Sunday, August 27, 2023

"महाराष्ट्रातील "या" प्रसिद्ध देवस्थानचे लोकनेते शरद पवार यांनी केले कौतुक, लहानपणीच्या "या" खास आठवणींना दिला उजाळा; गावकऱ्यांच्या "या" खास योगदानाबद्दल केले भरभरून कौतुक"....


पुरंदर, वीर, दि.२७ : भारतीय राजकारणातील जेष्ठ नेते, मा.केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी, शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी, जनतेशी संवाद साधण्यासाठी दौरे चालू आहेत.




लोकनेते शरद पवार पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले असताना, पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र वीर येथील गुरुवारी झालेल्या "सवाई मंगल कार्यालय लोकार्पण सोहळा व नियोजित विकास आराखडा (श्रीनाथ कोरीडॉर) भूमिपूजन सोहळ्यावेळी "श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर" यांनी भक्तांच्या सुखसुविधांसाठी केलेल्या चांगल्या उपक्रमांचे,कामाचे शरद पवार यांनी  कौतुक केले.




लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या तीर्थक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान विषयी असलेली भक्तीची लोकभावना, या कार्यक्रमात लोकनेते शरद पवार यांनी व्यक्त केली.




यावेळी शरद पवार म्हणाले,  "एका चांगल्या कार्यक्रमासाठी आज आपण इथे उपस्थित राहिलेलो आहोत. हे मंदिर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्याबाहेर सुद्धा एक श्रद्धेचे ठिकाण आहे. "


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"एका विशिष्ठ काळामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा लोक इथे येतात आणि दैनंदिन पूजा - आर्चासाठी लोक श्रद्धेने इथे येतात. आणि म्हणून श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान हे एक श्रद्धेचे देवस्थान आहे."




"ज्यावेळी अनेक ठिकाणाहून लोक येथे दर्शनासाठी येत असतात,त्यावेळी त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देणे, तो परिसर स्वच्छ राहील याची खबरदारी घेणे आणि आलेल्या माणसांना दर्शनाच्या नंतर एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल अशी पार्श्वभूमी तयार करणे याची आवश्यकता असते. आणि ते काम या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांनी होत आहे आणि साहजिकच मंदिराचा चेहरा बदलत आहे. आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत होत आहे, याचा मनापासून मला आनंद आहे." या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.




"आपल्या लहानपणीच्या वीर गावा विषयीच्या खास आठवणी सांगताना शरद पवार म्हणाले," मी माझ्या लहानपणी  अनेकदा या ठिकाणी आलोय. नातीगोती होती त्यावेळी येता आलं. आणि मला आठवतंय की वीरला या ठिकाणी त्या काळात आंब्याची झाडं फार असायची. त्यावेळेला आंबे खायला जाणं ही एक गोष्ट आम्हा लोकांची अत्यंत आवडीची असायची. "



वीर धरणासाठी  वीर मधील गावकऱ्यांच्या,नागरिकांच्या योगदानाबद्दल कौतुक करताना शरद पवार म्हणाले, "इथलं दुसरे वैशिष्ट्य असं आहे की, तुम्ही लोकांनी इथलं  धरण बांधलं आणि आज बारामती काय, इंदापूर काय किंवा पंढरपूर काय, फलटण काय या सगळ्या भागांमध्ये आज शेती संपन्न झाली. त्या शेतीचं मुख्य कारण इथल्या पाण्याच्या थेंब त्यांच्या शिवारामध्ये गेला आणि हे उपकार तिथल्या भागातल्या लोकांच्या कायम अंत:करणामध्ये आहेत. आज या कामाच्या निमित्ताने या ठिकाणी येता आलं याचा मला आनंद आहे."



 "हे मंदिर तुम्ही चांगल्या दृष्टीने बांधलं, त्याला स्वच्छ ठेवा, प्रसन्न वातावरण ठेवा, वृक्षवल्ली वाढवा आणि इथे आलेला प्रत्येक श्रद्धेय हा आनंदाने परत जाईल, विश्वासाने परत जाईल अशा प्रकारची खात्री या ठिकाणी आपण सगळेजण त्या भाविकांना द्या." अश्या शब्दात आपल्या भावना लोकनेते शरद पवार यांनी या कार्यक्रमात व्यक्त केल्या.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


याच कार्यक्रमात शरद पवार यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त परिस्थिती, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न यावर मनोगत व्यक्त करून, केंद्र सरकारच्या साखरेच्या,कांद्याच्या निर्यात धोरणावर टीका केली.




श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट,वीर संचलित सवाई मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा तसेच नियोजित विकास आराखडा(श्रीनाथ कॉरीडोर) चा भूमिपूजन सोहळा गुरुवारी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार  यांच्या शुभहस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


यावेळी बारामती लोकसभा खासदार सुप्रिया  सुळे,पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप, आमदार शशिकांत शिंदे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष माणिकराव झेंडे, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, माजी जि.प.सदस्य सुदाम आप्पा इंगळे, माजी जि.प.सदस्य बबुसाहेब माहुरकर, राष्ट्रवादी प्रवक्ते विजय कोलते, सर्व मान्यवर, वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ व सर्व विश्वस्त, सर्व सल्लागार,मानकरी,सालकरी,भक्त मंडळी व  ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment