Sunday, June 19, 2022

"पुरंदर तालुक्यातील 'वीर गावच्या "या" यशस्वी मुलींनी' दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून तालुक्यात मारली बाजी; रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर,श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कुल वीर शाळेचा १००% निकाल"....

 


पुरंदर, वीर, दि.१९ : महाराष्ट्रात यावर्षी दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला.  यावर्षी राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला आहे.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दहावीच्या निकालात मुली आघाडीवर आहेत. मुलींचा निकाल 97.96 टक्के जाहीर झालाय आणि मुलांचा निकाल 96.06 टक्के आहे. राज्यात एकूण 9 विभागीय मंडळांअंतर्गत परीक्षा पार पडली.


पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर गावातील रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर व श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर या विद्यालयांचा दहावीचा 100% निकाल लागलेला आहे.



श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर या विद्यालयाच्या समृद्धी संभाजी शेडगे या विद्यार्थिनीने दहावीला 97 .40% टक्के गुण मिळवून, तालुक्यातील परिंचे केंद्रात प्रथम, विद्यालयात प्रथम व  पुरंदर तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवले.




याच विद्यालयाच्या श्रावणी संजय चवरे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 97% गुण मिळवून परिंचे केंद्रात द्वितीय, विद्यालयात द्वितीय व पुरंदर तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवले. याच विद्यालयाच्या प्रणाली किरण जगताप या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 95 टक्के मार्क्स मिळवून परिंचे केंद्रात तिसरा क्रमांक, विद्यालयात तिसरा क्रमांक पटकावून यश मिळवले आहे.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीरच्या दहावीतील यशस्वी विद्यार्थिनींनी दहावीच्या निकालात पुरंदर तालुक्यात बाजी मारल्यामुळे, संपूर्ण तालुक्यात तसेच वीर पंचक्रोशीमध्ये त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे.


रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर या विद्यालयाचाही दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर या विद्यालयाच्या वैष्णवी चंद्रकांत मोरे या विद्यार्थिनीने 82 .40% टक्के गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. धनश्री राहुल समगीर या विद्यार्थिनीने 79.20%  टक्के गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत विद्यालयात द्वितीय क्रमांक पटकावला. आर्या महेश चव्हाण या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 77 .20% टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला.




रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर या विद्यालयाच्या सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्गाचे अभिनंदन विद्यालयाचे मुख्याध्यापक धिमधिमे एस. जे. यांनी केले.



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर या विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थिनींनी दहावीच्या परीक्षेत पुरंदर तालुक्यात यश मिळवुन बाजी मारल्यामुळे, या विद्यालयाचे सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच या विद्यालयाचे संस्थापक नितीन धुमाळ, विद्यालयाच्या प्राचार्या वृषाली धुमाळ व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्यावरती वीर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देऊन यशस्वी विद्यार्थी घडविल्यामुळे, श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर या विद्यालयाचा नावलौकिक संपूर्ण तालुक्यात झालेला आहे.


No comments:

Post a Comment