्त केल्या.




मान्यवर श्री मधुकर मारुती  शिंदे , श्री यश साने व श्रीमती सारिका ताई नेवाळे यांनी देश व देशावरील प्रेम व्यक्त करत शाळेतील विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन हे अतिशय मोलाचे ठरले. 


       

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक श्री. सतीश पाटील  व विश्वस्त  श्री. मंगेश पाटील व सौ. स्नेहल गणेश पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.प्रकाश गायकवाड, संस्थेचे सचिव श्री.चंद्रशेखर पाटील, संस्थेचे सहयोगी संचालक श्री. सुनील शेवाळे,  सिद्धी कॉलेज ऑफ़ फार्मसी प्राध्यापक डॉ.प्रविणकुमार साबळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिल्पा गायकवाड ,जीआयएस प्लेस्कुलच्या सौ. भारती गदाद, उपप्राचार्या सौ. प्रिया नेवाळे, प्रशालेच्या मीडिया प्रमुख त्यागिनी रामगडे व  सर्व शिक्षक वृंद व सेवेकरी वर्ग उपस्थित होते .


कार्यक्रमाच्या शेवटी  उपप्राचार्या सौ. प्रिया नेवाळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. अन्नु सिंग व सौ. धनश्री वैरागर यांनी केले.कार्यक्रमाची सांगता 'वंदेमातरम' या गीताने झाली.

"पुण्यातील प्रसिद्ध गणेश इंटरनॅशनल स्कुलचा 'परीक्षा पे चर्चा' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन लाईव्ह कार्यक्रमात सक्रिय सहभाग"; पंतप्रधान नरेंद मोदी यांचा देशभरात लाखो मुलांशी ऑनलाइन संवाद"...



पुणे, दि.२८ : पिंपरी चिंचवड परिसरातील प्रसिद्ध प्रशाला गणेश इंटरनॅशनल स्कुल विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वेगवेगळे चांगले उपक्रम राबवत असते. एस्.एस् .पी. शिक्षण संस्थेच्या गणेश इंटरनॅशनल स्कूल आणि सीनियर सेकंडरी  विद्यालयात २७ जानेवारी २०२३ रोजी अकरा वाजता परीक्षा पर चर्चा ह्या कार्यक्रमाचे  लाईव्ह आयोजन करण्यात आले होते. 




देशभरात विविध विद्यालयांमध्ये दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या मनात परीक्षा संदर्भात असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्या कार्यक्रमामध्ये शिक्षणाविषयी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक शंका-कुशंका दुर होण्यासाठी मदत झाली.




या चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल ४० लाख विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताणतणाव दुर करण्यासाठी गुरूमंत्र देखील दिला. 

   



पिंपरी चिंचवड मधील चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल  मधील नववी ,दहावी, अकरावी ,बारावीच्या विद्यार्थ्यांनी या  कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन श्री एस बी पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री.प्रकाश गायकवाड, सहयोगी संचालक श्री. सुनील शेवाळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिल्पा गायकवाड, उपप्राचार्या सौ. प्रिया नेवाळे,  प्रशालेच्या मीडिया प्रमुख त्यागिनी रामगडे व सर्व उपस्थित होते.




या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका. सौ पद्मश्री पगार यांनी केले. उपमुख्याध्यापिका सौ. प्रिया नेवाळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता  झाली.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

Friday, January 27, 2023

"ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव व वरिष्ठ गुप्तचर अधिकारी संभाजी देशमुख यांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर, महाराष्ट्रातील "या" ४ पोलीस शिलेदारांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर; राज्यातील "या" ३१ पोलीस शिलेदारांना 'पोलीस शौर्य पदक', ३९ पोलीस शिलेदारांना प्रशंसनीय सेवेकरिता 'पोलीस पदक' केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जाहीर"....



नवी दिल्ली, दि. २७ :  भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या औचित्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस शिलेदारांनी महाराष्ट्राची मान उंचावली आहे. 


केंदीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा झाली असून, यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना पुरस्कार जाहीर झाला. यातील चार पोलीस अधिका-यांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) 31 ‘पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी) तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत.




प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी  एकूण 901 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून 93  पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक' (पीपीएम), 140 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 668 पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाले असून यात महाराष्ट्राला एकूण 74 पदके जाहीर झाली आहेत.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


देशातील 93 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना  उत्कृष्ट सेवेकरिता  ‘राष्ट्रपती  विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्राच्या चार अधिकारी –कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.




चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) : -



1)श्री.देवेन त्रिपुरारी भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक, राज्य सुरक्षा कोऑपरेशन, मुंबई.

     


2)श्री.अनुप कुमार सिंह, अतिरिक्त पोलिस महासंचालक, मुंबई.





3)श्री. संभाजी नारायण देशमुख, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी (पोलिस उपनिरीक्षक), मुंबई.


 


4)श्री.दीपक धनाजी जाधव, पोलिस उपनिरिक्षक, ठाणे.



Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



राज्यातील एकूण 31 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी) : - 



1)मनीष कलवानिया,आयपीएस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (1st BAR To PMG)


2)संदिप पुंजा मंडलिक,सहाय्यक पोलीस निरीक्षक (2nd BAR To PMG)


3)राहूल बाळासो नामाडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक


4)सुनिल विश्वास बागल,पोलीस उपनिरीक्षक


5)देवेंद्र पुरूषोत्तम आत्राम,नाईक-पोलीस हवालदार


6)गणेश शंकर दोहे,पोलीस हवालदार


7)एकनाथ बारीकराव सिडाम,पोलीस हवालदार


8)प्रकाश श्रीरंग नरोटे,पोलीस हवालदार


9)दिनेश पांडुरंग गावडे,पोलीस हवालदार


10)शंकर दसरू पुंगटी,पोलीस हवालदार.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


11)योगीराज रामदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक


12)अमोल नानासाहेब फडतरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक


13)सदाशिव नामदेव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक


14)प्रेमकुमार लहु दांडेकर,पोलीस उपनिरीक्षक


15)राहूल विठ्ठल आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक


16)देवाजी कोटूजी कोवासे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक


17)राजेंद्र अंतराम मडावी,मुख्य हवालदार


18)नांगसू पंजामी उसेंडी,नाईक पोलीस हवालदार(1st BAR To PMG)


19)देवेंद्र पुरूषोत्तम आत्राम, नाईक पोलीस हवालदार (1st BAR To PMG)


20)प्रदिप विनायक भासरकर, नाईक पोलीस हवालदार


21)सुधाकर मानु कोवाची, पोलीस हवालदार


22)नंदेश्वर सोमा मडावी, पोलीस हवालदार


23)सुभाष भजनराव पाडा, पोलीस हवालदार


24)भाऊजी रघू मडावी, पोलीस हवालदार


25)शिवाजी मोडु उसेंडी, पोलीस हवालदार


26)गंगाधर केरबा कऱ्हाड, पोलीस हवालदार


27)रामा मैनु कोवाची, पोलीस हवालदार


28)महेश पोचम मदेशी, पोलीस हवालदार.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


29)स्वप्नील केसरी पाडा, पोलीस हवालदार


30)तानाजी दिगंबर सावंत, पोलीस निरीक्षक


31)नामदेव महिपती यादव, पोलीस हवालदार


राज्यातील 39 पोलीसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘पोलिस पदक’ (PM) : - 



1) श्री जयकुमार सुसाईराज, विशेष पोलीस महानिरीक्षक,कुलाबा, मुंबई


2)श्री लखमी कृष्ण गौतम, पोलिस अधिक्षक,विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय,कुलाबा, मुंबई


3)श्री निशीथ वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपाडा, मुंबई


4)श्री संतोष गणपतराव गायके, पोलीस उपअधिक्षक, गोरेगाव ,मुंबई


5)श्री चंद्रकांत विठ्ठल मकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, दादर (पूर्व),मुंबई


6)श्री दिपक राजाराम चव्हाण, पोलीस निरीक्षक, मांटुगा (पूर्व) ,मुंबई


7)श्री. रमेश विठ्ठलराव कठार, पी.डब्ल्यु.आय (इजिनिंअर) औरंगाबाद परीक्षेत्र


8)श्री. देविदास काशीनाथ घेवारे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती


9)श्री. सुधाकर पंडितराव काटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे.


10)श्री. शैलेश दिगांबर पासलवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


11)श्री. मनोज श्रीकांत नेर्लेकर,पोलीस उपअधिक्षक, वरळी , मुंबई


12)श्री. शाम खंडेराव शिंदे , पोलीस निरीक्षक, नवी मुंबई


13)श्रीमती अलका सदाशिव देशमुख, पोलीस निरीक्षक, ठाणे शहर


14)श्री. दत्तात्रय भंगवतराव पाबळे, पोलीस निरीक्षक, डी.एन. रोड, मुंबई


15)श्री. बापू तुळशीराम ओवे,पोलीस निरीक्षक, गोरेगांव (पूर्व), मुंबई


16)श्री. प्रसाद दशरथ पांढरे, पोलीस निरीक्षक, ठाणे


17)श्री. शिरीष क्रिशनाथ पवार,पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस स्टेशन


18)श्री. सदाशिव एलचंद पाटील,कमांडंट, धुळे


19)श्री. सुरेश पुंडलिकराव गाठेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वाशिम


20)श्री. दिलीप तुकाराम सावंत,गुप्तचर अधिकारी, एस.आय.डी, मुख्यालय, मुंबई


21)श्री. संतोष सखाराम कोयंडे, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई


22)श्री. चंद्रकांत गुणवंतराव लांबट,पोलीस उपनिरीक्षक, रामनगर, चंद्रपूर


23)श्री. झाकिरहुसेन मौला किल्लेदार,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, घाटकोपर , मुंबई


24)श्री. भरत अप्पाजी पाटील, पोलीस निरीक्षक, मुंबई.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


25)श्री. प्रमोद गंगाधरराव कित्ते,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,अमरावती


26)श्री. आनंद भिमराव घेवडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रायगड


27)श्री. सुखदेव खंडू मुरकुटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नाशिक


28)श्री. गोकुळ पुंजाजी वाघ, मुख्य हवालदार, औरंगाबाद


29)श्री. धनंजय छबनराव बारभाई,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर


30)श्री. सुनील विश्राम गोपाळ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई


31)श्री. दत्तात्रय राजाराम कडनोर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नाशिक शहर


32)श्री. ज्ञानेश्वर पंढरीनाथ आवारी,पोलीस निरीक्षक, मुंबई


33)श्री. रामकृष्ण नारायण पवार,पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे


34)श्री. ओमप्रकाश गंगाधर कोकाटे, पोलीस निरीक्षक, नागपूर ग्रामीण.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


35)श्री. सुभाष भीमराव गोईलकर,पोलीस उपनिरीक्षक, विरार (पूर्व) पालघर


36)श्री. संजय सिध्दू कुपेकर,पोलीस उपनिरीक्षक लव्हलेन रोड, मुंबई


37)श्री. प्रदीप केडा अहीरे, पोलीस उपनिरीक्षक ,ठाणे


38)श्री. प्रकाश हरीबा घाडगे,पोलीस उपनिरीक्षक, कांदीवली पोलीस स्टेशन ,मुंबई


39)श्री. विजय उत्तम पवार,पोलीस उपनिरीक्षक,फोर्ट, मुंबई.


महाराष्ट्र पोलीस शिलेदारांच्या या कौतुकास्पद कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे.


Thursday, January 26, 2023

"पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या प्रजासत्ताक दिनी, जगातील उत्तुंग शिखरे सर करून विश्वविक्रमाची दमदार कामगिरी करणाऱ्या प्रियदर्शनी प्रशालेच्या "या" माजी विद्यार्थीनीला मिळाला प्रजासत्ताक दिनाचा तिरंगा झेंडा फडकवण्याचा सन्मान; मा. नगरसेवक युवराज रेणूसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा"...



पुणे, दि.२६ : पुण्यातील  प्रसिद्ध  प्रियदर्शनी विद्या मंदिर प्रशालेत धनकवडी येथे  प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या व देशभक्तीमय वातावरणात पार पडला.




या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी  अध्यक्ष म्हणून मा. स्वीकृत नगरसेवक युवराज रेणुसे उपस्थित होते.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जगातील उत्तुंग शिखरे सर करून विश्वविक्रमाची दमदार कामगिरी करणाऱ्या प्रसिद्ध गिर्यारोहक व प्रियदर्शनी प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी स्मिता घुगे उपस्थित होत्या.




या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत ध्वज पथक, ढोल पथक यांच्या माध्यमातून शाळेच्या विद्यार्थ्यांकडून प्रशालेच्या वतीने करण्यात आले. 




प्रियदर्शनी विद्या मंदिर पुणे ही प्रशाला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. जगातील उंच शिखरे सर करून विश्वविक्रम करणाऱ्या प्रियदर्शनी प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी स्मिता घुगे यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा झेंडा फडकविण्याचा सन्मान मिळाला. प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे हे खूप कौतुकास्पद पाऊल आहे.




महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गिर्यारोहक स्मिता घुगे यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजरो सर करून सर्वात मोठा तिरंगा फडकवून विश्वविक्रम केलेला आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध गिर्यारोहक स्मिता घुगे यांनी सकाळी आठ वाजता तिरंगा झेंडा फडकवल्यानंतर प्रशालेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत ध्वजवंदना देण्यात आली. त्यानंतर झेंडा गीत, स्वागत गीत प्रियदर्शनी प्रशालेतील सातवी, आठवीच्या विद्यार्थिनींनी अतिशय सुरेख सादर केले.



या कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय व सत्कार प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजश्री दिघे, रूपाली मालुसरे, व ढुमे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. 




सर्व पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व शिक्षक यांना सहावी, सातवी व आठवीच्या मुलींनी योगासनातील सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके सादर करून दाखवून आरोग्याचा संदेश देण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने केला. 




Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या प्रशालेच्या कला व क्रीडा क्षेत्रातील जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. स्वीकृत नगरसेवक युवराज रेणूसे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

 



या  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्मिता घुगे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व शाळेतील तसेच जीवनातील महत्वाचे अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे भाषण केले. 




Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना संदीप भोसले  व सुनील सोनवणे  या शिक्षकांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया पाटसकर यांनी केले. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, लोकप्रिय मा. नगरसेवक आप्पा रेणुसे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.



Friday, January 20, 2023

"पुण्यात 'सोमेश्वर अमृततुल्य' चहा नवीन शाखेचे लोकप्रिय नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते उद्घाटन; बारामतीच्या २३ वर्षाच्या "या" युवकाच्या 'सोमेश्वर अमृततुल्य' चहाच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न"..


पुणे, दि.२० :  पुणे येथील रहाटणी येथे 'सोमेश्वर अमृततुल्य' चहा या नवीन शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत व लोकप्रिय मा.जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 




बारामतीच्या २३ वर्षाच्या प्रवीण जगताप उर्फ गाडेकर या तरुण व्यावसायिकाच्या 'सोमेश्वर अमृततुल्य' चहाच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा आनंददायी वातावरणात व उत्साहात संपन्न झाला.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा समिती प्रथम सभापती, पीएमआरडीए सदस्य, लोकप्रिय मा.जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचे रहाटणी येथील "सोमेश्वर अमृततुल्य" नवीन शाखेच्या उद्घाटन  सोहळ्यात सायंकाळी ६.३० वाजता आगमन झाले. 




वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकप्रिय नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी पुण्यातील रहाटणी येथील "सोमेश्वर अमृततुल्य" चहाच्या नवीन शाखेचे आनंददायी वातावरणात उद्घाटन केले.





सोमेश्वर अमृततुल्य चहाच्या नवीन शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर नगरसेवक चंद्रकांत नखाते व उपस्थित सर्व मान्यवरांनी सोमेश्वर अमृततुल्यच्या चहाचा आस्वाद घेतला.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


प्रवीण जगताप या बारामतीच्या ग्रामीण भागातील तरुण व्यावसायिकाच्या पुण्यातील "सोमेश्वर अमृततुल्य" या चहाच्या नवीन शाखा सुरू करण्याच्या ध्येयवादी पाऊलाचे लोकप्रिय नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी कौतुक करून, भावी प्रगतशील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




"बारामतीच्या ग्रामीण भागातील तरुण पुण्यात 'सोमेश्वर अमृततुल्य' चहा या नवीन शाखेच्या माध्यमातून प्रामाणिक व्यावसायिकतेचे चांगले पाऊल टाकत आहे. प्रवीण जगताप हा तरुण हुशार, मेहनती,शांत, हसतमुख स्वभावाचा आहे. मेहनत, इमानदारीने काम करून तोंडामध्ये साखर व डोक्यावर बर्फ या उक्तीप्रमाणे काम करून प्रवीण जगताप या तरुण व्यवसायिकाला चांगले यश मिळेल." अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




या उद्घाटन सोहळ्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रिय नगरसेवक चंद्रकांत नखाते, सामाजिक कार्यकर्ते निलेश नखाते, महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक,पत्रकार अजित जगताप,साई प्रीत इलेक्ट्रिकलचे युवा व्यावसायिक स्वप्नील गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर नखाते, मराठा महासंघाचे पुणे जिल्हा पदाधिकारी अभिजित जगताप, सामाजिक कार्यकर्ते सागर नखाते, अनिल जगताप,



Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


राहुल जगताप, सचिन जगताप, अक्षय गाडेकर, मयूर शिंदे, बाबू सातपुते,विशाल गाडेकर,शिरीष जगताप, प्रणित राऊत, प्रमोद गाडे, करण जगताप, रोहित गाडेकर, मयूर गायके,दत्तात्रय भोसले,अक्षय नलगे,सागर शेडगे व प्रवीण जगताप मित्रपरिवार उपस्थित होते.




"बारामती तालुक्यातील वाकी गावच्या शेतकरी कुटुंबातील २३ वर्ष वय असलेला तरुण व्यावसायिक प्रवीण जगताप या मेहनती तरुणाने पुण्यात "सोमेश्वर अमृततुल्य" चहाच्या नवीन शाखेचा शुभारंभ करणे हे खूपच कौतुकास्पद व प्रेरणादायी पाऊल आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रात यश मिळण्यासाठी जिद्दीने व प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे."अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.




"पुण्यात रहाटणी येथे शुभारंभ झालेल्या आमच्या 'सोमेश्वर अमृततुल्य' या चहाच्या नवीन शाखेच्या माध्यमातून पुण्यातील ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाच्या व स्वादिष्ट चवीचा चहा देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. सोमेश्वर अमृततुल्यची जिभेवर  रेंगाळणारी वेगळी चव व कडक चहाची चव पुणेकरांनी नक्कीच आवडेल." अशी प्रतिक्रिया 'सोमेश्वर अमृततुल्य'चे संचालक प्रवीण जगताप या तरुण व्यावसायिकाने महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



मराठी तरुणाई वेगवेगळ्या क्षेत्रात प्रामाणिकपणे व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी समाजाने पाठींबा देणे गरजेचे आहे.


पुणेकरांना कडक, स्वादिष्ट चहा आवडत असतो. "सोमेश्वर अमृततुल्य"च्या चहाची चव पुणेकरांना आवडेल असा आशावाद प्रवीण जगताप मित्रपरिवारानेही व्यक्त केला.