Tuesday, September 27, 2022

"सवाई सर्जाचं चांगभलं" भक्तीमय जयघोषात; महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील 'ऐतिहासिक नवरात्रोत्सवातील घटस्थापना सोहळा पारंपारिक पद्धतीने संपन्न"...


पुरंदर, वीर, दि.२७ :  महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान  क्षेत्र वीर येथे "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या भक्तिमय नादघोषात, पारंपरिक पद्धतीने घटस्थापना सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. 




तीर्थक्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात सोमवारी आश्विन शुद्ध प्रतिपदा या मुहूर्तावर  साडे अकरा वाजता घटस्थापना करण्यात आली.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


यावेळी देवस्थान ट्रस्टचे सालकरी, मानकरी, दागिनदार, गुरव, पुजारी, उपासकरी,  पुरोहित व  देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते. 




कोरोनाचे संकट दूर झाल्यापासून पुणे  जिल्ह्यातील  तीर्थक्षेत्र वीर  येथे भक्तांची देव दर्शनासाठी, आणि श्रीनाथ म्हस्कोबा देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी वाढत आहे.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक  नवरात्रोत्सवानिमित्त  पिण्याचे स्वच्छ पाणी व्यवस्था, मंदिर स्वच्छता, दर्शन बारी, मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई  देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आलेली  आहे. 




नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात पोलिस बंदोबस्त तसेच जादा होमगार्डची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच मंदिरात स्वयंसेवक व कर्मचारी कार्यरत आहेत. 




यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ, व सर्व विश्वस्त उपस्थित होते.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


"श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर येथील नवरात्रोत्सव पारंपारिक पद्धतीने,भक्तिमय वातावरणात साजरा होत असतो." असे श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ यांनी सांगितले.


Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरामध्ये नवरात्रोत्सवात, सालाबाद प्रमाणे "श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी" पारायण  सोहळ्याचे नियोजन देवस्थान ट्रस्टतर्फे उत्तम पद्धतीने केले जाते.

Sunday, September 25, 2022

"महाराष्ट्रातील "या" जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर; चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री; सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूरचे "या" नेत्यांकडे पालकमंत्रीपद"...



मुंबई, दिनांक २५ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. राज्यात सरकार स्थापनेनंतर तब्बल पावणेतीन महिन्यानंतर जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले. 




उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


जिल्ह्यानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे : 


१)राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर, सोलापूर


२)सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर,गोंदिया


३)चंद्रकांत दादा पाटील - पुणे


४)विजयकुमार गावित - नंदुरबार


५)गिरीश महाजन - धुळे,लातूर, नांदेड




६)गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव


७)दादा भुसे - नाशिक


८)संजय राठोड - यवतमाळ, वाशिम


९)सुरेश खाडे - सांगली


१०)संदिपान भुमरे - औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


११)उदय सामंत - रत्नागिरी, रायगड


१२)तानाजी सावंत - परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)


१३)रवींद्र चव्हाण - पालघर, सिंधुदुर्ग


१४)अब्दुल सत्तार - हिंगोली


१५)दीपक केसरकर - मुंबई शहर ,  कोल्हापूर


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



१६)अतुल सावे - जालना, बीड


१७)शंभूराज देसाई - सातारा, ठाणे


१८)मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now



Monday, September 19, 2022

"महाराष्ट्रात लम्‍पी आजारातून ३ हजार २९१ जनावरे रोगमुक्त; राज्यातील "या" २७ जिल्ह्यात ९ हजार ३७५ जनावरांमध्ये लम्‍पीचा प्रादुर्भाव, मंगळवारी "एवढया" लाख लसमात्रा प्राप्त होणार; मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या "या" टोल फ्री क्रमांकावर तत्काळ संपर्क करा"


मुंबई, दि. 19 : राज्यातील पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या सूचना, मनुष्यबळ वाढ, पुरेशा लसमात्रा, पशुधनावर करण्यात आलेले उपचार आणि निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने राज्यातील लम्‍पी आजार आटोक्यात येत आहे. 3 हजार 291 जनावरे औषधोपचारामुळे ठीक झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.




श्री. सिंह म्हणाले, राज्यात दि. १९ सप्टेंबर २०२२ अखेर जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली व रायगड अशा 27  जिल्ह्यांमधील 1108 गावांमध्ये 9 हजार 375 जनावरांमध्ये लम्‍पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधितांपैकी 3 हजार 291 जनावरे बरी झाली असून, उर्वरितांवर उपचार सुरु आहेत.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 49.83 लाख लसीच्या मात्रा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या लस मात्रांपैकी बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिघातील 1108 गावातील 16.45 लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून लसीकरण मोहीम सुरु आहे.




त्यानंतर प्राधान्याने गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


मंगळवार दि. 20 सप्टेंबर रोजी 25 लाख लसमात्रा प्राप्त होणार आहेत. बाधित जिल्ह्यातील जळगांव 94, अहमदनगर 30, धुळे 9, अकोला 46, पुणे 22, लातूर 3, औरंगाबाद 5, सातारा 12, बुलडाणा 13, अमरावती 17, कोल्हापूर 9, सांगली 2, वाशिम १, जालना १, ठाणे 3,नागपूर 3 व रायगड 1 अशा 271 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.


मुंबईत लम्‍पी रोगाचे नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करण्यासाठी प्राणी प्रदर्शने, बाजार, यात्रा व जनावरांची ने - आण करण्यास पूर्णतः बंदी घोषित 

राज्यासह देशात अनेक ठिकाणी लम्‍पी आजार जनावरांमध्ये वेगाने फैलावत असल्याने मुंबईतही सावधगिरी बाळगली जात आहे. मुंबईत बैलगाड्या, घोडागाडी तसेच अनेक ठिकाणी गायीदेखील पाळल्या जातात. हे लक्षात घेता मुंबईत लम्‍पीचा फैलाव टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रदर्शन, जत्रा तसेच गर्दीच्या ठिकाणी प्राण्यांची ने – आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. निर्देशांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार, असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


मुंबईत अनेक ठिकाणी जनावरांचे गोठे आहेत. मंदिरांबाहेर गायी बांधल्या जातात. मिरवणुकांमध्ये बैलगाड्यांचा वापर केला जातो. त्यामुळे गर्दीच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी जनावरांना नेण्यास या आदेशाद्वारे मनाई करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये या सूचना प्रसिद्ध करण्याबाबत सांगण्यात आले असून परिसरात जनावरे पाळणाऱ्यांपर्यंत संदेशही दिले जात आहेत. 

13 ऑक्टोबरपर्यंत पशुपालकांनी या नियमांचे पालन करावे, असे या आदेशात नमूद आहे. तसेच लम्‍पी करीता मुंबई हे 'नियंत्रित क्षेत्र' घोषित करण्यात आले असून मुंबईत प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही मुंबई पोलीसांनी दिला आहे.


Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now



समन्वय कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८४५१३२

श्री.सिंह म्हणाले, लम्‍पी नियंत्रणासाठी लसीकरण करणे, बाधित पशुधनास औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. तथापि, काही ठिकाणी पशुपालकांना येणाऱ्या समस्या, अडचणींचे निराकरण करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच शेतकरी, पशुपालकांना संपर्क साधता यावा, आणि क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधता यावा यासाठी मंत्रालयामध्ये रुम नं. 520, 5 वा मजला (विस्तार) येथे समन्वय कक्ष सुरु करण्यात आला आहे. पशुपालक समन्वय कक्षातील ०२२-२२८४५१३२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतील.


लम्‍पी वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरु केल्यास निश्चित बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरुन न जाता मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले आहे.

Wednesday, September 7, 2022

"पुण्यातील प्रसिद्ध शंकरराव उरसळ फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा; 'ज्या देशाची शिक्षण प्रणाली उत्कृष्ट आणि मजबूत तोच देश आर्थिकदृष्ट्या श्रीमंत' : शास्त्रज्ञ भास्कर इदगे"



पुणे, दि.७ : पुण्यातील प्रसिद्ध शंकरराव उरसळ फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत, मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. "सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासामधील तत्परता, एकाग्रता आणि शिक्षकांप्रती निष्ठा टिकवून ठेवणे गरजेचे आहे, तरच विद्यार्थी व्यक्तिमत्व विकसित होईल." असे प्रतिपादन पुणे येथील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ मा श्री भास्कर इदगे यांनी व्यक्त केले.




पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खराडी येथील शंकरराव  उरसळ फार्मसी महाविद्यालयामध्ये भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त  आयोजित  शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"विद्यार्थ्यांमध्ये चारित्र संपन्नता ही त्यांच्या शिक्षणाबरोबरच अभिप्रेत आहे. समाजामध्ये सर्व शिक्षक पूर्ण कार्यक्षमतेने काम  करत आहेत, आदर्श शिक्षकांच्या संकल्पनेतून योग्य व्यवस्थापन आणि कौशल्य याचे उपाययोजन करून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास नक्कीच साधता येईल." असे प्रतिपादन कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक राजेंद्र पायगुडे यांनी केले. 




शिक्षण प्रणालीचा दर्जा उंचावण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अमुलाग्र बदल घडवण्यात आले यामध्ये डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर आधारित शिक्षणात नवनवीन प्रयोग करून आपल्या देशाची शिक्षण प्रणाली उत्कृष्ट आणि मजबूत झाली आहे. 


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये नवनवीन आव्हाने स्वीकारून शिक्षकांनी आदर्श विद्यार्थी घडवणे अत्यावश्यक आहे असे मत व्यक्त करून,  सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा. व्यवस्थापन सदस्य डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या. 




"आपल्या जीवनातील प्रत्येक वेळ योग्य रीतीने योग्य दिशेने वापरून आपल्या जीवनातील गुरुप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे." असे पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य अँड डॉ. सचिन कोतवाल यांनी  यावेळी सांगितले. शिक्षक म्हणजे नवनवीन ज्ञान संकल्पना जाणून घेऊन अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ, अशा  शब्दांत महाविद्यालयाचे प्रा अश्विनी बनकर आणि प्रा किरण घुले यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व व्यक्त केले.





या कार्यक्रमात सानिका साळवी, जयेश घोरपडे, तेजस शितोळे आणि जयश्री ब्राह्मणे या विद्यार्थ्यांनी मनोगतामधून  शिक्षकांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमांमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा तसेच महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ग घेतले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


"महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शिक्षकांचे, गुरूंचे महत्वाचे स्थान आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात उच्चतम पातळीवर पोहचून सर्वच शिक्षकांना आनंद देणारी, अभिमानास्पद कामगिरी केली पाहिजे." अशी प्रतिक्रिया युवा प्राध्यापक विपुल धसाडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




या शिक्षकदिनाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. 


Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रा तृषा शंग्रपवार, प्रा सीमा केंजळे, प्रा भाग्यश्री शेलार यांनी केले.




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सीमा केंजळे व आभार प्रशांत खाडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम राष्ट्रीय गीताने झाली.

Thursday, September 1, 2022

"पुण्यातील प्रसिद्ध 'एकता मित्र मंडळाच्या' "या" सामाजिक उपक्रमाचे गणेशभक्तांकडून कौतुक; वाजतगाजत जल्लोषात निघालेल्या मिरवणुकीला व आगळ्या वेगळ्या "या" नैवेद्याला पुणेकरांकडून उत्तम प्रतिसाद"...

 




पुणे, दि.१ : पुण्यातील  अरण्येश्वर नगर, तावरे कॉलनी येथील प्रसिद्ध एकता मित्र मंडळाचा गणपती बाप्पा आगमन मिरवणूक सोहळा मोठ्या आनंदात, ढोल ताशाच्या गजरात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. 




सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव २०२२ च्या या आगमन मिरवणूक सोहळ्यामध्ये पुणे शहरात प्रथमच गणपती बाप्पांच्या  मिरवणुकीमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now





त्यामुळे अनेक लहान  मुला-मुलींनी वेगवेगळ्या  वेषभूषा परिधान करून अनेक आदर्श महापुरुष, देव देवतांचे, क्रांतिकारकांचे दर्शन घडविले.  




ढोल ताशांच्या गजरात मंत्रमुग्ध होण्यासाठी आठवणीतील विशेष आकर्षित आयोजन म्हणजे ज्ञान प्रबोधिनी ढोल-ताशा वाद्य व ध्वज  नृत्य पथक आणि गंधार ढोल-ताशा वाद्य पथक यांनी त्यांच्या वादनातून मिरवणूक पाहणाऱ्या गणेश भक्तांना मंत्रमुग्ध करून सोडले.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


श्रींची प्राणप्रतिष्ठापणा सजवलेल्या गणेश मंडपामध्ये स्थानिक सर्व महिलांच्या हस्ते महाआरती करून गणपती बाप्पा मंडपात विराजमान झाले.




गुरुवार, दि. १ सप्टेंबर २०२२ रोजी जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून ठरल्याप्रमाणे अनेक गणेश भक्तांतर्फे एकता मित्र मंडळाच्या  गणपती  बाप्पांना पुस्तकांचा नैवद्य दाखविण्यात आला.




"एकता मित्र मंडळ दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून पुणेकरांची  सेवा करत असते.  यावर्षीही आमचे मंडळ शैक्षणिक उपक्रम राबवत आहे.  कृपया आमच्या मंडळाच्या श्रींच्या दर्शनाला येताना हार व फुले सोबत आणण्यापेक्षा एक वही व पेन बाप्पांच्या चरणी अर्पण करावे. सदर  शैक्षणिक वस्तू गरजू विद्यार्थ्यांपर्यंत अवश्य पोहचविण्यात येतील." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व या मंडळाचे कार्यकर्ते सुधीर ढमाले  यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.





अमोल जाधव, अविनाश खंडागळे, दत्तात्रय शिंदे, सुधीर ढमाले, अनिकेत ढमाले, कुणाल गायकवाड, ऋषिकेश पांढरकामे, योगेश मांढरे, जयेश ढमाले, हिरेन गायकवाड,




शुभम बाणखेले, संकेत मिरघे, अथर्व तिवाटणे, दुर्वांकुर ढमाले, आशुतोष अमराळेयांनी  ही सदरील पुस्तके एकता स्वामी विवेकानंद ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी उपयोगी होतील या हेतूने बाप्पा चरणी अर्पण केली. अशी माहिती मंडळाचे कार्यकर्ते विनायक इंगवले यांनी दिली. पुस्तक देणाऱ्या गणेशभक्तांचे मंडळाने आभार मानले.




Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


पुण्यातील प्रसिद्ध एकता मित्र मंडळ वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून नेहमीच  लोकांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. या वर्षीच्या मंडळाच्या  शैक्षणिक उपक्रमाचे व आगळ्यावेगळ्या "शैक्षणिक  उपक्रमरुपी नैवेद्याचे"  पुणेकरांनी कौतुक केलेले आहे.