Friday, January 20, 2023

"पुण्यात 'सोमेश्वर अमृततुल्य' चहा नवीन शाखेचे लोकप्रिय नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते उद्घाटन; बारामतीच्या २३ वर्षाच्या "या" युवकाच्या 'सोमेश्वर अमृततुल्य' चहाच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न"..


पुणे, दि.२० :  पुणे येथील रहाटणी येथे 'सोमेश्वर अमृततुल्य' चहा या नवीन शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत व लोकप्रिय मा.जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 




बारामतीच्या २३ वर्षाच्या प्रवीण जगताप उर्फ गाडेकर या तरुण व्यावसायिकाच्या 'सोमेश्वर अमृततुल्य' चहाच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा आनंददायी वातावरणात व उत्साहात संपन्न झाला.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा समिती प्रथम सभापती, पीएमआरडीए सदस्य, लोकप्रिय मा.जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचे रहाटणी येथील "सोमेश्वर अमृततुल्य" नवीन शाखेच्या उद्घाटन  सोहळ्यात सायंकाळी ६.३० वाजता आगमन झाले. 




वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकप्रिय नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी पुण्यातील रहाटणी येथील "सोमेश्वर अमृततुल्य" चहाच्या नवीन शाखेचे आनंददायी वातावरणात उद्घाटन केले.





सोमेश्वर अमृततुल्य चहाच्या नवीन शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर नगरसेवक चंद्रकांत नखाते व उपस्थित सर्व मान्यवरांनी सोमेश्वर अमृततुल्यच्या चहाचा आस्वाद घेतला.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


प्रवीण जगताप या बारामतीच्या ग्रामीण भागातील तरुण व्यावसायिकाच्या पुण्यातील "सोमेश्वर अमृततुल्य" या चहाच्या नवीन शाखा सुरू करण्याच्या ध्येयवादी पाऊलाचे लोकप्रिय नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी कौतुक करून, भावी प्रगतशील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




"बारामतीच्या ग्रामीण भागातील तरुण पुण्यात 'सोमेश्वर अमृततुल्य' चहा या नवीन शाखेच्या माध्यमातून प्रामाणिक व्यावसायिकतेचे चांगले पाऊल टाकत आहे. प्रवीण जगताप हा तरुण हुशार, मेहनती,शांत, हसतमुख स्वभावाचा आहे. मेहनत, इमानदारीने काम करून तोंडामध्ये साखर व डोक्यावर बर्फ या उक्तीप्रमाणे काम करून प्रवीण जगताप या तरुण व्यवसायिकाला चांगले यश मिळेल." अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




या उद्घाटन सोहळ्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रिय नगरसेवक चंद्रकांत नखाते, सामाजिक कार्यकर्ते निलेश नखाते, महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक,पत्रकार अजित जगताप,साई प्रीत इलेक्ट्रिकलचे युवा व्यावसायिक स्वप्नील गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर नखाते, मराठा महासंघाचे पुणे जिल्हा पदाधिकारी अभिजित जगताप, सामाजिक कार्यकर्ते सागर नखाते, अनिल जगताप,



Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


राहुल जगताप, सचिन जगताप, अक्षय गाडेकर, मयूर शिंदे, बाबू सातपुते,विशाल गाडेकर,शिरीष जगताप, प्रणित राऊत, प्रमोद गाडे, करण जगताप, रोहित गाडेकर, मयूर गायके,दत्तात्रय भोसले,अक्षय नलगे,सागर शेडगे व प्रवीण जगताप मित्रपरिवार उपस्थित होते.




"बारामती तालुक्यातील वाकी गावच्या शेतकरी कुटुंबातील २३ वर्ष वय असलेला तरुण व्यावसायिक प्रवीण जगताप या मेहनती तरुणाने पुण्यात "सोमेश्वर अमृततुल्य" चहाच्या नवीन शाखेचा शुभारंभ करणे हे खूपच कौतुकास्पद व प्रेरणादायी पाऊल आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रात यश मिळण्यासाठी जिद्दीने व प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे."अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.




"पुण्यात रहाटणी येथे शुभारंभ झालेल्या आमच्या 'सोमेश्वर अमृततुल्य' या चहाच्या नवीन शाखेच्या माध्यमातून पुण्यातील ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाच्या व स्वादिष्ट चवीचा चहा देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. सोमेश्वर अमृततुल्यची जिभेवर  रेंगाळणारी वेगळी चव व कडक चहाची चव पुणेकरांनी नक्कीच आवडेल." अशी प्रतिक्रिया 'सोमेश्वर अमृततुल्य'चे संचालक प्रवीण जगताप या तरुण व्यावसायिकाने महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



मराठी तरुणाई वेगवेगळ्या क्षेत्रात प्रामाणिकपणे व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी समाजाने पाठींबा देणे गरजेचे आहे.


पुणेकरांना कडक, स्वादिष्ट चहा आवडत असतो. "सोमेश्वर अमृततुल्य"च्या चहाची चव पुणेकरांना आवडेल असा आशावाद प्रवीण जगताप मित्रपरिवारानेही व्यक्त केला.


No comments:

Post a Comment