पुरंदर,सासवड,दि.२८ : मराठा समाजाचे संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला महाराष्ट्रातील करोडो मराठा बांधवांचा पाठिंबा मिळालेला आहे. मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या ऐतिहासिक आंदोलनाचेही महत्वाचे योगदान आहे. संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांनी सहा वेळा उपोषण करूनही राज्य सरकारने मराठा समाजाची ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी पूर्ण न केल्यामुळे संतप्त झालेल्या पुरंदर मधील सकल मराठा समाजाने पुरंदर बंदची हाक देऊन राज्य सरकारच्या विरोधात ऐतिहासिक पुरंदर तालुका बंदच्या माध्यमातून शुक्रवारी सासवड येथील शिवतीर्थावर तीव्र निषेध व्यक्त केला.
"मराठा आरक्षणाच्या लढ्यात पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाज वेळोवेळी आक्रमक आंदोलने व बेमुदत ठिय्या ऐतिहासिक आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची लढाई लढत आहे. पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केलेले शंभर दिवसाचे ऐतिहासिक आंदोलन संपूर्ण राज्यभर गाजले होते."
पुरंदरच्या सासवड येथील शिवतीर्थावर पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी निवडणूक नायब तहसीलदार महादेव जाधव व पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे शिलेदार,मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्ते नंदकुमार जगताप, सागर जगताप,स्वप्नील गायकवाड, संतोष हगवणे, विठ्ठल मोकाशी, उमेश जगताप, बाळासाहेब भिंताडे, अनिल जगताप, संदीप जगताप, दत्तात्रय कड, सुजित बडदे व मराठा बांधव उपस्थित होते.
मराठा समाजाचे संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांनी वर्षभरात एकूण ६ वेळा आमरण उपोषण केलेले आहे. वेळोवेळी सरकाने फसवे आश्वसन देऊन मराठा आंदोलनाच्या गंभीर प्रश्नाला बगल दिली आहे.
"मराठा समाजाच्या न्याय व हक्कांसाठी पुकारलेल्या मराठा आरक्षण लढ्याला पुरंदर तालुक्यातून सर्व समाजाचा पाठिंबा देण्यात आलेला आहे. मराठा आरक्षणाचा गंभीर विषय सरकारने गांभीर्याने घेऊन त्यावरती लवकरात लवकर योग्य तोडगा काढला नाही तर आरक्षण विरोधी सरकारचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही अशा भावना मराठा बांधवांनी व्यक्त केल्या."
महाराष्ट्रातील मराठा समाजाला सगे सोयरे सहित ओबीसी मधून सरसकट आरक्षणामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीचा प्रश्न अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने प्रलंबित ठेवला आहे. या मागणी करता अनेक वेळा महाराष्ट्र शासनाकडून खोटी आश्वासने देऊन मराठा समाजाची दिशाभूल व फसवणूक केली गेली आहे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
मराठा आरक्षण मागणी करता अंतरवाली सराठी येथे मराठा संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील हे गेल्या नऊ दिवसापासून उपोषणाला बसले होते. आमरण उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खूप खालावली गेली व सलाईन लावून उपोषण करणे हे त्यांच्या मनाला पटले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी आमरण उपोषण 25 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता स्थगित केले. परंतु सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची कसलीही दखल न घेतल्यामुळे तसेच सरकारच्या वतीने कोणीही या उपोषणास हजेरी लावली नाही. यामुळे संतप्त झालेल्या पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने पुरंदर तालुका बंदच्या माध्यमातून सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
पुरंदर तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुरंदर तालुक्यात बंद ठेवण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवा वगळता, पुरंदर तालुक्यातील व्यापारी, दुकानदार, सराफ, किराणा दुकानदार, कापड दुकानदार, सलून आदी संघटनांनी बंद मध्ये सहभाग घेतला होता.
सासवड बाजारपेठेसह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच सासवड बाजारपेठेत दुपारनंतर काही प्रमाणात व्यवहार सुरू झाले. पुरंदर तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने हरून बागवान तसेच आरिफ आतार आदींनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लेखी निवेदनाद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे.
पुरंदर तालुक्याच्या वतीने 100% सर्व आस्थापना समाजाने बंद ठेवून सरकारचा तीव्र निषेध नोंदविला . मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे पुरंदरवासीयांनी प्रशासनाला केली आहे.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा यासाठी तहसीलदार यांना मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पुरंदर तालुक्यातीक मुस्लिम समाजानेही मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले.यावेळी पुरंदर तालुक्यातून प्रत्येक गावातून मराठा बांधव मोठ्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित होते.
मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न राज्य सरकारने गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी नाहीतर राज्यातील करोडो मराठा तरुणाई येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अशा संतप्त भावना यावेळी मराठा समाजातील तरुणांनी व्यक्त केल्या.
मराठा समाजाला न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर योग्य ती पावले उचलली पाहिजेत.