Wednesday, November 30, 2022

"पुरंदरच्या वीरकन्या करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन कोल्हापूरच्या युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांच्या हस्ते सासवड येथे दिमाखदार सोहळ्यात संपन्न; युवराज्ञी संयोगीताराजे यांनी सांगितलेल्या इंदुमती राणीसाहेब यांच्या शौर्याच्या "या" चित्तथरारक प्रसंगाने जिंकली लोकांची मने"


सासवड, दि. 30 : आजचा पुरोगामी, प्रगतशील महाराष्ट्र घडवण्यामध्ये अनेक संत, महापुरुष, समाजसुधारक,ध्येयवादी नेते, विचारवंत, क्रांतिकारक अश्या शेकडो कर्तुत्वान मराठी व्यक्तिमत्वांचे मोठे योगदान आहे. 




महाराष्ट्रातील ऐतिहासिक पुरंदरच्या सासवड भूमीतील महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांच्या  कुळातील सासवडचे शंकरराव पांडुरंग जगताप यांच्या वीरकन्या, महाराष्ट्रातील ऐतिहासिक कोल्हापूरच्या भूमीत स्त्री शिक्षणासाठी व महिला सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी कार्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या पुरोगामी रणरागिणी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्नुषा इंदुमतीदेवी राणीसाहेब यांचा जीवनप्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पुरंदर तालुक्यातील सासवड येथील महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठान दरवर्षी करवीर छत्रपती इंदुमती राणी साहेब यांचा स्मृतिदिन साजरा करत असते. यावर्षी ज्येष्ठ इतिहास संशोधिका आणि सिद्धहस्त लेखिका डॉ.सुवर्णा नाईक निंबाळकर लिखित पुरंदरच्या, सासवड कन्या "करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब"या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे  कोल्हापूरच्या युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती  यांच्या शुभहस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 




यावेळी युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी  इंदुमती राणीसाहेब यांच्या जीवनातील संघर्षमय प्रवास आपल्या मनोगतातून व्यक्त केला. 




"इंदुमती राणीसाहेब यांच्या संघर्षमय वाटचालीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सासरे म्हणून नव्हे तर वडील म्हणून कशा पद्धतीने इंदुमती राणी साहेबांचे पालन पोषण करून शिक्षण दिले याची माहिती दिली. "अडाणी मनुष्य हा डोळे असूनही आंधळा असतो !"( Man is blind without education) ही छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली शिकवण इंदुमती राणीसाहेबांनी जीवनामध्ये संघर्ष करताना महत्त्वाची ठरली. "




छत्रपती शाहू महाराजांनी इंदुमती राणेसाहेबांना घोडेस्वारी, युद्ध कला, गाडी चालवणे, प्रसंग आल्यास गाडी दुरुस्त करणे इत्यादींचेही शिक्षण दिले." असे आपल्या मनोगतातुन युवराज्ञी संयोगीता राजे यांनी सांगितले. 




"सुशीला" या वाघीणचे इंदुमती राणीसाहेबांनी पालन पोषण केले होते. एकदा इंदुमती राणीसाहेब शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेल्या असताना एक  चार महिन्याचं लहान बाळ त्या वाघिणीने तोंडात पकडलं. कोणीतरी छत्रपती शाहू महाराजांना ही बातमी सांगितली."


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"तात्काळ छत्रपतींनी इंदुमती साहेबांना शाळेमध्ये यासंबंधीची माहिती पोहोचवली. लागलीच राणीसाहेब शाळेतून धावत आल्या आणि त्यांनी त्या वाघिणीकडे फक्त "पाहिले." अन काय चमत्कार त्या वाघिणीने ते बाळ जमिनीवर ठेवले आणि शांतपणे बाजूला निघून गेली. राणीसाहेबांनी धावत जाऊन त्या बाळाला उचलून घेतले आणि सगळीकडे तपासून बघितले असता साधे खरचटले सुद्धा नव्हते. त्याचे कारण "सासवडच्या या वाघिणीने सुशीला वाघिणीच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले होते." हा प्रसंग युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी सांगितला आणि आचार्य अत्रे सभागृह टाळ्यांच्या गजरात बुडून गेले. 




इंदुमती राणीसाहेबांच्या बाबतीत घडलेले अनेक प्रसंग जसेच्या तसे युवराज्ञी साहेबांनी  आचार्य अत्रे सभागृहामध्ये कथन केले आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


तत्पूर्वी  सकाळी १० वाजता लेखिका डॉ.सुवर्णा नाईक निंबाळकर,  बापूसाहेब निंबाळकर, कृष्णराव नाईक- निंबाळकर,  तेजला दाभाडे,  सुलेखा शिंदे, हेमलता  भोसले,  शिवांजली नाईक निंबाळकर,  राजलक्ष्मी भोसले यांचे डॉ.दीपक जगताप यांच्या निवासस्थानी आगमन झाले. बरोबर ११:१५ मिनिटांनी युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांचे गोदाजीराजे जगताप चौकात आगमन झाले. आणि फटाक्यांची आतिषबाजी झाली.




युवराज्ञी संयोगीता राजे यांनी सरदार गोदाजीराजे जगताप पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप, माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप , डॉ. वृषाली जगताप, मा. नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप,  राजवर्धिनी जगताप,  बंडूकाका जगताप,  दीपकआप्पा जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. 




त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला.आणि आचार्य अत्रे सभागृहामधे त्यांचे आगमन झाले.



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. ज्याचे आयोजन  महेश जगताप,  गिरीश जगताप यांनी केले होते. पुढे सत्काराचा कार्यक्रम पार पडला यामध्ये ग्रामीण संस्थेच्या संस्थापिका राजवर्धिनी जगताप, डॉ. वृषाली जगताप, डॉ.अश्विनी जगताप यांनी  युवराज्ञी संयोगीता राजे यांचा सत्कार केला. त्यानंतर प्रतिष्ठानच्या वतीने  संतोष एकनाथकाका जगताप यांनी प्रास्ताविक केले. 




चरित्र ग्रंथाचे प्रकाशक मेहता पब्लिकेशन्स, पुणे यांचे वतीने  अखिल मेहता यांनी मनोगत व्यक्त करून सर्व मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन केले. 




सदर पुस्तकावर  रावसाहेब पवार ,(सरचिटणीस- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद) यांनी परीक्षणात्मक प्रतिक्रिया नेमक्या शब्दांत नोंदविली. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब चरित्र ग्रंथाच्या लेखिका, इतिहास संशोधिका डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या भाषणातून  या चरित्र ग्रंथाचा प्रवास तसेच इंदुमती राणीसाहेब यांच्या जीवन प्रवासातील प्रेरणादायी प्रसंग सांगून लोकांची मने जिंकली. 




पुरंदरचे युवा नेते  बाबाराजे जाधवराव यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये कोल्हापूरच्या काही महत्वपूर्ण आठवणी सांगितल्या. 




या कार्यक्रमांमध्ये पुरंदर-हवेलीचे लोकप्रिय  आमदार  संजय जगताप यांनी शुभेच्छापर आपले मत व्यक्त केले.  आमदार संजय जगताप यांनी लेखिका डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांच्या पुस्तकाचे कौतुक करून संशोधन कार्यात सहकार्य करण्याची ग्वाही दिली.



भाजप पुणे जिल्हा महिला अध्यक्षा संगीताराजे निंबाळकर यांनी देखील इंदुमती राणीसाहेब आणि युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांचे बद्दल गौरव उदगार काढले. 





पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी इंदुमती राणीसाहेबांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचे विश्लेषण केले. 


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील  यांनी अध्यक्षीय भाषण करून लोकांची मने जिंकली. मा. आमदार दीपक आबा पाटील यांनी  इतिहास संशोधिका डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांच्या शैक्षणिक प्रवासाविषयी जुन्या आठवणी सांगून संशोधन कार्याचे कौतुक केले.




सूत्रसंचालन करताना डॉ. दीपक जगताप यांनी कोल्हापूरला सासवडहून "मल्लविद्या" शिकण्यासाठी जाणाऱ्या पैलवानांची राहण्याची सोय संभाजीराजे छत्रपती महाराजांनी करावी तसेच कोल्हापूरच्याअंबाबाई मातेच्या दर्शनासाठी सुद्धा सासवडच्या मंडळींची सोय प्राथमिकतेनं करावी अशी विनंती केली आणि त्यास दुजोरा देत युवराज्ञी संयोगीताराजे यांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.




कार्यक्रमाच्या शेवटी सागर जगताप यांनी बहारदार असे आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  प्रमोददादा सुभानराव जगताप , वामनराव जगताप , नंदकुमार जगताप,  सुरज उत्तमराव जगताप , बंडूकाका जगताप, समीर जगताप, पै. प्रकाश जगताप, डॉ.प्रवीण जगताप ,डॉ.उत्कर्ष जगताप , प्रसाद जगताप, दिपाली जगताप,  राजगौरी जगताप यांनी मोलाचे सहकार्य केले. मार्गदर्शक म्हणून  दीपक माधवराव जगताप यांनी जबाबदारीने काम केले.


या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या याचे  युवराज्ञी संयोगीता राजे यांनी विशेष कौतुक केले.



Sunday, November 27, 2022

"पुण्यातील नवले पूल म्हणजे साक्षात मानव निर्मित मृत्यूचा सापळाच; जखम मांडीला अन् मलम शेंडीला" - प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे पाटील यांचा विशेष लेख...


"पुण्यातील नवले पूल म्हणजे साक्षात मानव निर्मित मृत्यूचा सापळाच; जखम मांडीला अन् मलम शेंडीला" 


एकेकाळी माॅंसाहेब जिजाऊंनी बसवलेलं शांत आणि निसर्गसंपन्न असणारं पुणे शहर. बैलगाड्या, घोडा-बग्गी आणि नंतर सायकलींचं शहर अशी बिरुदावली मिरवणारं हे शहर.



काही मोजक्या पेठांचा आवाका सोडला तर उपनगरातील गावं ही शेकडो मैल लांबच्या पल्ल्याची वाटायची. पण काळ बदलला शहर कात टाकु लागलं. उपनगरं शहराला झपाट्यानं जोडू लागली. तशी शहराची भौगोलीक रचना देखील बदलू लागली.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


शहरातील घरे- रस्ते कमी पडू लागले म्हणुन उपनगरं मानवी वस्त्यांनी बहरू लागली. जशी गरज तशी रस्त्यांची निर्मिती झाली.


कालांतराने बाहेरची शहरं, गावं, तालुके, जिल्हे आणि सबंध महाराष्ट्र पुणे शहराशी जोडली गेली याचं प्रमुख कारण म्हणजे पुणे हे विद्येचे माहेर घर म्हणुन नावारुपास आले. शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरून पुण्यात येणाऱ्यांची संख्या वाढत गेली. पुढे सर्वात टूमदार आणि गुंतुंवणुकीस चांगलं शहर म्हणुन पुण्यात उद्योगधंदे स्थापित झाले.


शिक्षणा बरोबरच नोकरीची देखील गरज पूर्ण होऊ लागल्याने अनेकांनी पुण्याचा रस्ता धरला. 


शिक्षण आणि नोकरी करता करता शहर गच्च भरुन ओसंडुन कधी वाहु लागलं हे लक्षातच नाही आलं. पण जितक्या प्रभावीपणे पुणे घडलं तितकंच त्याच्या मधल्या अडचणी देखील वाढत गेल्या.




एरवी पेठांमध्ये १०x१० (दहा बाय दहा) च्या खोल्यांत आनंदाने एकत्र कुटूंब पद्धतीत जगणारी माणसं शहरं सोडून उपनगरात स्थायिक झाली. परंतु शहराशी असणारी त्यांची नाळ कधीच तुटली नाही. या ना त्या कारणाने शहरात ये — जा सुरुच राहिली.


यासाठी शहरातले रस्ते प्रचंड वाहतुक कोंडीत सापडल्यामुळे शहरा जवळुन गेलेल्या महामार्गाचा वापर होऊ लागला.कालांतराने शहरा जवळुन जाणाऱ्या महामार्गांचा काही भाग हा शहरातीलच असल्याचा दावा होऊ लागला. असाच एक महामार्ग म्हणजे NH 4.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


सातारा रस्त्याने मुंबईकडे जाण्यासाठी या महामार्गाचा वापर अत्यंत सोयीचा असल्याने त्यावरची वाहतुक दिवस-रात्र सुरु असते.


पुर्वी कात्रजचा घाट व बोगदा हे पुणे शहराचे प्रवेशद्वार होते, परंतु कालांतराने अत्यंत दाटी वाटिचा रस्ता बनल्याने, याच्याच बाजुने नवीन बोगदा पाडुन महामार्ग तयार करण्यात आला. या महामार्गावर पुणे शहराच्या हद्दी जवळील म्हणजे कोळेवाडी-जांभुळवाडी- नऱ्हे - आंबेगांव ते वडगाव परीसराचा मोठा भाग आला. बाहेरील वाहनांबरोबरच  स्थानिकांची वाहने या महामार्गावर धावू लागली.



"सदरच्या नविन बोगद्या पासून म्हणजे दरी पुलापासून ते वडगाव पर्यंतच्या रस्त्याची रचना हि मानव निर्मित घोड चुक असल्याचं आता जवळ जवळ सिद्ध झालं आहे."


याचं कारण म्हणजे याच परिसरात आज पर्यंत झालेले भीषण अपघात. यामध्ये आज पर्यंत शेकडो नागरीकांनी यामध्ये आपला नाहक जीव गमावला आहे. याच्याशी संबंधित नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया, पुणे मनपा, वाहतुक पोलिस पुणे हे सर्वजण याला कारणीभुत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे.




कारण जेव्हा पासून या महामार्गाची निर्मिती झाली, तेव्हा पासुन या परिसरातील अपघाताचा केंद्रबिंदु हा "दरीपूल" होता. या पुलावर पूर्वी पासुन आज ही अपघात होतच आहेत.पुलावरुन गाडी खाली कोसळणे, पुलाच्या कठड्याला गाड्या धडकने, पुलावरील खड्ड्यात गाड्या आदळुन मागील वाहने अंगावरून जाणे असे प्रकार सर्रासपणे आजही घडत आहेत.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


पूर्वी इथले अपघात वर्तमानपत्रांच्या माध्यमातुन समोर येत होते. परंतु मागील काही काळात इथले अपघात समाजमाध्यमां समोर येणे बंद झाले, याचे कारण समजण्या पलीकडे आहे. आज ही या दरीपुलावरून पुण्याकडे येताना डाव्या बाजुला लक्ष दिल्यास इथे होणाऱ्या अपघातांची जाणीव होईल असे पुरावे म्हणजे पुलाच्या कठड्याला वाहने "धडकलेल्या खुणा, काचांचा खच, तुटलेले-वाकलेले रेलींगचे पाईप" इ. आढळुन येतात.




परंतु या ठिकाणा नंतर वर नमुद केल्या प्रमाणे आजु-बाजुच्या उपनगरांतील वाहने या महामार्गावर येऊ लागल्याने अपघाताचा दुसरा केंद्र बिंदु ठरला तो म्हणजे "नऱ्हे व नवले पूल" या दोन्हीमधलं अंतर केवळ १ कि.मी. याच पट्ट्यात आज पर्यंत अनेक भीषण अपघात झाले. त्या संबंधिच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रे व माध्यमांमधुन समोर आल्या.


आता इथं एक गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे,ती म्हणजे दरीपुलावरील अपघात हे समाज माध्यमांसमोर येत नाहीत,परंतु नवले पूल परीसरातील येतात, याचं मुख्य कारण म्हणजे हा सर्व परीसर लोकवस्तीत येतो, इथे सततची वर्दळ असते, त्यामुळे इथल्या घडामोडी सोशल मिडीयाच्या प्रभावी वापरामुळे तात्काळ व्हायरल होतात.


या महामार्गावर अपघातांची मालिका सतत सुरू आहे, संबंधित प्रशासनांच्या वतीने केवळ अपघात घडल्या नंतर उपाय योजनांच्या बाबतीत सक्रिय असल्याचे नाटक प्रत्येक वेळी केलं जातं.परंतु या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना रोखण्याच्या दृष्टिने कोणतीही ठोस उपाययोजना व पावले उचलली जात नव्हती.






ज्या वेळी अपघात व्हायचे त्या वेळी प्रशासनाकडुन कायम एक गोंडस कारण पुढं केल जायचं, आणि ते म्हणजे "वाहन चालक गाडी न्युट्रल करून चालवत असल्याने नियंत्रण न राहिल्याने अपघात झाला." पण प्रत्येक अपघात हा केवळ या एकाच कारणाने होतो का? याचा विचार कधीच कोणी केला नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.


म्हणुन मी स्वत: या विषयात लक्ष घालायचं ठरवलं, कारण सदरचा महामार्ग तयार होण्या पूर्वीपासुन हा परीसर माझ्या परिचयाचा होता.


या बरोबरच माझं गांव वेल्हे (राजगड) तालुक्यातील करंजावणे गांव आहे. गावाकडे जाण्या-येण्यासाठी देखील या महामार्गाचा वापर मी आज ही करीत असतो. माझ्यासह भोर/वेल्हे आणि सातारा येथील अनेक जण दुध व्यवसायाबरोबरच काम धंद्यासाठी याच महामार्गाचा जीव धोक्यात घालून वापर करीत आहेत.


दरीपूल ते नवले पूल या परिसरात अपघात होतात हे स्थानिकांसह नेहमी प्रवास करणाऱ्यांना माहिती असल्याने ते आवश्यक ती काळजी घेत असतात.


परंतु परराज्यातुन, परप्रांतातुन येणाऱ्यांना इथली परीस्थिती माहित नसते, आणि नेमके यातीलच काही लोक अपघातास कारणीभुत ठरतात, किंवा बळी पडतात. काही वेळा नेहमी प्रवास करणारे देखील या अपघातांमध्ये सापडतात.


Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


ही पार्श्वभुमी मला माहिती असल्याने सदरच्या अपघातांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणे विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा मानस होता.


परंतु हा विचार करत असताना एक गोष्ट मनात आली की, हा विषय केवळ आंदोलनाच्या माध्यमातुन राजकीय मुद्दा न बनवता, सदरच्या ठिकाणचे अपघात रोखण्या संदर्भात काम करु,असं म्हणुन मी या विषयाचा अभ्यास सुरू केला. परिसरातील भौगोलिक भागाचा विचार केला.


आणि मग यावर काही उपाययोजना जर प्रशासनाला सुचविली आणि प्रशासनाने त्याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी केली तर इथले अपघात कायमचे बंद होतील असा विश्वास मला आला.आणि सदरच्या विषयाचा अभ्यास करत असतानाच याच मार्गावर भीषण अपघात झाला.


त्या पार्श्वभुमिवर "डिसेंबर २०२०" रोजी मी NHAI च्या कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन सादर केलं, त्यामध्ये काही अत्यंत महत्वाचे उपाय  सुचवले. व या निवेदनाचा पाठपुरावा संबंधित कार्यालयाशी सतत संपर्क करून सुरु ठेवला.




या सुचनांपैकी नवीन बोगदा ते वडगाव पर्यंत यापुर्वी कधीही न बसवलेले विजेचे खांब बसवण्यासाठी पाठपुरावा केला आणि ते बसवल्याने हा धोकादायक परिसर उजेडात आला.


याच बरोबर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी देखील मागणी लावून धरत रंबलर्स बसवून घेतले. परंतु उर्वरीत सुचनांकडे मी वेळोवेळी लक्ष वेधुन सुद्धा संबंधितांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या दरम्यान अनेक छोटे-मोठे अपघात घडत होते, परंतु प्रशासन उसनं आवसान आणुन वागत होतं.


याही परिस्थितीत मार्गावरील बंद अवजड वाहने हलविणे असेल, वा नादुरुस्त अवस्थेतील वाहने हलविणे असेल यासाठी प्रयत्न सूरू आहेत.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


अशातच रविवार २० नोव्हेंबर २०२२ रोजी भीषण अपघात झाला. यामध्ये तीव्र उताराने आलेल्या एका भरधाव ट्रकने तब्बल ४८ वाहनांना उडवले. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले,वाहनांचे प्रचंड नुकसान झाले तर एका व्यक्तिचा दुर्दैवी मृत्यु झाला.




नेहमी प्रमाणे प्रशासनाने अपघाताचे खापर हे वाहन चालकावर फोडले, आणि "न्युट्रल किंवा ब्रेक फेल झाल्यानेच हा अपघात झाला," असे गोंडस कारण पुढे केले. परंतु RTO ने केलेल्या तपासणीमध्ये सदरचे वाहन हे पूर्णपणे सूस्थितीत असल्याचा अहवाल दिल्याने NHAI व वाहतुक पोलिसांचा दावा सपशेल फेल ठरला.


आता यावर मला माझी आंदोलनाची भुमिका घ्यायची होती,परंतु पुन्हा अडचण समोर आली, आणि ती म्हणजे आंदोलन करुन सुद्धा संबंधित यंत्रणा सुधारली नाही तर? तो पर्यंत पुन्हा एखादा अपघात घडुन कोणाचा निष्पाप आणि नाहक जीव गेला तर? मग मी पुन्हा आंदोलनाचं उपसलेलं हत्यार म्यान केलं, आणि पुन्हा नव्यानं संबंधित यंत्रणेला डिसेंबर २०२० मध्ये सुचवलेल्या उपायांचे निवेदन दिले.


रविवारी २० नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या भीषण अपघाताच्या  पार्श्वभुमीवर, मी पुन्हा एकदा २३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष NHAI कार्यालयास भेट देऊन निवेदन सादर केलं.आणि त्यात अपघात रोखण्यासंदर्भात योग्य ते उपाय सुचवले.आणि यावेळी मात्र मी "सोशल मिडीयाचा" प्रभावी वापर केला,ज्याचा फायदा म्हणजे, पुणे शहरातील काही लोकप्रतिनिधिंनी यात लक्ष घातले.पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील या विषयात गांभीर्याने लक्ष दिलं आहे.


या वेळी सदरच्या ठिकाणचे अपघात रोखण्यासाठी मी जे उपाय सुचवले ते पुढील प्रमाणे : -


१) पुणे शहरात प्रवेश करतानाच नवीन बोगदा सुरू होण्यापूर्वी १ कि.मी, अलिकडेच (शिंदेवाडी/ससेवाडी पासुन) वाहन चालकांचे समुपदेशन होण्याकरीता "माहिती फलक" व "पुढे धोका असल्याच्या चिन्हांद्वारे सूचना" मोठ्या आकारात लावण्यात याव्यात.


२)नवीन बोगद्यामध्ये वेगावर नियंत्रण रहावे यासाठी स्पिड लिमीट कमी म्हणजे १०/२० चे करण्यात यावे.

(१०/२० चे स्पिड यासाठी की आतील रस्त्याच्या रचनेमुळे आपोआपच गाड्यांचा वेग वाढत असतो)


३)नवीन बोगदा संपल्यावर दरी पुलाच्या सुरूवातीलाच "स्पिडगन व कॅमेरे" बसवण्यात यावेत.


४) दरीपूल संपल्यावर तीव्र उतार सुरू होण्यापूर्वी बॅरिगेडस् लावून वाहने हळुवारपणे वडगावपर्यंत मार्गस्थ होतील याची उपाय योजना करावी.


५) सर्विस रस्त्यावरून मुख्य मार्गावर येण्याकरिता आवश्यक शास्त्रीय गतिरोधक अथवा बॅरिगेडस् बसविण्यात यावेत.


६)आवश्यक ठिकाणी सिग्नलचे पिवळ्या रंगाचे ब्लिंकींग लाईट लावण्यात यावेत.


७) नवीन बोगदा ते वडगाव दरम्यान कायमस्वरूपी वाहन चालकांच्या जागृतीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात यावी.




या पैकी  काही उपाय पुण्याचे पालकमंत्री मा. श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आदेश देऊन,त्या उपायांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना नुकत्याच सुचना केल्या आहेत.आता फक्त वाट बघायची की याची अंमलबजावणी होते की नाही ते. अन्यथा हे शेवटचे निवेदन असल्याचं मी परवाच सोशल मिडीयाद्वारे जाहिर केलंच आहे.


"मा. पालकमंत्र्यांच्याच सुचनांना कचऱ्याची टोपली."


मा. पालकमंत्र्यांनी सुचना देऊन देखील संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी पुन्हा एक भीषण अपघात दुपारी १ वाजता झाला. यामध्ये एका टॅंकरने ३ वाहनांना जोरदार धडक दिली, सुदैवाने यामध्ये कोणाचाही जीव गेला नाही.


या बरोबरच आज पर्यंत या नवीन बोगद्यात झालेल्या भीषण अपघातात अनेकांचा जीव गेला आहे.त्या पार्श्वभुमीवर,आज ही नविन बोगद्याच्या आतमध्ये रस्त्याला पडलेले धोकादायक खड्डे, पाण्याची गळती, अपुरी प्रकाश व्यवस्था, या गोष्टींची त्वरीत डागडुजी करण्यात यावी अशी मागणी देखील मी केलेली आहे.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या बरोबरच सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला सर्व्हिस रस्त्यावर असणारी हाॅटेल व अन्य काही बांधकामांवर अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे. ती करावी की न करावी हा प्रशासनाचा अंतर्गत विषय आहे. परंतु सदरच्या हायवेवर होणारे अपघात व अतिक्रमण ठरवलेली बांधकामं यांचा सबंध येतो कुठं?


प्रत्यक्षात अपघाताचे ठिकाण आणि हि बांधकामे यांचा काडी मात्र संबंध नाही. केवळ स्वत: केलेल्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरीकांच्या मृत्युस जबाबदार ठरु नये या साठी "आम्ही काहीतरी करतोय" हे दाखवून सक्रिय झाल्याचा दिखावा करण्यासाठी ही कारवाई म्हणजे "जखम मांडिला अन् मलम शेंडिला." असा प्रकार आहे.असे मत मी निवेदनात मांडले आहे.




तसेच NHAI ने सदरच्या हायवेवर पार्किंग यार्ड करीता काही एकर मोकळी जागा राखीव केली आहे.


ती आज ही बेवारसपणे पडुन आहे, तेथे अतिक्रमण व्हायची वाट बघण्यापेक्षा, त्या ठिकाणी बाहेर राज्यातुन येणाऱ्या वाहनचालकांना विश्रांती मिळणे, थोडा वेळ गाडी बाजुला लावणे, वाॅशरुमची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे.


तीव्र उतारावरून येणाऱ्या वाहनांचा वेग कमी करण्यासाठी प्रशासनाने जे रंबलर्स बसवलेत, ते अतिशय कुचकामी ठरत आहेत, कारण लाखो रूपयांच्या आलिशान गाड्या आणि अवजड वाहनांवर याचा काहीही परिणाम होत नाही. तसेच अपघात रोखण्या संदर्भात जे उपाय प्रभावीपणे करणे गरजेचे असताना ते न करता, एरवी नवले पुलाखाली झुंडीने दंड वसुली करणारे पोलिस पुलावरील अपघात रोखण्यासाठी प्रयत्नशील राहतील का? हा प्रश्न जनसामान्यांना भेडसावत आहे.


लेखक : - पुणे शहरातील  सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे पाटील, संस्थापक अध्यक्ष - मराठा युवा फाऊंडेशन.



Friday, November 18, 2022

"स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुपटीने वाढ; सर्वसामान्य शेतकरीही कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार, शिंदे सरकारचे "हे" १४ महत्वपूर्ण निर्णय वाचा सविस्तर"....

 



मुंबई, दि.१८ : मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर यावर्षी न बदलण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.

कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर सध्या म्हणजे २०२२-२३ करिता न सुधारण्याचा निर्णय  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १५४(1ड) मध्ये सुधारणा करण्यात येईल.




कोविडमुळे लागू केलेल्या टाळेबंदी तसेच प्रादुर्भावाच्या भितीमुळे अनेक लहानमोठे उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, विकासाची कामे, कारखाने, बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे, दैंनंदिन रोजगार बंद होता. यामुळे सर्वसाधारण अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे बहुतांशी मालमत्ताधारक, संस्था, लोकप्रतिनिधींकडून मालमत्ता कर माफ करणे किंवा सवलत देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे निवेदने दिली होती.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने सदर भांडवली मुल्य सुधारित करण्यास 2022-23 करिता सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत दिल्याने महानगरपालिकेची अंदाजे 1116.90 कोटी रुपये इतकी महसूल हानी होणार आहे.



स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ  आता मिळणार दरमहा २० हजार रुपये


राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे.


या निवृत्तीवेतनात वाढ करण्याची मागणी वारंवार होत होती. यासाठी वार्षिक अंदाजे ७४.७५ कोटी रुपये इतका अधिक खर्च येईल. या निवृत्तीवेतन वाढीचा राज्यातील ६२२९ स्वातंत्र्य सैनिकांना लाभ होईल.




भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम अशा देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी दरमहा निवृत्तीवेतन देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने सन १९६५ पासून सुरु केली आहे. त्यानुसार २ ऑक्टोबर २०१४ पासून दरमहिन्याला १० हजार रुपये इतके निवृत्तिवेतन देण्यात येते.



नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सुविधा उपलब्ध करणार


नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सुविधा उपलब्ध करण्यासाठी २५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास  मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

या विद्यापीठाच्या वारंगा येथील स्थायी कॅम्‍पसमधील शैक्षणिक संकुल मुलामुलींचे वसतीगृह ॲमेनिटी ब्लॉक व प्रशासकीय संकुल या इमारतींमध्ये हिटींग,व्हेटीलेशन व एअर कंडीशन यंत्रणा लावण्यात येणार आहेत.



पुणे येथे जेएसपीएम विद्यापीठ स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता


पुणे येथे जेएसपीएम विद्यापीठ या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता देण्यास निर्णय  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

हे विद्यापीठ २०२३-२४ पासून सुरु होईल. तसेच याबाबतीत विधिमंडळासमोर विधेयक सादर करण्यात येईल.

हे प्रस्तावित विद्यापीठ हवेली तालुक्यातील वाघोली येथे असेल.






कुलगुरु, प्र-कुलगुरु यांच्या निवड पद्धतीत सुधारणा


राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु, प्र-कुलगुरु यांची निवड पद्धती आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विहीत केल्याप्रमाणे होणार आहे. यासंदर्भात  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


विद्यापीठ अनुदान आयोगाने कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्या निवडीची पध्दत, अर्हता इत्यादीसंदर्भात १८ जुलै २०१८ च्या अधिसूचनेन्वये सुधारणा केलेल्या आहेत. या सुधारणा आणि त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिनियम, 1989, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, अधिनियम, 1997 व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक होते.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


या अध्यादेशाव्दारे प्रामुख्याने पुढील सुधारणा करण्यात येणार आहेत. कुलगुरू पदावर नियुक्तीसाठी प्राध्यापक पदावरील किमान १० इतका अनुभव विहित करण्यात आला आहे, कुलगुरू पदाची निवड करण्यासाठी “शोध व निवड समिती” मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला आहे, कुलगुरूंनी केलेली शिफारस विचारात घेऊन प्र-कुलगुरूची नियुक्ती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून करण्यात येणार आहे.



नवीन महाविद्यालयांच्या परवानगीसाठी मुदत वाढविली


नवीन महाविद्यालयांच्या परवानगीसाठी आता १५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज स्वीकारण्यास व त्याप्रमाणे वेळापत्रकात बदल करून अध्यादेश प्रख्यापित करण्यास  मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


या सुधारणेनुसार राज्यामध्ये नवीन महाविद्यालये किंवा परिसंस्था, नवीन अभ्यासक्रम, विषय, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी अधिनियमात असलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात येतील.



कला संस्थांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ


अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ देण्याचा निर्णय  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली ३१ अशासकीय अनुदानित कला संस्था आहेत. या कला संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध लाभ ५ ऑक्टोबर, २०१७ पासून लागू करण्यास देखील आज मान्यता देण्यात आली.



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


हे लाभ पुढील प्रमाणे राहतील- अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १) महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मधील सर्वसाधारण तरतुदी ( भविष्यात करण्यात येणाऱ्या सुधारणांसह) लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती योजना लागू करणे, अध्यापकीय पदांना द्विस्तरीय / त्रिस्तरीय वेतन संरचना लागू करणे, अध्यापकांनी विनाअनुदानीत कला संस्थेमध्ये केलेली सेवा उच्च वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणाच्या तरतुदी लागू करणे. 


शिक्षक आणि शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांपर्यंत प्रसुती रजा मंजूर करणे, "कॅन्सर" "पक्षाघात" झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजाविषयक तरतुदी लागू करणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय खर्चाची प्रतीपूर्ती लागू करणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत अनुज्ञेय करणे, अशासकीय अनुदानित कला संस्थामधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा लाभ अनुज्ञेय करणे.



ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; अधिसंख्य पदांवर सामावून घेणार


ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास  मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगांव, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर ,बुलढाणा, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांतील ५४७ सेवानिवृत्त व ३४७ कार्यरत कर्मचारी यांना याचा लाभ मिळणार असून यासाठी २४.०४ कोटी रुपये इतक्या आवर्ती खर्चास व थकबाकीपोटी येणाऱ्या ५०.०१ कोटी रुपये इतक्या अनावर्ती खर्चास आज मान्यता देण्यात आली.


पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. पाणी पुरवठा योजना तयार केल्यानंतर योजना चालविण्यासाठी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येते. अशा योजनेवरील कार्यरत रोजंदारी कर्मचारी यांना जिल्हा परिषदेकडून वेतन देण्यात येते. विविध कारणास्तव या रोजंदारी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी जिल्हा परिषदांना आर्थिक अडचणी येत आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांना पुरेसे व वेळेवर वेतन अदा न झाल्याने पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे चालविण्यास मर्यादा येत आहेत.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांकडून विविध न्यायालयामध्ये उपस्थित प्रकरणामध्ये दिलेले आदेश, कालेलकर आयोगाच्या शिफारशी, पाणी पुरवठा योजना चालविण्यासाठी जिल्हा परिषदांना येणाऱ्या अडचणी विचारात घेवून शासनाने या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे दायित्व उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता या कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून सदरील कर्मचारी कार्यरत असेपर्यंतच पद निर्मिती करण्याचे ठरविले असून त्यांना रुपांतरीत नियमित अस्थायी (सीआरटी/CRT-Converted Regular Temporary Establishment) आस्थापनेवर सामावून घेण्यात येईल.



नागपूर व औरंगाबाद खंडपीठात अतिरिक्त सचिव पदे


मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे मुख्य न्यायमुर्ती यांचे अतिरिक्त सचिव अशी २ पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


रु.43690-1080-49090-1230-56470 या वेतनश्रेणीवर ही पदे भरण्यात येतील. यासाठी ३७ लाख ८४ हजार ९४४ इतका वार्षिक खर्च येईल.



सर्वसामान्य शेतकरी देखील आता बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार


आता सर्वसामान्य शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतील. यासंदर्भात महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार करण्याचा निर्णय  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या सुधारणेमुळे कृषि उत्पन्न बाजार समितीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व तसेच कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या अधिनियमाच्या 13 (1)(अ) या कलमामध्ये सुधारणा करुन कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या सुधारणेमुळे कृषि पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या व्यवस्थापन समितीवरील निर्वाचित सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबतच सर्वसामान्य शेतकऱ्यांना कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविता येईल.



नाधवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती देणार


सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नाधवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी १०७.९९ कोटी खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


या निर्णयामुळे वैभववाडी तालुक्यातील नाधवडे व सरदारवाडी गावातील सुमारे ५०० हेक्टर जमिनीला फायदा होणार आहे. हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत उर्वरित महाराष्ट्र या प्रदेशात असून या प्रकल्पाचा एकूण पाणी साठा ८.२२ दलघमी असा आहे.



समृद्धी महामार्ग बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडाचे आदेश रद्द


हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडनीय कारवाईचे आदेश रद्द करण्याचा निर्णय  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या गौण खनिजांच्या उत्खननावर आकारणी पात्र असलेले स्वामित्वधन बसविण्यास सूट दिली आहे. मात्र काही प्रकरणी दंडनीय कारवाईपोटी केलेल्या आदेशांच्या विरुद्ध संबंधित कंत्राटदारांनी वेगवेगळ्या प्राधिकरणांपुढे केलेल्या अपिलांच्या सुनावणी अद्यापही सुरु आहे. तर काही प्रकरणी महसूल यंत्रणेने वसुलीची कार्यवाही सुरु केली आहे. ही दंडनीय कारवाई ही विहित निर्देशानुसार केलेली नसल्यामुळे दंडनीय कारवाईचे आदेश रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


त्याचप्रमाणे महसूल यंत्रणेसमोर दंडनीय कारवाईबाबत सध्या सुरु असलेली सर्व प्रकरणे देखील रद्द करण्यात आली आहेत.



प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ३५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य रस्ते विकास महामंडळास मान्यता


महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ३५ हजार ६२९ कोटी रुपये कर्जरुपाने उभारण्यास  मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या मान्यतेमुळे भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार. कर्ज उभारणीस मान्यता दिलेल्या रकमेपैकी हुडकोकडून सुरुवातीला ५६४० कोटी रुपये इतका निधी उभा करण्यास मान्यता देण्यात आली.


विरार ते अलिबाग बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका प्रकल्प (MMC), पुणे शहराभोवतालचा चक्राकार वळण मार्ग (Ring Road) बांधण्याचा प्रकल्प व जालना ते नांदेड द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आवश्यक निधी हुडको व इतर वित्तीय संस्थांमार्फत मुदती कर्जाद्वारे उभारणाचा प्रस्ताव होता. या तीनही प्रकल्पांसाठी एकूण ३५,६२९ कोटी रुपये इतकी रक्कम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास कर्ज रुपाने उभारण्यास मंजूरी देण्यात आली. यासाठी लागणारी हमी शासनाकडून दिली जाणार आहे. यासाठी कर्ज व त्यावरील व्याज परतफेड करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदी करण्यात येईल. महामंडळाकडील भूखंडाच्या विक्रीतून येणारी रक्कमही कर्जाच्या परतफेडीसाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कर्जाचा कालावधी १५ वर्षाचा असेल.



पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस, आयबीपीएस कंपन्यांकडून घेण्यास मान्यता


राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क आणि गट ड ही पदे सरळ सेवेने भरताना आता या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. यासाठी परीक्षा घेण्याचे दर, परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने करण्यास देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या अनुषंगाने उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊन आज या दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या कराराच्या प्रारुपास मान्यता देण्यात आली.


संबंधित विभागाने पदभरती करताना ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक पदभरती प्रक्रीया व स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करावयाचा आहे. या संदर्भातील विस्तृत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येत आहे.