Sunday, June 5, 2022

"कामगारांच्या न्याय हक्कांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे महानगरपालिकेवर धडक आंदोलन; कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी व सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत प्रहारचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष साठे संघर्ष करणार"

 


पुणे, दि.५ : पुणे शहरातील नागरिकांच्या गंभीर प्रश्नांसाठी नेहमीच आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे धनकवडी - सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या स्वच्छता व पडिक हद्दीच्या झाडण कामाचे, पुणे महानगरपालिकेच्या मार्फत कंत्राट दिलेल्या खाजगी कंपनीद्वारे कर्मचाऱ्यांना मिळणारे अर्धवट पगार व अन्य महत्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पुणे महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात आले.




"प्रियंका इंटरप्राईजेस या खासगी कंपनीकडे हे कंत्राट आहे. निविदा क्रमांक १८६ याद्वारे कंपनीला हे कंत्राट मिळाले होते. या कंपनीकडे साधारणपणे २९२ कर्मचारी सध्या काम करत आहेत. या कामगारांना मागील काही वर्षांपासून पूर्ण पगार दिला जात नाही. महानगरपालिकेच्या नियमानुसार कामगारांकडून २६ दिवस काम करून घेतले जाते. परंतु कंपनीकडून कामगारांना फक्त २० ते २२ दिवसांचे काम दिले जाते. या दिवसांच्या वेतनामधून सुद्धा वेतन कापण्यात येते." अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष साठे यांनी दिली.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


कामगारांच्या न्याय हक्कांसाठी व मूलभूत समस्या सोडवण्यासाठी  प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष साठे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेवर धडक आंदोलन करण्यात आले.




या आंदोलनात प्रहार पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ, प्रहार अपंग क्रांती महिला  संघटनेच्या सुरेखा ढवळे, पुणे शहर अपंग सेलचे अध्यक्ष अभय पवार, सूर्या ग्रुप अध्यक्ष अनिकेत दूधभाते, प्रहार युवाचे पंकजा अवघडे, वैभव भोसले, प्रवीण मोरे, पिंपरी चिंचवड वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य अजिंक्य बारणे तसेच रुग्णसेवक उमेश महाडिक, नयन पुजारी, हरी उपाडे, योगेश राऊत, संदीप नवले, पुनम तावरे, बाळासाहेब तावरे, मिथुन आवारे, अमोल लोखंडे, मनोज पाटोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात उपस्थित होते.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या आंदोलनाची दखल घेत कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय दिला जाईल. असे आश्वासन पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिल्याची माहिती संतोष साठे यांनी दिली.


"गेल्या काही वर्षांपासून प्रियंका इंटरप्राईजेस ही कंपनी २९२ कामगारांना पगार पावती देत नाही. त्याचप्रमाणे सदर कंपनीने जो पगार कमी दिलेला आहे या सर्व कामगारांना त्यांचे नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी. कामगारांना पीएफ, वैद्यकीय सुविधा, ईएसआय कार्ड या सुविधा कंपनीकडून देण्यात आलेल्या नाहीत. पुणे महानगरपालिकेने प्रियंका एंटरप्रायजेस या कंपनीवर  कायदेशीर कारवाई करून सर्व कामगारांना न्याय देण्यात यावा." अशी प्रतिक्रिया प्रहारचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष साठे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"कामगारांच्या मागण्या, समस्या व तक्रारी संदर्भात संबंधित खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर कामगारांना न्याय मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल." अशी प्रतिक्रिया पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता व पडीक हद्द झाडण काम विभागासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी व सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे संघर्ष करत राहू." अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष संतोष साठे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


पुणे महानगरपालिकेतील कामगारांच्या न्याय हक्कांसाठी तसेच सर्व समस्या सोडवण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.



No comments:

Post a Comment