मुंबई,दि.९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर जनतेच्या हितासाठी चांगले निर्णय घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय देणाऱ्या प्रमुख मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. महाराष्ट्रातील गरीब,सर्वसामान्य व होतकरू मराठा तरुणांना न्याय मिळण्यासाठी सारथी, आण्णासाहेब पाटील महामंडळ या संस्थांना सरकारकडून निधी मिळणे खूप आवश्यक आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजातील तरूणांना उद्योगासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १० लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यात येते. या महामंडळासाठी ३० कोटी निधी देण्याचे आदेश शिंदे सरकारने दिले आहेत. त्यासंदर्भातील जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या या जीआरनुसार आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला ३० कोटींचा निधी देण्याची घोषणा सरकारने केली आहे. हा निधी लवकर वाटप करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासंदर्भात मराठा समन्वयाकांनी निधी मिळण्यासाठी मागणी सरकारकडे केली होती. या मागणीची दखल घेत शिंदे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी देण्याची मागणी मराठा संघटना आणि मराठा समाजाकडून करण्यात येत होती. ती मागणी मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला तात्काळ निधी देण्याबाबत पाऊले उचलली आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला निधी मिळत नसल्याचा आरोप वारंवार मराठा समाजाकडून होत आला आहे. त्यासाठी मराठा समाजाकडून अनेकदा आंदोलनही करण्यात आले आहे. तसेच खुद्द संभाजी राजे यांनी मुंबईत उपोषण करत काही मागण्या सरकार पुढे ठेवल्या होत्या.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
त्यावेळीही शिवसेना ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जाऊन छत्रपती संभाजी राजे यांची भेट घेतली होती. आणि त्यांचं उपोषण सोडण्याचे विनंती केली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी आपलं उपोषण सोडलं होतं. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री होण्याआधी पासून एक मोठी भूमिका राहिली आहे. आगामी काळात मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध मागण्या मुख्यमंत्री कशाप्रकारे हाताळतात हे येणाऱ्या काळात पहावे लागेल.
"राज्यात आत्ताच स्थापन झालेल्या नवीन शिंदे सरकारने मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी ३० कोटीचा निधी वर्ग केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. श्री छत्रपती संभाजीराजे मुंबईमध्ये मराठा समाजाच्या महत्वाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते त्या सर्व मागण्या पुर्ण कराव्यात.यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण मागणी म्हणजे कोपर्डी अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी.मराठा आरक्षण, आण्णासाहेब पाटील महामंडळाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणे,सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा समाजासाठी वस्तीगृह,सारथी संस्थेला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणे.तसेच मराठा तरुणांच्या रखडलेल्या अधिकारी पदाच्या नियुक्त्या लवकरात लवकर करणे."
Snapdeal Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"सरकार या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करतील अशी आम्ही आशा बाळगतो." अशी प्रतिक्रिया सातारा येथील मराठा क्रांती मोर्चा समन्वयक,कार्यकर्ते नितीन सत्रे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आण्णासाहेब पाटील महामंडळाला जो ३० कोटी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचे मराठा युवा फाऊंडेशनच्या वतीने स्वागत आहे व मी मनापासून आभार मानतो. येणाऱ्या काळात सारथीच्या अडचणींबाबत मा. मुख्यमत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे,आणि गेली अनेक वर्षे रेंगाळलेला मराठा आरक्षणाचा विषय देखिल मार्गी लागावा अशी अपेक्षा मा. मुख्यमत्र्यांकडुन आहे."
"तसेच मराठा समाजातील गरीब शेतकरी बांधव, असंघटित कष्टकरी, मोल-मजुरी करणाऱ्या कुटूंबातील मुलींच्या शैक्षणिक भवितव्यासाठी कायमस्वरुपी उपाय योजना आखण्यात यावी. मराठा समाजातील तरुण होतकरु मुला-मुलींना व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण व व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहकार्य सरकारच्या वतीने मिळण्यासाठी सरकारने तरतुद करावी." अशी प्रतिक्रिया मराठा युवा फाऊंडेशन महा. राज्यचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे पाटील यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
महाराष्ट्रातील मराठा समाजातील गरीब घटकाला न्याय मिळण्यासाठी मराठा आरक्षण प्रश्न गांभीर्याने सरकारने सोडवला पाहिजे. तसेच गरीब मराठा मुलांसाठी शैक्षणिक सवलती व तरुणांसाठी व्यवसाय व उद्योगधंद्यासाठी मदत होईल अशा चांगल्या योजना राज्य सरकारने राबवणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment