Wednesday, October 15, 2025

"गावाकडच्या रानामाळात गुरे हाकणारा मुलगा ते पुण्यात वॉशिंग सेंटरवर गाड्या धुणारा मुलगा ते घड्याळाच्या दुकानात काम करणारा तरुण ते डेक्कन होंडा शोरूममध्ये प्रामाणिकपणे काम करणारा युवा शिलेदार ते लाखो रुपये कमावणारे पुण्यातील प्रसिद्ध आवाळे मिसळ ब्रँडचे सर्वेसर्वा आवाळे दाजी ते नगरसेवक, आमदार,अधिकारी यांना उत्कृष्ट चव व प्रामाणिक सेवेमुळे भुरळ घालणाऱ्या आवाळे मिसळ ब्रँडचे मालक, यशस्वी उद्योजक, कर्तुत्वान शिलेदार हनुमंत आवाळे"



"गावाकडच्या रानामाळात गुरे हाकणारा मुलगा ते पुण्यात वॉशिंग सेंटरवर गाड्या धुणारा मुलगा ते घड्याळाच्या दुकानात काम करणारा तरुण ते डेक्कन होंडा शोरूममध्ये प्रामाणिकपणे काम करणारा युवा शिलेदार ते लाखो रुपये कमावणारे पुण्यातील प्रसिद्ध आवाळे मिसळ ब्रँडचे सर्वेसर्वा आवाळे दाजी ते नगरसेवक, आमदार,अधिकारी यांना उत्कृष्ट चव व प्रामाणिक सेवेमुळे भुरळ घालणाऱ्या आवाळे मिसळ ब्रँडचे मालक, यशस्वी उद्योजक, कर्तुत्वान शिलेदार हनुमंत आवाळे"

आयुष्यात कितीही अडचणी, संकटे आले तरी त्या अडचणींवरती मात करून, आपल्या आवडीच्या क्षेत्रात उच्चतम पातळीवरती पोहोचण्यासाठी जिद्दीने, चिकाटीने, मेहनत करणारी ध्येयवेडी लोकं त्यांच्या स्वप्नपूर्तीचा इतिहास निर्माण करतात. पश्चिम महाराष्ट्रात, पुणे शहरात उत्कृष्ट चव व दर्जेदार सेवा यामुळे अल्पावधीतच प्रसिद्ध झालेला ब्रँड व नगरसेवक, आमदार, अधिकारी  व तरुणाई यांना भुरळ घालणारे आवाळे मिसळ ब्रँडचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील, भोर तालुक्यातील देवळे या गावी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला.

ग्रामीण भागात अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या हनुमंत आवाळे यांनी वयाच्या 12 व्या वर्षापासूनच, शेतकरी कुटुंबात वडिलांना शेतीसाठी व दूध व्यवसायासाठी मदत करायला सुरुवात केली होती. गावाकडच्या रानामाळात गुरे हाकणारे, वडिलांना शेतीसाठी व दूध व्यवसायासाठी मदत करणारे हनुमंत आवाळे बालपणापासूनच कष्ट व मेहनत करून कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न करत होते. गावाकडच्या रानामाळात गुरे चारायला घेऊन जाण्यापासून ते दूध काढण्यापासून ते दूध डेअरीला देण्यापासूनचे सर्व कामांमध्ये हनुमंत आवाळे आपल्या कुटुंबीयांना मदत करत होते. गावाकडच्या गरीब परिस्थितीशी संघर्ष करत असताना शालेय शिक्षण कमी झाले तरी व्यावहारिक शिक्षणात हनुमंत आवाळे यांनी मोठी झेप घेतली होती.गावाकडच्या वडिलांच्या शेतीमध्ये राबणारे हात, गुरांच्या मागे राबणारे हात भविष्यातील प्रगतीची नवीन स्वप्ने पाहत, धडपड करत होते.

गावाकडे तरुण वयात प्रामाणिकपणे  शेती करणारे हनुमंत आवाळे यांनी कष्ट व मेहनत करून वडिलांना शेती व दुग्ध व्यवसायात चांगला हातभार लावला. प्रत्येक कामात झोकून देऊन, चांगले काम करण्याची उमेद त्याकाळी हनुमंत आवाळे यांच्याकडे होती. तरुण वयातच नवनवीन कौशल्ये विकसित करून,नवीन अनुभव घेऊन माणसाचे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने फुलत असते.

"आपला पुतण्या मेहनती आहे.हुशार आहे. पुणे शहरात जाऊन आपल्या पुतण्याने नोकरी किंवा व्यवसाय केला तर त्याची चांगली प्रगती होऊ शकते. या भावनेतून हनुमंत आवाळे यांच्या चुलत्याने हनुमंत आवाळे यांना प्रगतीच्या दृष्टिकोनातून कडक बोल सुनावले."

चुलत्याचे कडक शब्द मनाला लागल्यानंतर हनुमंत आवाळे यांनी नुकतेच नवीन लग्न झालेले असताना देखील सहा महिन्यातच लगेच नोकरीसाठी पुणे शहर गाठले.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

"आमच्या भोर तालुक्यातील, दिवळे गावाबद्दल मला खूप आत्मीयता, प्रेम असल्यामुळे एक भक्कम नाळ जोडलेली होती. गावाशी एक चांगलं नातं झाले होते. त्यामुळे ऐन तरुण वयात गाव सोडणं माझ्यासाठी खूप कठीण होते. पण आमच्या चुलत्याने प्रगतीसाठी बोललेले कडक शब्द मनाला लागलेले होते. त्यामुळे लग्नाला अवघे सहा - महिने झालेले असताना देखील मी नोकरीसाठी पुण्यात आलो. पुणे शहरात आल्यानंतर सुरुवातीचा काळ खूप संघर्षाचा होता." असे पुण्यातील प्रसिध्द हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

"गावच्या संस्कृतीची नाळ घट्ट जोडलेली असताना वयाच्या 25 व्या वर्षे लग्नाला अवघे सहा महिने झालेले असताना, हनुमंत आवाळे यांनी पुणे शहरात नोकरीसाठी येऊन, प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करणे त्याकाळी एवढे सोपे नव्हते. पुण्यात मित्रांच्या रूमवरती राहून नोकरी शोधण्याचा त्यावेळेसचा काळ आवाळे यांच्यासाठी कठीण होता. पुण्यात के. के. मार्केटला वॉशिंग सेंटरला गाडी धुण्याची पहिले काम हनुमंत आवाळे यांना मिळाले. वॉशिंग सेंटरला हनुमंत आवाळे यांनी सहा महिने काम केल्यानंतर पुढे पुण्यात घड्याळाच्या दुकानात आठ महिने काम केले. शिक्षण कमी असल्यामुळे पुण्यात चांगल्या कंपनीत नोकरी मिळणे आवाळे यांच्यासाठी खूप अवघड होते तरी देखील ते चांगली नोकरी मिळवण्यासाठी त्याकाळी प्रयत्न करत होते."

पुण्यात चांगली नोकरी मिळण्यासाठी हनुमंत आवळे यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न व मेहनत यामुळे त्याकाळी पुण्यातील नामांकित असलेल्या डेक्कन होंडा या गाड्यांचा ब्रँड असलेल्या शोरूममध्ये त्यांना नोकरी मिळाली. डेक्कन होंडा शोरूममध्ये हनुमंत आवाळे यांनी सुरुवातीच्या काळात गाड्या धुण्यापासून ते गाड्या चेक करण्यापासून, विविध विभागांमध्ये सर्व प्रकारची कामे केली. डेक्कन होंडा शोरूममध्ये हनुमंत आवाळे यांनी टेक्निशियन म्हणून अनेक वर्ष उत्तम काम केले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

पुणे शहरातील नामांकित डेक्कन होंडा शोरूममध्ये हनुमंत आवाळे यांनी जिद्दीने, चिकाटीने, प्रामाणिकपणे, प्रचंड मेहनत करून, कंपनीच्या व्यवस्थापनाचा विश्वास संपादन केला. डेक्कन होंडा शोरूममध्ये नोकरी करत असताना, हनुमंत आवाळे यांना प्रगतीच्या नवीन वाटा, नवीन स्वप्न स्वस्थ बसून देत नव्हते. 'नोकरी बरोबर अजून काहीतरी नवीन व्यवसायासाठी प्रयत्न केले पाहिजे. धडपडले पाहिजे हा विचार मनात ठेवून' हनुमंत आवाळे यांनी डेक्कन होंडाची नोकरी करत असतानाच पुण्यातील के.के. मार्केट येथील प्रसिद्ध सुशील वडापाव या  त्यांचे मामा रोहिदास भाटे यांच्या वडापाव स्नॅक्स सेंटरवरती  वडापाव बनवायला शिकून, मामाला मदत करायला सुरुवात केली.

"माझी डेक्कन होंडा शोरूममधील नोकरी चांगली चालू होती पण तरी देखील पुढे प्रगतीसाठी अजून नवीन काहीतरी केले पाहिजे. नवीन कौशल्य शिकले पाहिजे या भावनेतून मी माझ्या हॉटेल क्षेत्रातील माझे गुरु आमचे मामा रोहिदास भाटे यांच्या पुण्यातील के.के. मार्केट येथील प्रसिद्ध सुशील वडापाव स्नॅक सेंटरला वडापाव बनवायला शिकलो. माझ्या मामांनी मला हॉटेल व्यवसायासाठी खूप चांगले मार्गदर्शन केले. त्याकाळी रोज मी  डेक्कन होंडाची नोकरी करून  सुशील वडापाव स्नॅक्स सेंटरला मामांना मदत करण्यासाठी जात होतो. तो काळ माझ्यासाठी व्यवसायाची दिशा मिळण्यासाठी खूप महत्त्वाचा होता." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

पुणे शहरात दिवसभर डेक्कन होंडा शोरूममध्ये नोकरी करणे व नोकरीची रोजची वेळ संपल्यानंतर, संध्याकाळी मामाच्या वडापाव स्नॅक्स सेंटर वरती जाऊन तिथे वडापाव बनवून, तिथल्या कामांमध्ये मदत करणे. ही गोष्ट खूप कष्टाची व खूप काही शिकवुन जाणारी होती. 

त्याकाळी पुणे शहरात हनुमंत आवाळे यांचे कुटुंब असल्यामुळे कुटुंबाच्या प्रगतीसाठी, नवनवीन अवघड वाटांवरती चालून प्रगतीसाठी त्यांची प्रामाणिकपणे धडपड चालू होती.

पुण्यातील नामांकित डेक्कन होंडा या गाड्यांच्या शोरूममध्ये नऊ वर्ष नोकरी केल्यानंतर स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय 2015 ला हनुमंत आवाळे यांनी घेतला. डेक्कन होंडा या गाड्यांचा ब्रँड असणाऱ्या नामांकित कंपनीतून नोकरी सोडून हॉटेल व्यवसायामध्ये उतरण्याचा त्यावेळेसचा हनुमंत आवाळे यांचा निर्णय खूप कठीण व धोकादायक वाटणारा होता. परंतु हनुमंत आवाळे यांच्या पत्नीची साथ व कुटुंबियांची साथ असल्यामुळे त्यांनी तो साहसी निर्णय घेऊन 2015 ला पुणे शहरातील भारती विद्यापीठ येथे "ओम साई स्नॅक्स सेंटर" नावाने हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली.

"पुण्यातील चांगल्या कंपनीतील नोकरी सोडून हॉटेल व्यवसायामध्ये उतरल्यामुळे त्याकाळी काही मित्रांनी टीका देखील केली. माझा हा निर्णय काही लोकांना आवडलाही नसेल परंतु माझ्या कुटुंबियांची मला असलेली साथ व मला माझ्या मेहनतीवरती, प्रामाणिक कामावरती असलेला विश्वास, यामुळे हॉटेल व्यवसायातील सुरुवातीच्या काळात मी अडचणींवरती  मात करून, हॉटेल व्यवसायातील प्रगतशील वाटचालीसाठी चांगली सुरुवात केली. पुण्यात भारती विद्यापीठला "ओम साई स्नॅक्स सेंटर" नावाने आम्ही हॉटेल चालू केल्यानंतर सुरुवातीला चहा, पोहे, वडापाव या तीन खाद्यपदार्थांनी आमचे छोटेसे हॉटेल चालू केले तरीदेखील आम्हाला सुरुवातीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला." असे हॉटेल आवाळे मिसळ या ब्रँडचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

कुठल्याही व्यवसायाची सुरुवात केल्यानंतर सामान्य माणसासाठी सुरुवातीचा काळ हा कठीणच असतो. हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक असणारी समर्पण वृत्ती, जिद्द, चिकाटी व मेहनत यामुळे हनुमंत आवाळे अल्पावधीतच हॉटेल व्यवसायिक म्हणून पुण्यात भारती विद्यापीठ परिसरामध्ये,पुणे शहरात लोकप्रिय झाले. हॉटेलच्या सुरुवातीच्या काळात आवाळे दाजींचा वडापाव हा ब्रँड खूप लोकप्रिय झाला. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

"हॉटेल ओम साई स्नॅक्स सेंटर मधील खाद्यपदार्थांची उत्कृष्ट चव व हनुमंत आवाळे यांची ग्राहकांना मिळालेली उत्तम सेवा यामुळे अल्पावधीतच हनुमंत आवाळे हे ग्राहकांचे आवडते आवाळे दाजी कसे झाले हे त्यांनाही कळून आले नाही."

"पुण्यात भारती विद्यापीठ परिसरामध्ये हॉटेल ओम साई स्नॅक्स सेंटर चालू झाल्यानंतर पहिले चार महिने खूप अडचणींना सामोरे जावे लागले परंतु त्यानंतर हनुमंत आवाळे यांचा हॉटेल व्यवसायात चांगला जम बसायला सुरुवात झाली. हनुमंत आवाळे यांच्या हॉटेलमधील खाद्यपदार्थांना शेकडो लोकांची पसंती मिळाल्यानंतर त्यांनी सहा महिन्यातच "आवाळे मिसळ' चालू केली."

"ग्राहक हे माझ्यासाठी  दैवत आहेत. आमच्या हॉटेलच्या ग्राहकांना चविष्ट खाद्यपदार्थ देण्याचा नेहमीच आमचा प्रयत्न असतो. आमच्या हॉटेलचा वडापाव लोकांना आवडू लागल्यानंतर आम्ही आमच्या शेकडो ग्राहकांसाठी "आवाळे मिसळ" चालू केली. आमच्या आवाळे मिसळला चांगला आकार देण्यासाठी,उत्कृष्ट चवीसाठी माझी पत्नी व कुटुंबीयांनी खूप मोठी साथ दिली. माझी पत्नी यमुना आवाळे कोकणातील असल्यामुळे घरगुती उत्कृष्ट मसाले वापरून, आम्ही ग्राहकांसाठी उत्कृष्ट चवीची मिसळ तयार केली आणि ती पुणे शहरात अल्पावधीतच हजारो ग्राहकांना आवडली आणि अल्पावधीचा आवाळे मिसळ हा ब्रँड पुण्यातील लोकांनी डोक्यावरती घेतला याचे खूप समाधान आहे." असे "आवाळे मिसळ" या हॉटेल ब्रँडचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

आयुष्यात कुठलाही साहसी निर्णय घेतल्यानंतर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल आणि तुम्ही प्रामाणिकपणे, जिद्दीने, चिकाटीने मेहनत घेतली तर त्या क्षेत्रात तुम्हाला नक्कीच चांगले यश मिळते. हे हनुमंत आवाळे यांनी आवाळे मिसळ हा हॉटेल ब्रँड अल्पावधीतच हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचवून दाखवून दिलेले आहे.

पुणे शहरात शेकडो हॉटेल सुरू होतात परंतु अल्पावधीतच बंद पडतात. हनुमंत आवाळे यांनी हॉटेल व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात "आवाळे वडापाव" लोकप्रिय झाल्यानंतर ते आवाळे मिसळच्या माध्यमातून  उत्कृष्ट चव व उत्तम सेवा यामुळे हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचले. हनुमंत आवाळे यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केल्यानंतर काही वर्षातच "हॉटेल आवाळे मिसळ" हा ब्रँड आवाळे कुटुंबियांचे कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा,हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट, हजारो ग्राहकांना दिलेली उत्कृष्ट चवीची मिसळ व उत्तम सेवा यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाला.

कुठल्याही व्यवसायात योग्य दिशेने प्रचंड कष्ट व मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. हॉटेल आवाळे मिसळ या ब्रॅंडचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे रोज 10 - 12 तास काम करून हॉटेलमधील येणाऱ्या शेकडो ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी कार्यतत्पर असतात. पुण्यातील प्रसिद्ध भारती विद्यापीठ परिसरातील शनी चौकामध्ये हॉटेल आवळे मिसळ, कमी जागेमध्ये सुरू झाल्यानंतरसुद्धा शेकडो ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी हनुमंत आवाळे व त्यांच्या कुटुंबीयांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप उत्तम व्यवस्थापन केले.

"आमची घरगुती मसाल्याचा वापर करून बनवलेली, ग्रामीण भागातील स्वाद असलेली चविष्ट, अस्सल मिसळ अल्पावधीतच शेकडो - हजारो लोकांच्या पसंतीस उतरल्यामुळे आवाळे मिसळच्या आम्हाला मोठ्या ऑर्डर घेता आल्या. हॉटेल आवाळे मिसळच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र हांडे यांची 1200 मिसळची मोठ्या कार्यक्रमाची ऑर्डर आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यानंतर आम्हाला कुठेच व्यावसायिक प्रगतीमध्ये मागे वळून पाहायची गरज पडली नाही. मुंबईतील प्रसिद्ध महानंदा डेअरीच्या 6000 मिसळची मोठ्या कार्यक्रमाची ऑर्डर देखील आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केली. याचे खूप समाधान आहे व आमच्या सहकाऱ्यांचा, हॉटेलच्या टीमचा, मला अभिमान वाटतो." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

हॉटेलमध्ये येणाऱ्या शेकडो ग्राहकांना नक्की काय आवडते? या खाद्य संस्कृतीची नस हनुमंत आवाळे यांना माहित झाल्यामुळे, हॉटेल आवाळे मिसळने अल्पावधीतच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो ग्राहकांना उत्कृष्ट मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी पुण्यात हॉटेल आवाळे मिसळमध्ये येण्यास भाग पाडले.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

"आमच्या हॉटेल आवाळे मिसळच्या शेकडो - हजारो ग्राहकांना उत्कृष्ट मिसळ देण्यासाठी आम्ही खूप प्रयोग केले. चांगल्या मिसळच्या रेसिपीसाठी खूप मेहनत घेतली. आवाळे मिसळचे सॅम्पल, मसाला यासाठी माझ्या पत्नीने खूप मेहनत घेतली. तिचे खूप मोठे योगदान आहे. आमची आवाळे मिसळ अल्पावधीतच पुणे शहरातील शेकडो - हजारो लोकांना आवडलीच परंतु आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो ग्राहक आवर्जून आवडीने आमची आवाळे मिसळ खायला येतात. शाळेतील मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वांनाच आमची मिसळ आवडते याचे खूप समाधान वाटते." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

"पुण्यात वॉशिंग सेंटरवरती गाड्या धुण्याचे काम करणारा तरुण, घड्याळाच्या दुकानात काम करणारा तरुण, डेक्कन होंडा शोरूमला नऊ वर्ष काम करणारा युवक नोकरीतील आरामदायी आयुष्य सोडून, साहसी निर्णय घेऊन हॉटेल व्यवसायात उतरतो सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करून, जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने अल्पावधीतच पुणे शहरात  उत्कृष्ट मिसळ देणाऱ्या हॉटेल क्षेत्रातील "आवाळे मिसळ" हा ब्रँड हजारो लोकांपर्यंत पोहोचवतो. हॉटेल व्यवसायातून हजारो ग्राहकांना उत्तम सेवा देऊन लाखो रुपये कमवतो. पोलीस अधिकारी, नगरसेवक, आमदार वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित मंडळी आवाळे मिसळचा आस्वाद घ्यायला आवर्जून येतात. हा आवाळे मिसळ या ब्रॅंडचे सर्वेसर्वा असणाऱ्या हनुमंत आवाळे यांचा प्रवास तरुण पिढीसाठी खूपच प्रेरणादायी आहे."

"आमच्या हॉटेलमध्ये मिसळ खायला येणाऱ्या शेकडो ग्राहकांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. पुणे शहरातील तरुण वर्ग,अधिकारी वर्ग, नगरसेवक, आमदार, सकाळच्या वेळेला व्यायाम करायला येणारा युवा वर्ग,डॉक्टर, इंजिनिअर, खेळाडू वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आमची आवाळे मिसळ खायला आवर्जून येतात आणि मनापासून कौतुक करतात. हे चित्र आम्हाला सर्वांना खूप प्रेरणा देणारे असते. आवाळे मिसळची उत्तम चव, चांगला दर्जा व प्रामाणिक सेवा यामुळे या सर्व दिग्गज मंडळीचा आमच्यावरती असलेले विश्वास पाहून आम्हाला खूप ऊर्जा मिळते." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

कुठल्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कष्ट, मेहनत व प्रामाणिकपणा लागतोच त्याचबरोबर व्यवसाय करत असताना कितीही कठीण प्रसंग आला तरी तुमच्या डोक्यावरती बर्फ व जिभेवरती साखर हवी. हनुमंत आवाळे यांच्या प्रेमळ, दिलदार, माणुसकीबाज स्वभावामुळे त्यांनी अनेक चांगली लोकं जोडलेली आहेत. आवाळे दाजींच्या निस्वार्थ, प्रामाणिक व प्रेमळ स्वभावावरती प्रेम करणारी शेकडो  लोकं आहेत. हॉटेल आवाळे मिसळ हा ब्रँड होण्यासाठी हनुमंत आवळे यांची पत्नी, मुलगा, त्यांचे कुटुंबीय व मित्र यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.

"आपल्या कुटुंबातील सदस्यांची साथ असेल तर कुठलाही व्यवसायात आपल्याला मोठी झेप घेता येते. हॉटेल आवाळे मिसळ हा ब्रँड होण्यासाठी,हॉटेलच्या प्रगतशील वाटचालीसाठी माझी पत्नी यमुना आवाळे, मुलगा संस्कार आवाळे व कुटुंबीयांचे मोलाचे योगदान आहे. माझ्या अनेक मित्रांचे खूप चांगले सहकार्य लाभले. आमचे मित्र, मार्गदर्शक संतोष धनकवडे पाटील यांचेही नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. आमच्या हॉटेलमधील बाबू,शंभू व गणेश या कामगारांचेही खूप महत्त्वाचे योगदान आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आवाळे मिसळवरती प्रेम करणारे शेकडो - हजारो ग्राहक यांच्यामुळेच आज आम्ही हॉटेल व्यवसायात चांगले काम करू शकलो. आमचे सहकारी मित्र रमेश मोरे, आमचे मामा रोहिदास भाटे या सर्वांचे  खूप चांगले सहकार्य मिळाले.  मित्र,नातेवाईक, सहकारी ही सर्व आपली माणसं सोबतीला असल्यामुळे आमच्या हॉटेल आवाळे मिसळचा प्रवास सुखकर झाला." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

कुठल्याही सामान्य माणसाच्या आयुष्यात, आपले पुणे शहरात नवीन घर असावे. आपण एखादी नवीन कार घ्यावी हे खूप मोठे स्वप्न असते. जेव्हा हे स्वप्न पूर्ण होते त्यावेळेस त्या सामान्य माणसाला खूप आनंद होतो. हॉटेल आवाळे मिसळच्या प्रगतशील वाटचालीतील काही वर्षांमध्येच हनुमंत आवाळे यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली नवीन कार घेतली. मारुती सुझुकी या ब्रॅण्ड कंपनीचे लक्झरीस कार घेतल्यानंतर हनुमंत आवाळे यांच्या कुटुंबियांना, आई-वडिलांना खूप आनंद झाला. हनुमंत आवाळे यांच्या आई - वडिलांना त्यांच्या मुलाचा खूप अभिमान वाटला.

"कुठल्याही व्यक्तीची आयुष्यातील पहिली नवीन कार हा खूपच आनंददायी व संस्मरणीय क्षण असतो. जेव्हा मी मारुती सुझुकी या ब्रँड कंपनीची लक्झीरियस कार घेऊन गावाला पूजन करण्यासाठी गेलो त्यावेळी माझ्या आई-वडिलांना, मित्रांना व नातेवाईकांना खूप आनंद झाला. माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील समाधान मला खूप ऊर्जा देऊन गेले. आपली पूर्ण झालेली स्वप्न आई-वडिलांनी पाहणे आणि आपलं कौतुक करून, प्रेरणा देणे ही खूपच समाधान देणारी गोष्ट आहे." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

आपल्या मुलाने प्रचंड कष्ट, मेहनत घेऊन पुणे शहरात हॉटेल क्षेत्रातील हॉटेल आवाळे मिसळ हा ब्रँड तयार करून उत्कृष्ट चव व प्रामाणिक सेवा देऊन हजारो ग्राहकारापर्यंत पोहोचवला. हॉटेल व्यवसायाच्या प्रगतशील वाटचालीमध्ये आपला मुलगा त्याची स्वप्न पूर्ण करतोय हे पाहून कुठल्याही आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाही.

कुठल्याही व्यवसायात यश मिळवायचे असेल तर प्रचंड कष्ट व मेहनत घ्यावे लागतात. कितीही अडचणी, संकटे आले तरी त्यावरती धैर्याने मात करावी लागते. हनुमंत आवाळे पहाटे पाच वाजता हॉटेलमध्ये जाऊन मिसळ व  खाद्यपदार्थ बनवण्याच्या  तयारीसाठी कामाला सुरुवात करतात. हॉटेल आवाळे मिसळमध्ये हनुमंत आवाळे पहाटे पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी साडे आठ वाजेपर्यंत 12 - 13 तास त्यांच्या शेकडो ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी रोज मेहनत घेतात. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ बनवत असताना हनुमंत आवाळे यांच्या पायावरती गरम तेल सांडल्यानंतर त्यांना जी गंभीर दुखापत झाली होती ती बरी होण्यासाठी सहा महिने उपचार घ्यावे लागले. अशा वेळेस देखील  हॉटेलवरती जाऊन ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी हनुमंत आवळे हॉटेलमध्ये कार्यरत होते. या कठीण काळात हनुमंत आवाळे यांची पत्नी व मुलगा यांनी हॉटेलच्या संपूर्ण व्यवस्थापनामध्ये खूप सहकार्य केले.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

"हॉटेल व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येत असतात. आमच्या हॉटेलमध्ये मिसळ बनवत असताना दुर्दैवाने गरम उकळते तेल चुकून माझ्या पायावरती सांडले गेले त्यामुळे पायाला गंभीर दुखापत झाली होती.तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. माझ्या पायाची जखम बरी होण्यासाठी चार - सहा महिन्याचा काळ गेला. या काळात माझी पत्नी व मुलाचे हॉटेलचे व्यवस्थापनामध्ये खूप सहकार्य मिळाले. मी देखील या काळात माझ्या आरोग्याची काळजी घेऊन, आमच्या ग्राहकांना प्रामाणिक सेवा देण्याचा प्रयत्न केला. कुठलेही आजारपण असो किंवा गंभीर दुखापत असो उपचार घेतल्यानंतर, ज्यावेळेस आमच्या हॉटेलमध्ये येतो  त्यावेळेस हॉटेलमध्ये मिसळ खायला येणाऱ्या आमच्या शेकडो ग्राहकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आम्हाला खूप ऊर्जा मिळते" असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

पुणे शहरात चमचमीत, रुचकर, स्वादिष्ट मिसळ देणारी शेकडो हॉटेल्स आहेत. पुण्यात हॉटेल व्यवसायात खूप मोठी स्पर्धा आहे. असे असताना देखील हॉटेल आवाळे मिसळ हा ब्रँड हनुमंत आवाळे यांनी प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, समर्पणवृत्ती, उत्तम दर्जाची स्वादिष्ट मिसळ व ग्राहकांना दिलेली उत्तम सेवा यामुळे आवाळे दाजींची मिसळ खायला शेकडो ग्राहक रोज आनंदाने येतात.

"महाराष्ट्रात चविष्ट, रुचकर मिसळ देणारी शेकडो, हजारो हॉटेल्स आहेत. पुणे शहरात देखील हॉटेल व्यवसायात खूप मोठी स्पर्धा आहे. मागील दहा वर्षात हॉटेल आवाळे मिसळने हजारो ग्राहकांना दिलेली उत्तम सेवा व आमची चविष्ट, घरगुती मसाल्यातील, उत्तम दर्जाची मिसळ यामुळे आजही रोजचे 200 ते 300 ग्राहक आमच्या चविष्ट मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी येतात. प्रत्येक आठवड्यातील शनिवार - रविवार तर खूप गर्दी असते. प्रत्येक रविवारी 600 ते 1000 ग्राहक आमच्या आवाळे मिसळचा आस्वाद घेण्यासाठी येतात. आमच्या हॉटेलमध्ये भरपूर गर्दी असल्यानंतर  आमचे ग्राहक अक्षरशः गाडीवरती बसून वडापाव व मिसळीचा आस्वाद घेतात. ग्राहकांच्या आवडीची आम्ही विशेष लक्ष देऊन, काळजी घेत असतो." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

पुणे शहरात मागील दहा वर्षात यशस्वी हॉटेल व्यवसायिक म्हणून नाव मिळवल्यानंतरही हनुमंत आवाळे यांनी आपल्या गावाशी माणुसकीची नाळ भक्कमपणे जोडून ठेवलेली आहे. गावामध्ये होणाऱ्या विविध सामाजिक, अध्यात्मिक उपक्रमात हनुमंत आवाळे सक्रियपणे सहभाग घेतात. पुणे जिल्ह्यातील, भोर तालुक्यातील देवळे या गावात हनुमंत आवाळे यांनी नवरात्र उत्सवात संपूर्ण "गावासाठी मिसळ" हा सामाजिक उपक्रम राबवला.

"माझ्या गावाचा, माझ्या कुटुंबीयांचा माझ्या जडणघडणीमध्ये व प्रगतीमध्ये खूप मोठे योगदान आहे. आमच्या दिवळे गावाशी असलेली माणुसकीची नाळ मी कधीच तोडली नाही. गावातील विविध सामाजिक उपक्रमात, अध्यात्मिक उपक्रमात मी मनापासून सहभाग घेतो. नवरात्रउत्सव काळात मला माझ्या गावातील हजारो लोकांना आमच्या आवाळे मिसळचा आस्वाद देण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. ज्या हॉटेल आवाळे मिसळने मला पुणे शहरात हॉटेल व्यवसायात मोठे केले त्या आवाळे मिसळचा आस्वाद माझ्या गावातील हजारो बांधवांना देण्याची मला संधी मिळाली याचे खूप समाधान वाटते. आमच्या गावातील लोकांनाही हा नवरात्रउत्सव काळातील गावकऱ्यांसाठीचा मिसळ उपक्रम खूप आवडला. या गोष्टीचा विशेष आनंद आहे." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

पुणे शहरातील तरुणाईमध्ये "आवाळे दाजी" खूप लोकप्रिय आहेत. हनुमंत आवाळे यांचा निस्वार्थी, प्रामाणिक, दिलदार, प्रेमळ स्वभाव व हॉटेलमध्ये येणाऱ्या हजारो ग्राहकांना दिलेली उत्तम सेवा यामुळे तरुण पिढी त्यांच्याशी जोडली गेलेली आहे. पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचे सांस्कृतिक कार्यक्रम असो की अध्यात्मिक कार्यक्रम असो की सामाजिक उपक्रम असो हनुमंत आवाळे सर्वांना मनापासून मदत करतात. पुण्यातील शेकडो संख्येने असलेल्या मित्र परिवाराला, हनुमंत आवाळे अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात आपला आधारस्तंभ वाटतात.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"पुणे शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या आमच्या मित्रपरिवारचे, आमच्या हॉटेल व्यवसायाला नेहमीच सहकार्य लाभलेला आहे. आमचे नवयुग गणेशोत्सव मंडळ, धर्मवीर गणेशोत्सव मंडळ, साईनाथ गणेशोत्सव मंडळ, जयनाथ गणेशोत्सव मंडळ व पुण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळाचे आम्हाला नेहमीच सहकार्य असते. पुण्यातील आमच्या गणेशोत्सव मंडळांच्या विविध सामाजिक उपक्रमात, सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होऊन, गणपती बाप्पाची सेवा करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मागील दहा वर्षात आमच्या हॉटेल आवाळे मिसळच्या माध्यमातून हजारो ग्राहकांना दिलेली उत्तम सेवा यामुळे हजारो लोकांचे मिळालेले प्रेम हीच आमच्यासाठी खूप मोठी संपत्ती आहे." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

पुण्यासारख्या मोठ्या शहरात आजकालच्या प्रचंड महागाईमुळे नवीन घर घेणे सोपे राहिले नाही. पुण्यात नोकरीसाठी, उपजीविका भागवण्यासाठी आलेल्या हनुमंत आवाळे यांनी काही वर्षातच हॉटेल व्यवसायामध्ये चांगली प्रगती केल्यानंतर, स्वतःचे नवीन घर लक्झरीयस मोठा फ्लॅट घेतला.

"पुण्यात आपलं स्वतःचं घर असावं अशी माझ्या पत्नीची व कुटुंबियांची खूप मोठी इच्छा होती, खूप मोठे स्वप्न होते. अनेक वर्ष हॉटेल व्यवसायामध्ये आमच्या कुटुंबीयांनी एकजुटीने केलेले कष्ट, मेहनत यामुळे आम्हाला पुण्यात स्वतःचा नवीन लक्झरीयस मोठा फ्लॅट, नवीन घर घेता आले याचे खूप समाधान वाटते. आपल्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादामुळे आपली सर्व स्वप्न पूर्ण होणे हे खूप मोठे भाग्य आहे." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

"पुणे शहरातील मिसळीचा प्रसिद्ध ब्रँड हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांचे वडील रामचंद्र आवाळे व आई  मालन आवाळे यांचे हनुमंत आवाळे यांच्या हॉटेल व्यवसायातील प्रगतशील वाटचालीमध्ये खूप मोठे योगदान आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद व शक्ती मुलांच्या पाठीशी असल्यानंतर जगातील कुठलाही मोठ्या संकटावरती मात करून, मुले त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून कर्तुत्वाच्या मोठ्या शिखरावरती नक्कीच पोहोचतात."

"माझा जन्म ग्रामीण भागात, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाल्यामुळे माझ्या शेतकरी आई-वडिलांचे मला मिळालेले संस्कार,आशीर्वाद,मार्गदर्शन व प्रत्येक कठीण प्रसंगात मिळालेला मौल्यवान आधार यामुळेच मी आयुष्यात हॉटेल व्यवसायात प्रगतशील वाटचाल करून, काहीतरी चांगले करू शकलो. याचे खूप समाधान वाटते. आई-वडिलांचा हात तुमच्या पाठीवरती असल्यानंतर तुम्ही जगातील कुठल्याही क्षेत्रात मोठे काम करून, चांगले यश मिळवू शकता." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

पुण्यातील हॉटेल आवाळे मिसळ हा ब्रँड मोठा होण्यासाठी हनुमंत आवाळे यांच्या पत्नी यमुना आवाळे व त्यांचा मुलगा यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. ज्या उत्कृष्ट चवीच्या मिसळीमुळे हॉटेल आवाळे मिसळ ब्रँड झाला त्या मिसळीच्या रेसिपीसाठी यमुना आवाळे यांनी खूप कष्ट व मेहनत घेतलेली आहे. हनुमंत आव्हाळे यांचा मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना देखील, हॉटेलमधील सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी खंबीरपणे पार पाडतो.

"माझी पत्नी यमुना आवाळे ही आमच्या कुटुंबासाठी लक्ष्मी आहे. आमचे हॉटेल आवाळे मिसळ हे ब्रँड होण्यासाठी, उत्कृष्ट खाद्यपदार्थासाठी माझ्या पत्नीने मनापासून मेहनत घेतली. चविष्ट आवळे मिसळसाठी तिने बनवलेले घरगुती मसाले, पाट्यावरचे वाटण, मिसळच्या उत्कृष्ट रेसिपीसाठी तिने खूप मेहनत घेतलेली आहे. आमच्या हॉटेलमध्ये ग्राहकांची कितीही गर्दी झाली तरी माझा मुलगा उत्तमरित्या व्यवस्थापन करतो याचे मला खूप समाधान व अभिमान वाटतो. आमच्या कुटुंबीयांच्या एकजुटीपणामुळे व प्रामाणिकपणामुळे आम्ही हॉटेल व्यवसायात  चांगले काम करत आहोत याचे खूप समाधान वाटते." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

हॉटेल व्यवसायात प्रामाणिक कामगारांची खूप मोठी मागणी असते.अनेक हॉटेलमध्ये कामगार टिकत नाहीत पण हनुमंत आवाळे यांचा माणुसकीबाज, प्रामाणिक व प्रेमळ स्वभाव असल्यामुळे तसेच त्यांच्या हॉटेलमधील प्रत्येक कामगाराची ते घरातल्या सदस्यागत काळजी घेत असल्यामुळे, अनेक वर्ष त्यांच्याकडे हॉटेलमध्ये कामगार टिकून राहून, प्रामाणिकपणे काम करतात.

"आम्ही आमच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला देवासमान मानतो. आमच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची आम्ही खूप काळजी घेतो. जशी आम्ही आमच्या ग्राहकांची काळजी घेतो तसेच आमच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराची देखील मनापासून काळजी घेतो. आमच्या हॉटेलमधील कामगार म्हणजे आमच्या परिवारातील सदस्य आहेत. त्यांना आम्ही काहीच कमी पडून देत नाही. आमच्या हॉटेलमधील तीन कामगार अनेक वर्ष प्रामाणिकपणे आमच्याकडे काम करत आहेत. आमच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या शेकडो ग्राहकांना आम्ही उत्तम सेवा देऊन, आमची उत्कृष्ट चवीची मिसळ खाल्ल्यानंतर, त्यांच्या चेहऱ्यावरती  जे समाधान दिसते ते आमच्यासाठी खरी संपत्ती आहे." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल आवाळे मिसळ हा ब्रँड हजारो लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे अनेक व्यावसायिक लोक हॉटेल आवाळे मिसळची फ्रॅंचायजी मागण्यासाठी येतात परंतु हनुमंत आवाळे यांचे हॉटेलची फ्रॅंचायजी देण्याबाबत खूप वेगळे धोरण आहे.

"आज तरुण पिढीने कुठल्याही व्यवसायात झोकून देऊन काम केले पाहिजे.आजच्या तरुण मुलांना लगेच मोठे व्हायचे असते. परंतु कुठल्याही क्षेत्रात मोठे होण्यासाठी खूप कष्ट, मेहनत घ्यावी लागते. अनेक अडचणींचा, संकटांचा सामना करावा लागतो. समर्पण वृत्तीने उत्कृष्ट कामगिरी करावी लागते. आमच्या आवाळे मिसळचा ब्रँड हजारो लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक व्यावसायिक मंडळी आमच्या आवाळे मिसळची फ्रॅंचायजी घेण्यासाठी आमच्याकडे येतात. परंतु आमच्या हॉटेल आवाळे मिसळची फ्रँचायजी देण्यासाठीचे  माझे धोरण व नियोजन खूप वेगळे आहे. आमच्या हॉटेल आवाळे मिसळची शाखा घरातील व्यक्तींनाच देऊन, जवळच्या विश्वासू व्यक्तींनाच देऊन, त्यांना मोठे करायचे आहे. हॉटेल आवाळे मिसळचे नाव, दर्जा, गुणवत्ता आम्हाला टिकवून ठेवायचा आहे. यामुळेच आम्ही हॉटेलच्या फ्रॅंचाईजी मॉडेलच्या मागे न धावता, ग्राहकांना उत्तम सेवा व उत्कृष्ट खाद्यपदार्थ कसे देता येईल हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

"आजच्या काळात पालकांनी मुलांवरती चांगले संस्कार करणे खूप गरजेचे आहे. मुलांना चांगली संगत असणे खूप आवश्यक आहे. कुठल्याही व्यवसायात पहिले तीन वर्ष झोकुन देऊन काम केलं तर नक्कीच चांगले यश मिळते. व्यवसायात जेवढ्या अडचणी जास्त तेवढे यश मोठे मिळते. आजच्या काळातील मुलांना, तरुणांना व्यवसायासाठी खूप मोठ्या संधी आहेत. फक्त एकाच व्यवसायावरती फोकस देऊन, पहिले तीन वर्ष कष्ट केले, मेहनत घेतली तर तोच व्यवसाय तुम्हाला मोठे केल्याशिवाय राहणार नाही." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"आमच्या हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक हा माझ्यासाठी देव आहे. आमच्या ग्राहकांची सेवा मी आयुष्यभर प्रामाणिकपणे करणार. आमच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या हजारो ग्राहकांचे प्रेम व आशीर्वाद मिळाल्यामुळेच आज आम्ही प्रगतीच्या एका चांगल्या उंचीवरती  पोहोचू शकलो. समाजातील विविध घटकांची सेवा करत, हॉटेल आवाळे मिसळ हा ब्रँड कर्तृत्ववान तरुण पिढीच्या मदतीने, संपूर्ण महाराष्ट्रभरात पोहोचवायचा आमचा मानस आहे." असे हॉटेल आवाळे मिसळचे सर्वेसर्वा हनुमंत आवाळे यांनी सांगितले.

"पुण्यातील प्रसिद्ध आवाळे मिसळ हा जसा मिसळीचा ब्रँड आहे तसाच आवाळे दाजी हा माणुसकीचा, प्रेमाने लोकांना जोडणारा ब्रँड आहे. असे हनुमंत आवाळे यांच्या मित्रपरिवारातील अनेक लोक सांगतात."

"पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला मुलगा ते बाराव्या वर्षापासून काबाडकष्ट करून, वडिलांना साथ देणारा मुलगा ते गावाकडच्या रानात गुरे हाकणारा मुलगा ते पुण्यात वॉशिंग सेंटरवरती गाड्या धुणारा तरुण ते घड्याळाच्या दुकानात काम करणारा तरुण ते पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन होंडा या गाड्यांच्या शोरूममध्ये नऊ वर्ष काम करणारा युवक ते वडापावच्या गाडीवरती मामाला मदत करणारा तरुण ते महाराष्ट्रातील हजारो ग्राहकांना उत्तम सेवा देणाऱ्या, हॉटेल व्यवसायातून लाखो रुपये कमावणाऱ्या हॉटेल आवाळे मिसळ या ब्रँडचे सर्वेसर्वा, यशस्वी हॉटेल उद्योजक, कर्तृत्ववान शिलेदार हनुमंत आवाळे यांचा संघर्षमय, प्रेरणादायी,विलक्षण प्रवास महाराष्ट्रातील तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे."


पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल आवाळे मिसळ या ब्रँडचे सर्वेसर्वा, प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक, कर्तृत्ववान शिलेदार हनुमंत आवाळे यांच्या भावी प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा....

लेखक : अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.


No comments:

Post a Comment