मुंबई,दिनांक ३१ : कोरोना महामारी काळात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन काळात अनेक कडक निर्बंध लादले होते. पण महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनलॉक 4 ची नियमावली जाहीर केली त्यामध्ये मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठवलेली आहे. महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर आज राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. येत्या 2 सप्टेंबरपासून याची अमंलबजावणी केली जाणार आहे.महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिलेल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगिन अगेन नियमावलीनुसार, मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. हॉटेल आणि लॉज व्यावसायिकांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल आणि लॉज यांना पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रवासासाठी खासगी बस, मिनी बस तसेच इतर वाहनांना ही परवानगी दिलेली आहे. यासंबंधीची सर्व नियमावली परिवहन आयुक्तांमार्फत जारी केली जाईल.
अनलॉक 3 प्रमाणेच या नवीन नियमावलीत मेट्रो, सिनेमा गृह हे बंदच राहणार आहेत. शिक्षण क्षेत्र - शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संस्थाही बंद राहणार आहेत. स्विमिंग पूल, करमणूक केंद्र, सिनेमा हॉल, नाट्य गृह, (मॉलमधील सिनेमाहॉलसह) बार परमीट रूमही बंदच राहतील.
No comments:
Post a Comment