पुरंदर,दि.१२ : जगभरात क्षयरोग या गंभीर आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे, त्यामुळे यावरील उपचार पद्धतीमध्ये संशोधनाची खूप आवश्यकता आहे. पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, वीर या गावचे सुपुत्र प्राध्यापक विपल धसाडे यांनी चेन्नई येथील वेल्स फार्मसी विद्यापीठामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने टीबी - क्षयरोग आजारावरती दोन प्रभावी औषधे शोधून काढण्यात यश मिळाल्यामुळे त्यांना विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निष्कर्षानुसार जगामध्ये वाढती व्यसनाधीनता यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊन क्षयरोग संसर्ग होण्याचे प्रमाण खूप आहे आणि यामध्ये उपलब्ध असणारे औषध उपचार दीर्घकालीन वापर करूनही पूर्णतः क्षयरोग बरा करण्यासाठी परिणामकारक नसल्याने या विषयांमध्ये नवनवीन संशोधन होणे गरजेचे होते.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
जागतिक आरोग्य संघटनेच्या विविध योजनांद्वारे क्षयरोग प्रतिबंधात्मक संशोधन करण्यात येत आहे. या संशोधनाची गरज ओळखून प्रा. विपुल धसाडे यांनी वनस्पतीशास्त्र तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दोन नवीन प्रभावी औषधे शोधून त्यांची परिणामकारक चाचणी लखनौ येथील शासकीय संशोधन संस्थेच्या मदतीने यशस्वीरित्या पूर्ण केली.
"क्षयरोगावर संशोधन केलेल्या या औषधांची मानवी शरीरामध्ये चाचणी घेणे अत्यावश्यक आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रात क्षयरोग व त्यावरील उपचार पद्धती प्रभावी कार्यक्षमतेने क्षयरोगाचा संसर्ग थांबवून मानवी शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होईल असा विश्वास प्राध्यापक विपुल धसाडे यांनी व्यक्त केला."
"क्षयरोगावरील या नवीन औषधावर पेटंट घेऊन सखोल संशोधन करण्याचा मानस असून, आजच्या नवीन संशोधकांसाठी क्षयरोग नियंत्रण हा प्रेरणादायी विषय असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संशोधन केले तर क्षयरोग नियंत्रणामध्ये एक महत्त्वाचे पाऊल ठरेल." अशी प्रतिक्रिया प्राध्यापक, संशोधक विपुल धसाडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
प्रा. विपुल धसाडे हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या खराडी येथील फार्मसी महाविद्यालयात कार्यरत असून, त्यांना या संशोधनामध्ये चेन्नई येथील विषयतज्ञ डॉ एम. कोमला, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक भोसले, डॉ रवींद्र पाटील, डॉ अमित कसबे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
औषधनिर्माण शास्त्र या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करत असताना प्रा. विपुल धसाडे यांनी पी. एच. डी. पदवी प्राप्त केल्यामुळे फार्मसी क्षेत्रातील विविध तज्ञांचे, महाविद्यालयातील वरिष्ठ शिक्षक तसेच विविध स्तरावरील मित्रपरिवार व पुरंदर तालुक्यातील तसेच वीर गावातील ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.
पुरंदर तालुक्यातील, वीर गावातील तरुण विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. यामुळे पुढील पिढीमध्ये उद्योजकता तसेच विविध प्रेरणादायी विचार मनामध्ये ठेवून ध्येय प्राप्ती करता येईल. यातूनच उद्याचा प्रगतिशील भारताचा आदर्श नागरिक तयार होईल.
प्राध्यापक व संशोधक विपुल धसाडे यांचा क्षयरोग या गंभीर आजारावरील उपचार पद्धतीमधील संशोधनाचा प्रेरणादायी प्रवास, महाराष्ट्रातील सर्व तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे.
"एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला एक सामान्य युवक, आपल्या मातृभाषेत माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या, मराठी माध्यमात शिकलेला सामान्य तरुण प्राध्यापक विपुल धसाडे..एक जागतिक दर्जाचे संशोधन करतो आणि क्षयरोग या गंभीर आजारावरती नवीन औषध शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्ट भारतातील तरुण पिढीसाठी खूपच प्रेरणादायी आहे."अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली."
महाराष्ट्रातील तरुण पिढी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून, उत्तुंग यश मिळवताना दिसत आहे.