Thursday, January 25, 2024

"मराठा आरक्षणासाठी पुणे शहरात ऐतिहासिक पदयात्रेत लाखो मराठा आंदोलकांचा महाप्रलय, लाखो मराठा तरुणाईचा बुलंद आवाज पुण्यात घुमला; ऐतिहासिक पदयात्रेत बैलगाडीवरून येणाऱ्या मराठा आंदोलकांचा सरकारला "हा" गर्भित इशारा"...


पुणे,दि.२५ : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे क्रांतिकारी आंदोलन राज्यात चालू आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईला निघालेली मनोज जरांगे-पाटील यांची ऐतिहासिक पदयात्रा लाखो मराठा आंदोलकांच्या उपस्थितीत बुधवारी शहरात १० तास सुरू होती.



मराठा समाजाचा महाप्रलय या ऐतिहासिक पदयात्रेत पुणे शहरात दिसून आला. नागरिकांकडून होणारे स्वागत, बघ्यांची गर्दी यामुळे पदयात्रा निघालेल्या रस्त्याला पालखी यात्रेचेच स्वरूप आले होते. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


प्रचंड गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. मात्र, रस्त्याची एक बाजू मोकळी ठेवून आंदोलक व त्यांची वाहने जात असल्यामुळे शिस्तीचेही दर्शन पुणेकरांना घडले. 



वाघोलीवरून सकाळी ११ वाजता निघालेली ही पदयात्रा रात्री ९ नंतर शहरातून लोणावळ्याकडे रवाना झाली. नियोजित मुक्काम लोणावळा शहराजवळील वाकसई चाळ येथे नियोजित असल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी १३० एकरचे, तर वाहनतळासाठी १५० एकरचे मैदान तयार करण्यात आले.



घराघरांतून प्रत्येकी २५ चपात्या, चटणी लोणावळा, मावळ तालुक्यातील आंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ, कामशेत, वडगाव, तळेगाव या भागामधून घराघरांतून प्रत्येकी २५ चपात्या व चटणी तयार केल्याचे नियोजन करण्यात आले.   

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"मराठा आरक्षणाचा आमचा निर्धार पक्का आहे त्यामुळे आम्ही वाहनांमधून महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य आणि साहित्य घेऊन निघालो आहोत. त्यात स्वयंपाकासह कपडे, चादरी यांचा समावेश आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसून मराठयांचा वाघ मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण घेऊनच परत येणार,’ असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झालेल्या मराठा आंदोकांनी केला आहे. 


धाराशिव, नाशिक, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमधून अनेक मराठा समाज बांधव पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.  



आता आरक्षण घेऊनच मागे येणार असल्याचे अनेक मराठा आंदोलकांनी सांगितले. शेतातील कामे उरकली आहेत. जी काही थोडी कामे शिल्लक आहेत, त्यांची जबाबदारी घरातील महिलांवर सोपवल्याचे त्यांनी सांगितले. 


या ऐतिहासिक पद यात्रेत बैलगाडीवरून येणाऱ्या मराठा आंदोलकांनी ही विशेष लक्ष वेधून घेतलेले आहे. पेट्रोल लय महाग झालंय. आता वाहनाने मुंबईला जाणं शक्य नाही म्हणून आम्ही आमच्या बैलगाडीसोबत मुंबईकडे जातोय. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मंत्रालयाच्या समोरच बैलांची खुंटी बांधणार आणि शेणाच्या गोवऱ्या तिथल्या भिंतींवर थापणार,’ असा इशारा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे बैलगाडीतून निघालेल्या मराठा आंदोलकांनी दिला आहे. 


मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो लोकांनी बुधवारी पुण्यातून मुंबईकडे प्रचंड उत्साहात कूच केले. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथून निघालेली मनोज जरांगे पाटील यांची ऐतिहासिक पदयात्रा पुणे शहरातून  पहाटे पावणे सहाच्या सुमारास भक्ती शक्ती चौक निगडी येथे पोहोचली. यावेळी लाखो मराठा आंदोलकांचा  उत्साह दिसून आला.  मराठा समाजाच्या आंदोलकांनी रात्र जागून काढली.


पिंपरी - चिंचवड मधील सांगवी फाट्यावर  बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शहरांमध्ये मनोज जरांगे पाटलांची पदयात्रा पोचली होती. सांगवी फाटा, पिंपळे निलख चौक, जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, थेरगाव, बिर्ला हॉस्पिटल चौक, चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन, काळभोर नगर, आकुर्डी, खंडोबा माळ चौक, टिळक चौक, शहराच्या सीमेवर भक्ती - शक्ती चौक मार्गे शहरात पोहोचली. 



मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी काढलेल्या मुंबई पदयात्रेस पिंपरी - चिंचवड शहरात अलोट गर्दीने प्रतिसाद दिला. रात्रभर पदयात्रा मार्गावर लाखोंची गर्दी झाली होती. भक्ती - शक्ती चौकामध्ये पदयात्रा गुरुवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास पोहोचली.



"कोण आला रे कोण आला मराठ्यांचा वाघ आला..., जय भवानी जय शिवाजी... एक मराठा लाख मराठा" अशा घोषणा देण्यात आल्या आणि मनोज जरांगे पाटलांचे आगमन झाले. जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ही पदयात्रा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी रात्र जागून काढली.



पुणे शहरातील लाखो मराठा समाज बांधवांचा ऐतिहासिक पदयात्रेतील सहभाग मनोज जरांगे पाटील यांची ऊर्जा वाढवणारा होता. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment