पुणे, दि.२२ : पुण्यातील अरण्येश्वर नगर, तावरे कॉलनी येथील प्रसिद्ध एकता मित्र मंडळाने "बाप्पाला पुस्तकांचा नैवेद्य व अनोखे विज्ञान प्रदर्शन" या आदर्श उपक्रमांमुळे गणेश भक्तांची व पुणेकरांची मने जिंकली.
श्री गणेशा विद्येची देवता आणि पुस्तके हे विद्येचे, ज्ञानाचे माध्यम आहे. पुस्तके छोटी असली तरी संपूर्ण जग त्यात सामावलेले असते. अशी ही पुस्तके आपली ज्ञानाची भूक भागवतात. गणेशोत्सव मंडळे नेहमीच अनेकदा अन्नकोट करत असतात.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
पण यावेळी व गेली अनेक वर्षे जय गणेश व्यासपीठ, पुणे शहर यांच्या वतीने हीच ज्ञानाची भूक भागवण्यासाठी "पुस्तककोट" उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे पर्वती विभागातून एकता मित्र मंडळाने या उपक्रमात सहभाग घेतला आणि अनेक स्थानिक नागरिकांना या उपक्रमात सहभागी होत, लहान मुलांसाठी वेगवेगळ्या विषयांची, गोष्टींची, सामान्य ज्ञानाची पुस्तके एकता मित्र मंडळाच्या लाडक्या बाप्पाला पुस्तकांचा नैवद्य म्हणून अर्पण केली.
स्थानिक मा. नगरसेविका अश्विनी नितीन कदम व सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम यांनी वेगवेगळ्या विषयावरील ३०० पुस्तके, यशातारा सोसायटीमधील अनंतकाका वाघ १०० पुस्तके, अशोक बाणखेले, धमेंद्र बानगुडे, शिवाजी अमराळे, अविनाश खंडागळे, महादेव ढमाले, शेखर मिरघे, मस्जिद शेख, अनिल ढमाले, मंगेश भुजबळ, अमोल जाधव,
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
ऋषिकेश पांढरकामे, सुधीर ढमाले, विनायक इंगवले, जयेश ढमाले, हिरेन गायकवाड, शुभम बाणखेले, योगेश मांढरे, संकेत मिरघे, गणेश खाडे, सनी तिवाटणे, आशुतोष अमराळे, दुर्वांकुर ढमाले, आदित्य मिरघे, चैतन्य ढमाले, यश चावट, केशव अमराळे, संकेत आढाव, मानव बाणखेले, आदर्श चावट, प्रथमेश शिंदे, दर्शन खंडागळे, हर्षद खंडागळे, हेरंब ढमाले, आदिनाथ नाईक, सोमनाथ नाईक, तेजस पवार या सर्वांनी पुस्तके अर्पण करून बाप्पाला नैवद्य अर्पण केला.
एकता मित्र मंडळ व ज्ञान प्रबोधिनी यांच्या माध्यमातून गुरुवारी सायं ७:०० ते ९:०० या वेळेमध्ये "विज्ञान प्रदर्शन" (उष्णता आणि इलेक्ट्रॉन व विविध विषयांवर ४०-५० प्रयोग व प्रकल्पांसह) आयोजित करण्यात आले होते.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत उपलब्ध सर्व प्रयोगांविषयी सखोल माहिती व प्रश्न विचारत प्रदर्शनकर्त्या सर्व युवकांचे कौतुक केले.
विशेष म्हणजे लहान मुला मुलींनी मोठ्या संख्येने आवडीने पूर्णपणे विज्ञानाची सफर केली. यावेळी पुणे मनपाचे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री. नरेंद्र व्यवहारे यांनीही या प्रदर्शनाला भेट देत, "असे स्तुत्य उपक्रम गणेशोत्सवात होत आहेत आणि हे समाजासाठी आवश्यक आहेत... हे नाविन्यपूर्ण कार्य आहे." असे म्हणत एकता मंडळाचे व ज्ञान प्रबोधिनीचे मनभरून कौतुक केले.
जय गणेश व्यासपीठासोबत संलग्न असलेली वेगवेगळ्या भागातील अनेक मंडळे एकाच दिवशी बाप्पांच्या चरणी पुस्तककोट करत असतात आणि त्यानंतर बाप्पाचा आशीर्वाद व नैवद्य म्हणून या पुस्तकांचे गरजू, वंचित, शहर, ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांमध्ये वाटप करण्यात येणार आहे आणि तसेच श्रींची आरती झाल्यावर मंडळातील स्थानिक सर्व लहान मुलांना बाप्पाचा नैवद्य म्हणून पुस्तके वाटण्यात आली.
"एकता मित्र मंडळ दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून पुणेकरांची सेवा करत असते. यावर्षीही आमचे मंडळ शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. कृपया आमच्या मंडळाच्या श्रींच्या दर्शनाला येताना हार व फुले सोबत आणण्यापेक्षा एक वही व पेन बाप्पांच्या चरणी अर्पण करावे. सदर शैक्षणिक वस्तू गरजू विद्यार्थ्यांपर्यंत अवश्य पोहचविण्यात येतील." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व या मंडळाचे कार्यकर्ते सुधीर ढमाले यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
पुण्यातील प्रसिद्ध एकता मित्र मंडळ वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून नेहमीच लोकांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. या वर्षीच्या मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमाचे व आगळ्यावेगळ्या "शैक्षणिक उपक्रमरुपी नैवेद्याचे" पुणेकरांनी कौतुक केलेले आहे.
No comments:
Post a Comment