Friday, July 29, 2022

"पुरंदर तालुक्यातील काळदरी परिसरातील शेतकऱ्यांचा "या" सुधारित भातशेतीच्या लागवडीवर भर; पुणे जिल्ह्यातील प्रसिध्द इंद्रायणी भात शेतीची "ही" चार सूत्री लागवड पद्धत वाचा सविस्तर.."




पुरंदर, दि.२९ : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील काळदरी परिसर इंद्रायणी भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. पुरंदर तालुक्यामधील काळदरी, बांदलवाडी ,बहिरवाडी , पानवडी मिसाळवाडी ,धनकवडी, मांढर दवणेवाडी , घेरा पुरंदर या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये प्रमुख्याने भात हे पिक घेतले जाते. 




पुरंदर तालुक्यात सर्वाधिक पाऊस याच परिसरात पडत असल्यामुळे सध्या भात शेतीची लावणीचे कामे जोरात सुरू आहेत.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now



सर्व साधारण जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भात पिकाची रोपे टाकून रोपवाटिका तयार करतात. परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे रोपे टाकण्यास उशीर झाला. सर्वसाधारणपणे 21 ते 30 दिवसाचे रोप झाल्यावर रोपाची पुनर्लागवड करण्यात येते. सर्वाधिक क्षेत्र हे इंद्रायणी या वाणाचे असून त्याला शहरी ग्राहकांचा प्रतिसाद असल्याने त्याची लागवड सर्वाधिक होते .



थोड्याफार प्रमाणात इंडम या भाताची लागवड सुद्धा होते. सध्या या भागात भाताच्या पुनर्लागवडीचा हंगाम जोरात सुरू आहे. जवळजवळ 60 ते 70 टक्के लोकांची भात लावणे पूर्ण झाली आहे. 


"भात पिकाची लागवड दोरीवर 15बाय 15 सेंटीमीटर किंवा 25 बाय 25 सेंटिमीटर अंतरावर करण्यात येते. एका ठिकाणी तीन ते चार रोपे लागवड केली जातात. दोरीवर योग्य अंतरामध्ये लागवड केल्यामुळे भात पिकात फुटव्यांची संख्या चांगली वाढते तसेच हवा खेळती राहिल्यामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो."




"लागवडीसाठी रोपांची संख्याही कमी लागते त्यामुळे मजूरही कमी लागतात व वेळेत लागवड होते. नियंत्रित लागवडीमुळे चार चुडच्या भात रोपामध्ये युरिया ब्रिगेडची एक गोळी (२.७ ग्राम) साधारणपणे सात ते दहा सेंटिमीटर खोलीवर खोचली जाते."

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


"साधारणपणे एकरी 70 किलो युरिया ब्रिगेडच्या गोळ्या लागतात. युरिया ब्रिगेड गोळी मध्ये युरिया व डीएपी एकत्रित असल्याने पुन्हा खत देण्याची आवश्यकता राहत नाही. तसेच जमिनीत गोळी खोचल्यामुळे  अति पावसामुळे खत वाहून जात नाही. त्यामुळे खताची  ४० % बचत होते."


काळदरी परिसरात कृषी विभागाच्या वतीने शेती शाळा घेण्यात आली व त्यामध्ये शेतकऱ्यांना नियंत्रित लागवड करण्यासाठी दोरी बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्याद्वारे बहुतांश शेतकऱ्यांनी स्वतःच दोऱ्या तयार केल्या आहेत. अंकुश बापू परखंडे यांच्या शेतावर भात शेतीच्या चार सूत्री लागवडीचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना दाखवण्यात आले.


Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


"प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत भात ,भुईमूग, सोयाबीन, बाजरी  इत्यादी पिकाचा पिक विमा शेतकऱ्यांनी बँकेत अथवा सीएससी केंद्रात जाऊन विम्याची रक्कम भरावी व ३१ जुलै पूर्वी विमा उतरवावा." असे आवाहन  तालुका कृषि अधिकारी सूरज जाधव यांनी केले.


यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री सुरज जाधव ,मंडळ कृषी अधिकारी श्री .संजय फडतरे, कृषी अधिकारी श्री .चंद्रकांत धायगुडे, कृषी पर्यवेक्षक श्री संदीप कदम ,कृषी सहाय्यक स्वप्नाली चौंडकर व शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment