पुणे, दि.५ : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरात जनक्षोभ उसळलेला आहे. महाराष्ट्राच्या समाजमनाला काळिमा फासणारी ही खूप क्रूर व अमानवी हत्याकांडाची घटना आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर राज्यात जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे. परभणीच्या आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच बीडच्या संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील जनता रस्त्यावरती उतरलेली आहे. पुणे शहरात आज झालेल्या विराट जनआक्रोश मोर्चामध्ये हजारो लोकांनी सहभागी होऊन, या क्रूर घटनेचा संताप व निषेध व्यक्त केला व या संतोष देशमुख हत्याकांड घटनेतील सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी ही मागणी केली.
या बीडच्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राजकीय वर्तुळासह राज्यभरातून होत आहे. अशातच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आता राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. आज पुण्यात जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना बीड, बुलढाणा, परभणीनंतर आज रविवारी पुणे शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
पुण्यातील या जनआक्रोश मोर्चावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी या मोर्च्यात सहभाग दर्शवत मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला. आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्व, राजकारण या विषयांवरून मंत्री धनंजय मुंडे व बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेले व बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप असलेल्या वाल्मीक कराडवर कडाडून प्रहार केला.
इतकंच नाहीतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही भाष्य केलं." ‘वाल्मिक कराड आण्णा उर्फ आक्का 17 मोबाईल नंबर वापरतात. बीडच्या एसपी आणि सीआयडीच्या आयजींना विनंती आहे की नितीन कुलकर्णी आणि वाल्मिक कराड हे दोघे मिळून 17 मोबाईल नंबर वापरतात. हा नितीन कुलकर्णी वाल्मिक कराड आत गेल्यापासून गायब झाले आहे. त्यामुळे नितीन कुलकर्णी यांनी कोणाकडून किती माल घेतला, याचे सगळे पुरावे 17 मोबाईल मध्ये सापडतील’ "असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.
पुढे सुरेश धस असेही म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना आणि अजित पवारांना विनंती करतो… "अजित दादा फार प्रामाणिक माणूस आहे. पाच वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे आणि ते कधीच चुकीच्या लोकांना मदत करणार नाही. राष्ट्रवादीत 2005 पासून 2015 पर्यंत राष्ट्रवादीत होतो.
"मी त्यांच्याबरोबर काम केलं अजित दादा असा नव्हता रे अजित दादा तुझ्या पाया पडतो तुझं काय अडकलं रे यांच्यापाशी."असा सवालही आमदार सुरेश धस यांनी केला तर हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली तर मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल." असं आव्हान देखील सुरेश धस यांनी दिलं.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी यांच्या विरोधात बोलतोय असं नाही. जर तसं असेल तर मी शांत बसतो, घाना देशात राहून जातो पण तुम्ही संतोष देशमुखला परत आणाल का? त्याच्या कुटुंबीयांना न्याय द्याल का? असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विचारला. जोपर्यंत संतोष देशमुखचे मारेकरी फासावर जात नाही तोपर्यंत मनात राग ठेवा असं आवाहन आमदार सुरेश धस यांनी केलं. "
"बीडचा बिहार नाही तर यांनी हमास आणि तालीबान करून ठेवलाय" अशी जहरी टीका आमदार सुरेश धस यांनी पुण्यातील जनआक्रोश मोर्चात केली केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
"संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांनी बीडचा बिहार नाही तर हमास, काबुलीस्तान आणि तालिबान केला असल्याची टीका आमदार सुरेश धस यांनी केली. ते म्हणाले की, "माझा रंगही काळा आहे. तुम्ही म्हणाल तर घाना देशात जाऊन राहतो. पण मग संतोष देशमुखला परत आणू शकाल का? संतोष देशमुख तिसऱ्यांदा सरपंच झाला. पण अजून त्याच्या कुटुंबीयांना राहायला घर नाही. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, यात कसलं राजकारण आहे?"
मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांना बिनखात्याचा मंत्री करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली. या आधी अनेकांनी राजीनामा दिले. आर आर पाटील, विलासराव देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. महायुतीच्या तीनही पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो. यांचा राजीनामा घ्या, आमच्या मुलाला न्याय द्या अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली.
सुरेश धस म्हणाले की, "मी अजितदादावर टीका केली नाही. पण यांनी घेरा घातलाय त्यांना. ते लायकवान माणसं नाहीत. अजितदादा डोळे उघडून खाली बघा काय सुरू आहे ते. बारामती मतदारसंघातील तुमच्या विश्वासातली माणसे बीड जिल्ह्यात पाठवा म्हणजे सत्यता समोर येईल."
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"तो सूरज चव्हाण माझ्यावर बोलला. अरे तो अजून बालवाडीतही नाही. तुम्ही काय बोलायचं ते बोला, मी तुमच्याकडे लक्ष देणार नाही. मला संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष हटवायचं नाही. "असे आमदार सुरेश धस म्हणाले.
"फक्त मराठा समाज नाही तर संपूर्ण अठरापगड जाती या संतोष देशमुख यांच्यासोबत आहेत. वंजारी समाजातील काही लोक सोडली तर सगळ्यांना ही गोष्ट पटली नाही. तुम्ही जाती-जातीत का अंतर पाडताय? एखादी जात आम्ही टार्गेट करत नाही. त्या जातीतील चुकीचे नेतृत्व करत आहेत त्यांना सोडायचं नाही." असं सुरेश धस म्हणाले.
याच जनआक्रोश मोर्चातून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी देखील आक्रमक भाषण केले. यावेळी त्यांनी आकाचा आका कोण? असा सवालही अरविंद शिंदे यांनी केला.
"पुण्यातील जनआक्रोश मोर्चावेळी काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना थेट संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांसह धनंजय मुंडे यांच्यावरही कडक कारवाईची मागणी केली आहे. ‘मराठा समाज हा न्याय देण्याच्या भूमिकेत होता, आज तो समाज न्याय मागण्याच्या भूमिकेत आला आहे. हे कुणी केली? त्या आकाचा आका कोण? त्यालाही रस्त्यावर आणलं पाहिजे आणि मारेकऱ्यांसह, धनंजय मुंडे यांचाही सहभाग असेल तर यांनाही फाशी झाली पाहिजे’, अशी मागणीही अरविंद शिंदे यांनी यावेळी केली आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडानंतर त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावरती येऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाले पाहिजे. अशा भावना महाराष्ट्रातील लाखो लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सरकारने संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण गांभीर्याने घेऊन, या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी योग्य ती पावले लवकरात लवकर उचलणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment