मुंबई - दिनांक 20 : पुरंदर तालुक्यातील तोंडल या गावचे रहिवासी असलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी विनायक बाबर यांचे कोरोना संसर्गामुळे मुंबई येथे दुःखद निधन झाले.देवनार पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक विनायक बाबर यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना दिनांक ०९/०८/२०२० रोजी डॉ डी वाय पाटील रुग्णालय ,नेरूळ ,नवी मुंबई येथे दाखल केले होते. त्यांना पुढील उपचारार्थ काल रोजी ICU मध्ये हलवण्यात आले होते. आज दिनांक २०/०८/२०२० रोजी पहाटे ०३:45 वाजता ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून ते कामोठे ,नवी मुंबई येथे राहत होते. विनायक बाबर यांचे मूळ गाव मु.पो. तोंडल, तालुका -पुरंदर, जिल्हा पुणे हे असून सदर ठिकाणी त्यांचे आई, वडील, भाऊ व त्याची पत्नी राहतात. विनायक बाबर यांचे मित्रपरिवार आणि शिक्षकवर्ग यांनाही तीव्र शोक व्यक्त केला. विनायक बाबर हे अनेकांचे आवडते व्यक्तिमत्त्व असल्याने पुरंदर तालुक्यातील तोंडल,वीर या पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली आहे.पुरंदरचा कोरोना योद्धा हरपल्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment