"महाराष्ट्राचा योद्धा बाजी मारणार की दिल्लीचे कुटील राजकारण सरस ठरणार?बारामतीच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करणारा खरा विकासपुरुष कोण?"...
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान पराक्रमाने, महान इतिहासाने पावन झालेली ही महाराष्ट्राची महान भूमी. महाराष्ट्राच्या भूमीने आपल्या भारत देशाला महान संत,महान समाजसुधारक, महान साहित्यिक,खेळाडू, कलाकार,संशोधक, विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व व महान नेते आपल्या देशाच्या प्रगतशील वाटचालीसाठी दिले. भारताची आर्थिक राजधानी मुंबई देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देशाची सेवा करत आहे. भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी संपूर्ण देशातून सर्वात जास्त कर आपल्या महाराष्ट्रातून आपल्या भारत देशाला दिला जातो.
भारताच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रंगतदार व चुरशीच्या निवडणुकीवर लागले आहे. भारताचे प्रभावशाली राजकीय नेते,महाराष्ट्राचे लोकनेते शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ राज्याचे सत्ताकेंद्र बनून अनेक वर्षे अभिमानाने विकासाची वाटचाल करत आहे.
लोकनेते शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडीपासून सुरू केलेला राजकीय प्रवास प्रभावशाली सामाजिक कार्य, जनतेचा पाठींबा व तरुणाईच्या साथीने 1967 मध्ये शरद पवार तरुणपणी बारामती तालुक्याचे पहिल्यांदा आमदार झाले.बारामती तालुक्यातील जनतेने व महाराष्ट्रातील जनतेच्या पाठींब्याने व आशीर्वादाने शरद पवार यांना बारामतीतुन 6 वेळा आमदार केले व लोकसभा निवडणूक जिंकून 7 वेळा खासदार केले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
बारामतीकरांनी शरद पवारांना दिलेले प्रेम व मतदानरुपी आशीर्वाद तसेच महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना दिलेला पाठिंबा यामुळेच शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले व देशाच्या राजकारणातही त्यांनी चांगले स्थान निर्माण केले. महाराष्ट्राच्या प्रगतशील वाटचालीतील शरद पवार यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. शरद पवारांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय असतील, महिला आरक्षणाचा निर्णय असेल तसेच देशाचे संरक्षण मंत्री असताना घेतलेले देश हिताचे चांगले निर्णय असतील, शरद पवार यांनी राजकीय जीवनात वेगवेगळ्या पदांवरती काम करत असताना लोकहितासाठी, भारतीयांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय यामुळे देशाच्या राजकारणावरती त्यांची चांगली छाप पडलेली आहे.
शरद पवार यांनी 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर मागील 25 वर्षात अनेक नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री घडवले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रगतशील वाटचालीसाठी पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी खूप कष्ट, मेहनत करून पक्ष वाढवला हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांनी काम करत असताना महाराष्ट्रातील जिल्ह्यांची,तालुक्यांची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तरुण नेत्यांवरती सोपवली. राष्ट्रवादी काँग्रेस मधील तरुण नेत्यांची,तरुण मंत्र्यांची मोठी फळी निर्माण करण्यामध्ये शरद पवार यांचे मोठे योगदान आहे.
एकेकाळच्या दुष्काळी बारामती तालुक्याला बागायती तालुका करण्यामध्ये शरद पवार यांचे 1967 पासूनचे केलेले अखंड प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत.बारामती म्हटलं की शरद पवार हे राजकीय आणि विकासाचे समीकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. बारामती तालुक्यातील प्रगतशील शैक्षणिक संस्था, कृषी संशोधन संस्था,सहकारी संस्था,मूलभूत सुविधा,विकासाचे विविध प्रकल्प तसेच बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी शरद पवार यांनी केलेली मेहनत,कष्ट कोणीही नाकारू शकत नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांनी अनेक तरुण नेते घडवले. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जडणघडण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांना चांगला ठसा उमटवता आला. 1991 ला शरद पवार यांनी अजित पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातुन खासदारकीसाठी संधी दिली आणि प्रचंड बहुमताने निवडून आणले. 1991 ला लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार महाराष्ट्रात काँग्रेसच्या निवडणूक प्रचारातील प्रमुख नेते होते. काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीने 1991 ला शरद पवार यांनी 48 खासदारांपैकी काँग्रेसचे 38 खासदार निवडून आणले.
शरद पवार यांनी अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघ व संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिलेले पाठबळ व मार्गदर्शन कोणीही नाकारू शकणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार यांनी अनेक तरुण नेत्यांना मंत्रीपदे देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलं काम करण्याची संधी दिली. शरद पवार यांनी अजित पवार यांना 3 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद, 2 वेळा अर्थमंत्री पद, जलसंपदामंत्री, ऊर्जामंत्री यासारखी अनेक महत्वाची पदे देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात चांगले काम करण्याची संधी दिली हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.
शरद पवार यांनी राजकारणात दिलेल्या संधीचे सोने करून अजित पवार यांनी राज्यात प्रभावशाली काम करून राज्याच्या राजकारणातील ताकदवान नेते म्हणून ओळख निर्माण केली.राज्यातील शिस्तप्रिय, कार्यक्षम नेते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातुन 7 वेळा निवडून आलेले आहेत. बारामती तालुक्यात अजित पवार यांनी केलेली विकासकामे,पक्षातील तरुणांचे संघटन,लोकहिताच्या कामांसाठी अधिकाऱ्यांवर असणारा वचक,वक्तृत्व व नेतृत्व यामुळे बारामतीकर अजित पवार यांच्या पाठिशीही खंबीरपणे उभे राहिले.बारामतीच्या विकासात अजित पवार यांचेही महत्वाचे योगदान आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही.
2019 च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून येऊन देखील शरद पवार यांच्या राजकीय खेळीमुळे भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही.विरोधी पक्ष बनावे लागले याचा राग भाजपच्या केंद्रातील व राज्यातील वरिष्ठ नेत्यांना तेव्हापासूनच होता. 2019 ला शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री झाले.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
भाजप जून 2022 मध्ये शिवसेना पक्ष फोडायला यशस्वी झाले व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला व शिवसेनेचे प्रभावशाली नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व भाजपचे अभ्यासू, हुशार नेते अशी ओळख असलेले देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या शिवसेनेतील आमदारांनी "आमच्या मतदारसंघात निधी मिळत नाही तसेच अजित पवार त्यांच्या पक्षाच्या पराभूत उमेदवारांना जास्त निधी देतात. उद्धव ठाकरे आमच्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी आम्हाला वेळ देत नाहीत." अश्या तक्रारी करून शिवसेनेतील आमदारांनी, एका मोठया गटाने बंड केले होते. शिवसेनेतील या नेत्यांच्या बंडामागे भाजपच्या केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांची, राज्यातील भाजपच्या ताकदवान नेत्यांचीही मोठी भूमिका होती.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील भाजप पक्षाच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरती भ्रष्टाचाराच्या विषयावरून सडकून टीका केली. अजित पवार यांच्यावरती विरोधक करत असलेल्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपाच्या विषयावरून नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनात आक्रमकपणे भाष्य केले. यानंतर लगेचच काही दिवसांमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंड केले व 40 आमदारांना घेऊन राज्यातील भाजपा - शिवसेना(शिंदे गट) सरकारला पाठिंबा दिला. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले व अजित पवार यांच्या बरोबर आलेल्या आमदारांपैकी आठ जणांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा दुसरा राजकीय भूकंप. भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठी माणसाचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात यशस्वी ठरली.
भाजपच्या राज्यातील अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्यावरती 70 हजार कोटीचे सिंचन घोटाळ्याचे आरोप केले. सहकारी बँक घोटाळ्याचे 25 हजार कोटीचे आरोप केले त्याच भाजपने अजित पवार यांना भाजप - शिवसेना(शिंदे गट)युती सरकारमध्ये सामील करून उपमुख्यमंत्री केले व अजित पवार यांच्या 8 सहकाऱ्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले. महाराष्ट्रातील सामान्य माणसाला भाजपचे पक्ष फोडाफोडीचे, घर फोडाफोडीचे व भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात सामावून घ्यायचे धोरण अजिबात आवडलेले नाही. महाराष्ट्रातील सामान्य माणूस या स्वार्थी नेत्यांच्या, स्वार्थी राजकीय धोरणांबद्दल, राज्यातील गलिच्छ राजकारणाबद्दल प्रचंड राग, चिड व्यक्त करत आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीवरती संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शरद पवार यांचा बारामतीचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपने पूर्णपणे ताकद लावलेली आहे. महाराष्ट्रातील भाजपकडे बारामती लोकसभा मतदारसंघात संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध लढायला तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट देऊन, बारामती लोकसभेच्या निवडणुकीत चुरस निर्माण केलेली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील या निवडणुकीत शरद पवार व अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे हे वास्तव कोणीही नाकरू शकणार नाही. आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेतील कामगिरी उत्तम आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून निधी आणलेला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती तालुक्यातील वर्चस्व, संघटन, विकास कामे या अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या जमेच्या बाजू आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या राजकारणात नवीन असल्या तरी सामाजिक कार्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. पर्यावरण, शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे चांगले कार्य आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड व खडकवासला या विधानसभा मतदारसंघातील आमदार महायुतीचे असल्यामुळे कागदावरती तरी महायुतीची ताकद दिसत असली तरी मतदारांच्या मनावर विकास कामे व मतदारसंघाचे व्हिजन याबाबतीत जो उमेदवार राज्य करेल त्यांना विजयाची संधी आहे.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दोन्ही बाजूने एकमेकांवर, पवार घराण्यातील व्यक्तींवर वैयक्तिक टीका केली जात आहे ती बाब जनतेच्या पचनी पडेल असे वाटत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी पुरंदर तालुक्यातील पाण्याचा गंभीर प्रश्न, गुंजवणी प्रकल्पाचा प्रश्न, विमानतळाचा प्रश्न यासारखे अनेक गंभीर प्रश्न आहेत यावरती महाविकासआघाडी व महायुती यांची ठोस भूमिका येथील मतदारांना पटली पाहिजे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती तालुका प्रगतशील असला तरी बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर, इंदापूर, दौंड, भोर हे तालुके बारामतीच्या तुलनेत विकासात खूप मागे राहिलेले आहेत. या चार तालुक्यातील मतदारांचा कौल ही या निवडणुकीत महत्त्वाचा असणार आहे.
बारामती तालुक्यातील अनेक वर्षांपासूनचा दुष्काळी गावांचा पाण्याचा गंभीर प्रश्न तसेच इंदापूर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाण्याचा गंभीर प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. बारामती व इंदापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी येथे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बारामती तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याची कामगिरी उत्तम असली तरी बारामती तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा ऊस उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असल्यामुळे जळून जात असताना देखील साखर कारखाना घेऊन जात नव्हता यामुळे कारखान्याच्या सभासदांच्या, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीला यावेळेस येथील लोकप्रतिनिधींना सामोरे जायला लागू शकते.
खडकवासला विधानसभा मतदारसंघ शहरी भागात येत असला तरी पुणे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ट्रॅफिक, रस्ते, आरोग्य सेवा, कचऱ्याचा प्रश्न, पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांच्या विकासाचे प्रश्न याविषयी नागरिकांमध्ये सत्ताधारी पक्षाबद्दल संताप दिसत आहे.
लोकनेते शरद पवार यांच्या विषयी बारामती लोकसभा मतदारसंघातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रमध्ये या निवडणुकीच्या वेळेस सहानुभूती पाहायला मिळत आहे."महाराष्ट्रात दिल्लीचे नेते कुटील राजकारण करून राजकीय खेळ्या खेळत असताना देखील 84 वर्षांचा शरद पवार नावाचा हा तरुण योद्धा महाराष्ट्रासाठी लढत आहे. अशी जनभावना लोकांमध्ये व्यक्त होत आहे." आपल्या देशात वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, इंधन दरवाढ, घरगुती गॅसचे वाढलेले दर, महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या यामुळे लोकांच्यामध्ये भाजप सरकार विरोधात चीड दिसत आहे. याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळू शकतो.
बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांमध्ये जनतेचे गंभीर प्रश्न आहेतच त्याबरोबरच 80 रुपयांचे 115 रुपयांपर्यंत गेलेले पेट्रोल,500 रुपयांचा घरगुती गॅस 1100 रुपयांपर्यंत गेला होता.महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी या गंभीर प्रश्नांचाही फटका यावेळेस भाजपच्या महायुती सरकारला बसू शकतो.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
मोदी सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या असल्या तरी महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारीने सर्वसामान्य माणसाचं जगणं कठीण केलं जातं त्यावेळेस कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी त्यांना फटका बसतोच. 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी लाट होती ती 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा वेळेस दिसत नाही.
"महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता राज्यातल्या गलिच्छ राजकारणाला कंटाळलेली आहे. सर्वपक्षीय स्वार्थी नेत्यांच्या या पक्षातून त्या पक्षात मारल्या जाणाऱ्या कोलांट उड्या जनतेला पसंत नाही. इडी, सीबीआय या केंद्रीय संस्थांचा भाजपने भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात सामील करून घेण्यासाठीचा केलेला वापर येथील सर्वसामान्य लोकांना पसंत नाही."
"भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील मराठी माणसांचे दोन मोठे पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्याचं शल्य येथील लोकांमध्ये दिसत आहे. दिल्लीतील नेत्यांना मराठी माणूस राष्ट्रीय राजकारणात मोठा झालेला कधीही आवडत नाही. दिल्लीतील नेत्यांचे कुटिल राजकारण कितीही वेग घेत असले तरी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्रातील मराठी माणूस त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही."
पुरंदर-हवेलीचे माजी आमदार, मा. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध बारामती लोकसभा मतदारसंघात दंड थोपटून,पंधरा दिवस बंड करून, कडाडून टीका करून देखील अचानक बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यामुळे त्यांच्याविषयी पुरंदर - हवेलीमधील जनतेच्या मनात शंका निर्माण होऊन, चीड व्यक्त करण्यात आलेली आहे. "बारामती लोकसभेच्या निवडणुकीतून मी माघार घेतली तर माझी पुरंदर- हवेलीची जनता माझ्या तोंडात शेण घालेन व मला मतदारसंघात तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही." हे विजय शिवतारे यांचे वाक्य या बारामती लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड गाजलेले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विजय शिवतारे यांचे बारामती लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील बंड रोखण्यात यश मिळाले असले तरी पुरंदर - हवेलीच्या जनतेचे जनमत या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघ, पुरंदर, दौंड, इंदापूर, भोर या तालुक्यातील लोकांना विकासकामांविषयी, मतदार संघाच्या विकास आराखड्या विषयी आश्वासन देत असले तरी येथील जनता त्यांच्यावरती किती विश्वास ठेवते हे येणाऱ्या काळात पहावे लागेल. सिंचन घोटाळा व सहकारी बँक घोटाळ्याचे ज्यांच्यावर आरोप झाले ते अजित पवार ईडी, सीबीआयची कारवाई होईल या भीतीने भाजपबरोबर गेल्याचे त्यांचे विरोधक आक्रमकपणे आरोप करतात तसेच लोकांमध्ये या विषयाची जोरदार चर्चा रंगत आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थापन केलेल्या व वाढवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरती व चिन्हावरती अजित पवार यांनी दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळाचे चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. यामुळे शरद पवार यांच्या विषयी राज्यातील लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला मिळालेले तुतारी हे चिन्ह त्यांनी उत्तम नियोजन करून महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवलेले आहे.
"बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या सुनेत्रा पवार या उमेदवारांमध्ये असले तरी या निवडणुकीत शरद पवार व अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे केंद्रीय मंत्री निवडणूक प्रचारात शरद पवार यांच्यावरती कडाडून टीका करत असले तरीही शरद पवार विरुद्ध नरेंद्र मोदी ही राजकीय लढाई महाराष्ट्रातील या लोकसभा निवडणुकीत पहावयास मिळत आहे."
1967 पासून बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शरद पवार यांची विकासकामे,रणनीती व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेतील उत्तम कामगिरी व मतदारसंघातील केलेली विकासकामे या बारामती लोकसभा निवडणुकीत बाजी मारणार की बारामती तालुक्यावरती वर्चस्व असणाऱ्या अजित पवार यांची विकासकामे,रणनीती व सामाजिक कार्यकर्त्या सुनेत्रा पवार यांचे सामाजिक कार्य बाजी मारते? हे येणाऱ्या चार जूनलाच कळेल. जनता हुशार आहे.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे आणि बारामतीकरही हुशार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात निवडून येणाऱ्या उमेदवाराने बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघ, पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर,भोर या तालुक्यांचा सर्वांगीण विकास करावा हीच जनतेची माफक अपेक्षा आहे.
लेखक : अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज. पुणे.
No comments:
Post a Comment