Monday, December 22, 2025

"सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत मा.आमदार संजय जगताप धुरंधर; पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या रंगतदार,चुरशीच्या निवडणुकीत सासवडमध्ये कमळ फुलले, सासवडच्या नगराध्यक्षपदी आनंदीकाकी जगताप; सासवडच्या राजकारणातील "जगताप ब्रॅंडने" लोकसेवेच्या माध्यमातून जिंकली हजारो सासवडकरांची मने"....

सासवड,दि.२२ : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक भूमी असलेल्या सासवड नगरपरिषदेच्या चुरशीच्या सार्वजनिक निवडणुकीत माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपला मोठा विजय मिळवून देऊन, सासवड नगरपरिषदेचा गड जिंकला. 

सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यासह, विरोधी पक्ष एकवटलेले असतानादेखील, सासवडकर जनतेने मा. आमदार संजय जगताप यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाला पुन्हा संधी देऊन, नगराध्यक्ष पदासह भाजपचे 13 नगरसेवक  बहुमताने निवडून आले. सासवड नगरपरिषदेच्या  प्रतिष्ठित लढाईतील या विजयामुळे सासवडच्या राजकारणात माजी आमदार संजय जगताप धुरंधर ठरले.

सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची प्रचार यंत्रणा अत्यंत मजबूत होती. माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड नगरपरिषदेचे मा. नगरसेवकांनी केलेले कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी ठरल्याचे दिसून आले.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

पुरंदर - हवेलीचे शिवसेनेचे आमदार,मा. मंत्री विजय शिवतारे यांनी सासवड नगरपरिषदेची निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावले होती परंतु शिवसेनेचे केवळ नऊ नगरसेवक निवडून आले. राज्याच्या सत्तेतील, महायुतीतील प्रमुख घटकपक्ष असलेले शिवसेना शिंदेगटाचे आमदार विजय शिवतारे यांना पुरंदर हवेली मतदारसंघातील सासवड नगरपरिषद, जेजुरी, फुरसुंगी - देवाची उरुळी नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ता काबीज करता न आल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

फुरसुंगी - देवाची उरुळी नगरपरिषदेची स्थापना विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले असताना देखील तेथील जनतेने त्यांना नाकारल्याचे नगरपरिषदेच्या निकालावरून दिसून येते. पुरंदर - हवेली तालुक्यातील या नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या निकालाचा प्रभाव येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावरती पडू शकतो.

पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच भारतीय जनता पार्टीने  जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या आनंदीकाकी चंदूकाका जगताप यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सचिन सुरेश भोंगळे यांचा १,०९१ मतांच्या फरकाने पराभव केला.

आनंदीकाकी जगताप यांना ११,३६२ मते मिळाली, तर सचिन भोंगळे यांना १०,२७१ मते पडली. इतर उमेदवारांनी लढा देण्याचा प्रयत्न केला त्यात अभिजीत जगताप (उद्धव ठाकरे गट) यांना ६८२ मते मिळाली आणि निकिता धोत्रे (अपक्ष) यांना ९८ मते मिळाली. 

सासवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ३३,६५६ मतदारांपैकी २२,५५७ (६७.०२ टक्के) मतदारांनी मतदान केले. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होऊन शांततेत संपन्न झाली.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"हा निकाल भाजपसाठी मोठा विजय असून, माजी काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशानंतरची पहिली निवडणूक होती. संजय जगताप यांच्या आई असलेल्या आनंदीकाकी जगताप यांनी तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान होऊन जगताप कुटुंबीयांचा वारसा कायम राखला. सहकारमहर्षी कै. चंदूकाका जगताप यांच्या महान कार्याचा वारसा, सासवडच्या सर्वांगीण विकासाचे धोरण जगताप कुटुंबियांनी पुढे घेऊन गेल्याचे दिसून येत आहे. सासवडच्या या जगताप परिवाराने समाजकारण, राजकारण, सहकार, शिक्षण क्षेत्रात हजारो सासवडकरांची प्रामाणिकपणे सेवा करून मने जिंकलेले आहेत."

सासवड नगरअध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आनंदीकाकी जगताप म्हणाल्या, "जनतेच्या प्रेमाने हा विजय मिळाला आहे. सासवडच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही तत्पर राहू. सासवडकर जनतेने विकास कामाला, जनसेवेला दिलेला हा विजयी कौल आहे." 

"सासवडकर जनतेने विकासकामाला दिलेला हा मतदानरुपी आशीर्वादाचा कौल याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.कै. सहकारमहर्षी चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली सासवडच्या सर्वांगीण विकासाची वाटचाल आम्हाला सासवडकर जनतेच्या सेवेच्या माध्यमातून पुढे घेऊन जाता आली याचे समाधान आहे. सासवडकर जनतेने दिलेल्या संधीमुळेच स्वच्छ व सुंदर शहर, स्वच्छ सर्वेक्षण विभागात आम्हाला देशातील नंबर एकची सासवड नगरपरिषद करता आली. सासवडकर जनतेचा विश्वास व भारतीय जनता पार्टीचे संघटन यामुळे आम्हाला यश मिळाले. सासवड शहरासाठी पाण्याची योजना, सांडपाणी व्यवस्था या सर्व मूलभूत सुविधा देऊन, सर्वांग सुंदर,विकसित शहर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली सासवड शहराचा  सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील." अशी प्रतिक्रिया मा. आमदार संजय जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्युजशी बोलताना दिली.

नगरसेवकांच्या २२ जागांपैकी भाजपने १३ जागा पटकावल्या यात ७ पुरुष नगरसेवक व ६ महिला नगरसेविका निवडून आल्या तर शिवसेनेने ९ जागा जिंकल्या त्यात ४ पुरुष नगरसेवक व ५ महिला नगरसेविका जिंकल्या. 

"पुरंदरचे भाग्यविधाते, सहकारमहर्षी कै.मा.आमदार चंदूकाका जगताप यांच्या स्वप्नातील स्वच्छ, सुंदर सासवड शहर आनंदीकाकी जगताप यांनी त्यांच्या कारकिर्दीत तीन वेळा देशात सासवड नगरपालिकेचा प्रथम क्रमांक मिळवून दिला आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा त्या नगराध्यक्ष म्हणून बहुमताने निवडून आल्या आहेत.आता संपूर्ण जगात सासवड शहराचं नावलौकिक वाढवण्याचे काम त्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्यासोबत, माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी जोमाने करणार आहेत.मागील 4 वर्षाच्या प्रशासकीय काळात जाणून बुजून रखडवलेला सासवड शहराचा विकास आता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीससाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  होणार आहे. शिवसेना शिंदेगटाचे आमदार विजय शिवतारे यांच्याकडून निवडणुकीत जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला गेला परंतु सासवडकर जनतेने जातीयवाद व दहशतीच्या वातावरणाला पूर्णपणे नाकारले.  शिवसेनेसह राष्ट्रवादी, इतर सर्व विरोधीपक्ष मिळून भाजपच्या विरोधात ही निवडणूक लढली गेली आहे. सर्वपक्षीय संपूर्ण ताकद पणाला लावूनही शिवतारे यांना अपयश आले आहे. येणाऱ्या पाच वर्षात सासवड शहराचा चेहरा मोहरा बदलून आपल्या सासवड शहराची ओळख संपूर्ण जगात होणार आहे. सासवडकर जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." अशी प्रतिक्रिया सासवड नगरपरिषदेचे लोकप्रिय नगरसेवक अजित ऊर्फ हापुकाका जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत अजित ऊर्फ हापुकाका जगताप यांच्या विक्रमी मताधिक्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सासवड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये अजित ऊर्फ हापूकाका जगताप  सर्वांत मोठया 1080 विक्रमी मताधिक्याने निवडून आले.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

सासवड नगरपरिषदेचे प्रभागनिहाय  विजयी झालेले नगरसेवक : -

1) प्रभाग १ अ मध्ये शिवसेनेच्या माधुरी तेजस राऊत - (१,२०९ मते), १ ब मध्ये भाजपचे जगताप मनोहर ज्ञानोबा -(१११२ मते)

2) प्रभाग २ अ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वढणे लीना सौरभ - (७५४ मते), २ ब मध्ये शिवसेनेचे बाळासो बापूराव भिंताडे (७५५ मते)

3) प्रभाग ३ अ मध्ये भाजपच्या शितल प्रवीण भोंडे (१,०१३ मते), ३ ब मध्ये भाजपचे ज्ञानेश्वर (माऊलीकाका) गुलाब जगताप (१,०६९ मते), 

4)  प्रभाग ४ अ मध्ये भाजपच्या रणपिसे सोपान एकनाथ (१,४४४ मते), ४ ब मध्ये भाजपच्या स्मिता सुहास जगताप (बिनविरोध).

5) प्रभाग ५ अ मध्ये शिवसेनेच्या रत्ना अमोल म्हेत्रे (१,५२१ मते), ५ ब मध्ये शिवसेनेचे गिरमे मंदार विजय (१,६२७ मते)

6) प्रभाग ६ अ मध्ये भाजपच्या अर्चना चंद्रशेखर जगताप (१,४५५ मते), ६ ब मध्ये भाजपचे जगताप राजनभैय्या चंद्रशेखर (१,४९० मते)

7) प्रभाग ७ अ मध्ये भाजपच्या जगताप स्मिता उमेश (१,४५९ मते), ७ ब मध्ये शिवसेनेचे टकले वैभव बबनराव (१,२७१ मते)

8) प्रभाग ८ अ मध्ये शिवसेनेचे म्हेत्रे प्रितम सुधाकर (९७२ मते), ८ ब मध्ये शिवसेनेच्या जगताप दिपाली अक्षराज (९३४ मते).

9) प्रभाग ९ अ मध्ये भाजपचे प्रदीप (बंडू काका) काशिनाथ राऊत (६८४ मते), ९ ब मध्ये भाजपच्या जगताप प्रियंका साकेत (९३८ मते)

10) प्रभाग १० अ मध्ये भाजपचे गिरमे ज्ञानेश्वर साधू (९३६ मते), १० ब मध्ये शिवसेनेच्या जगताप शिल्पा संदीप (९५४ मते)

11) प्रभाग ११ अ मध्ये शिवसेनेच्या इनामके हेमलता मिलिंद (बिनविरोध) आणि ११ ब मध्ये भाजपचे अजित (हापू काका) काळूराम जगताप (१,६६६ मते).

या निवडणुकीची पार्श्वभूमी चुरशीची होती. शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत युती केली, पण राष्ट्रवादीने उमेदवारी मागे घेतल्याने थेट भाजप-शिवसेना लढत झाली. पुरंदर-हवेलीचे शिवसेना आमदार विजय शिवतारे यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली, पण संजय जगतापांच्या नेतृत्वाला सासवडकर जनतेने विजयाचा कौल दिल्यामुळे भाजपला फायदा झाला. शिवसेनेला २ जागांवरून ९ जागांपर्यंत वाढ झाली, ज्यामुळे भविष्यातील  निवडणुकांसाठी आत्मविश्वास वाढला. मात्र, विजय शिवतारे यांना मोठा धक्का बसला.

सासवड नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक निरीक्षक आरती भोसले, सहाय्यक डॉ. कैलास चव्हाण आणि निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे यांच्या देखरेखीत प्रक्रिया पार पडली. उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंग गौर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली यावेळी कडक बंदोबस्त होता.

हा निकाल महायुतीच्या राज्यस्तरीय वर्चस्वाचा पुरावा आहे, ज्यात भाजपने राज्यभरात सर्वाधिक जागा जिंकल्या. नवनिर्वाचित नगरपरिषद रखडलेली पाणीपुरवठा, रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे. सासवडच्या राजकारणात जगताप कुटुंबीयांचे वर्चस्व कायम राहिले असून, भविष्यातील विकासासाठी हा विजय माइलस्टोन ठरणार आहे.

Thursday, December 4, 2025

"महाराष्ट्रातील 'या' कर्तृत्ववान मुलींना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित; देशातील पहिली व्हीलचेअर मॉडेल, दिव्यांगजणांना स्वप्नपूर्तीसाठी प्रेरणा देणारी वक्ता असणाऱ्या 'या' नागपूरच्या मुलीला व ५०० हुन अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना कला व व्यवसाय कौशल्य शिकवणाऱ्या,आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला पदके मिळवून देणाऱ्या "या" पुण्याच्या कर्तुत्वान महिलेला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान"....

नवी दिल्ली, दि. ४ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाचे औचित्य साधून  नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे बुधवारी 3 डिसेंबर रोजी भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार-२०२५’ प्रदान करण्यात आले. यंदा देशभरातून ३७ व्यक्ती व संस्थांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला असून त्यापैकी ६ पुरस्कार महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांना मिळाले आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या सचिव बी. विद्यावती यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

महाराष्ट्राचा झेंडा उंचावणाऱ्या पुरस्कारांमध्ये नागपूरच्या अबोली विजय जरीत यांचा समावेश आहे. व्हीलचेअरवर असूनही त्या नागपूरच्या पहिल्या व्हीलचेअर मॉडेल आणि प्रेरक वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी ‘सर्वोत्कृष्ट दिव्यांग व्यक्ती’ हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

पुण्याच्या भाग्यश्री मनोहर नादी मित्तला कन्ना या श्रवणबाधित महिलेला ‘सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रवणयंत्राच्या मदतीने त्यांनी कला व व्यावसायिक कौशल्य शिक्षण क्षेत्रात ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून आंतरराष्ट्रीय डेफ ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

"पुण्यातूनच न्यूरो-डायव्हर्जंट कलाकार कुमारी धृती रांका हिने ‘श्रेष्ठ दिव्यांग बालिका’ पुरस्कार मिळवला. ‘टिकलर आर्ट’ या संस्थेच्या त्या संस्थापक असून शार्क टँक इंडियासह अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांनी भारताला सन्मान मिळवून दिला आहे."

मुंबईच्या विलेपार्ले येथील प्रसिद्ध ऑडिओलॉजिस्ट व समाजसेविका देवांगी पराग दलाल यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘जोश फाउंडेशन’च्या माध्यमातून आतापर्यंत २,००० हून अधिक गरजू मुलांना मोफत श्रवणयंत्रे व थेरपी पुरवली आहे.

नागपूरच्या अबोलीची यशस्वी भरारी : 

१. व्हीलचेअर मॉडेलिंग आणि फॅशन इंडस्ट्रीतील योगदान

अबोली जरीत ही देशातील पहिली व्हीलचेअर मॉडेल आहे आणि नागपूरची पहिली अशी मॉडेल. तिने दिव्यांग (अपंगत्व) असलेल्या व्यक्तींसाठी फॅशन आणि ग्लॅमरच्या क्षेत्रात नवीन दारे उघडली आहेत.

ती 'मिस व्हीलचेअर इंडिया २०२१' ची फायनलिस्ट राहिली आहे आणि 'इंडियाज दिव्यांग ग्लॅमर २०२३' ची विजेती आहे.

तिच्या मॉडेलिंगद्वारे ती दिव्यांग व्यक्तींना आत्मविश्वास वाढवण्याचे आणि सामाजिक भेदभाव तोडण्याचे संदेश देते. तिच्या कामामुळे अनेक जण अपंगत्वाला अडथळा न मानता स्वप्ने पूर्ण करण्यास प्रेरित होतात.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

२. प्रेरणादायी वक्ता (मोटिव्हेशनल स्पीकर) आणि आनंद दूत (हॅप्पीनेस  अँबेसिडर)

"अबोली जरीत एक यशस्वी मोटिव्हेशनल स्पीकर आहे, जी शाळा, कॉलेज आणि कार्यक्रमांमध्ये बोलते. तिची भाषणे अपंगत्वावर मात करणे, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेवर आधारित असतात."

"राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारी नागपूरची अबोली जरीत 'हॅप्पीनेस  अँबेसिडर म्हणून ओळखली जाते आणि लोकांना आनंदाने जगण्याचे शिकवते. तिच्या सोशल मीडिया (इन्स्टाग्राम @aboli__jarit) वर ती प्रेरणादायी कथा, मोटिव्हेशनल व्हिडिओ आणि लाइफस्टाइल टिप्स शेअर करते, ज्यामुळे लाखो लोकांना प्रोत्साहन मिळते."

तिने आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरींमध्ये भाग घेतला असून, तिचा प्रवास जागतिक स्तरावर प्रेरणा देणारा आहे. तिने 'इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स २०२५' मध्ये स्थान मिळवले आहे.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

भाग्यश्री मनोहर नादीमेटाला कन्ना ही पुण्यातील ३९ वर्षीय (जन्म: २१ सप्टेंबर १९८५) श्रवणबाधित (१००% श्रवण अपंगत्व) महिला आहे, जी जन्मजात गहन श्रवण दोष असलेली आहे. तिच्या दिव्यांगत्वामुळे (अपंगत्वामुळे) बोलणे आणि ऐकणे कठीण असतानाही, तिने कला, शिक्षण आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या क्षेत्रात अविश्वसनीय यश मिळवले आहे.

"राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारी भाग्यश्री तिच्या कुटुंबाच्या (वडील मनोहर आणि आई) यांच्या प्रोत्साहनामुळे ती या अडचणींवर मात करून इतर दिव्यांग व्यक्तींना प्रेरणा देणारी व्यक्तिमत्त्व बनली आहे. "

"३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिला 'राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार २०२५' अंतर्गत 'सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन' (सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन) श्रेणीत पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार तिच्या सर्वसमावेशक शिक्षण, कला शिक्षण आणि दिव्यांगांच्या सक्षमीकरणातील योगदानासाठी दिला गेला आहे."

भाग्यश्रीचे कार्य मुख्यतः खालील क्षेत्रांत केंद्रित आहे:

१. कला शिक्षिका आणि व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षक म्हणून योगदान

भाग्यश्री मनोहर नादीमेटाला कन्ना 'सुहृद मंडळ' (Suhrud Mandal) या पुण्यातील संस्थेत कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तिने गेल्या अनेक वर्षांत ५०० हून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना (विशेषतः श्रवणबाधित आणि इतर अपंग व्यक्तींना) चित्रकला, ड्रॉईंग, हस्तकला आणि व्यावसायिक कौशल्ये शिकवली आहेत.

तिच्या मार्गदर्शनाखाली तिचे विद्यार्थी राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्पर्धांमध्ये पदके जिंकले आहेत. यामुळे ती केवळ शिक्षिका नसून, विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि स्वावलंबन शिकवणारी मार्गदर्शक आहे. तिच्या विद्यार्थ्यांमधील अनेक जण आता स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत आणि कला क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.

तिच्या कार्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणले जाते आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते. ती सांगते, "कला ही केवळ अभिव्यक्ती नाही, तर सक्षमीकरणाची शक्ती आहे."

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

२. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व आणि यश

भाग्यश्री ही पहिली भारतीय श्रवणबाधित महिला आहे, जी २०२३ मध्ये फ्रान्स येथे झालेल्या 'इंटरनॅशनल अबिलिंपिक्स' (International Abilympics) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. हे अबिलिंपिक्स हे दिव्यांग व्यक्तींच्या व्यावसायिक कौशल्यांसाठीचे आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, जिथे तिने कला आणि बहु-प्रतिभा श्रेणीत भाग घेतला.

"भाग्यश्रीने 'आर्ट अँड मल्टी टॅलेंट' श्रेणीत नवीन भारतीय रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. याशिवाय, तिच्या विद्यार्थ्यांनीही या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली आहेत."

"तिच्या या यशामुळे ती जागतिक स्तरावर दिव्यांगांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणारी प्रेरणास्थान बनली आहे. २०२२ च्या वार्षिक अहवालात (DEPwD) तिला १,३०,००० रुपयांचे सन्माननीय पुरस्कार मिळाले होते."

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

संस्था श्रेणीत मुंबईच्या ‘जय वकील फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर’ला बौद्धिक व विकासात्मक दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी ‘सर्वोत्कृष्ट संस्था’ म्हणून निवडण्यात आले. तर डिजिटल सुगम्यतेतील उल्लेखनीय कार्याबद्दल मुंबईचीच ‘बॅरियर ब्रेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी ‘सर्वोत्कृष्ट सुगम्य माहिती तंत्रज्ञान’ पुरस्काराची मानकरी ठरली.

पुरस्कार वितरण करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, “दिव्यांगजन हे समाजाचे समान हक्कधारक आहेत. त्यांच्याशिवाय कोणताही समाज खऱ्या अर्थाने विकसित म्हणता येणार नाही. केंद्र सरकारने आता कल्याणकारी दृष्टिकोन सोडून ‘अधिकार-आधारित आणि सन्मान-केंद्रित’ व्यवस्था स्वीकारली आहे.” त्यांनी विशेषतः श्रेष्ठ दिव्यांग बालक मोहम्मद यासिन (केरळ) आणि धृती रांका (पुणे) यांच्यासह सर्व पुरस्कर्त्या मुला-मुलींच्या असामान्य कामगिरीचे कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवात दृष्टिहीन विद्यार्थिनी वैष्णवी थापा हिच्या मधुर सरस्वती वंदनेने झाली.

सुगम्य भारत अभियान, २०१६ चा दिव्यांगजन अधिकार कायदा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे दिव्यांगजनांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले. २०१५ पासून ‘दिव्यांगजन’ हा आदरयुक्त शब्द वापरण्याचा निर्णयही त्याच सन्मानाचेच द्योतक असल्याचे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रातील या विजेत्यांनी केवळ वैयक्तिक यश मिळवले नाही तर दिव्यांगत्वाला कधीच मर्यादा न मानता समाजाला प्रेरणा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या यशाने राज्याचा मान उंचावला असून दिव्यांगजन सशक्तीकरणाच्या दिशेने देश पुढे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sunday, November 30, 2025

"HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी "या" तारखेपर्यंत नवीन मुदतवाढ; पाचवी मुदतवाढ देऊनही पुण्यात "इतक्या" लाखांपेक्षा जास्त वाहनांना अजून सुरक्षा नंबरप्लेट बसवणे बाकी; 'खड्डेमुक्त रस्ते करा' आधी, फक्त कडक नियम करून,दंड करू नका"

पुणे,दि.३० :  1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंर राज्य परिवहन विभागाने यावरती कार्यवाही चालू केल्यानंतर, वाहनधारकांना चार वेळा मुदत दिल्यानंतरही  HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी पुन्हा परिवहन विभागाने 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिल्याची माहिती समोर आलेली आहे. राज्यातील वाहन धारकांना HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी पाचवी मुदतवाढ देऊनही पुण्यात पंधरा लाखांपेक्षा जास्त वाहनधारकांनी अजूनही सुरक्षा नंबरप्लेट बसवलेली नाही.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात विविध ठिकाणी खड्डे असलेले खराब रस्ते आहेत. खड्डे असणाऱ्या खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात होत असतात.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

"वाहतुकीचे नियम आम्ही पाळतो.HSRP नंबरप्लेटही बसवू. सरकारला आम्ही विविध मार्गाने एवढा लाखो - करोडो रुपयांचा कर देत असतो. परंतु मूलभूत सुविधांच्या नावाने नेहमीच बोंबाबोंब असते. वाहतुकीचे नियम कडक करून फक्त दंड जास्त आकारू नका तर खड्डेमुक्त रस्ते आम्हाला द्या, अपघात मुक्त, ट्रॅफिक मुक्त वाहतूक व्यवस्था निर्माण करा.लोकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी सरकारने गांभीर्याने प्रयत्न केले पाहिजेत. अशा भावना राज्यातील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत."

"महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परिवहन विभागाने नंबरप्लेट बसवण्यासाठी दिलेली ही पाचवी मुदतवाढ आहे. मात्र अद्यापही पुण्यात १५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना सुरक्षानंबर प्लेट बसविणे बाकी आहे. त्यामुळे एका महिन्यात एवढ्या नंबरप्लेट बसवून होणार का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. राज्याच्या परिवहन विभागाने चार वेळा मुदतवाढ देऊनही पुण्यातील वाहन चालकांनी HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी पाठ फिरवलेली दिसत आहे."


HSRP नंबरप्लेट फायदेशीर आहे का?

उच्च  न्यायालयाच्या आदेशानुसार एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले होते. त्यानुसार जानेवारी महिन्यापासून ही नंबरप्लेट बसविण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

अपघात किंवा गुन्ह्यात सहभागी होणारी वाहने सहजपणे पकडता यावीत, प्रत्येकाचे वाहन सुरक्षित रहावे म्हणून सर्व वाहनांना सुरक्षा नंबरप्लेटचे बंधन घालण्यात येत आहे; तसेच अनेक गुन्हे व अपघातातील वाहने या नंबरप्लेटमुळे सहजपणे शोधता येणे शक्य असल्याचे सांगितले जात आहे.

आतापर्यंत पुण्यातील 7 लाख 62,274 वाहनधारकांनी सुरक्षा नंबरप्लेट बसवून घेतली आहे, तर 9 लाख 55,811 वाहनधारकांनी सुरक्षा नंबरप्लेटसाठी नोंदणी केलेली आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"६५ टक्के वाहनांना HSRP नंबरप्लेट नाही.पुण्यात साधारण २५ लाखांच्या पुढे वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे; पण अद्यापपर्यंत दहा लाखांच्या आसपास वाहनांनी नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच, पुण्यातच जवळजवळ १५ लाख वाहनांनी अद्यापही सुरक्षा नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. परिवहन विभागाकडून अनेक वेळा मुदतवाढ देऊनही याकडे वाहनधारकांनी पाठ फिरवली आहे."

पुण्यात अद्यापही ६५ टक्के वाहनांना नंबरप्लेट बसविलेली नाही. सध्या तरी सुरक्षा नंबरप्लेट नसलेल्या वाहनांची आरटीओतील कोणतीही कामे होत नाहीत. ३१ डिसेंबरनंतर नंबरप्लेट न बसविलेल्या वाहनांवर दंड होणार असल्यामुळे तातडीने त्या बसवून घ्याव्यात, असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रभरात HSRP नंबरप्लेट काय स्थिती?

राज्यात एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांची संख्या साधारण २.१० कोटी इतकी आहे. यातील ९० लाख वाहनांची एचएसआरपीसाठी नोंदणी झाली आहे. त्यातील ७३ लाख वाहनांना एचएसआरपी बसवण्यात आली आहे. पाटीचा दर्जा अतिशय खराब असणे, एक पाटी तुटल्यास किंवा खराब झाल्यास दोन्ही पाट्या विकत घेणे असा भुर्दंड वाहनचालकांना सहन करावा लागतो. 

यामुळे राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी एचएसआरपीला मुदतवाढ देण्याची मागणी सरकारकडे केली होती. यापूर्वी ३० एप्रिल, ३० जून, १५ ऑगस्ट, ३० नोव्हेंबर रोजी यासाठीची मुदतवाढ देण्यात आली होती.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

HSRP मध्ये असलेले खास सिक्युरिटी फीचर्स आणि होलोग्राममुळे नंबरप्लेटची डुप्लिकेट कॉपी बनवणे जवळजवळ अशक्य होते. या योजनेची अंमलबजावणी होऊनही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

"31 डिसेंबरनंतर एचएसआरपी नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनधारकांवरती दंड आकारला जाईल.  परिवहन विभागाने अनेकवेळा मुदतवाढ देऊनही नागरिकांनी याकडे लक्ष दिले नाही. आता, ज्या वाहनांवर HSRP नाही, त्यांची कोणतीही कामे आरटीओमध्ये (RTO) होत नाहीत."

वाहन मालकांना त्वरित HSRP बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण 31 डिसेंबरनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर मोठा दंड आकारला जाईल.

राज्यातील लाखो नागरिकांनी वाहन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर HSRP नंबरप्लेट बसवणे गरजेचे आहे. तसेच सरकारनेही राज्यातील करोड लोकसंख्या असलेल्या जनतेला मूलभूत सुविधा देणे, चांगले रस्ते, चांगली वाहतूक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.