Tuesday, September 7, 2021

"महाराष्ट्रातील "या" आदर्श शिक्षकाने 'कोरोना विधवांच्या मुलांना' मदतीची हात देऊन साजरा केला आगळा वेगळा 'शिक्षकदिन'; बारामतीच्या आदर्श शिक्षकाचा प्रेरणादायी सामाजिक उपक्रम"....



बारामती, दि. 7 : - कोरोना महामारीमुळे समाजातील सर्वच घटकांना फटका बसलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून समाजातील दुर्लक्षित घटकांना, पीडित घटकांना मदत करणारे फार कमी लोक आज समाजात आहेत. दरवर्षी शिक्षक दिनाला शिक्षक वेगवेगळे उपक्रम करत असतात. कोरोना विधवांच्या प्रश्नावर संवेदनशील असणारे, सामाजिक जबाबदारीचे भान कृतीतून दाखवून देणारे  बारामतीचे आदर्श शिक्षक लक्ष्मण जगताप यांनी यावर्षी कोरोना विधवांच्या कुटुंबांला मदतीचा हात देऊन सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून शिक्षक दिन साजरा केला. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                   Buy Now

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मराठी विद्यालयात लक्ष्मण जगताप शिक्षक म्हणून  कार्यरत आहेत. शिक्षक दिना दिवशीच लक्ष्मण जगताप यांचा वाढदिवस असतो. प्रत्येक वर्षी या दिवशी बारामतीचे आदर्श शिक्षक लक्ष्मण जगताप वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून शिक्षक दिन व त्यांचा वाढदिवस साजरा करत असतात. 



यावर्षीचा वाढदिवस व शिक्षक दिनाचे औचित्य लक्षात घेऊन त्यांनी अतिशय गरीब कुटुंबातील कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी  तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५००० रुपयांची ठेव पावती दिली. त्यातून या विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षणाला मदत होणार आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भिगवन येथील प्रसाद धनाजी घोरपडे. बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे येथील प्राची राजेंद्र जगताप व बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लिमटेक येथील शंभू दादा खंडाळे  या ३ विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळाला.




"या मुलांच्या वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे या विद्यार्थ्यांची आई मजुरी करते. हे विद्यार्थी बालमजुरीत ढकलले जाऊ नयेत व किमान त्यांच्या शिक्षणाची काळजी घ्यावी यासाठी लक्ष्मण जगताप  यांनी हा निर्णय घेतला. कोरानातील उध्वस्त झालेल्या कुटुंबांना शिक्षक दिनाच्या दिवशी व आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशी ठेव पावती ची मदत करणारे लक्ष्मण जगताप सर हे शिक्षक नव्हे तर समाज शिक्षक आहेत. त्यांच्या  या कृतीला करोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने वंदन. अशीच भूमिका समाजातील सर्वांनी घेतली तर कोरोनात उजाड झालेले संसार नक्कीच सावरले जातील." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी दिली.


Flipkart...Best Offer... Headphones and Speakers Upto 80% Off...Limited Time Deal! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                     Buy Now

"प्रत्येक वर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून माझा वाढदिवस व शिक्षक दिन आम्ही साजरा करत असतो. समाजातील गरजू व्यक्तींना मदत मिळावी हा प्रामाणिक उद्देश असतो. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतूनच  मदत करत असतो अशी प्रतिक्रिया बारामतीचे आदर्श शिक्षक लक्ष्मण जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


समाजातील गरजू व पीडित घटकाला सर्वांनीच मदत करणे गरजेचे आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस व शिक्षक दिन साजरा करणे कौतुकास्पद व प्रेरणादायी उपक्रम आहे.


Ajio Fashion Brand...Best Offer... Get 8 T-Shirts @ Rs 135 Each.... HERE'S HOW:
Add 8 T-shirts To Cart Worth Rs 196 to Rs 200 Use  Code: SUMMER2021 to get Flat Rs 500 Off + Free Shipping SHOP NOW For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                      Buy Now







No comments:

Post a Comment