पुरंदर, वीर, दि.२६ : पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, तीर्थक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर नेहमीच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते.
आजी आजोबा व नातवंडांमधील प्रेमाचे नाते समृद्ध करणारा "आजी - आजोबा दिन" जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर येथे सोमवारी अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
आजी - आजोबा व नातवंडांमधील बंध अधिक घट्ट होण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर मधील विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांवर फुले उधळून त्यांचे स्वागत केले. आजी आजोबांच्या चरणांवर फुले वाहून व त्यांना औक्षण करून आजी-आजोबांप्रती आपले प्रेम व्यक्त केले.
शाळेने आजी-आजोबांसाठी संगीत खुर्ची व फुगे उडवणे या मनोरंजक खेळाचे आयोजन केले.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
आजी - आजोबांनी देखील या मनोरंजक खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या खेळाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमामध्ये माधवी धुमाळ, शोभा धसाडे, विमल मोरे या आजींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या आगळ्यावेगळ्या "आजी - आजोबा दिन" कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आजी आजोबा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रेणुका मस्के यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शुभांगी मर्ढेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक संजय कुंजीर यांनी केले.
"विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी आमच्या शाळेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो." अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीरचे मुख्याध्यापक संजय कुंजीर यांनी दिली.
आजी - आजोबा व नातवंडांमधील प्रेमाचा बंध फुलवणारे, समृद्ध करणारे असे दिन साजरे होणे गरजेचे आहेत.
No comments:
Post a Comment