Saturday, May 18, 2024

"मराठी माध्यमामध्ये शिकून सामान्य कुटुंबातील आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा तरुण डॉक्टर ते जगाला दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये" नोंद करून जागतिक विक्रम करणारे निष्णात डॉक्टर ते हजारो वंध्यत्वग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करणारे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ, महाराष्ट्राचे प्रेरणादायी शिलेदार डॉक्टर सागर माने"


"मराठी माध्यमामध्ये शिकून सामान्य कुटुंबातील आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा तरुण डॉक्टर ते जगाला दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये" नोंद करून जागतिक विक्रम करणारे निष्णात डॉक्टर ते हजारो वंध्यत्वग्रस्त रुग्णांवर  यशस्वी उपचार करणारे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ, महाराष्ट्राचे प्रेरणादायी शिलेदार डॉक्टर सागर माने"

ध्येयवेडी माणसं आयुष्यात कितीही संकटे, अडचणी आल्या तरी जिद्दीने,चिकाटीने, प्रयत्न करून त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात. जगाला आपल्या प्रामाणिक सामाजिक कार्याची दखल घ्यायला लावणाऱ्या डॉक्टर सागर माने यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील, फलटणमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. डॉक्टर सागर माने यांचे वडील कै.सूर्यकांत श्रीपतराव माने यांचा आपल्या सर्व मुलांनी चांगले उच्च शिक्षण घ्यावे हा  ध्यास होता. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत असताना स्वतःला उच्च शिक्षण घेता आले नाही तरी आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन त्यांच्या आवडत्या क्षेत्रात चांगली कामगिरी करावी असा ध्यास सूर्यकांत माने यांचा होता.


डॉक्टर सागर माने यांच्या आई कै.अंजनादेवी सूर्यकांत माने या गृहिणी होत्या तर वडील सूर्यकांत माने फलटणमधील एका माध्यमिक विद्यालयात क्लार्क या पदावरती कार्यरत होते. चार भावंडांच्या असलेल्या या कुटुंबात डॉक्टर सागर माने यांचे मोठे बंधू यशवंत माने इंजिनियर झाले. दोन नंबरचे बंधू अनिलकुमार माने डॉक्टर झाले आणि बहीण संगीता गोरखनाथ काकडे/ माने शिक्षिका झाल्या. 


एका सर्वसामान्य कुटुंबातील ही चारही भावंड त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्याकाळात उच्च शिक्षण घेतात ही खरंतर सोपी गोष्ट नाही. 1983 ते 2011 या 28 वर्षात डॉक्टर सागर माने यांच्या कुटुंबातील सर्व भावंडे उच्च शिक्षण घेत होती. त्यामुळे साहजिकच डॉक्टर सागर माने यांचे वडील सूर्यकांत माने यांच्यावरची ही जबाबदारी खूपच कठीण व आव्हानात्मक होती.


आजच्या काळातील सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्या मुलाला डॉक्टर करायचे म्हटलं तरी लाखो  रुपयांचा खर्च येतो. सर्वसामान्यांसाठी हे आर्थिक नियोजन करणे खूप कठीण गोष्ट आहे. 1983 ते 2011 या 28 वर्षांमध्ये दोन मुलांना डॉक्टर करणे. एका मुलाला इंजिनियर करणे आणि एका मुलीला शिक्षिका करणे हे खरंच खूप आव्हानात्मक कार्य सूर्यकांत माने यांनी जिद्दीने, चिकाटीने, पार पाडले.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


डॉक्टर सागर माने यांचे बालपण फलटणमध्येच आई-वडिलांच्या कडक शिस्तीत व चांगल्या संस्कारात, चांगल्या वातावरणात गेले. डॉक्टर सागर माने यांचे माध्यमिक शिक्षण फलटण मधील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात, मराठी माध्यमामध्ये झाले. "आयुष्यात प्रगती करायची असेल तर शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी ही खूप महत्त्वाची आहे. अशी शिकवण डॉक्टर सागर माने यांना लहानपणापासूनच त्यांच्या आई-वडिलांनी दिलेली होती. आपल्या आवडीच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपण ज्या समाजात जन्माला आलो. लहानाचे मोठे झालो त्या समाजासाठीही चांगलं कार्य केले पाहिजे ही वडिलांचे शिकवण डॉक्टर सागर माने यांनी त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील कारकिर्दीतून दाखवून दिली.

(डॉक्टर सागर माने यांना युथ आयकॉन या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले तो क्षण)

डॉक्टर सागर माने यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेत असतानाच शाळेत खूप अभ्यास करायचे  त्यावेळेस त्यांचे शिक्षक त्यांना म्हणायचे "तू खूप हुशार आहेस, अभ्यासू आहेस तू डॉक्टर बनले पाहिजे." त्यांच्या आई-वडिलांचेही हे स्वप्न होते आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे. त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच मार्गदर्शन व पाठिंबा दिला. डॉक्टर सागर माने इयत्ता दहावीला चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यानंतर मुधोजी हायस्कूलमधून अकरावी - बारावी विज्ञान शाखेतून फलटणमध्येच शिक्षण घेतले.


मराठी माध्यमातून शिकलेल्या डॉक्टर सागर माने यांना बारावीला सायन्सला 90% पेक्षा अधिक चांगले मार्कस मिळाले. डॉक्टर सागर माने यांना बारावीला चांगले मार्क्स मिळाल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात बीएएमएस - BAMS या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर होणाऱ्या डिग्री साठी धुळे येथे  ऍडमिशन मिळाले. पण त्यांना एमबीबीएस - MBBS या वैद्यकीय क्षेत्रातील पदवीसाठी प्रवेश हवा होता.

(जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र बीबी, फलटण येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर सागर माने)

डॉक्टर सागर माने यांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला (MBBS) त्यावर्षी प्रवेश  मिळाला नसल्यामुळे ते खूप निराश झाले. त्यांच्या घरातील भावंडांनी व आई-वडिलांनी त्यांना त्यावेळेस आधार देऊन आपण तुझ्या एमबीबीएस प्रवेशासाठी प्रयत्न करूयात असे सांगून त्यावेळेस धीर दिला. डॉक्टर सागर माने यांना वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस या पदवीसाठी प्रवेश मिळण्यासाठी त्यांचे वडील सूर्यकांत माने यांनी त्यावेळेस खूप कष्ट, मेहनत घेतले. खूप प्रयत्न केले. सूर्यकांत माने यांनी त्यावेळेस मुलाच्या उच्च शिक्षणासाठी दिल्ली गाठली. दिल्लीतील विविध खासदारांना भेटल्यानंतर डॉक्टर डी. वाय. पाटील यांच्या माध्यमातून आपल्या मुलाला नेपाळला एमबीबीएसला प्रवेश मिळू शकतो हे समजल्यानंतर त्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला एमबीबीएस करायचे आहे आणि बारावीलाही खूप चांगले मार्क्स मिळाले आहेत. त्या मुलाच्या आई-वडिलांचा ध्यास पाहून डॉक्टर डी. वाय. पाटील यांनी त्यांच्या नेपाळमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळण्यासाठी माने कुटुंबीयांना संपूर्ण सहकार्य केले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने नेपाळला जाऊन वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणे ही खरंच त्यावेळेस खूप दुर्मिळ गोष्ट होती.

डॉक्टर सागर माने यांना नेपाळमधील नेपाळगंज वैद्यकीय महाविद्यालयात 1997-98 ला एमबीबीएसला प्रवेश मिळाल्यानंतर ज्यावेळेस ते फलटण मधून नेपाळला जाण्यासाठी निघाले त्यावेळेस दौंड येथून रेल्वेतून सागर माने यांना पुढील प्रवासासाठी कुटुंबीयांनी बसवून दिले. खरंतर नेपाळपर्यंत संपूर्ण कुटुंबियांनी जाऊन त्या महाविद्यालयात आपल्या मुलाला पोहोचवावे यासाठी लागणारे पैसे ही त्या काळात माने कुटुंबियांकडे नव्हते. अशा कठीण परिस्थितीत डॉक्टर सागर माने यांनी खचून न जाता, निराश न होता आपल्या आई-वडिलांचे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते नेपाळला एमबीबीएस पदवी पूर्ण करण्यासाठी गेले.

नेपाळ म्हणजे नवीन देश, नवीन प्रांत, नवीन संस्कृती तरी देखील डॉक्टर सागर माने त्या नेपाळमधील वैद्यकीय महाविद्यालयात गेल्यानंतर चांगल्या पद्धतीने तेथे रुळण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यावेळेस एमबीबीएसच्या 75 मुलांच्या बॅचेस मध्ये महाराष्ट्रातील फक्त दोन मुले होती. उत्तर भारतातील निम्मी मुले व निम्मी नेपाळची मुले त्यावेळेस नेपाळमध्ये एमबीबीएससाठी शिक्षण घेत होती.

(पॅथॉलॉजी या विषयात विशेष प्राविण्य मिळाल्यामुळे नेपाळमधील काठमांडू विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते डॉक्टर सागर माने यांचा सन्मान)

डॉक्टर सागर माने यांच्या उच्च शिक्षणासाठी वडिलांनी केलेला संघर्ष त्यांच्या डोळ्यासमोर ठामपणे उभा होता. त्यामुळे एमबीबीएससाठी सर्वस्व झोकुन देऊन अभ्यास करायचा हे त्यांनी त्यावेळेसच ठरवले होते. कॉलेजमध्ये अल्पावधीतच डॉक्टर सागर माने यांची आपल्या भारतातील विविध राज्यातील मित्रांशी व नेपाळमधील मित्रांशी घट्ट मैत्री झाली."आपण सर्वजण भारतीय आहोत आणि भारतीय म्हणून एकत्र राहून येथे चांगलं शिक्षण घेऊ." ही भावना डॉक्टर सागर माने यांनी आपल्या भारतातील नेपाळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विविध राज्यातील सर्व भारतीय मित्रांच्या मनामध्ये पेरली.

सागर माने यांचा प्रेमळ, मनमिळावू, बोलका स्वभाव त्यांच्या मित्रांना भावला. डॉक्टर सागर माने नेपाळला एमबीबीएससाठी शिक्षण घेत असतानाच त्यांच्यातील नेतृत्व गुण चांगले विकसित झाले. नेपाळमधील त्या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या महाविद्यालयीन निवडणुका झाल्यानंतर त्यामध्ये डॉक्टर सागर माने भरघोस मताने विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले व साडेचार वर्ष विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून त्यांनी कामगिरीही  उत्तम बजावली. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


डॉक्टर सागर माने एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला असताना पॅथॉलॉजी या अवघड विषयात पूर्व परीक्षेमध्ये 100 पैकी फक्त 35 गुण मिळाले त्या विषयात नापास झाले. त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना सल्ला दिला की "हा विषय सहा महिन्यानंतरच तुम्हाला सोडावावा लागेल त्यामुळे तुम्ही दुसऱ्या विषयांचा अभ्यास चालू करा." परंतु डॉक्टर सागर माने यांनी मुख्य परीक्षेच्या अगोदरच्या पंधरा दिवसांमध्ये त्या विषयाचा अभ्यास चांगला केला तसेच सर्व विषयांचा अभ्यास चांगला करून त्यांनी युनिव्हर्सिटीच्या मुख्य परीक्षेत, ज्या विषयात ते पूर्व परीक्षेत नापास झाले होते त्या विषयातच सर्वांपेक्षा जास्त मार्कस मिळवून  युनिव्हर्सिटीत प्रथम क्रमांक आला व त्यात विशेष प्राविण्यही मिळाले.
             (नेपाळगंज वैद्यकीय महाविद्यालय - नेपाळ)
सागर माने जेव्हा वर्ष - दीड वर्षातून घरी यायचे त्यावेळेस पुन्हा फलटण वरून नेपाळला जाण्यासाठी  फलटण ते मुंबई एसटी बसने प्रवास, त्यानंतर मुंबईवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन ते लखनौ ट्रेनचा 25 तासाचा प्रवास त्यानंतर लखनौ ते नेपाळमधील  वैद्यकीय महाविद्यालयात जाण्यासाठी सात ते आठ तासाचा प्रवास. संपूर्ण प्रवासात त्यांचे दोन दिवस जायचे असा धकाधकीचा प्रवास करून त्यांनी त्यावेळी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष केला.

"युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासातुन, महान कार्यातून मला खूप प्रेरणा मिळते. प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची दुर्दम्य इच्छा शक्ती, शिवाजी महाराजांचा लोकसंग्रह,निर्भीड लढाऊ वृत्ती, समता,न्याय, दूरदृष्टी, कडक शिस्त,शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती यासारखे शेकडे गुण मला माझ्या आयुष्यात प्रेरणा देतात." असे डॉक्टर सागर माने सांगतात.

(डॉक्टर सागर माने यांच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर राज्याचे माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर व लोकप्रिय नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांची कौतुकाची थाप)

डॉक्टर सागर माने नेपाळमध्ये एमबीबीएस करत असतानाच 2001 ला नेपाळच्या राजघराण्यात मोठे हत्याकांड झाले होते त्यावेळेस संपूर्ण वैद्यकीय महाविद्यालयात भीतीचे वातावरण पसरलेले होते. भारतीय विद्यार्थी खूप भयभीत झालेले होते. त्यावेळेस डॉक्टर सागर माने यांनी आपल्या सर्व भारतीय मित्रांना एकत्र करून धीर दिला तसेच नेपाळची राजधानी काठमांडू येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व भारतीय मुलांना सुरक्षा मिळण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. 

त्यावेळेसचा काळ खूप कठीण होता. कॉलेजमधील खोलीच्या बाहेर कोणी पडत नव्हते परंतु डॉक्टर सागर माने सांगतात "मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमितील असल्यामुळे मी निर्भीडपणे बाहेर पडून माझ्या सर्व मित्रांना आधार दिला. तेथील पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून तसेच भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांशी बोलून आम्हाला सुरक्षा मागवुन घेतली. आमच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातही निर्भीडपणे आम्ही वावरायला लागलो." भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही त्यावेळेस नेपाळच्या प्रशासनाशी संपर्क साधून भारतीय मुलांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्याची विनंती केली.

(डॉक्टर सागर माने यांच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर  माढ्याचे लोकप्रिय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची कौतुकाची थाप)

आयुष्यात येणारे कठीण प्रसंग माणसाला घडवतात असाच हा चित्तथरारक प्रसंग डॉक्टर सागर माने यांच्या आयुष्यात घडल्यामुळे साहजिकच पुढील आयुष्यामध्ये हा निर्भीडपणा, प्रामाणिकपणा, मदत करण्याची वृत्ती खूप काही शिकवून जाते. डॉक्टर सागर माने यांचे मोठे बंधू डॉक्टर अनिलकुमार माने, प्राध्यापक यशवंत माने यांनीही त्यांच्या एमबीबीएसच्या काळात आर्थिक सहकार्य केलेले होते. सर्वसामान्य कुटुंब असले तरी कुटुंबातील सर्वजण उच्च शिक्षण घेत असल्यामुळे आर्थिक अडचणी चालू असल्या तरी डॉक्टर सागर माने यांच्या सर्वच भावंडांनी, बहिणीने व नातेवाईकांनी त्यांना एमबीबीएस साठी तसेच पुढील शिक्षणासाठी चांगली मदत केली.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now

"आपला भाऊ मोठा झाला पाहिजे. आपल्या भावाने उच्च शिक्षण घेऊन चांगली कामगिरी केली पाहिजे." खरं तर ही माने कुटुंबियांची भावना सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. डॉक्टर सागर माने  नेपाळमध्ये साडेपाच वर्षे एमबीबीएसचे शिक्षण घेऊन ज्यावेळेस घरी फलटणला आले त्यावेळेस काही कालावधीनंतर निकालाची वाट पाहत होते. एमबीबीएसच्या निकालाची माहिती घेण्यासाठी पुन्हा नेपाळला जाण्यासाठी ते फलटण वरून निघाले परंतु ज्या वेळेस रेल्वेने प्रवास करत असताना जळगाव मधील भुसावळ स्टेशनला उतरले त्यावेळेसच त्यांनी नेपाळला कॉलेजमध्ये फोन केल्यानंतर त्यांना माहिती मिळाली की ते एमबीबीएसची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. क्षणभर त्यांना त्या गोष्टीवरती विश्वास बसला नाही परंतु मागील काही वर्षांचा संघर्षाचा, प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचा सर्व काळ त्यांच्या डोळ्यासमोर आला आणि आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केलेल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहत होता.

वडिलांचे कष्ट, मेहनत, संघर्ष याचे फळ मिळाल्याची अनुभूती त्यांना त्यावेळेस मिळाली. सातारा जिल्ह्यातील, ग्रामीण भागातील फलटणमधील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून नेपाळमध्ये जाऊन एमबीबीएसचे शिक्षण घेऊन 2003 ला डॉक्टर झाला होता. ही बातमी डॉक्टर सागर माने यांच्या कुटुंबीयांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना व मित्रपरिवाराला खूप सुखावणारे होती.


डॉक्टर सागर माने यांचे 2003 ला एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर ते डॉक्टर झाले. त्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय क्षेत्रातील पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीसाठी  त्यांना युरोपमध्ये शिक्षण घ्यायची इच्छा होती परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते होऊ शकले नाही. परंतु याच दरम्यान डॉक्टर सागर माने यांनी डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड या पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री साठीची प्रवेश परीक्षा दिली होती आणि या परीक्षेत ते देशांमध्ये 31 वे आले. ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती. डॉक्टर सागर माने एमबीबीएस झाल्यानंतर त्यांनी फलटण तालुक्यातील बीबी या गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी पुढे अडीच वर्ष प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले.

ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून केलेल्या प्रामाणिक कामामुळे डॉक्टर सागर माने यांची चांगली जडणघडण झाल्याचे ते सांगतात. "ग्रामीण आरोग्य व्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था मला खूप जवळून बघता आली तसेच महिला आरोग्य हा किती गंभीर व महत्त्वाचा विषय आहे हे मला माझ्या त्यावेळेसच्या कारकिर्दीतच समजले त्यामुळेच पुढील स्पेशलायझेशन मी स्त्रियांचे आरोग्य, स्त्रीरोग या महत्त्वाच्या विषयावरच करण्याचे ठरवले." असे डॉक्टर सागर माने यांनी सांगितले. ग्रामीण भागातील वेगवेगळ्या घटकातून येणारे रुग्ण, त्या रुग्णांचे वेगवेगळे आजार, त्यांच्या समस्या ह्या प्रत्येक डॉक्टरला खूप काही शिकवून जातात.


डॉक्टर सागर माने यांना एमबीबीएस नंतरच्या पुढील उच्च शिक्षणासाठी स्त्रीरोगतज्ञांच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीसाठी त्यांना केरळमधील एडप्पल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. केरळ राज्यात साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्था खूप चांगली आहे. "केरळमध्ये माता मृत्यू, बालमृत्यू, कुपोषणाचे प्रमाण खूपच कमी आहे. तेथील आरोग्य व्यवस्थेमधील सर्वच लोक आरोग्य शिक्षणावरती खूप जास्त भर देतात. आपल्या महाराष्ट्रात  आरोग्य व्यवस्थेतही आरोग्य शिक्षणावरती जास्त भर दिला तर अनेक समस्या कमी होतील. आपली आरोग्य व्यवस्था जास्त भक्कम होईल." असे डॉक्टर सागर माने सांगतात.

(एडप्पल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय - केरळ)

डॉक्टर सागर माने यांनी केरळमधील ग्रामीण भागात जाऊन तिथली सरकारी आरोग्य व्यवस्था तसेच त्यातील दर्जेदार आरोग्य सुविधा देणारी व्यवस्था समजून घेतली. देशभरात केरळमधली आरोग्य व्यवस्था का सर्वोत्तम आहे? याचाही अभ्यास त्यांनी त्यावेळेस केला. केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना ज्यावेळेस डॉक्टर सागर माने यांना शिकवणारे त्यांचे प्राध्यापक, वरिष्ठ डॉक्टर्स यांनी  वंध्यत्वग्रस्त रुग्णांवरती केलेल्या उपचारामुळे  ज्या लग्न झालेल्या जोडप्यांना अनेक वर्ष मुलं होत नव्हती  त्यांच्यावरती वंध्यत्व उपचार केल्यानंतर ते यशस्वी झालेल्यानंतर त्या जोडप्यांना मूल झाल्यानंतर त्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झालेला प्रसंग पाहिल्यानंतर, त्या कुटुंबाला झालेला आनंद पाहून डॉक्टर सागर माने यांना असे वाटले की आपणही वंध्यत्व उपचार या विषयावरती  भविष्यामध्ये काम करू. खरं तर तिथूनच त्यांना ही प्रेरणा मिळाली.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

डॉक्टर सागर माने यांनी केरळमध्ये स्त्रीरोगतज्ञांची गायनॅकॉलॉजिस्ट  या पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ञ म्हणून सहा महिने सेवा दिली. या सहा महिन्यात डॉक्टर सागर माने यांनी महिला आरोग्याशी संदर्भातील विविध गंभीर केसेस उत्तमपणे हाताळल्या. पुण्यातील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये सेवा देत असताना मावळ भागातील कमी वयातील एका मातेचा झालेला मृत्यू पाहिल्यानंतर गरोदर मातेचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य किती गंभीर व महत्त्वाचा विषय आहे व या विषयावरती प्रबोधन होणे खूप गरजेचे आहे. याची जाणीव त्यांना झाली.


डॉक्टर सागर माने यांनी याच दरम्यान फलटण येथील फलटण उपजिल्हा रुग्णालयात देखील सहा महिने स्त्रीरोगतज्ञ म्हणून चांगली सेवा दिली. ग्रामीण भागातून वेगवेगळ्या गावांमधून येणारे रुग्ण त्यांच्या वेगवेगळ्या समस्या व त्यांच्यावरती केले जाणारे उपचार, रुग्णांनी दिलेल्या सकारात्मक व आनंददायी प्रतिक्रिया हा सगळा अनुभव डॉक्टर सागर माने यांना भविष्यातील त्यांच्या कारकीर्दीसाठी खूप फायदेशीर ठरला.

डॉक्टर सागर माने यांचे मोठे भाऊ डॉक्टर अनिलकुमार माने यांचे मार्गदर्शन व पाठिंबा असल्यामुळे तसेच वैद्यकीय अधिकारी म्हणून फलटण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये केलेले अडीच वर्षाचे प्रामाणिक काम यामुळे डॉक्टर सागर माने यांनी 2012 ला सुरू केलेल्या श्रीराधाकृष्ण हॉस्पिटल अँड इनफर्टिलिटी सेंटरला स्त्रीरोगतज्ञ म्हणून सुरू केलेल्या कारकिर्दीला फलटण तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातुनही ही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 


डॉक्टर सागर माने यांचे संवाद कौशल्य, नेतृत्वगुण रुग्णांच्या समस्या आपुलकीने समजून घेण्याची वृत्ती, रुग्णांना दिले जाणारे उत्कृष्ट उपचार, वंध्यत्व उपचारामुळे रुग्णांना मिळालेले समाधान, आनंद तसेच महिला आरोग्य, कुपोषण, गरोदर मातेचे आरोग्य यावरती त्यांच्याकडून केले जाणारे मार्गदर्शन व प्रबोधन यामुळे अल्पावधीतच सातारा जिल्हा तसेच जवळपासच्या विविध जिल्ह्यांमध्ये डॉक्टर सागर माने यांच्या प्रामाणिक सेवेमुळे शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी यायला लागले.

"माता मृत्यू रोखण्यासाठी, कुपोषण रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. खूप गंभीर आणि महत्त्वाचे हे विषय आहेत . आरोग्य क्षेत्रातील गंभीर आजार,समस्या निर्माण होण्यापेक्षा अगोदरच प्रतिबंधात्मक उपाय करून तो गंभीर आजार, समस्या निर्माण होणार नाही याची जर काळजी घेतली तर नक्कीच  याचा आरोग्य व्यवस्था सक्षम करायला उपयोग होईल. आमच्या वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग लोककल्याणासाठी झाला पाहिजे." असे डॉक्टर सागर माने सांगतात.


फलटण तालुक्यातील, ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील विवाहित जोडप्याच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊनही त्यांना मूल होत नव्हते त्यांनी डॉक्टर सागर माने यांच्याकडे वंध्यत्व उपचार घेतले त्यानंतर आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचार घेऊन त्यांना तीन मुले झाली. सातारा जिल्ह्यातील ही खूप दुर्मिळ घटना होती. डॉक्टर सागर माने यांनी माणुसकी, प्रामाणिकपणा दाखवून त्या सामान्य कुटुंबासाठी खूप कमी खर्चामध्ये वैद्यकीय उपचार करून त्या कुटुंबाचं अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण केले. 

पंचवीस वर्ष मूल नसणाऱ्या विवाहित जोडप्याला एकाच वेळेस तीन मुलं होणे आणि त्यांची उपचार पद्धती यशस्वी करून ती 3 बालकं व्यवस्थित, सुखरूप आयुष्य जगण्यासाठी पुढील उपचार यशस्वीपणे करणे  हे खूप आव्हानात्मक,कठीण काम डॉक्टर सागर माने यांनी त्यावेळेस पेललं. "विवाहित जोडप्याला पंचवीस वर्षानंतर बाळ झालेल्याचा आनंद, आई-वडील झालेल्याचा आनंद  पाहत असताना एक डॉक्टर म्हणून आपण केलेल्या प्रामाणिक सेवेमुळे एखाद्याच्या आयुष्यात मिळालेला जो आनंद  असतो तो खूप अनमोल आणि ऊर्जा देणारा असतो." असे डॉक्टर सागर माने सांगतात.

(डॉक्टर सागर माने यांच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर त्यावेळेसच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची कौतुकाची थाप)

डॉक्टर सागर माने ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असतानाच ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य समस्या, बालकांचे कुपोषण समस्या पाहायला मिळाल्यानंतर त्यावरती त्यांनी काम करायला  सुरुवात केली. गरोदर मातेचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, बालकांचे कुपोषण या महत्त्वाच्या विषयांवरती  डॉक्टर सागर माने यांनी गावोगावी शेकडो व्याख्याने देऊन जनजागृती करून,  सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला.

(जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र बीबी, फलटण येथे क्षयरोग रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर सागर माने)

"डॉक्टर सागर माने यांना वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच आव्हानात्मक काम करायला आवडते. त्यामुळेच त्यांनी बालकांचे कुपोषण या गंभीर विषयावरती सातारा जिल्ह्याच्या, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून, विविध प्रकारच्या फोटोंच्या माध्यमातून बालकांचे कुपोषण या विषयावरती जनजागृती करून, या महत्त्वाच्या विषयासंदर्भात प्रबोधन करून हजारो लोकांपर्यंत या विषयाचे गांभीर्य सामाजिक संदेशाच्या माध्यमातून पोहोचण्याच्या मोहिमेत ते यशस्वी झाले या  उल्लेखनीय,असामान्य कार्याची जगाला दखल घ्यायला भाग पाडली व त्यांच्या या सामाजिक कार्याची  2015 ला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली."

(डॉक्टर सागर माने यांच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल 2015 ला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दिलेले हे प्रमाणपत्र)
               
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या सामाजिक विभागात बालकांचे कुपोषण या विषयावरती मोठ्या प्रमाणावर, जनजागृती करून, प्रबोधन करून जागतिक विक्रम करणारे डॉक्टर सागर माने जगातले पहिले व्यक्ती ठरले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्रात डॉक्टर सागर माने यांच्या आईंच्या नावाचा विशेष उल्लेख आहे. एक महाराष्ट्रीयन म्हणून तसेच एक भारतीय म्हणून अभिमानास्पद कामगिरी करून डॉक्टर सागर माने यांनी आपल्या शिरपेचात मानाचा तोरा रोवला. 

           (कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांचा माने परिवार)

"कुपोषण म्हणजे कमी पोषण व अति पोषण, बालकांच्या कुपोषणाची विविध कारणे आहेत. कमी वयातील मुलींची लग्न, आरोग्य शिक्षणाचा अभाव, आरोग्य सुविधांचा अभाव यासारखी अनेक कारणे बालकुपोषणासाठी कारणीभूत असली तरी कुपोषित बाळ जन्मालाच येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले तर नक्कीच ही समस्या कमी होईल. गरोदर मातेच्या आरोग्यावरती लक्ष दिले तर, बाळ पोटात असताना व्यवस्थित काळजी घेतली तर नक्कीच जन्म घेणारे बाळ सुदृढ बालक असेल." असे डॉक्टर सागर माने सांगतात.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


ज्या विवाहित दांपत्यांना लग्न होऊन अनेक वर्ष होऊन देखील मुलं होत नाही त्यांच्या अडचणी, समस्या खूपच संवेदनशील असतात. त्यांची दुःख खूप मोठी असतात. यामुळेच डॉक्टर सागर माने यांनी वंध्यत्व उपचार या विषयासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिले. नैसर्गिकरित्या गर्भधारणा झालेल्या महिलांवरती उपचार करणे सोपे असते परंतु ज्या विवाहित जोडप्यांना अनेक वर्षांपासून मूल नाहीये त्यांचा आजार शोधून  त्यांच्यावरती यशस्वी उपचार करणे खूपच आव्हानात्मक काम असते. वंध्यत्वाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या हजारो रुग्णांवरती डॉक्टर सागर माने यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत.

सातारा जिल्ह्यातील, फलटण येथील प्रसिद्ध श्रीराधाकृष्ण हॉस्पिटल अँड इन्फर्टिलिटी सेंटरला  डॉक्टर सागर माने यांच्या प्रामाणिक वैद्यकीय सेवेला मिळालेल्या, चांगल्या प्रतिसादामुळे डॉक्टर सागर माने यांनी फलटणला 2016 ला आयव्हीएफ सेंटर, टेस्टट्यूब बेबी सेंटरची सुरुवात केली. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयव्हीएफ सेंटरची सुरुवात करणे हे खर तर खूपच कठीण आणि आव्हानात्मक पाऊल होतं परंतु ते डॉक्टर सागर माने यांनी त्यांच्या दोन्ही मोठ्या भावंडांच्या मदतीने हे आव्हान चांगल्या पद्धतीने पेलले. त्या काळात लाखो रुपयांचे कर्ज काढून आयव्हीएफ सेंटर चालू करणे खूपच जोखमीचं काम होते. 

(पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सागर माने यांचे श्रीराधाकृष्ण हॉस्पिटल अँड इन्फर्टिलिटी सेंटर, फलटण, सातारा)

सुरुवातीच्या काळात आयव्हीएफ तंत्रज्ञान व टेस्टबेबी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील, विविध तालुक्यातील वंध्यत्वग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानंतर सातारा,पुणे, सोलापूर अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील रुग्णांवरती या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डॉक्टर सागर माने यांनी यशस्वी उपचार केले.

ज्या विवाहित जोडप्यांना अनेक वर्षांपासून मुलं होत नव्हती त्यांच्यावरती या आयव्हीएफ तंत्रज्ञान, टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डॉक्टर सागर माने यांनी यशस्वी उपचार केले व अश्या शेकडो कुटुंबांचे बाळाचे आई-वडील होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. डॉक्टर सागर माने यांच्या या आरोग्य क्षेत्रातील यशस्वी प्रवासात त्यांचे आई-वडील, मोठे भाऊ-बहीण तसेच त्यांच्या पत्नीचेही खूप महत्त्वाचे सहकार्य लाभले. डॉक्टर सागर माने यांच्या पत्नी वाणीश्री माने यादेखील डॉक्टर आहेत आणि आयव्हीएफ तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये देखील त्या तज्ञ आहेत. राधाकृष्ण हॉस्पिटलच्या उत्तम व्यवस्थापनामध्ये त्यांची ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. डॉक्टर सागर माने यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतशील वाटचालीसाठी खांद्याला खांदा लावून प्रमाणिकपणे त्या साथ देत आहेत.


पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व टेस्टट्यूब बेबी तज्ञ डॉक्टर सागर माने यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय  कार्याबद्दल त्यांना "युथ आयकॉन" हा देशातील प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर सागर माने व डॉक्टर वाणीश्री माने यांच्या प्रामाणिक व निष्ठेने केलेल्या कार्यामुळे  अल्पावधीतच 500 टेस्टट्यूब बेबींचा टप्पा पार केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आला. 


डॉक्टर सागर माने यांच्या राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे हजारो रुग्ण समाधानाने त्यांचे अनुभव अनेक लोकांना सांगतात. आपल्या देशाच्या बॉर्डर वरती आपल्या देशाचे रक्षण करणारे आर्मी, बीएसएफ मधले जे सैनिक आहेत त्यांच्यासाठी डॉक्टर सागर माने खास विशेष सवलत देऊन उपचार करतात. व त्यांची विशेष काळजी घेतात.

डॉक्टर सागर माने हे समाजातील सामान्य घटक, आर्थिक अडचण असणाऱ्या घटकातील रुग्णांवरती कमी खर्चामध्ये उपचार करून त्यांना पुढील मोफत उपचारांसाठी योग्य ते मार्गदर्शन करतात. 

कोरोनाच्या काळाच्या अगोदर एक वंध्यत्वग्रस्त विवाहित जोडपं डॉक्टर सागर माने यांच्याकडे आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचार घेण्यासाठी आले होते. मध्यमवर्गीय कुटुंबातील त्या व्यक्तीचे हे दुसरे लग्न होते तसेच त्यांना किडनीचाही आजार होता परंतु डॉक्टर सागर माने यांनी त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार करून त्यांची पुरुष बीजं  घेऊन गर्भ तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी पुढील उपचार आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चालू केले होते. दोन महिन्यानंतर तयार झालेला गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेसाठी त्या जोडप्याला हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आले. परंतु त्यावेळेस फक्त ती महिला तिच्या सासू- सासऱ्यांबरोबर  उपस्थित होती. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


त्या महिलेच्या पतीचे कोरोनाच्या काळात निधन झाले होते. डॉक्टर सागर माने यांनी त्या कुटुंबाला धीर देऊन पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले. त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असला तरी त्या व्यक्तीच्या पुरुष बीजांपासून तयार केलेला गर्भ त्या आयव्हीएफच्या प्रयोगशाळेमध्ये व्यवस्थित होता. त्या कुटुंबाला व्यवस्थित मार्गदर्शन करून तसेच त्या कुटुंबांच्या परवानगीने पुढील आयव्हीएफ प्रक्रियेसाठी डॉक्टर सागर माने यांनी सुरुवात केली. त्या महिलेच्या गर्भाशयात तो निरोगी गर्भ हस्तांतरित करण्याची प्रक्रिया यशस्वी पार पडली. त्या कुटुंबात मूल जन्माला आल्यानंतर जो आनंद होता तो खूप मोठा होता आणि ऊर्जा देणार होता. असे डॉक्टर सागर माने सांगतात.

कोरोनाच्या काळात अशाप्रकारे महाराष्ट्रात घडणारी ही खूपच दुर्मिळ घटना आहे. डॉक्टर सागर माने व त्यांच्या संपूर्ण टीमने त्या कुटुंबाला धीर देऊन, व्यवस्थित मार्गदर्शन करून त्या कुटुंबाचे अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले व त्याला चांगले यश मिळाले. एका विवाहित जोडप्याला अनेक वर्षांपासून मूल नाहीये व त्यांचे आयव्हीएफ च्या माध्यमातून उपचार चालू असताना पुरुष बीज  घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चालू असतानाच ज्यावेळेस त्या पुरुषाचा मृत्यू होतो त्यानंतरची पुढची संपूर्ण आयव्हीएफची प्रक्रिया पूर्ण करणे खूपच कठीण आणि आव्हानात्मक असते. परंतु डॉक्टर सागर माने यांच्या टीमने ही संपूर्ण प्रक्रिया त्या कुटुंबाला आधार देऊन, व्यवस्थित मार्गदर्शन करून यशस्वीरित्या पूर्ण केली ही खरच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे.


"आयव्हीएफ तंत्रज्ञान, टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञान या विषयासंदर्भात समाजामध्ये खूप गैरसमज आहेत बऱ्याच सुशिक्षित लोकांमध्ये देखील या विषयासंदर्भात गैरसमज पाहायला मिळतात. ज्या विवाहित जोडप्यांना अनेक वर्षांपासून मुलं होत नाही त्यांच्यासाठी आयव्हीएफ तंत्रज्ञान, टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञान खूप वरदान आहे. वंध्यत्व या समस्येवरती योग्य उपचार घेतले तर आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या विवाहित जोडप्याला त्यांचेच पुरुषबीज व स्त्रीबीजापासून आयव्हीएफच्या माध्यमातून एका चांगल्या गर्भाची निर्मिती होऊन त्यांना त्यांच्या बाळाचे आई-वडील होण्याचे समाधान नक्कीच मिळू शकते. आयव्हीएफ तंत्रज्ञान, टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञान याविषयी समाजामध्ये प्रबोधन होणे खूप गरजेचे आहे." असे डॉक्टर सागर माने सांगतात.

डॉक्टर सागर माने यांनी राष्ट्रीय पोषण कार्यक्रम, कुपोषण निर्मूलन, पौगंड अवस्थेतील शिक्षण, लैंगिक शिक्षण, गरोदर महिलांचे आरोग्य या विषयावरती शेकडो - हजारो व्याख्याने ग्रामीण भागात दिलेली आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकार, जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती फलटण यांनी त्यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विविध प्रमाणपत्रे, पारितोषिके देऊन गौरवलेले आहे.

(बालकांचे कुपोषण या विषयावरती ग्रामीण भागात जाधववाडी, फलटण येथे डॉक्टर सागर माने यांनी केलेले जनजागृती अभियान)

पंढरपूरच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एका विवाहित जोडप्याला अनेक वर्षांपासून मूल नव्हते त्यांनी अनेक ठिकाणी वंध्यत्वावर उपचार घेतले होते परंतु त्यांच्या उपचारांना यश मिळत नव्हते. डॉक्टर सागर माने यांनी त्या विवाहित जोडप्यावरती आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या साह्याने यशस्वी उपचार केले व त्यांना मूल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले. पंढरपूरमधील त्या कुटुंबाने पंढरपूर मधील मोठा तुळशीहार घेऊन फलटणमध्ये डॉक्टर सागर माने यांचा विठ्ठलाला अर्पण केला जाणारा हा  तुळशीहार घालून मोठा सत्कार केला. हा हृदयस्पर्शी प्रसंग डॉक्टर सागर माने यांना खूप ऊर्जा देतो. त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला आमच्या पुढील आयुष्यसाठी खूप ऊर्जा,प्रेरणा देणारा असतो. असे डॉक्टर सागर माने सांगतात.


ज्या विवाहित जोडप्यांना मूल होत नाही अशा वंध्यत्वाच्या समस्याने ग्रस्त 1000 पेक्षा जास्त रुग्णांवरती डॉक्टर सागर माने यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यशस्वी उपचार केलेले आहेत. डॉक्टर सागर माने यांनी त्यांच्या पंधरा वर्षाच्या वैद्यकीय कारकीर्दीत वंध्यत्वग्रस्त  असणाऱ्या दहा हजार पेक्षा जास्त रुग्णांवरती यशस्वी उपचार केलेले आहेत. असे त्यांनी सांगितले.पुढील पाच - दहा वर्षांमध्ये खूप कमी खर्चामध्ये, आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हजारो वंध्यत्वग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याचे, प्रामाणिक सेवा देण्याचे  डॉक्टर सागर माने यांचे स्वप्न आहे.


"वैद्यकीय क्षेत्रात एक चांगला डॉक्टर बनण्यासाठी मेहनत, प्रामाणिकपणा,चिकाटी, चारित्र्य व रुग्णांची प्रामाणिक सेवा या गोष्टी खूप महत्त्वाचे आहेत." असे डॉक्टर सागर माने सांगतात. डॉक्टर सागर माने यांच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना आरोग्य शिक्षण, आरोग्य विमा, कुपोषण मुक्ती, माता मृत्यू, बालमृत्यू या महत्वाच्या विषयांवर ते मनापासून मार्गदर्शन करतात.

स्त्रियांच्या आरोग्याच्या गंभीर समस्यांवरील उपचार, वंध्यत्वग्रस्त रुग्णांवरील उपचार करणे, कुपोषण निर्मूलन,आयव्हीएफ तंत्रज्ञान यावर प्रबोधन करणे हा डॉक्टर सागर माने यांचा  ध्यास आहे.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला एक सामान्य मुलगा, मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेऊन, पुढे नेपाळला जाऊन एमबीबीएसचे शिक्षण घेऊन  डॉक्टर होतो आणि आपल्या आई - वडिलांचे स्वप्न पूर्ण करतो त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ म्हणून हजारो वंध्यत्वग्रस्त रुग्णांवरती यशस्वी उपचार करून त्या हजारो कुटुंबाला अनमोल आनंद देतो, कुपोषण निर्मूलन या गंभीर विषयावरती उल्लेखनीय,विशेष कार्य करून त्याची जगाला दखल घ्यायला भाग पाडून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद होऊन त्यांच्या प्रामाणिक सामाजिक कार्याचा जागतिक विक्रम होतो. यानंतरही महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांना स्त्रीरोगतज्ञ म्हणून प्रामाणिक सेवा देतात हा असामान्य प्रवास खरंच सर्व तरुणांसाठी तसेच महाराष्ट्रातल्या सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे.


महाराष्ट्राचे प्रेरणादायी शिलेदार डॉक्टर सागर माने यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील भावी प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा...

लेखक : - अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.


Friday, May 3, 2024

"महाराष्ट्राचा योद्धा बाजी मारणार की दिल्लीचे कुटील राजकारण सरस ठरणार?बारामतीच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करणारा खरा विकासपुरुष कोण?" - बारामती लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीवरील खास लेख...

"महाराष्ट्राचा योद्धा बाजी मारणार की दिल्लीचे कुटील राजकारण सरस ठरणार?बारामतीच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करणारा खरा विकासपुरुष कोण?"...


युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान पराक्रमाने, महान इतिहासाने पावन झालेली ही महाराष्ट्राची महान भूमी. महाराष्ट्राच्या भूमीने आपल्या भारत देशाला महान संत,महान समाजसुधारक, महान साहित्यिक,खेळाडू, कलाकार,संशोधक, विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व व महान नेते आपल्या देशाच्या प्रगतशील वाटचालीसाठी दिले. भारताची आर्थिक राजधानी मुंबई देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देशाची सेवा करत आहे. भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी संपूर्ण देशातून सर्वात जास्त कर आपल्या महाराष्ट्रातून आपल्या भारत देशाला दिला जातो.


भारताच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रंगतदार व चुरशीच्या निवडणुकीवर लागले आहे. भारताचे प्रभावशाली राजकीय नेते,महाराष्ट्राचे लोकनेते शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ राज्याचे सत्ताकेंद्र बनून अनेक वर्षे अभिमानाने विकासाची वाटचाल करत आहे.


लोकनेते शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडीपासून सुरू केलेला राजकीय प्रवास प्रभावशाली सामाजिक कार्य, जनतेचा पाठींबा व तरुणाईच्या साथीने 1967 मध्ये शरद पवार तरुणपणी बारामती तालुक्याचे पहिल्यांदा आमदार झाले.बारामती तालुक्यातील जनतेने व महाराष्ट्रातील जनतेच्या पाठींब्याने व आशीर्वादाने शरद पवार यांना  बारामतीतुन 6 वेळा आमदार केले व लोकसभा निवडणूक जिंकून 7 वेळा खासदार केले.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


बारामतीकरांनी शरद पवारांना दिलेले प्रेम व मतदानरुपी आशीर्वाद तसेच महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना दिलेला पाठिंबा यामुळेच शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले व देशाच्या राजकारणातही त्यांनी चांगले स्थान निर्माण केले. महाराष्ट्राच्या प्रगतशील वाटचालीतील शरद पवार यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. शरद पवारांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय असतील, महिला आरक्षणाचा निर्णय असेल तसेच देशाचे संरक्षण मंत्री असताना घेतलेले देश हिताचे चांगले निर्णय असतील, शरद पवार यांनी राजकीय जीवनात वेगवेगळ्या पदांवरती काम करत असताना  लोकहितासाठी, भारतीयांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय यामुळे देशाच्या राजकारणावरती त्यांची चांगली छाप पडलेली आहे.


शरद पवार यांनी 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर मागील 25 वर्षात अनेक नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री घडवले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रगतशील वाटचालीसाठी पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी खूप कष्ट, मेहनत करून पक्ष वाढवला हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांनी काम करत असताना महाराष्ट्रातील जिल्ह्यांची,तालुक्यांची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तरुण नेत्यांवरती सोपवली. राष्ट्रवादी काँग्रेस मधील तरुण नेत्यांची,तरुण मंत्र्यांची मोठी फळी निर्माण करण्यामध्ये शरद पवार यांचे मोठे योगदान आहे.


एकेकाळच्या दुष्काळी बारामती तालुक्याला बागायती तालुका करण्यामध्ये शरद पवार यांचे 1967 पासूनचे केलेले अखंड प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत.बारामती म्हटलं की शरद पवार हे राजकीय आणि विकासाचे समीकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. बारामती तालुक्यातील प्रगतशील शैक्षणिक संस्था, कृषी संशोधन संस्था,सहकारी संस्था,मूलभूत सुविधा,विकासाचे विविध प्रकल्प तसेच बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी शरद पवार यांनी केलेली मेहनत,कष्ट कोणीही नाकारू शकत नाही.


महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांनी अनेक तरुण नेते घडवले. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जडणघडण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांना चांगला ठसा उमटवता आला. 1991 ला शरद पवार यांनी अजित पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातुन खासदारकीसाठी संधी दिली आणि प्रचंड बहुमताने निवडून आणले. 1991 ला लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार महाराष्ट्रात  काँग्रेसच्या निवडणूक प्रचारातील प्रमुख नेते होते. काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीने 1991 ला शरद पवार यांनी 48 खासदारांपैकी काँग्रेसचे 38 खासदार निवडून आणले.


शरद पवार यांनी अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघ व संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिलेले पाठबळ व मार्गदर्शन कोणीही नाकारू शकणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार यांनी अनेक तरुण नेत्यांना  मंत्रीपदे देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलं काम करण्याची संधी दिली. शरद पवार यांनी अजित पवार यांना 3 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद, 2 वेळा अर्थमंत्री पद, जलसंपदामंत्री, ऊर्जामंत्री यासारखी अनेक महत्वाची पदे देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात चांगले काम करण्याची संधी दिली हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.


शरद पवार यांनी राजकारणात दिलेल्या संधीचे सोने करून अजित पवार यांनी राज्यात प्रभावशाली काम करून राज्याच्या राजकारणातील ताकदवान नेते म्हणून ओळख निर्माण केली.राज्यातील शिस्तप्रिय, कार्यक्षम नेते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातुन 7 वेळा निवडून आलेले आहेत. बारामती तालुक्यात अजित पवार यांनी केलेली विकासकामे,पक्षातील तरुणांचे संघटन,लोकहिताच्या कामांसाठी अधिकाऱ्यांवर असणारा वचक,वक्तृत्व व नेतृत्व यामुळे बारामतीकर अजित पवार यांच्या पाठिशीही खंबीरपणे उभे राहिले.बारामतीच्या विकासात अजित पवार यांचेही महत्वाचे योगदान आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही.


2019 च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून येऊन देखील शरद पवार यांच्या राजकीय खेळीमुळे भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही.विरोधी पक्ष बनावे लागले याचा राग भाजपच्या केंद्रातील व राज्यातील वरिष्ठ नेत्यांना तेव्हापासूनच होता. 2019 ला शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री झाले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


भाजप जून 2022 मध्ये शिवसेना पक्ष फोडायला यशस्वी झाले व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला व शिवसेनेचे प्रभावशाली नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व भाजपचे अभ्यासू, हुशार नेते अशी ओळख असलेले देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.


एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या शिवसेनेतील आमदारांनी "आमच्या मतदारसंघात निधी मिळत नाही तसेच अजित पवार त्यांच्या पक्षाच्या पराभूत उमेदवारांना जास्त निधी देतात. उद्धव ठाकरे आमच्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी आम्हाला वेळ देत नाहीत." अश्या तक्रारी करून शिवसेनेतील आमदारांनी, एका मोठया गटाने बंड केले होते. शिवसेनेतील या नेत्यांच्या बंडामागे भाजपच्या केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांची, राज्यातील भाजपच्या ताकदवान नेत्यांचीही मोठी भूमिका होती.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील भाजप पक्षाच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरती भ्रष्टाचाराच्या विषयावरून सडकून टीका केली. अजित पवार यांच्यावरती विरोधक करत असलेल्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपाच्या विषयावरून नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनात आक्रमकपणे भाष्य केले. यानंतर लगेचच काही दिवसांमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंड केले व 40 आमदारांना घेऊन राज्यातील भाजपा - शिवसेना(शिंदे गट) सरकारला  पाठिंबा दिला. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले व अजित पवार यांच्या बरोबर आलेल्या आमदारांपैकी आठ जणांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा दुसरा राजकीय भूकंप. भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठी माणसाचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात यशस्वी ठरली.


भाजपच्या राज्यातील अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्यावरती 70 हजार कोटीचे सिंचन घोटाळ्याचे आरोप केले. सहकारी बँक घोटाळ्याचे 25 हजार कोटीचे आरोप केले त्याच भाजपने अजित पवार यांना भाजप -  शिवसेना(शिंदे गट)युती सरकारमध्ये सामील करून उपमुख्यमंत्री केले व अजित पवार यांच्या 8 सहकाऱ्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले. महाराष्ट्रातील सामान्य माणसाला भाजपचे पक्ष फोडाफोडीचे, घर फोडाफोडीचे व भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात सामावून घ्यायचे धोरण अजिबात आवडलेले नाही. महाराष्ट्रातील सामान्य माणूस या स्वार्थी नेत्यांच्या, स्वार्थी राजकीय धोरणांबद्दल, राज्यातील गलिच्छ राजकारणाबद्दल प्रचंड राग, चिड व्यक्त करत आहे.


बारामती लोकसभा निवडणुकीवरती संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शरद पवार यांचा बारामतीचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपने पूर्णपणे ताकद लावलेली आहे. महाराष्ट्रातील भाजपकडे बारामती लोकसभा मतदारसंघात संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध लढायला तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट देऊन, बारामती लोकसभेच्या निवडणुकीत चुरस निर्माण केलेली आहे.


बारामती लोकसभा मतदारसंघातील या निवडणुकीत शरद पवार व अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे हे वास्तव कोणीही नाकरू शकणार नाही. आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेतील कामगिरी उत्तम आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून निधी आणलेला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती तालुक्यातील वर्चस्व, संघटन, विकास कामे या अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या जमेच्या बाजू आहेत.


बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या राजकारणात नवीन असल्या तरी सामाजिक कार्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. पर्यावरण, शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे चांगले कार्य आहे.


बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड व खडकवासला या विधानसभा मतदारसंघातील आमदार महायुतीचे असल्यामुळे कागदावरती तरी महायुतीची ताकद  दिसत असली तरी मतदारांच्या मनावर विकास कामे व मतदारसंघाचे व्हिजन याबाबतीत जो उमेदवार राज्य करेल त्यांना विजयाची संधी आहे.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दोन्ही बाजूने एकमेकांवर, पवार घराण्यातील व्यक्तींवर वैयक्तिक टीका केली जात आहे ती बाब जनतेच्या पचनी पडेल असे वाटत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी पुरंदर तालुक्यातील पाण्याचा गंभीर प्रश्न, गुंजवणी प्रकल्पाचा प्रश्न, विमानतळाचा प्रश्न यासारखे अनेक गंभीर प्रश्न आहेत यावरती महाविकासआघाडी व महायुती यांची ठोस भूमिका येथील मतदारांना पटली पाहिजे. 


बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती तालुका प्रगतशील असला तरी बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर, इंदापूर, दौंड, भोर हे  तालुके बारामतीच्या तुलनेत विकासात खूप मागे राहिलेले आहेत. या चार तालुक्यातील मतदारांचा कौल ही या निवडणुकीत महत्त्वाचा असणार आहे.

बारामती तालुक्यातील अनेक वर्षांपासूनचा दुष्काळी गावांचा पाण्याचा गंभीर प्रश्न तसेच इंदापूर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाण्याचा गंभीर प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. बारामती व इंदापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी येथे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बारामती तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याची कामगिरी उत्तम असली तरी बारामती तालुक्यातील  दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा ऊस उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असल्यामुळे जळून जात असताना देखील साखर कारखाना घेऊन जात नव्हता यामुळे कारखान्याच्या सभासदांच्या, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीला यावेळेस येथील लोकप्रतिनिधींना सामोरे जायला लागू शकते.



खडकवासला विधानसभा मतदारसंघ शहरी भागात येत असला तरी पुणे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ट्रॅफिक, रस्ते, आरोग्य सेवा, कचऱ्याचा प्रश्न, पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांच्या विकासाचे प्रश्न याविषयी नागरिकांमध्ये सत्ताधारी पक्षाबद्दल संताप दिसत आहे.

लोकनेते शरद पवार यांच्या विषयी बारामती लोकसभा मतदारसंघातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रमध्ये या निवडणुकीच्या वेळेस सहानुभूती पाहायला मिळत आहे."महाराष्ट्रात दिल्लीचे नेते कुटील राजकारण करून राजकीय खेळ्या खेळत असताना देखील 84 वर्षांचा शरद पवार नावाचा हा तरुण योद्धा महाराष्ट्रासाठी लढत आहे. अशी जनभावना लोकांमध्ये व्यक्त होत आहे." आपल्या  देशात वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, इंधन दरवाढ, घरगुती गॅसचे वाढलेले दर, महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या यामुळे लोकांच्यामध्ये भाजप सरकार विरोधात चीड दिसत आहे. याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळू शकतो.


बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांमध्ये जनतेचे गंभीर प्रश्न आहेतच त्याबरोबरच 80 रुपयांचे 115 रुपयांपर्यंत गेलेले पेट्रोल,500 रुपयांचा घरगुती गॅस 1100 रुपयांपर्यंत गेला होता.महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी या गंभीर प्रश्नांचाही फटका यावेळेस भाजपच्या महायुती सरकारला बसू शकतो.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


मोदी सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या असल्या तरी महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारीने सर्वसामान्य माणसाचं जगणं कठीण केलं जातं त्यावेळेस कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी त्यांना फटका बसतोच. 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी लाट होती ती 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा वेळेस दिसत नाही.


"महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता राज्यातल्या गलिच्छ राजकारणाला कंटाळलेली आहे. सर्वपक्षीय स्वार्थी नेत्यांच्या या पक्षातून त्या पक्षात मारल्या जाणाऱ्या कोलांट उड्या जनतेला पसंत नाही. इडी, सीबीआय या केंद्रीय संस्थांचा भाजपने भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात सामील करून घेण्यासाठीचा केलेला वापर येथील सर्वसामान्य लोकांना पसंत नाही."


"भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील मराठी माणसांचे दोन मोठे पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्याचं शल्य येथील लोकांमध्ये दिसत आहे. दिल्लीतील नेत्यांना मराठी माणूस राष्ट्रीय राजकारणात मोठा झालेला कधीही आवडत नाही. दिल्लीतील नेत्यांचे कुटिल राजकारण कितीही वेग घेत असले तरी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्रातील मराठी माणूस त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही."

पुरंदर-हवेलीचे माजी आमदार, मा. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध बारामती लोकसभा मतदारसंघात दंड थोपटून,पंधरा दिवस बंड करून, कडाडून टीका करून देखील अचानक बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यामुळे त्यांच्याविषयी पुरंदर - हवेलीमधील जनतेच्या मनात शंका निर्माण होऊन, चीड व्यक्त करण्यात आलेली आहे. "बारामती लोकसभेच्या निवडणुकीतून मी माघार घेतली तर माझी पुरंदर- हवेलीची जनता माझ्या तोंडात शेण घालेन व मला मतदारसंघात तोंड दाखवायला  जागा शिल्लक राहणार नाही." हे  विजय शिवतारे यांचे वाक्य या बारामती लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड गाजलेले आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विजय शिवतारे यांचे बारामती लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील बंड रोखण्यात यश मिळाले असले तरी पुरंदर - हवेलीच्या जनतेचे जनमत या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघ, पुरंदर, दौंड, इंदापूर, भोर या तालुक्यातील लोकांना विकासकामांविषयी, मतदार संघाच्या विकास आराखड्या विषयी आश्वासन देत असले तरी येथील जनता त्यांच्यावरती किती विश्वास ठेवते हे येणाऱ्या काळात पहावे लागेल. सिंचन घोटाळा व सहकारी बँक घोटाळ्याचे ज्यांच्यावर आरोप झाले ते अजित पवार ईडी, सीबीआयची कारवाई होईल या भीतीने भाजपबरोबर गेल्याचे त्यांचे विरोधक आक्रमकपणे आरोप करतात तसेच लोकांमध्ये या विषयाची जोरदार चर्चा रंगत आहे.



महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थापन केलेल्या व वाढवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरती व चिन्हावरती अजित पवार यांनी दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळाचे चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. यामुळे शरद पवार यांच्या विषयी राज्यातील लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला मिळालेले तुतारी हे चिन्ह त्यांनी उत्तम नियोजन करून महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवलेले आहे.


"बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या सुनेत्रा पवार या उमेदवारांमध्ये असले तरी या निवडणुकीत शरद पवार व अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे केंद्रीय मंत्री निवडणूक प्रचारात शरद पवार यांच्यावरती कडाडून टीका करत असले तरीही शरद पवार विरुद्ध नरेंद्र मोदी ही राजकीय लढाई महाराष्ट्रातील या लोकसभा निवडणुकीत पहावयास मिळत आहे."


1967 पासून बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शरद पवार यांची विकासकामे,रणनीती व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेतील उत्तम कामगिरी व मतदारसंघातील केलेली विकासकामे या बारामती लोकसभा निवडणुकीत बाजी मारणार की बारामती तालुक्यावरती वर्चस्व असणाऱ्या अजित पवार यांची विकासकामे,रणनीती व सामाजिक कार्यकर्त्या सुनेत्रा पवार यांचे सामाजिक कार्य बाजी मारते? हे येणाऱ्या चार जूनलाच कळेल. जनता हुशार आहे.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे आणि बारामतीकरही हुशार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात निवडून येणाऱ्या उमेदवाराने बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघ, पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर,भोर या  तालुक्यांचा सर्वांगीण विकास करावा हीच जनतेची माफक अपेक्षा आहे.


लेखक : अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज. पुणे.