पुणे, दि.१ : पुण्यातील अरण्येश्वर नगर, तावरे कॉलनी येथील प्रसिद्ध एकता मित्र मंडळाचा गणपती बाप्पा आगमन मिरवणूक सोहळा मोठ्या आनंदात, ढोल ताशाच्या गजरात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव २०२२ च्या या आगमन मिरवणूक सोहळ्यामध्ये पुणे शहरात प्रथमच गणपती बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
त्यामुळे अनेक लहान मुला-मुलींनी वेगवेगळ्या वेषभूषा परिधान करून अनेक आदर्श महापुरुष, देव देवतांचे, क्रांतिकारकांचे दर्शन घडविले.
ढोल ताशांच्या गजरात मंत्रमुग्ध होण्यासाठी आठवणीतील विशेष आकर्षित आयोजन म्हणजे ज्ञान प्रबोधिनी ढोल-ताशा वाद्य व ध्वज नृत्य पथक आणि गंधार ढोल-ताशा वाद्य पथक यांनी त्यांच्या वादनातून मिरवणूक पाहणाऱ्या गणेश भक्तांना मंत्रमुग्ध करून सोडले.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
श्रींची प्राणप्रतिष्ठापणा सजवलेल्या गणेश मंडपामध्ये स्थानिक सर्व महिलांच्या हस्ते महाआरती करून गणपती बाप्पा मंडपात विराजमान झाले.
गुरुवार, दि. १ सप्टेंबर २०२२ रोजी जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून ठरल्याप्रमाणे अनेक गणेश भक्तांतर्फे एकता मित्र मंडळाच्या गणपती बाप्पांना पुस्तकांचा नैवद्य दाखविण्यात आला.
अमोल जाधव, अविनाश खंडागळे, दत्तात्रय शिंदे, सुधीर ढमाले, अनिकेत ढमाले, कुणाल गायकवाड, ऋषिकेश पांढरकामे, योगेश मांढरे, जयेश ढमाले, हिरेन गायकवाड,
शुभम बाणखेले, संकेत मिरघे, अथर्व तिवाटणे, दुर्वांकुर ढमाले, आशुतोष अमराळेयांनी ही सदरील पुस्तके एकता स्वामी विवेकानंद ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी उपयोगी होतील या हेतूने बाप्पा चरणी अर्पण केली. अशी माहिती मंडळाचे कार्यकर्ते विनायक इंगवले यांनी दिली. पुस्तक देणाऱ्या गणेशभक्तांचे मंडळाने आभार मानले.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
No comments:
Post a Comment