पुरंदर, वीर, दि.१० : पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, वीर गावच्या अनुष्का धुमाळ या विद्यार्थिनीने जिद्दीने, चिकाटीने, मेहनत करून, कोणताही खाजगी क्लास लावलेला नसतानाही, आई दिपाली धुमाळ यांच्या प्रेरणेने व वडील अमोल धुमाळ यांच्या पाठबळामुळे, इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये 96 टक्के गुण संपादन करून घवघवीत यश मिळवले.
मुलांची यशस्वी शैक्षणिक कारकीर्द घडवण्यासाठी आई-वडिलांचे संस्कार, प्रेरणा व पाठबळ खूप महत्त्वाचे असते. कुटुंबाच्या प्रगतशील वाटचालीसाठी वडिलांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन,पाठींबा जेवढा महत्वाच्या असतो तेवढेच आईची माया, प्रेम,संस्कार, मार्गदर्शन व प्रेरणाही मुलांच्या प्रगतशील वाटचालीसाठी महत्वाची असते.
अनुष्का धुमाळ हिच्या यशामध्ये तिची जिद्द, चिकाटी,मेहनत, जेवढी महत्वाची तेवढीच आईची प्रेरणा,संस्कार, मार्गदर्शन व वडिलांचे प्रोत्साहन,पाठबळही खूप महत्वाचे आहे.
अनुष्का धुमाळ या यशस्वी विद्यार्थिनीची आई दिपाली धुमाळ या गृहिणी असून देखील आपल्या मुलींनी खूप शिकावं, नाव मोठं करावं. प्रगतशील शैक्षणिक वाटचाल करावी यासाठी मुलींना प्रेरणा देऊन, योग्य मार्गदर्शन करून मागील अनेक वर्ष मेहनत घेत आहेत.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
अनुष्का धुमाळ या यशस्वी विद्यार्थिनीचे वडील अमोल धुमाळ हे वाई येथील खाजगी कंपनीत चांगल्या पदावरती कार्यरत आहेत तसेच सामाजिक क्षेत्रातही सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत. मुलींच्या प्रगतशील वाटचालीसाठी त्यांचेही योगदान खूप महत्त्वाचे आहे.
अनुष्का धुमाळ हिची मोठी बहीण आदिती धुमाळ हिने देखील बारावीला 90% पेक्षा जास्त गुण संपादन करून, चांगले यश मिळवले. आदिती धुमाळ हिने पुण्यातील नामांकित महाविद्यालयामधून संगणक अभियंत्याची पदवी नुकतीच पूर्ण केलेली असून तिची महाविद्यालयाच्या कॅम्पस मुलाखती मधून संगणक क्षेत्रातील एका चांगल्या बहुराष्ट्रीय कंपनीसाठी आदिती धुमाळ हिची निवडही झालेली आहे.
मुलींच्या शैक्षणिक कारकीर्दीची प्रगतशील वाटचाल हेच खरे आई-वडिलांच्या कष्ट, मेहनतीचे फळ असते.अनुष्का धुमाळ हिचे पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर हे मूळ गाव असून वडील अमोल धुमाळ हे वाई येथील खासगी कंपनीमध्ये नोकरीला असल्यामुळे अनुष्का धुमाळ हिचे शिक्षण सातारा जिल्ह्यातील, वाई येथे चालू आहे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
वाई येथील जॉय चिल्ड्रन्स अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाची अनुष्का धुमाळ ही यशस्वी विद्यार्थ्यांनी असून या विद्यालयाचे शिक्षक वर्ग व मुख्यद्यापक सर्वांचेच मार्गदर्शन तिला शैक्षणिक प्रगतशील वाटचालीमध्ये लाभलेले आहे.
ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय धुमाळ कुटुंबातील या दोन्ही बहिणींची यशस्वी शैक्षणिक वाटचाल सर्व मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. आई-वडिलांना सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून मुलांची शैक्षणिक कारकीर्द प्रगतशील घडवण्यासाठी खूप लक्ष द्यावे लागते.
अनुष्का धुमाळ हिने दहावीला कुठलाही खाजगी क्लास लावलेला नसतानाही, 96 टक्के मिळवून जे घवघवीत यश मिळवले त्याबद्दल पुरंदर तालुक्यातील व वाई तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्वच नागरिकांनी तिचे भरभरून कौतुक केलेले आहे.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
अनुष्का धुमाळ हिचा लहान भाऊ शिवराज धुमाळ हा देखील शालेय अभ्यासात हुशार असून वेगवेगळ्या शालेय व व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन गुणवत्ता दाखवत असतो.
"अनुष्का धुमाळ हिच्या आई दिपाली धुमाळ यांनी गृहिणी असून देखील गृहिणीच्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून, मुलांवरती चांगले संस्कार करून, मुलींना शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देऊन, योग्य मार्गदर्शन करून एक आदर्श कुटुंब कसे असावे हे उदाहरण समाजाला दाखवून दिलेले आहे."
"अनुष्का धुमाळ हिचे वडील अमोल धुमाळ यांचे मुलांना असलेले मार्गदर्शन, प्रोत्साहन व पाठबळ यामुळेच धुमाळ कुटुंबियांतील मुलींची यशस्वी शैक्षणिक वाटचाल झालेली आहे."
आपल्या मुलांची शैक्षणिक कारकीर्दीतील यशस्वी वाटचाल हाच आई-वडिलांचा खूप मोठा सन्मान असतो.
No comments:
Post a Comment