Sunday, November 27, 2022

"पुण्यातील नवले पूल म्हणजे साक्षात मानव निर्मित मृत्यूचा सापळाच; जखम मांडीला अन् मलम शेंडीला" - प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे पाटील यांचा विशेष लेख...


"पुण्यातील नवले पूल म्हणजे साक्षात मानव निर्मित मृत्यूचा सापळाच; जखम मांडीला अन् मलम शेंडीला" 


एकेकाळी माॅंसाहेब जिजाऊंनी बसवलेलं शांत आणि निसर्गसंपन्न असणारं पुणे शहर. बैलगाड्या, घोडा-बग्गी आणि नंतर सायकलींचं शहर अशी बिरुदावली मिरवणारं हे शहर.



काही मोजक्या पेठांचा आवाका सोडला तर उपनगरातील गावं ही शेकडो मैल लांबच्या पल्ल्याची वाटायची. पण काळ बदलला शहर कात टाकु लागलं. उपनगरं शहराला झपाट्यानं जोडू लागली. तशी शहराची भौगोलीक रचना देखील बदलू लागली.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


शहरातील घरे- रस्ते कमी पडू लागले म्हणुन उपनगरं मानवी वस्त्यांनी बहरू लागली. जशी गरज तशी रस्त्यांची निर्मिती झाली.


कालांतराने बाहेरची शहरं, गावं, तालुके, जिल्हे आणि सबंध महाराष्ट्र पुणे शहराशी जोडली गेली याचं प्रमुख कारण म्हणजे पुणे हे विद्येचे माहेर घर म्हणुन नावारुपास आले. शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरून पुण्यात येणाऱ्यांची संख्या वाढत गेली. पुढे सर्वात टूमदार आणि गुंतुंवणुकीस चांगलं शहर म्हणुन पुण्यात उद्योगधंदे स्थापित झाले.


शिक्षणा बरोबरच नोकरीची देखील गरज पूर्ण होऊ लागल्याने अनेकांनी पुण्याचा रस्ता धरला. 


शिक्षण आणि नोकरी करता करता शहर गच्च भरुन ओसंडुन कधी वाहु लागलं हे लक्षातच नाही आलं. पण जितक्या प्रभावीपणे पुणे घडलं तितकंच त्याच्या मधल्या अडचणी देखील वाढत गेल्या.




एरवी पेठांमध्ये १०x१० (दहा बाय दहा) च्या खोल्यांत आनंदाने एकत्र कुटूंब पद्धतीत जगणारी माणसं शहरं सोडून उपनगरात स्थायिक झाली. परंतु शहराशी असणारी त्यांची नाळ कधीच तुटली नाही. या ना त्या कारणाने शहरात ये — जा सुरुच राहिली.


यासाठी शहरातले रस्ते प्रचंड वाहतुक कोंडीत सापडल्यामुळे शहरा जवळुन गेलेल्या महामार्गाचा वापर होऊ लागला.कालांतराने शहरा जवळुन जाणाऱ्या महामार्गांचा काही भाग हा शहरातीलच असल्याचा दावा होऊ लागला. असाच एक महामार्ग म्हणजे NH 4.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


सातारा रस्त्याने मुंबईकडे जाण्यासाठी या महामार्गाचा वापर अत्यंत सोयीचा असल्याने त्यावरची वाहतुक दिवस-रात्र सुरु असते.


पुर्वी कात्रजचा घाट व बोगदा हे पुणे शहराचे प्रवेशद्वार होते, परंतु कालांतराने अत्यंत दाटी वाटिचा रस्ता बनल्याने, याच्याच बाजुने नवीन बोगदा पाडुन महामार्ग तयार करण्यात आला. या महामार्गावर पुणे शहराच्या हद्दी जवळील म्हणजे कोळेवाडी-जांभुळवाडी- नऱ्हे - आंबेगांव ते वडगाव परीसराचा मोठा भाग आला. बाहेरील वाहनांबरोबरच  स्थानिकांची वाहने या महामार्गावर धावू लागली.



"सदरच्या नविन बोगद्या पासून म्हणजे दरी पुलापासून ते वडगाव पर्यंतच्या रस्त्याची रचना हि मानव निर्मित घोड चुक असल्याचं आता जवळ जवळ सिद्ध झालं आहे."


याचं कारण म्हणजे याच परिसरात आज पर्यंत झालेले भीषण अपघात. यामध्ये आज पर्यंत शेकडो नागरीकांनी यामध्ये आपला नाहक जीव गमावला आहे. याच्याशी संबंधित नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया, पुणे मनपा, वाहतुक पोलिस पुणे हे सर्वजण याला कारणीभुत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे.




कारण जेव्हा पासून या महामार्गाची निर्मिती झाली, तेव्हा पासुन या परिसरातील अपघाताचा केंद्रबिंदु हा "दरीपूल" होता. या पुलावर पूर्वी पासुन आज ही अपघात होतच आहेत.पुलावरुन गाडी खाली कोसळणे, पुलाच्या कठड्याला गाड्या धडकने, पुलावरील खड्ड्यात गाड्या आदळुन मागील वाहने अंगावरून जाणे असे प्रकार सर्रासपणे आजही घडत आहेत.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


पूर्वी इथले अपघात वर्तमानपत्रांच्या माध्यमातुन समोर येत होते. परंतु मागील काही काळात इथले अपघात समाजमाध्यमां समोर येणे बंद झाले, याचे कारण समजण्या पलीकडे आहे. आज ही या दरीपुलावरून पुण्याकडे येताना डाव्या बाजुला लक्ष दिल्यास इथे होणाऱ्या अपघातांची जाणीव होईल असे पुरावे म्हणजे पुलाच्या कठड्याला वाहने "धडकलेल्या खुणा, काचांचा खच, तुटलेले-वाकलेले रेलींगचे पाईप" इ. आढळुन येतात.




परंतु या ठिकाणा नंतर वर नमुद केल्या प्रमाणे आजु-बाजुच्या उपनगरांतील वाहने या महामार्गावर येऊ लागल्याने अपघाताचा दुसरा केंद्र बिंदु ठरला तो म्हणजे "नऱ्हे व नवले पूल" या दोन्हीमधलं अंतर केवळ १ कि.मी. याच पट्ट्यात आज पर्यंत अनेक भीषण अपघात झाले. त्या संबंधिच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रे व माध्यमांमधुन समोर आल्या.


आता इथं एक गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे,ती म्हणजे दरीपुलावरील अपघात हे समाज माध्यमांसमोर येत नाहीत,परंतु नवले पूल परीसरातील येतात, याचं मुख्य कारण म्हणजे हा सर्व परीसर लोकवस्तीत येतो, इथे सततची वर्दळ असते, त्यामुळे इथल्या घडामोडी सोशल मिडीयाच्या प्रभावी वापरामुळे तात्काळ व्हायरल होतात.


या महामार्गावर अपघातांची मालिका सतत सुरू आहे, संबंधित प्रशासनांच्या वतीने केवळ अपघात घडल्या नंतर उपाय योजनांच्या बाबतीत सक्रिय असल्याचे नाटक प्रत्येक वेळी केलं जातं.परंतु या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना रोखण्याच्या दृष्टिने कोणतीही ठोस उपाययोजना व पावले उचलली जात नव्हती.






ज्या वेळी अपघात व्हायचे त्या वेळी प्रशासनाकडुन कायम एक गोंडस कारण पुढं केल जायचं, आणि ते म्हणजे "वाहन चालक गाडी न्युट्रल करून चालवत असल्याने नियंत्रण न राहिल्याने अपघात झाला." पण प्रत्येक अपघात हा केवळ या एकाच कारणाने होतो का? याचा विचार कधीच कोणी केला नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.


म्हणुन मी स्वत: या विषयात लक्ष घालायचं ठरवलं, कारण सदरचा महामार्ग तयार होण्या पूर्वीपासुन हा परीसर माझ्या परिचयाचा होता.


या बरोबरच माझं गांव वेल्हे (राजगड) तालुक्यातील करंजावणे गांव आहे. गावाकडे जाण्या-येण्यासाठी देखील या महामार्गाचा वापर मी आज ही करीत असतो. माझ्यासह भोर/वेल्हे आणि सातारा येथील अनेक जण दुध व्यवसायाबरोबरच काम धंद्यासाठी याच महामार्गाचा जीव धोक्यात घालून वापर करीत आहेत.


दरीपूल ते नवले पूल या परिसरात अपघात होतात हे स्थानिकांसह नेहमी प्रवास करणाऱ्यांना माहिती असल्याने ते आवश्यक ती काळजी घेत असतात.


परंतु परराज्यातुन, परप्रांतातुन येणाऱ्यांना इथली परीस्थिती माहित नसते, आणि नेमके यातीलच काही लोक अपघातास कारणीभुत ठरतात, किंवा बळी पडतात. काही वेळा नेहमी प्रवास करणारे देखील या अपघातांमध्ये सापडतात.


Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


ही पार्श्वभुमी मला माहिती असल्याने सदरच्या अपघातांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणे विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा मानस होता.


परंतु हा विचार करत असताना एक गोष्ट मनात आली की, हा विषय केवळ आंदोलनाच्या माध्यमातुन राजकीय मुद्दा न बनवता, सदरच्या ठिकाणचे अपघात रोखण्या संदर्भात काम करु,असं म्हणुन मी या विषयाचा अभ्यास सुरू केला. परिसरातील भौगोलिक भागाचा विचार केला.


आणि मग यावर काही उपाययोजना जर प्रशासनाला सुचविली आणि प्रशासनाने त्याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी केली तर इथले अपघात कायमचे बंद होतील असा विश्वास मला आला.आणि सदरच्या विषयाचा अभ्यास करत असतानाच याच मार्गावर भीषण अपघात झाला.


त्या पार्श्वभुमिवर "डिसेंबर २०२०" रोजी मी NHAI च्या कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन सादर केलं, त्यामध्ये काही अत्यंत महत्वाचे उपाय  सुचवले. व या निवेदनाचा पाठपुरावा संबंधित कार्यालयाशी सतत संपर्क करून सुरु ठेवला.




या सुचनांपैकी नवीन बोगदा ते वडगाव पर्यंत यापुर्वी कधीही न बसवलेले विजेचे खांब बसवण्यासाठी पाठपुरावा केला आणि ते बसवल्याने हा धोकादायक परिसर उजेडात आला.


याच बरोबर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी देखील मागणी लावून धरत रंबलर्स बसवून घेतले. परंतु उर्वरीत सुचनांकडे मी वेळोवेळी लक्ष वेधुन सुद्धा संबंधितांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या दरम्यान अनेक छोटे-मोठे अपघात घडत होते, परंतु प्रशासन उसनं आवसान आणुन वागत होतं.


याही परिस्थितीत मार्गावरील बंद अवजड वाहने हलविणे असेल, वा नादुरुस्त अवस्थेतील वाहने हलविणे असेल यासाठी प्रयत्न सूरू आहेत.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


अशातच रविवार २० नोव्हेंबर २०२२ रोजी भीषण अपघात झाला. यामध्ये तीव्र उताराने आलेल्या एका भरधाव ट्रकने तब्बल ४८ वाहनांना उडवले. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले,वाहनांचे प्रचंड नुकसान झाले तर एका व्यक्तिचा दुर्दैवी मृत्यु झाला.




नेहमी प्रमाणे प्रशासनाने अपघाताचे खापर हे वाहन चालकावर फोडले, आणि "न्युट्रल किंवा ब्रेक फेल झाल्यानेच हा अपघात झाला," असे गोंडस कारण पुढे केले. परंतु RTO ने केलेल्या तपासणीमध्ये सदरचे वाहन हे पूर्णपणे सूस्थितीत असल्याचा अहवाल दिल्याने NHAI व वाहतुक पोलिसांचा दावा सपशेल फेल ठरला.


आता यावर मला माझी आंदोलनाची भुमिका घ्यायची होती,परंतु पुन्हा अडचण समोर आली, आणि ती म्हणजे आंदोलन करुन सुद्धा संबंधित यंत्रणा सुधारली नाही तर? तो पर्यंत पुन्हा एखादा अपघात घडुन कोणाचा निष्पाप आणि नाहक जीव गेला तर? मग मी पुन्हा आंदोलनाचं उपसलेलं हत्यार म्यान केलं, आणि पुन्हा नव्यानं संबंधित यंत्रणेला डिसेंबर २०२० मध्ये सुचवलेल्या उपायांचे निवेदन दिले.


रविवारी २० नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या भीषण अपघाताच्या  पार्श्वभुमीवर, मी पुन्हा एकदा २३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष NHAI कार्यालयास भेट देऊन निवेदन सादर केलं.आणि त्यात अपघात रोखण्यासंदर्भात योग्य ते उपाय सुचवले.आणि यावेळी मात्र मी "सोशल मिडीयाचा" प्रभावी वापर केला,ज्याचा फायदा म्हणजे, पुणे शहरातील काही लोकप्रतिनिधिंनी यात लक्ष घातले.पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील या विषयात गांभीर्याने लक्ष दिलं आहे.


या वेळी सदरच्या ठिकाणचे अपघात रोखण्यासाठी मी जे उपाय सुचवले ते पुढील प्रमाणे : -


१) पुणे शहरात प्रवेश करतानाच नवीन बोगदा सुरू होण्यापूर्वी १ कि.मी, अलिकडेच (शिंदेवाडी/ससेवाडी पासुन) वाहन चालकांचे समुपदेशन होण्याकरीता "माहिती फलक" व "पुढे धोका असल्याच्या चिन्हांद्वारे सूचना" मोठ्या आकारात लावण्यात याव्यात.


२)नवीन बोगद्यामध्ये वेगावर नियंत्रण रहावे यासाठी स्पिड लिमीट कमी म्हणजे १०/२० चे करण्यात यावे.

(१०/२० चे स्पिड यासाठी की आतील रस्त्याच्या रचनेमुळे आपोआपच गाड्यांचा वेग वाढत असतो)


३)नवीन बोगदा संपल्यावर दरी पुलाच्या सुरूवातीलाच "स्पिडगन व कॅमेरे" बसवण्यात यावेत.


४) दरीपूल संपल्यावर तीव्र उतार सुरू होण्यापूर्वी बॅरिगेडस् लावून वाहने हळुवारपणे वडगावपर्यंत मार्गस्थ होतील याची उपाय योजना करावी.


५) सर्विस रस्त्यावरून मुख्य मार्गावर येण्याकरिता आवश्यक शास्त्रीय गतिरोधक अथवा बॅरिगेडस् बसविण्यात यावेत.


६)आवश्यक ठिकाणी सिग्नलचे पिवळ्या रंगाचे ब्लिंकींग लाईट लावण्यात यावेत.


७) नवीन बोगदा ते वडगाव दरम्यान कायमस्वरूपी वाहन चालकांच्या जागृतीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात यावी.




या पैकी  काही उपाय पुण्याचे पालकमंत्री मा. श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आदेश देऊन,त्या उपायांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना नुकत्याच सुचना केल्या आहेत.आता फक्त वाट बघायची की याची अंमलबजावणी होते की नाही ते. अन्यथा हे शेवटचे निवेदन असल्याचं मी परवाच सोशल मिडीयाद्वारे जाहिर केलंच आहे.


"मा. पालकमंत्र्यांच्याच सुचनांना कचऱ्याची टोपली."


मा. पालकमंत्र्यांनी सुचना देऊन देखील संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी पुन्हा एक भीषण अपघात दुपारी १ वाजता झाला. यामध्ये एका टॅंकरने ३ वाहनांना जोरदार धडक दिली, सुदैवाने यामध्ये कोणाचाही जीव गेला नाही.


या बरोबरच आज पर्यंत या नवीन बोगद्यात झालेल्या भीषण अपघातात अनेकांचा जीव गेला आहे.त्या पार्श्वभुमीवर,आज ही नविन बोगद्याच्या आतमध्ये रस्त्याला पडलेले धोकादायक खड्डे, पाण्याची गळती, अपुरी प्रकाश व्यवस्था, या गोष्टींची त्वरीत डागडुजी करण्यात यावी अशी मागणी देखील मी केलेली आहे.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या बरोबरच सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला सर्व्हिस रस्त्यावर असणारी हाॅटेल व अन्य काही बांधकामांवर अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे. ती करावी की न करावी हा प्रशासनाचा अंतर्गत विषय आहे. परंतु सदरच्या हायवेवर होणारे अपघात व अतिक्रमण ठरवलेली बांधकामं यांचा सबंध येतो कुठं?


प्रत्यक्षात अपघाताचे ठिकाण आणि हि बांधकामे यांचा काडी मात्र संबंध नाही. केवळ स्वत: केलेल्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरीकांच्या मृत्युस जबाबदार ठरु नये या साठी "आम्ही काहीतरी करतोय" हे दाखवून सक्रिय झाल्याचा दिखावा करण्यासाठी ही कारवाई म्हणजे "जखम मांडिला अन् मलम शेंडिला." असा प्रकार आहे.असे मत मी निवेदनात मांडले आहे.




तसेच NHAI ने सदरच्या हायवेवर पार्किंग यार्ड करीता काही एकर मोकळी जागा राखीव केली आहे.


ती आज ही बेवारसपणे पडुन आहे, तेथे अतिक्रमण व्हायची वाट बघण्यापेक्षा, त्या ठिकाणी बाहेर राज्यातुन येणाऱ्या वाहनचालकांना विश्रांती मिळणे, थोडा वेळ गाडी बाजुला लावणे, वाॅशरुमची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे.


तीव्र उतारावरून येणाऱ्या वाहनांचा वेग कमी करण्यासाठी प्रशासनाने जे रंबलर्स बसवलेत, ते अतिशय कुचकामी ठरत आहेत, कारण लाखो रूपयांच्या आलिशान गाड्या आणि अवजड वाहनांवर याचा काहीही परिणाम होत नाही. तसेच अपघात रोखण्या संदर्भात जे उपाय प्रभावीपणे करणे गरजेचे असताना ते न करता, एरवी नवले पुलाखाली झुंडीने दंड वसुली करणारे पोलिस पुलावरील अपघात रोखण्यासाठी प्रयत्नशील राहतील का? हा प्रश्न जनसामान्यांना भेडसावत आहे.


लेखक : - पुणे शहरातील  सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे पाटील, संस्थापक अध्यक्ष - मराठा युवा फाऊंडेशन.



No comments:

Post a Comment