पुरंदर, सासवड,दि.२९ : रक्तदान हे श्रेष्ठदान या उक्तीचा खऱ्या अर्थाने सामाजिक संदेश देशभरातील केमिस्ट शिलेदारांनी एका दिवसात 75000 रक्ताच्या बाटल्या संकलित करून, भारतीय समाजासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. भारतीय आरोग्य व्यवस्थेसमोर रक्ताची कमतरता ही खूप मोठी गंभीर समस्या आहे. आजही आपल्या भारतात रुग्णांना उपचाराप्रसंगी रक्त मिळत नाही यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. समाजातील सर्व घटकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त रक्तदान करणे ही काळाची गरज आहे.
ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, केमिस्ट बांधवांचे आधारस्तंभ,मा. आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी देशभरातील केमिस्ट बांधवांच्या कल्याणासाठी मागील 40 वर्ष सातत्याने केलेल्या प्रामाणिक कार्यामुळे त्यांच्या कार्याला एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी देशभरातील हजारो केमिस्ट बांधवांनी महारक्तदान शिबिर आयोजित करून 75000 पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करून देशभरात एक मोठा विश्वविक्रम करून, समाजाला दिशा देणारा प्रेरणादायी उपक्रम राबवलेला आहे.
एक आपत्कालीन, सामाजिक, नैतीक गरज डोळ्यासमोर ठेवून हा भव्य - दिव्य उपक्रम संघटनेने हाती घेतला. भविष्यात देशामध्ये अचानक आपत्कालीन परिस्थिती उद्धभवली आणि मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासल्यास देशातले सर्व केमिस्ट मोफत रक्तदान करून ही परिस्थिती योग्य प्रकारे पूर्ण करतील यासाठीच हा महासंकल्प हाती घेतला.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
संपूर्ण देशात दिनांक 24 तारखेला एकाच वेळी रक्तदान करण्याचा उपक्रम हाती घेऊन केमिस्ट बांधवांनी समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे. पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट संघटनेच्या वतीने या महारक्तदान शिबिराचे सासवड, जेजुरी, निरा येथील सर्व केमिस्ट बंधू, भगिनींनी आयोजन केले.
या शिबिरात पुरंदर तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, तरुण शिलेदार, सामाजिक कार्यकर्ते,महिला वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.याप्रसंगी सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण, श्री राम कारंडे आणि सर्व आरोग्य अधिकारी यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.
जेजुरी शहरात डॉ कैलास सुपेकर पुरंदर तालुक्याचे जिल्हा कार्यकारी सदस्य धैर्यशील शिंदे यांनी शिबिराचे उद्घाटन केले.तसेच निरा शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास कदम आणि डॉ अजय निगडे यांनी या शिबिरात मोलाचे सहकार्य करून जास्तीत जास्त रक्तदान करून घेतले.
संघटनेचे उपाध्यक्ष योगेश जठार, दत्तात्रय कर्णावर, राजेंद्र भोईटे, निखिल काकडे, नरेंद्र जैन यांनी जनजागृती करून मोठ्याप्रमाणात रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला.
पुरंदर मेडिकल असोसिएशन वतीने अध्यक्ष डॉ प्रविण जगताप, डॉ सचिन निरगुडे, डॉ वृषाली जगताप, डॉ अश्विनी जगताप यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.सध्या आपल्या देशात रक्त पुरवठा खुप कमी झाला आहे त्याअनुषंगाने संपूर्ण पुरंदर तालुक्यात सर्व केमिस्ट बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले.
पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा प्रतिनिधी श्री धैर्यशील शिंदे, श्री बाळासाहेब भिंताडे, सौ शुभांगी जगताप(महिला जिल्हा कार्यकारी सदस्या),ज्येष्ठ सभासद श्री कृष्णा शेट्टी, तालुका अध्यक्ष श्री सुकुमार नाझीरकर,मा नगरसेवक श्री नंदकुमार जगताप, सौ उर्मिला जगताप, श्री भूषण ताकवले , श्री निलेश डाकले, श्री संतोष ढमाळ तसेच
श्री विराज सस्ते, श्री सुमित जगताप, श्री अजित शेंडकर, श्री सागर सस्ते, श्री संदिप घारे, श्री मनोज जगदाळे, बाबुराव जगदाळे, अवधुत जगताप,सौ सुवर्णा रनणवरे,सौ ललिता जगताप,सौ तनुजा पाटील,माया शहा, सौ तृप्ती बोराडे,सौ तृप्ती संदेश गायकवाड,श्री विक्रम खामकर तसेच
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
श्री नितीन नाझीरकर, श्री रामदास कदम, श्री निखिल काकडे, श्री मनोहर क्षीरसागर , श्री मायदेव, श्री चेतन डाकले यांनी या रक्तदान महाशिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला. पुरंदर तालुक्यात सामाजिक वारसा जपत वज्र पुरंदर ग्रूपने सर्वात जास्त सहभाग नोंदवला. अध्यक्ष मा नगरसेवक संदिप राऊत, उपाध्यक्ष योगेश आबा जगताप, नाना कुंभारकर, जितेंद्र कामथे, विजय काळे, अतुल निगडे, गणेश चौरे, बाबासाहेब पिलाने, बाबू कुंभार, चकित जगताप, योगेश कोलते यांनी रक्तदान करून सहकार्य केलं.
"महारक्तदान शिबिरामध्ये सर्व केमिस्ट, फार्मासिस्ट व सहकाऱ्यांनी एकजुटीने मेहनत घेत, हे रक्तदान शिबिर यशस्वी केले.या रक्तदान शिबिरामध्ये स्वयंस्फूर्तीने तळागाळातील बांधवांकडून रक्तदान चळवळ राबवली तसेच सर्व ग्रामीण व शहरी भागातील सर्व सभासदांनी आप्पासाहेब व संघटनेवर दाखवलेल्या प्रेम व विश्वासाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व शतशः आभारी आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा रक्तदानाचा उच्चांकी आकडा गाठून विश्वविक्रम करत आमचे मार्गदर्शक,आधारस्तंभ जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या वर प्रचंड प्रेम दाखवत देशाप्रति निष्ठा जपली आहे. प्रतिकूल परिस्थिती व संघर्षातून देशव्यापी सर्व समावेशक नेतृत्व अप्पासाहेबांच्या रूपाने आपल्याला लाभले. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, केमिस्ट, फार्मासिस्ट ,सभासद, सहकारी, मित्रपरिवार यांनी कठोर परिश्रम घेतल्याबद्दल त्या सर्वांना लाख लाख धन्यवाद व सर्वांचे मनापासून आभार." अशी प्रतिक्रिया पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी धैर्यशील शिंदे यांनी दिली.
"पुरंदर तालुक्यातील महारक्तदान शिबिरात आमच्या संघटनेचा प्रत्येक सभासद मनापासून रक्तदान करण्यासाठी प्रयत्न करत होता. ग्राहक हा आपला अन्नदाता आहे ही भावना मनात ठेवून आपल्या अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी आलेली ही संधी साधण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत होता. प्रत्येक सभासद आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ जगन्नाथ आप्पा शिंदे यांचा देशात गौरव वाढवण्याचा अंतःकरणा पासुन झटत होता. या महारक्तदान शिबिरात 90 % रक्तदान हे केमिस्ट व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी केले आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान.रक्तदान केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानणे म्हणजे ती खुप छोटी गोष्ट ठरेल. पुरंदर तालुक्याच्या वतीने सर्व रक्तदात्यांना समाजसेवेचा लाल सलाम" अशी प्रतिक्रिया पुरंदर तालुका ड्रॅगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन उपाध्यक्ष, माजी नगरसेवक नंदकुमार विठ्ठलराव जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशन समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते.
रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजाची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या केमिस्ट बांधवांनी महारक्तदान शिबिर आयोजित करून समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे.