Thursday, September 14, 2023

"मराठा आरक्षणासाठीचे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण १७ व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन मागे; मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे"



जालना,दि.१४ : मराठा समाजाच्या न्याय, हक्कांसाठी व आरक्षणापासून वंचित असणाऱ्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून  मनोज जरांगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात उपोषण चालू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थी नंतर, त्यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी फळांचा रस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे पाटील यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फळांचा रस पिऊन त्यांचं उपोषण सोडलं. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "माझ्यावर विश्वास ठेवा. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही" असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं. त्यामुळे जरांगे पाटील यांनीही जास्त आढेवेढे न घेता उपोषण मागे घेतलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री म्हणून तोंडभरून कौतुक केलं.




गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सातत्याने चर्चा सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारला काही दिवसांचा अवधी देण्याची तयारी दर्शविली.




त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार राजेश टोपे, मंत्री संदीपान भुमरे, आमदार अर्जुन खोतकर हे सर्वजण अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फळांचा रस पिऊन आपल्या उपोषणाची सांगता केली.




यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, "आज राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या उपोषणस्थळी आले आहेत. मराठा समाजाला एकनाथ शिंदेंच न्याय देऊ शकतात, ही माझी भावना आहे. ते आज इथे आलेत म्हणून मी ही गोष्ट म्हणत नाही. पण ते आरक्षण देतील, हा माझा विश्वास आहे. शासनाची मागणी होती की, आम्हाला एक महिन्यांचा वेळ द्या. आपण त्या पद्धतीने एक महिन्यांचा वेळ दिला आहे. ३१ व्या दिवशी सरकार आपल्या मराठ्यांना कुणबी दाखले देईल, असा विश्वास आहे."असे मनोज जरांगे यांनी म्हटले.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आल्यावर जरांगे पाटील यांचे वडिलही मंचावर आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांची ख्यालीखुशाली विचारली. मनोज जरांगे पाटील यांना फळांचा रस दिल्यावर मुख्यमंत्र्यानी जरांगे पाटलांच्या वडिलांनाही फळांचा रस दिला.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"मराठा आरक्षणाची लढाई यशस्वी केल्याशिवाय मी माघार घेणार नाही. माझा बाप अजूनही कष्ट करतो, मी त्यांच्या कष्टाची जाणीव ठेऊन मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप मी कधीच सहन करणार नाही, असं सांगताना मराठा समाजबांधवांनी कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.




मुख्यमंत्री  एकनाथ  शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन  मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, चर्चा केली. 


यावेळी त्यांनी  मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलकांच्या बहुतांश मागण्यांबाबत शासन ठोसपणे कार्यवाही करत असल्याचे सांगितले. ‘सारथी’ तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाशी संबंधित मागण्यांवर तातडीने कार्यवाही केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.




मुख्यमंत्र्याच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मनोज जरांगे पाटील  यांनी अखेर आज उपोषण सोडले आहे. मात्र असे असले तरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. "मी समाजाच्या हिताचाच निर्णय घेईन. मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईन आणि तशीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचीही आहे. असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.




"मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलन शांततेत करायचे आहे. हे आरक्षण मिळवल्याशिवाय मी मागे हटणार नाही, मराठा समाजाला एकनाथ शिंदेच न्याय देवू शकतात असेही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


मराठा आरक्षणाचा लढा राज्यभर आंदोलन, उपोषणाच्या माध्यमातून तीव्र होत चाललेला आहे. यामुळे सरकारने गांभीर्य घेऊन सुप्रीम कोर्टात टिकणारे, कायदेशीर भक्कम आधार असणारे मराठा आरक्षण देणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा राज्यातील मराठा समाज व्यक्त करत आहे.


No comments:

Post a Comment