Wednesday, August 16, 2023

"वेल्हे तालुक्यातील 'दापोडे गावचा' लोकांची मने जिंकणारा, आगळावेगळा, आदर्श उपक्रम; गावातील विधवा, परित्यक्ता महिलांना ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्याचा मिळाला सन्मान"...


पुणे, वेल्हे, दि.१६ : समाजात महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कितीही यशस्वी झाल्या तरी, आजही महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवरती शासनाचे व सामाजिक संस्थांचे प्रयत्न चालू असतात. 




पुणे जिल्ह्यातील, वेल्हे तालुक्यातील दापोडे या गावात 77 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील विधवा, परित्यक्ता महिलांना ध्वजारोहणाचा सन्मान देऊन, स्वातंत्र्य दिन उत्साहात, आनंददायी व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.




वेल्हे तालुक्यातील दापोडे ग्रामपंचायतीच्या  वतीने 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक आगळावेगळा, आदर्श उपक्रम राबविण्यात आला. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दापोडे गावातील विधवा, परित्यक्ता, महिलांच्या हस्ते सकाळी आठ वाजता, दापोडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये, देशभक्तीमय वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले.




यावेळी दापोडे गावचे सरपंच संदीप शेंडकर, वेल्हे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील सर्व परित्यक्ता,विधवा महिलांना साडी वाटप करून सन्मानित करण्यात आले. 





"गावातील विधवा, परित्यक्ता महिलांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचा सन्मान देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारा असा  चांगला, आगळावेगळा उपक्रम वेल्हे तालुक्यामध्ये प्रथमच राबवून समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न दापोडे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला." अशी प्रतिक्रिया दापोडे गावचे सरपंच संदीप शेंडकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




दापोडे गावच्या महिलांना सन्मान देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या, आदर्श उपक्रमामुळे दापोडेकरांनी वेल्हा तालुक्यातील लोकांची मने जिंकलेली आहेत.




महिला आरक्षण असो की महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असलेल्या संधी असो महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगले कार्य करत आहेतच,

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


परंतु समाजामध्ये महिलांना सन्मान देणारे असे आगळेवेगळे आदर्श उपक्रम राबवले तर निश्चितच महिला सक्षमीकरणासाठी एक चांगले पाऊल पुढे पडेल.




77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दापोडे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम देखील राबविण्यात आला. 




यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर, वेल्हे तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष आनंता शेंडकर, उपसरपंच साधू शेंडकर, सखाराम बोडके, माऊली शेंडकर, दौलत शेंडकर तसेच,




संतोष शेंडकर, पंकज शिवतरे, अशोक शेंडकर, शिवाजी शेंडकर, नवनाथ शेंडकर, प्रकाश यादव, कृष्णा मरळ, विनायक खैरे, दीपक धुमाळ, संतोष कांबळे, यासह दापोडे गावातील ग्रामस्थ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


1 comment: