Sunday, August 27, 2023

"महाराष्ट्रातील "या" प्रसिद्ध देवस्थानचे लोकनेते शरद पवार यांनी केले कौतुक, लहानपणीच्या "या" खास आठवणींना दिला उजाळा; गावकऱ्यांच्या "या" खास योगदानाबद्दल केले भरभरून कौतुक"....


पुरंदर, वीर, दि.२७ : भारतीय राजकारणातील जेष्ठ नेते, मा.केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी, शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी, जनतेशी संवाद साधण्यासाठी दौरे चालू आहेत.




लोकनेते शरद पवार पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले असताना, पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र वीर येथील गुरुवारी झालेल्या "सवाई मंगल कार्यालय लोकार्पण सोहळा व नियोजित विकास आराखडा (श्रीनाथ कोरीडॉर) भूमिपूजन सोहळ्यावेळी "श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर" यांनी भक्तांच्या सुखसुविधांसाठी केलेल्या चांगल्या उपक्रमांचे,कामाचे शरद पवार यांनी  कौतुक केले.




लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या तीर्थक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान विषयी असलेली भक्तीची लोकभावना, या कार्यक्रमात लोकनेते शरद पवार यांनी व्यक्त केली.




यावेळी शरद पवार म्हणाले,  "एका चांगल्या कार्यक्रमासाठी आज आपण इथे उपस्थित राहिलेलो आहोत. हे मंदिर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्याबाहेर सुद्धा एक श्रद्धेचे ठिकाण आहे. "


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"एका विशिष्ठ काळामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा लोक इथे येतात आणि दैनंदिन पूजा - आर्चासाठी लोक श्रद्धेने इथे येतात. आणि म्हणून श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान हे एक श्रद्धेचे देवस्थान आहे."




"ज्यावेळी अनेक ठिकाणाहून लोक येथे दर्शनासाठी येत असतात,त्यावेळी त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देणे, तो परिसर स्वच्छ राहील याची खबरदारी घेणे आणि आलेल्या माणसांना दर्शनाच्या नंतर एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल अशी पार्श्वभूमी तयार करणे याची आवश्यकता असते. आणि ते काम या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांनी होत आहे आणि साहजिकच मंदिराचा चेहरा बदलत आहे. आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत होत आहे, याचा मनापासून मला आनंद आहे." या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.




"आपल्या लहानपणीच्या वीर गावा विषयीच्या खास आठवणी सांगताना शरद पवार म्हणाले," मी माझ्या लहानपणी  अनेकदा या ठिकाणी आलोय. नातीगोती होती त्यावेळी येता आलं. आणि मला आठवतंय की वीरला या ठिकाणी त्या काळात आंब्याची झाडं फार असायची. त्यावेळेला आंबे खायला जाणं ही एक गोष्ट आम्हा लोकांची अत्यंत आवडीची असायची. "



वीर धरणासाठी  वीर मधील गावकऱ्यांच्या,नागरिकांच्या योगदानाबद्दल कौतुक करताना शरद पवार म्हणाले, "इथलं दुसरे वैशिष्ट्य असं आहे की, तुम्ही लोकांनी इथलं  धरण बांधलं आणि आज बारामती काय, इंदापूर काय किंवा पंढरपूर काय, फलटण काय या सगळ्या भागांमध्ये आज शेती संपन्न झाली. त्या शेतीचं मुख्य कारण इथल्या पाण्याच्या थेंब त्यांच्या शिवारामध्ये गेला आणि हे उपकार तिथल्या भागातल्या लोकांच्या कायम अंत:करणामध्ये आहेत. आज या कामाच्या निमित्ताने या ठिकाणी येता आलं याचा मला आनंद आहे."



 "हे मंदिर तुम्ही चांगल्या दृष्टीने बांधलं, त्याला स्वच्छ ठेवा, प्रसन्न वातावरण ठेवा, वृक्षवल्ली वाढवा आणि इथे आलेला प्रत्येक श्रद्धेय हा आनंदाने परत जाईल, विश्वासाने परत जाईल अशा प्रकारची खात्री या ठिकाणी आपण सगळेजण त्या भाविकांना द्या." अश्या शब्दात आपल्या भावना लोकनेते शरद पवार यांनी या कार्यक्रमात व्यक्त केल्या.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


याच कार्यक्रमात शरद पवार यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त परिस्थिती, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न यावर मनोगत व्यक्त करून, केंद्र सरकारच्या साखरेच्या,कांद्याच्या निर्यात धोरणावर टीका केली.




श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट,वीर संचलित सवाई मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा तसेच नियोजित विकास आराखडा(श्रीनाथ कॉरीडोर) चा भूमिपूजन सोहळा गुरुवारी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार  यांच्या शुभहस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


यावेळी बारामती लोकसभा खासदार सुप्रिया  सुळे,पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप, आमदार शशिकांत शिंदे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष माणिकराव झेंडे, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, माजी जि.प.सदस्य सुदाम आप्पा इंगळे, माजी जि.प.सदस्य बबुसाहेब माहुरकर, राष्ट्रवादी प्रवक्ते विजय कोलते, सर्व मान्यवर, वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ व सर्व विश्वस्त, सर्व सल्लागार,मानकरी,सालकरी,भक्त मंडळी व  ग्रामस्थ उपस्थित होते.

Wednesday, August 16, 2023

"वेल्हे तालुक्यातील 'दापोडे गावचा' लोकांची मने जिंकणारा, आगळावेगळा, आदर्श उपक्रम; गावातील विधवा, परित्यक्ता महिलांना ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्याचा मिळाला सन्मान"...


पुणे, वेल्हे, दि.१६ : समाजात महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कितीही यशस्वी झाल्या तरी, आजही महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवरती शासनाचे व सामाजिक संस्थांचे प्रयत्न चालू असतात. 




पुणे जिल्ह्यातील, वेल्हे तालुक्यातील दापोडे या गावात 77 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील विधवा, परित्यक्ता महिलांना ध्वजारोहणाचा सन्मान देऊन, स्वातंत्र्य दिन उत्साहात, आनंददायी व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.




वेल्हे तालुक्यातील दापोडे ग्रामपंचायतीच्या  वतीने 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक आगळावेगळा, आदर्श उपक्रम राबविण्यात आला. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दापोडे गावातील विधवा, परित्यक्ता, महिलांच्या हस्ते सकाळी आठ वाजता, दापोडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये, देशभक्तीमय वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले.




यावेळी दापोडे गावचे सरपंच संदीप शेंडकर, वेल्हे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील सर्व परित्यक्ता,विधवा महिलांना साडी वाटप करून सन्मानित करण्यात आले. 





"गावातील विधवा, परित्यक्ता महिलांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचा सन्मान देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारा असा  चांगला, आगळावेगळा उपक्रम वेल्हे तालुक्यामध्ये प्रथमच राबवून समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न दापोडे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला." अशी प्रतिक्रिया दापोडे गावचे सरपंच संदीप शेंडकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




दापोडे गावच्या महिलांना सन्मान देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या, आदर्श उपक्रमामुळे दापोडेकरांनी वेल्हा तालुक्यातील लोकांची मने जिंकलेली आहेत.




महिला आरक्षण असो की महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असलेल्या संधी असो महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगले कार्य करत आहेतच,

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


परंतु समाजामध्ये महिलांना सन्मान देणारे असे आगळेवेगळे आदर्श उपक्रम राबवले तर निश्चितच महिला सक्षमीकरणासाठी एक चांगले पाऊल पुढे पडेल.




77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दापोडे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम देखील राबविण्यात आला. 




यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर, वेल्हे तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष आनंता शेंडकर, उपसरपंच साधू शेंडकर, सखाराम बोडके, माऊली शेंडकर, दौलत शेंडकर तसेच,




संतोष शेंडकर, पंकज शिवतरे, अशोक शेंडकर, शिवाजी शेंडकर, नवनाथ शेंडकर, प्रकाश यादव, कृष्णा मरळ, विनायक खैरे, दीपक धुमाळ, संतोष कांबळे, यासह दापोडे गावातील ग्रामस्थ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tuesday, August 15, 2023

"पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेत ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात, जल्लोषात साजरा; दहावीत 'प्रथम आलेल्या स्वराज धुमाळ या गुणवंत विद्यार्थ्याच्या पालकांना मिळाला ध्वजारोहणाचा सन्मान"



पुणे, दि.१५ :  पुणे शहरातील धनकवडी येथील प्रियदर्शनी विद्यामंदिर या  दक्षिण उपनगरातील प्रसिद्ध शाळेत भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात व  देशभक्तीमय,आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. 




77 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त शाळेमध्ये प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले. प्रशालेतील विद्यार्थी मोठ्या आनंदाने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.




पुण्यातील धनकवडी येथील प्रियदर्शनी विद्या मंदिर  प्रशालेमध्ये 77 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त सकाळपासूनच  विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वर्ग या सर्वांच्या मध्येच उत्साह दिसत होता.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


प्रियदर्शनी विद्यामंदिर या विद्यालयात  दहावी मध्ये ९४ टक्के गुण मिळवून, पहिला क्रमांक आलेल्या स्वराज धुमाळ  या  गुणवंत विद्यार्थ्याच्या पालकांच्या हस्ते  सकाळी साडे सात वाजता  शाळेच्या मैदानावर, देशभक्तीमय  वातावरणात ध्वजारोहण झाले. या 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते शंकरराव कडू यांची उपस्थिती लाभली.




या प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम, झांज, ध्वज व ढोल पथकाने पाहुण्यांचे स्वागत अतिशय उत्साही व आगळ्या, वेगळ्या पद्धतीने केले.



Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


या कार्यक्रमात राष्ट्रगीत, राज्यगीत  विद्यार्थ्यांनी सादर केल्यानंतर पाहुण्यांना मानवंदना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दिली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना दिली. 




झेंडा गीत व स्वागत गीत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी खूप सुंदर व सुरेख पद्धतीने सादर केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापिका राजश्री दिघे  व रुपाली मालुसरे  यांच्या हस्ते संपन्न झाला.



Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक शंकरराव कडू यांनी प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेतील विविध उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.




या प्रशालेचा गुणवंत विद्यार्थी स्वराज धुमाळ याचे पालक सविता धुमाळ यांनी प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे कौतुक करून, कुठलाही खाजगी क्लास न लावता स्वराज धुमाळने मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल आपल्या मनोगतातून समाधान व्यक्त करून, प्रशालेचे आभार मानले.




"प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. गुणवंत विद्यार्थ्याच्या पालकांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सन्मानित करून, ध्वजारोहणाचा मान देणे हा स्तुत्य उपक्रम आहे." अशी प्रतिक्रिया गुणवंत विद्यार्थी स्वराज धुमाळ याचे पालक राजेंद्र धुमाळ यांनी दिली.




या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक व  शिक्षकेतर वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


या कार्यक्रमासाठी कलाशिक्षक सुनील सोनवणे व क्रीडा शिक्षक संदीप भोसले यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया पाटसकर  यांनी केले.




या संस्थेचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते आप्पा रेणुसे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


प्रियदर्शनी विद्यामंदिर या प्रशालेतील दहावी मधील प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थी किंवा विद्यार्थीनीच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करणे हा खूपच कौतुकास्पद उपक्रम आहे.




आज संपूर्ण  देशभरात,  संपूर्ण महाराष्ट्रात 77 वा  स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात,  देशभक्तीमय  वातावरणात साजरा  करण्यात आला.


Monday, August 14, 2023

"१५ ऑगस्टपासून राज्यातील आरोग्य विभागाच्या "या" सर्व शासकीय रुग्णालयांमधून मोफत उपचार मिळणार; औषधे,आरोग्य तपासण्याही मोफत; पैसे आकारले किंवा बाहेरून औषधे आणायला सांगितल्यास "या" टोल फ्री नंबरवर तक्रार करता येणार"..



मुंबई, दि. १४ :  राज्यातील सर्वसामान्य नागरिकांवरती वैद्यकीय संकट, मोठ्या आजारपणाचे संकट आल्यानंतर आरोग्यावरच्या मोठया खर्चाला तोंड द्यावे लागते. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये १५ ऑगस्ट २०२३ पासून राज्यातील गरजू, गरीब रुग्णांना  मोफत उपचार मिळणार आहेत.




सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. महाराष्ट्र राज्य सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील गरजू, गरीब रुग्णांना दिलासा मिळणार आहे.



रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील गरीब, आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना नि:शुल्क उपचार मिळणार आहेत.




राज्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे किंवा अन्य साहित्य आणायला सांगू नये तसेच बाहेरून औषधे घेण्यासाठी प्रीस्क्रिप्शन ही लिहून देऊ नये. असा आदेश आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांना देण्यात आलेला आहे. यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.




रुग्णाला क्वचित प्रसंगी बाहेरील औषधे द्यावी लागल्यास रुग्णालयाने रुग्ण कल्याण समितीच्या अनुदानातून औषधे खरेदी करून रुग्णाला मोफत उपलब्ध करून द्यावीत. आरोग्य विभागाच्या कोणत्याही रुग्णालयामध्ये शुल्क आकारण्यात येत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे.


महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये  रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्याची अंमलबजावणी उद्या मंगळवारपासून 15 ऑगस्ट २०२३ पासून करण्यात येणार आहे.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


राज्यातील सर्व रुग्णालयांनी निर्णयाची  अंमलबजावणी करावी असा आदेश आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी काढला आहे.


राज्यातील "या" रुग्णालयात मिळणार मोफत उपचार..  


राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणारी सर्व उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय (Super Speciality Hospital) जिल्हा रुग्णालय येथे मोफत उपचार मिळणार आहेत.




सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे 2 कोटी 55 लाख नागरीक येतात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण 2418 संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


शासकीय रुग्णालयात रुग्णावरील उपचारादरम्यान पैसे आकारले किंवा बाहेरून औषध आणण्यासाठी सांगितल्यास रुग्णाला तक्रार करता येणार आहे. रुग्णाला 104 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण करण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयांच्या प्रमुखांची असणार आहे. संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकित्सक यांची असणार आहे.


आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराच्या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भातील सूचना


1) सरकारने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोफत नोंदणी करावी.


2) वैद्यकीय उपचार व आरोग्य तपासण्यासाठी शुल्क आकारू नये.




3) इसीजी, एक्स-रे, सिटीस्कॅन, प्रयोगशाळेतील चाचण्या यांच्यासाठीही शुल्क आकारू नये.




4) आंतर रुग्ण विभागात दाखल असलेल्या रुग्णाला वैद्यकीय उपचार झाल्यानंतर घरी सोडताना पैसे मागू नये.




5) सरकारी निर्णयाच्या अंमलबजावणीपूर्वी  रुग्णांकडून गोळा केलेली रक्कम सरकारी खाते किंवा रुग्ण कल्याण निधीमध्ये जमा करावी.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला. यामुळे राज्यातील गरजू, गरिब रुग्णांना दिलासा मिळणार आहे.




भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकास जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क म्हणून प्रदान करण्यात आलेला आहे. प्रत्येक नागरीकास चांगल्या आरोग्यासाठी उपचार मिळाले पाहिजेत. राज्यातील प्रत्येक नागरिकास नि:शुल्क, दर्जेदार, सहज व विनाविलंब वैद्यकीय सेवा देण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयातून नि:शुल्क उपचाराचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




आरोग्य हक्क राज्यातील नागरिकांना उत्तमरित्या देण्याकरीता आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांमध्ये संसाधने, साधन - सामुग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ, औषधांची उपलब्धता, आरोग्य विषयक जनजागृती, लसीकरण, औषधोपचार असे अनेक घटक असून रूग्णशुल्काचा यामध्ये समावेश होतो.


सद्यस्थितीत आरोग्य संस्थामधील औषधे व उपचारावरील रुग्ण शुल्क नि:शुल्क होणार असल्यामुळे सर्व वंचित, दुर्बल घटकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


शासनाकडून जनतेसाठी आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेतंर्गत 5 लाख रूपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची हमी शासनाने यापूर्वीच घेतली आहे. 


या योजनांमधून राज्यातील सर्व नागरीकांना आरोग्य खर्चाचे कवच शासनाने उपलबध करून दिले आहे.




राष्ट्रीय रक्त धोरणानुसार रक्त व रक्त घटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे सेवा शुल्क वगळून शासकीय रूग्णालयांमधून करण्यात येणाऱ्या तपासण्या व उपचार, तसेच सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील वैद्यकीय सेवा नि:शुल्क करण्यात येणार आहेत.


 राज्य सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा देणारा हा चांगला निर्णय घेतलेला आहे. परंतु याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.