Wednesday, September 4, 2024

"सांगलीचा सुपूत्र सचिन खिलारीने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत गोळा फेक क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावून रचला इतिहास; लहान वयातच आईला गमावले,सायकल अपघातात अपंगत्व; चाळीस वर्षानंतर भारताला पॅरालिम्पिकमध्ये गोळा फेक एफ - ४६ क्रीडा प्रकारात मिळवुन दिले रौप्य पदक"...

पॅरिस,दि.४ : आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी त्यावरती जिद्दीने, चिकाटीने व मेहनतीने मात करता येते व ध्येयवेढा माणूस कष्टाने, मेहनतीने,प्रामाणिकपणे योगदान देऊन जगाला प्रेरणा देणारी अभिमानास्पद कामगिरी करू शकतो हे सांगलीच्या सचिन खिलारी या प्रेरणादायी शिलेदाराने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये गोळा फेक - एफ ४६ क्रीडा प्रकारात भारताला रौप्य पदक मिळवून देऊन दाखवून दिलेले आहे.

जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला 21वे पदके मिळाले. आज सातव्या दिवशी महाराष्ट्राच्या सचिन खिलारीने भारतासाठी गोळा फेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. 

महाराष्ट्राची मान जगात अभिमानाने उंचावणाऱ्या सचिन खिलारीने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सातव्या दिवशी भारताचे खाते उघडले आणि पुरुषांच्या गोळा फेक स्पर्धेत पदक जिंकले. वर्ल्ड चॅम्पियन सचिनचा 16.32 मीटरचा गोळा फेक हा F46 प्रकारातील आशियाई खेळाडूने केलेला आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो होता. 

2023 आणि 2024 चा विश्वविजेता सचिन खिलारी कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टच्या मागे राहिला. ग्रेग स्टीवर्टने 16.38 च्या थ्रोसह सुवर्णपदक जिंकले.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

या स्पर्धेत एकूण तीन भारतीय सहभागी झाले होते. मोहम्मद यासर आणि रोहित कुमार यांना व्यासपीठ पूर्ण करता आले नाही. त्यांनी अनुक्रमे 14.21 मीटर आणि 14.10 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह 8 वे आणि 9 वे स्थान पटकावले. 

वर्ल्ड चॅम्पियन आणि एशियन गेम्स जिंकून पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आलेला सचिनने सर्व 6 वैध थ्रो केले, दुसऱ्या प्रयत्नात त्याच्या सर्वोत्तम कामगिरीसह सुरुवातीपासूनच टॉप-2 स्पर्धकांमध्ये राहिला. या स्पर्धेत भारताला 40 वर्षाआधी पदक मिळाले होते त्यामुळे सचिन खिलारी यांनी तब्बल 40 वर्षांनंतर भारतासाठी गोळाफेक स्पर्धेत पदक जिंकले. या पदकांसह त्याने 40 वर्षापासून असलेला पदकाचा दुष्काळही संपवला आहे.

सचिन खिलारी यांचा जीवनप्रवास खूप संघर्षमय आहे. सचिन अवघ्‍या ९ वर्षांचा हाेता त्यावेळी सायकल चालवताना अपघात झाला. त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला. मात्र काही दिवसात गँगरीन पसरू लागले. या जीवघेण्‍या संकटातून ताे बचावला;पण त्‍याच्‍या हाताच्‍या हालचालींवर कायमस्‍वरुपी मर्यादा आल्‍या. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

बालपणातच हा मोठा अपघात त्‍याने माेठ्या धैर्याने पचवला. लहानपणापासून खेळाची कमालीची आवड होतीच. पण आता आपल्‍या शारीरिक मर्यादेचे भांडवल न करता त्‍याने थेट माेठे मैदान गाजवण्‍याचा निर्धार केला. अथक परिश्रम आणि स्‍वप्‍नपूर्तीचा निरंतर ध्‍यासातून सचिन सर्जेराव खिलारी नावाचा महान खेळाडू घडला. 

आज त्‍याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक पटकावत महाराष्ट्राची व देशवासियांची मान गर्वाने उंचावली आहे. त्‍याचबराेबर संकटाचे संधीमध्‍ये कसे रुपांतर करावे, याचा आदर्श देशातील तरुणाई समाेर ठेवला आहे. महाराष्ट्रातील तरुणांसाठी सचिनची ही यशोगाथा खूप प्रेरणादायी आहे.

2017 मध्ये सचिनने पहिले सुवर्ण पदक जिंकले. प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सचिनने गोळाफेकमध्ये आपले कौशल्य वाढवले. त्याने 2017 मध्ये जयपूर नॅशनलमध्ये 58.47 मीटर गोळा फेक करून पहिले सुवर्णपदक जिंकले. 

गेल्या वर्षी पॅरिसमध्ये 16.21 मीटरच्या नवीन आशियाई विक्रमासह त्याने पहिले जागतिक पॅरा विजेतेपद जिंकले. यानंतर त्याने हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्समध्ये 16.03 मीटर गोळा फेक करून विजेतेपद पटकावले.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

भारताने पॅरिसमधील पॅरालिम्पिक स्पर्धेत कालच्या दिवसांतच चार पदके जिंकली आणि पदक जिंकण्याच्याबाबतीत विक्रम मोडला. भारत आता पदतालिकेत 21 पदकांसह 19व्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 3 सुवर्णपदक, 8 रौप्यपदक आणि 10 कांस्यपदक जिंकली आहेत. मागील पॅरालिम्पिक स्पर्धेत 19 पदके जिंकली होती तर यावर्षी नक्कीच भारताने 19 पदकांपेक्षा पुढे मजल मारली आहे त्यामुळे नक्कीच यावेळी अजून जास्त पदक भारत जिंकू शकतो.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील,आटपाडी तालुक्यातील कारागणी गावात सचिनचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. सचिनचा शाळेत असताना एक भीषण अपघात झाला होता या सायकल अपघातानंतर त्याच्या डाव्या हाताला अपंगत्व आले. २०१५ साली सचिनची पॅरा स्पोर्ट्सशी ओळख झाली आणि त्याने २०१७ मध्ये जयपूर येथे राष्ट्रीय खेळांमध्ये तो सहभागी झाला आणि सुवर्णपदक जिंकले.

सचिन खिलारीने आपल्या क्रीडा कौशल्यासोबतच मेकॅनिकल इंजिनीयर म्हणून शैक्षणिक क्षेत्रातही यश संपादन केले आहे. तो वेगवेगळ्या संस्थांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करतो, विद्यार्थ्यांना त्यांच्या MPSC आणि UPSC परीक्षेच्या तयारीत मदत करतो. 

सचिनने लहान वयातच त्याच्या आईला गमावले आणि सायकल अपघातात त्याला अपंगत्व आले. अनेक शस्त्रक्रिया करूनही त्याचा हात गँगरीन आणि स्नायूंच्या कमकुवतपणामुळे पूर्ववत ठीक होऊ शकला नाही.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या सचिन खिलारीने पॅरिसमध्ये पॅरालिम्पिकमध्ये गोळा फेक - एफ ४६ क्रीडा प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करून इतिहास रचला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकच्या सातव्या दिवशी सचिन खिलारीने पुरुषांच्या शॉटपुट F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. हे आजचे पहिले पदक आहे. या रौप्य पदकासह सचिन 40 वर्षांत पॅरालिम्पिक शॉट-पुट पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1984 मध्ये भारताने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये पहिले पदक जिंकले होते.

सचिनच्या या पदकासह भारताच्या पदकांची संख्या 21 झाली आहे. सचिनने 16.32 मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने सुवर्णपदक जिंकले. कांस्यपदक क्रोएशियाच्या लुका बाकोविचला मिळाले. सचिनने यापूर्वी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते.

या 34 वर्षीय खेळाडूने दुसऱ्या प्रयत्नात आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि 16.30 मीटरचा स्वतःचा आशियाई विक्रम मोडला. जपानमध्ये मे 2024 मध्ये झालेल्या जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सचिनने सुवर्णपदक जिंकून  हा विक्रम केला. 

"सचिन खिलारीचे रौप्यपदक हे सध्या सुरू असलेल्या पॅरा गेम्समध्ये पॅरा-ॲथलेटिक्समध्ये जिंकलेले 21 वे पदक आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्येही त्याने सुवर्णपदक पटकावले होते. F46 श्रेणी अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांच्या हातात कमकुवतपणा आहे, स्नायू कमकुवत आहेत किंवा त्यांच्या हातात हालचाल कमी आहे."

पॅरालिम्पिकच्या इतिहासात  शॉटपुटमध्ये गोळा फेक - एफ ४६ क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा सचिन खिलारी हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी 1984 मध्ये जोगिंदर सिंग बेदीने कांस्यपदक जिंकले होते आणि महिला धावपटू दीपा मलिकने 2016 च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आता हे तिसरे पदक 8 वर्षांनंतर आले आहे.

"पॅरिसमधील पॅरालिम्पिकमध्ये गोळा फेक क्रीडा प्रकारात भारताला ४० वर्षानंतर रौप्य पदक मिळवून देऊन जग जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या सचिन खिलारीचा संघर्षमय,असामान्य प्रवास भारतातील तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे."

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला जास्त पदके मिळवायची असतील तर क्रीडा मंत्रालयाने सर्व खेळाडूंना चांगल्या सुखसुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम प्रशिक्षण देऊन, प्रेरित केले पाहिजे.

No comments:

Post a Comment