पुणे, दि. 3 : - पुणे शहरातील धनकवडी येथील सर्व्हे नंबर 34, मोहननगर मधील नवीन क्रीडांगणाला 'छत्रपती संभाजीराजे' यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शंभू प्रेमींनी व स्थानिक नागरिकांनी केलेली आहे.
'धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समितीतर्फे' पुणे शहर उपमहापौर सुनिता वाडेकर, पुणे महापालिका उपायुक्त कुणाल खेमनार, नाव समिती, स्थानिक नगरसेविका वर्षा तापकीर तसेच प्रभागातील स्थानिक नगरसेवक किशोर धनकवडे, नगरसेवक विशाल तांबे, नगरसेविका अश्विनी भागवत यांना समितीतर्फे छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आलेले आहे.
प्रभाग क्रमांक 34 मधील स्थानिक नगरसेवक किशोर धनकवडे, नगरसेवक विशाल तांबे व नगरसेविका अश्विनी भागवत यांनी मोहन नगर, स.न. ३४ येथे होणाऱ्या क्रीडांगणाला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे देण्यात येणाऱ्या नावाच्या मागणीला सहमती देऊन या विषयीचे नाहरकत पत्र धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समितीला देऊन आपली संमती दर्शविली आहे.
"मोहन नगर येथील नवीन क्रीडांगणाला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्यात यावे अशी आम्हा सर्व शंभू भक्तांची व स्थानिक नागरिकांची मागणी आहे."
"छत्रपती संभाजी राजेंच्या गौरवशाली इतिहासातून तरुणांना मोठी प्रेरणा मिळत असते. छत्रपती संभाजी राजेंच्या गौरवशाली नावातून सर्वांना प्रेरणा मिळेल." अशी प्रतिक्रिया शंभूप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते संतोष साठे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"प्रभाग क्रमांक 39 मधील नवीन झालेल्या क्रीडांगणाला 'धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज' हे नाव देण्यात यावे या करिता धनकवडी मधील नागरिक व सर्व शिवभक्त व शंभुभक्त यांच्या वतीने स्थानिक नगरसेवक व पालिका प्रशासन यांना निवेदन देण्यात आले."
"स्थानिक नागरिकांच्या व शंभू भक्तांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर नामकरण व्हावे हीच सर्व शिवशंभू भक्त यांची मागणी आहे." अशी प्रतिक्रिया पतीत पावन संघटना खडकवासला विभाग अध्यक्ष विजय क्षीरसागर यांनी दिली.
धनकवडी परिसरातील स्थानिक नागरिकांच्या व शंभू भक्तांच्या भावना प्रशासनाने लक्षात घेऊन नवीन क्रीडांगणाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्यात येईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
मराठा युवा फाऊंडेशनचा शंभूप्रेमींच्या या मागणीला जाहिर पाठिंबा...
ReplyDelete