पुणे, दि.15 : - महाराष्ट्र राज्य सरकारच्या ई पीक पाहणी उपक्रमांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतातील पिकांची नोंदणी ई पिक पाहणी या ॲप वर करत असताना अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण, कामगार, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई पीक पाहणी अंमलबजावणी करण्याकरिता शेतकऱ्यांवर सक्ती करु नये तसेच शासकीय यंत्रणेद्वारे पीक पाहणी करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी शिवाजी हळणवार यांनी सरकारच्या "ई पीक पाहणी" उपक्रमाबद्दल रोखठोक मत व्यक्त करून आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे रोष व्यक्त केला आहे.
सोलापूरचे प्रगतशील शेतकरी शिवाजी हळणवार यांचा ई पीक पाहणी या सरकारच्या उपक्रमाबाबतचा अनुभव व रोखठोक प्रतिक्रिया : -
"सरकारने परवा परिपत्रक काढल.१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरच्या दरम्यान शेतात जा. मोबाईल काढा. त्यावर E - पीक पहाणी ॲप डाऊनलोड करा. त्यात माहिती भरा. सुरुवातीला आलेला ४ अंकी OTP कायमचा लक्षात ठेवा. कोणतं पीक आहे हे त्यात लिहा.पिकासोबतचा तुमचा फोटो अपलोड करा.तलाठी ( भाऊसाहेब ) हे काम करणार नाहीत...!!
"सगळ तुमच्या तुम्ही करा...!'नांगरा कोळपा,पेरा ,धान्य काढा आणि मातीमोल किमतीत बाजारात विकून या...!!कोणाच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना निघाली म्हणायची. ई पीक नोंदणी ...तरीपण शासनाच्या विरोधात जायचं नाही म्हणून" ....
"सकाळी सहा वाजता शेतात गेलो. मोबाईल काढला. ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड केलं. आणि माहिती भरायला सुरुवात केली.ओटीपी आला पटकन डायरीत लिहून घेतला .आमच्या जन्मतारखा आमच्या लक्षात राहत नाहीत. पण हा ओटीपी आता कायमचा लक्षात ठेवायचा. त्यानंतर माहिती भरायला सुरुवात केली."
"नाव ,गाव, गट नंबर, सर्वे नंबर सगळ टाकून झालं.टोमॅटो ( लालचिखल)सोबत उभारून फोटो काढला (दर नसल्याने २ एकरावर रोटर मारला ,जे दिसतंय ते उद्या रोटरतोय ,तो भाग वेगळा) पण डाउनलोड होईना कारण रेंज नव्हती .आता ही तक्रार कोणाकडे करायची. ? भर दुपारी बारा वाजताच्या दरम्यान रेंज आली."
"शेतात ५-६ तास थांबून रेंज येत नसेल तर शेतकऱ्यांनी शेतीची काम ठेवून हेच करत बसायचं का ? मग प्रशासन काय काॅग्रेस, गवत उपटणार आहे का...? मन उद्विग्न करणारे प्रसंग समोर येतात जर ही माहिती नाही भरली तर .आपल्याला ७/१२ मिळणार नाही .आपल्याला विमा मिळणार नाही (तसा तो ३ वर्षांपासून मिळतच नाही)...आपल्याला कोणतीही शासकीय योजना राबवता येणार नाही."...! (शेतकऱ्यांसाठी योजना फक्त कागदावरच असतात म्हणा....)
"या देशात शेतकरी म्हणून जन्माला आलो हा आमचा दोष आहे का ? त्यांनीच दिलेल्या 02025712712 या हेल्पलाईन नंबरला फोन लावला फोनच लागत नाही . भारत हा शेतीप्रधान देश म्हणून डंका पिटला जातो. आता नेमकं मी काय करायचं ,मी सुद्धा हतबल झालो आहे. माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांची ही अवस्था तर सामान्य शेतकऱ्यांनी काय करायचं?
असा सवाल प्रगतशील शेतकरी शिवाजी हळणवार यांनी राज्य सरकारला विचारून शेतकरी वर्गाची व्यथा मांडली आहे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
राज्य सरकारच्या ई पीक पाहणी उपक्रमाचा उद्देश चांगला असला तरी राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा विचार करून राज्य सरकारने शेतकरी हिताचा योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment